मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

शरद पोंक्षे ह्यांनी लिहिलेला लेखाला उत्तर

बरेच दिवस झाले एक ब्लॉग सारखा मला येत होता , शरद पोंक्षे ह्यांनी लिहिलेला लेख . मला अभिनेता म्हणून नितांत आदर  आहे, टिव्ही असो नाटक असो गुणी कलाकार, पण तो लेख मला झेपला नाही. नशिबाने  माझ्या बहिणीशी बोलताना लक्षात आलं कि तिला हि माझ्या सारखच वाटलं, म्हणजे काही लोकांना खटकलं असेलच ना? म्हणून माझं हे मत मांडतो आहे. 

म्हणजे मला थूनकू नको सांगतोस? अंघोळ कर म्हणतोस? अंगण साफ ठेव सांगतोस ? नाही करत जा आधी माझ्या बाजूवाल्याला सांग तो पण अंघोळ नाही करत दाढी पण नाही करत कचरा पण नाही काढत. आहे हिम्मत त्याला सांगायची ? मग ? चूप बस मी घाण करणार आवाज करणार ..... हे एकदम असं . म्हणजे नक्की म्हणणं काय आहे पोंक्षे ह्यांचं? आपण आवाज करत राहायचं? झाड कपात राहायची? पाणी दूषित करत राहायचं? पर्यावरणाची वाट लावत राहायची? कुणी बकरा कापतो म्ह्णून आपण झाड कापायचं? तलावात plaster of paris चा गाळ करायचा? तो वेडा म्हणून आपण सात वेडे होऊन दाखवायचं? त्यानं काय होईल? तुम्ही शहाणे आहात ना? मग वेड होईच हट्ट का? आणि कश्यासाठी?

बकरा मारणं आणि हरण (का काळवीट?) मारणं ह्यात  फरक नाही? बकरे खाण्यासाठी पाळतात तो अजून तरी extinct घोषित केला नाहीये आणि बोकड आपण पण मारतोच कि (अगदि सर्रास) आणी खातो सुद्धा आणी  हे म्हणजे जैन लोकान सारखय ह्या दिवसात कुणी अमुक खाऊ नका तमुक खाऊ नका, उद्या कांदा वर्ज करतील, चक्कर येऊन पडला माणूस तर त्याला काय भेंडी लावायची नाकाला?  हा सगळाच अतिरेक. त्यांने केला न?मग  मी पण करणार  हा हट्ट मला विचित्र वाटतो. 

तेव्हा पण बकरा कापायचे आता पण तोच कापतात आणि तुमच्या घरी आणून तरी कापत नाहीत ना  अजून तरी? आता पोंक्षे वाचन वगैरे करत असतील, म्हणजे करतात असं वाटत .  टिळकांनी जेव्हा गणपती उत्सव साजरा करायचा ठरवल त्या काळी आणि हल्ली  जो घाट घालतात त्यात फरक त्यांना जाणवत नाही का? शाडू ची मूर्ती वापरा  गोंगाट करू नका हे सांगणं गैर ते कस? मिरवणुकीत दारू पिऊन झीनघाट घालणं हे सांस्कृतिक कस?  सैराट होऊन धिंगाणा घालणं धार्मिक कस? त्याचा धर्म वाईट म्हणून माझा चांगला, हे logic मला पचायला जड आहे (एक वेळ बकरा पचेल).

हल्ली माझा धर्म कसा पहिला येईल ह्या स्पर्धेत का असतो आपण? त्या पेक्षा olympic मध्ये पाहिलं यायला झटा न. आपल्याला ठाऊक आहे न कि आपला धर्म स्तुतनीय वंदनीय आदरणीय आणि पालनीय आहे , अरे पण ठीक आहे.  लोकांना का टाहो फोडून सांगायचं कि तुम्ही अस करता? बघा मी कस  करतो ते, म्हणून माझा  धर्म  जास्त मोठा आणि चांगला मला नका शहाणं पण शिकवू .

आमच्या कॉलेजात एकदा एका मुलाला काही तरी चोरी करताना पकडलं, त्याला मग दम  देऊन सोडल, त्याच्या मित्रान पैकी कुणीतरी सांगायला गेलं त्याच्या आईला कि काकू अस  झालं म्हणुन, तर त्या बाई ह्या मुलांनाच ओरडायला लागल्या, तुम्ही कस बंक करता पिक्चर बघता आणी तो तुमचा मित्र सिगारेट ओढतो!  वाह सांगू का तुमच्या घरी, चालते व्हा .आत्ता 20 वर्ष नंतर  तो मुलगा काय करतोय हे सांगायला नकोय. पोंक्ष्याचा असं काही तरी होतंय असं वाटतंय मला.  म्हणजे मला नका सांगू मी काय करायचं ते तुम्ही बकरा कापायचं थांबवा (अरे तुम्ही नको खाऊ  आम्ही खातोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ?) . फार तर पहाटे बांग  नका मारू हे ठीक आहे .  आपल्याला त्रास होत असेल तर बोला 

थोड  हास्यास्पद वाटतंय ते म्हणजे वाघ आणी  बकरा ह्यांची  तुलना केली आहे, त्यांनी चक्क  असं लिहिलंय कि वाघ मारू नका अस म्हणताय ना? मग बकरा मारू नका अस म्हणा. हे थोडं अति आहे. 

मी पोंक्षे  ह्यांच्याशी अजिबात सहमत नाहीये, हिंदू धर्मा बद्दल लिहिण्याची ही वेळ नाही आणि दाभोळकर ह्यांच्या संस्थे विषयी सुद्धा नाही, मी नक्की लिहीन, पण तो खूप विशयनंतर होईल सध्या मला फक्त एवढच म्हणायचं आहे कि धर्म  ह्या नावाखाली जो बाजार आपण हिंदूंनी  मांडलाय तो आपणच थांबवू शकतो 40 फूट मूर्ती आणली म्हणजे काय तो माझ्या पेक्षा  उंच कोटींचा हिंदू होत नाही, खूप गोंगाट करून आणि 100 स्पीकर्स लावून मिरवणूक काढली म्हणजे माझा धर्म  जास्त मोठा होत नाही, दही हंडीच्या उंचीवरून  माझी श्रद्धा खुजी होत नाही. धर्माचं  पाश्चती करण जे चालवलं आहे ते थांबवा, कोणत्या ग्रंथा मध्ये असं गणपतीच्या मूर्ती ची उंची म्हणा कि  आवाज म्हणा  असे तपशील असतील तर मला कृपा करून  दाखवा मी सुद्धा पुढच्या वर्षी एक मोठा स्पीकर चा खर्च स्पॉन्सर करेन ....

तो वर कृपा करून शांतता राखा               

सागर कुलकर्णी