मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

एक सत्यकथा

एक  सत्यकथा   

हल्ली जे काही गाजतंय म्हणून मला एक घटना आठवली , मला कुणी तरी सांगितलेली....जशी सांगितली तशीच लिहित आहे...

"मी आधी एका क्लासेस  मध्ये शिक्वायची ,  कॉलेज मधली मुल मुली होती सगळी  , तिथे एक गोड चुणचुणीत मुलगी यायची छान  होती तरतरीत, सरळ नाक, छान  केस..मला आवडायची ...मला एकदा आमच्या एका पिउन ने तिच्याशी गप्पा मारताना पाहिलं आणि मला म्हणाला "बाई जास्त बोलू नका तिच्याशी चांगली नाही ती " असा मला आणखी कुणी सल्ला दिला , माझ्या लक्षात आल कि ती नेहमी मुलान मध्ये जास्त असते, मुली तिला टाळतात , पण मी मात्र कुणाच ऐकल नाही , मी बोलायची , तिला बर वाटत असेल कदाचित , ती खूप बोलायची.

एकदा बस मध्ये मला "मी बसू इथे " अस विचारल कुणी तरी  , बघते तर हीच , अरे बस न , मी म्हंटल , डोळे लाल वाटले  मला , मी काही बोलले नाही तीच बोलायला लागली , "बाई मी का येते माहिती आहे शिकायला? मला न ह्यातून बाहेर पडायचं नोकरी करायची आहे म्हणून शिकते त्रास होतो कधी कधी, मन मेलय म्हणा पण तरी सुधा कधी काहि झाल, घडल कि निराश होइला होत, पण जिद्द नाही सोडत पुन्हा अंग झटकून सुरु होते  ".

पुढे तिने मला जे सांगितल ते ऐकून मी सुन्न झाले . त्या मुलीच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता , वडील भावाला घेऊन गेले आणि मुलगी म्हणून आई कडे हिला ठेवल , आई ने दुसर लग्न केल आणि तेव्हा ही लहान होती खूप , पण तिला काय ते फार अवडल न्हवत जशी मोठी होऊ लागली त्या सावत्र बापाची नजर तिला बोचायला लागली आणि एक दिवस त्याने जे नाही करायचा ते केल , रडली खूप आई आली तेव्हा आई कडे रडत गाऱ्हाणं सांगितल तिला वाटल आता आई त्याला हाकलून लावेल आपण दोघीच राहू आनंदाने , पण झाला भलतच आई हिलाच ओरडली आणि बदडून काढल , बापाची तक्रार करते म्हणून आणि मग तर आई सांगायला लागली जा बोलावतो आहे. हे अस अनेक वर्ष सुरु आहे, म्हणजे ती वयात आल्या पासून.

लहानग्या वयात एवढा आघात सहन करायचा म्हणजे?   पण ती म्हणाली मला हे नॉर्मल वाटू लागल बापाच प्रेम मिळालंच न्हवत त्या मुळे  हे असच असेल अस वाटू लागल , आता तर हे एक काम आहे अस वाटतंय म्हणाली , मन साफ मेल कसल काही वाटत नाही अस म्हणाली . पण बाई मला ह्यातून बाहेर पडायचं असेल तर रडून कस चालेल? मी शिकणार नोकरी करणार चार पैशे आले कि आधी घर सोडणार कुठे हि राहेन कहि खाइन , जगात आणखी त्रास काही होऊ शकेल का मला? जन्म दाती आई जर वैरी असेल तर काय त्रास होणार बाकीच्यांचा ? 

मी त्या दिवशी खूप बेचैन झाले त्याच बस ने उलटी घरी आले आणि विचार करत बसले , ती प्रेम शोधत फिरते आहे म्हणून कुणाशीही बोलते , मुलांना काय  तेच हव असत , तिला घरात जाईला  आवडत नसे , म्हणून मुलान बरोबर हिंड, इथे जा तिथे जा अस करत फिरे. लोकांनी मात्र किती वेगळा अर्थ लावला होता.

काहि कारणाने मी शिकवायचं बंद केल , म्हणून तिचा संपर्क नाही राहिला त्या काळी सेल फोन न्हव्ते आणि मला एक दिवस कळल कि तिने आत्महत्या केली दिवाळीच्या पणतीने  पेटून घेतल  स्वताला ...

माझा विश्वास बसेना कारण हे अशक्य होत, इतकी वर्ष जिद्दीने लढलेली मुलगी अशी आत्महत्या नाही करणार , खूप विषण्ण वाटल मी तिला मदत नाही करू शकली हेही खुपत राहील . पुढे तिचा खून केला होता तिच्याच आईने आणि त्या माणसाने म्हणून त्यांना अटकही केली ....पण त्याचा काय उपयोग?  कुंपणच शेत खात म्हणजे काय ते मला तेव्हा कळल ".







बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

जय हिंद .

15 ऑगस्ट 2012

आज सुट्टी आहे , हल्ली स्वातंत्र्य  दिन म्हणजे एक सुट्टी म्हणूनच बघतो मी पण. 

 facebook  वर सगळ्यांनी भारतीय असल्याचा अभिमान वगेरे लिहिलंय , गम्मत वाटली,  सारख सांगाव लागत , हल्लि mothers day ला सख्या आईला मला "तू खूप आवडते " "I  Love You " अस लोकांना सांगत फिरायचं , मी आज पर्यंत चाळीस वर्षात एकदा पण आई ला अस नाही सांगीतल , म्हणजे मी वाईट मुलगा आहे का?

तसच मला हल्ली जाणवत , सगळा खोटे पणा . परवा त्या दंगे खोरांनी अख्या मुंबईस दोन तास वेठीस धरल , काहीही होऊ शकल असत त्या मध्ये चार  कसाब असते तर? असतील ही वेळ आली कि कळेल . किती नुकसान केल आणि ह्याची भरपाई मी आणि तुम्हीच करणार न? पण काही होत नाही, कसाब  जिवंत आहे विलासराव गेले ....सोश्लीस्त लोक गप्प , शबाना , महेश भट , तिस्ता आणि अशे बरेच बुद्धी किवी , कीव कारवाई अशी बुद्धी आहे ह्यांची ...

परदेशी राहणाऱ्या आणि स्थाईक झालेल्यांनी मला भारत किती आवडतो अस आवर्जून लिहिलंय आज...आणि मी काय बोलणार , हा खोटेपणा आहे न? हल्ली जगच खोट्याचं आहे ...निस्वार्थ काही नाही.. प्रेम हि नाही, म्हणून सख्या आईला सारख सांगाव लागत ....मला तू आवडते म्हणून ....आणि देशाला पण कि मला अभिमान आहे तुझा ...

आपण त्या पेक्षा एक संकल्प सोडूया की ह्या दिवशी देश करता काही तरी एक गोष्ट करूया, मग ती दिवस भर traffic signal पाळण असो की रस्त्यात कचरा न टाकण असो, हे फुटकळ वाक्य नकोतच. नुसता झेंडा लाऊन कुणी देश भक्त नाही होत शरीरा भोवती गुंडाळून चितेवर जाईला  हव ....तो झेंड्याचा मान ...

65 वर्ष झाली तरी आपण अजून गुलामीत जगतो , इंग्रजीची तर प्रचंड गुलामी , खाण्याची गुलामी, विचारांची गुलामी सगळीच  गुलामी आणि तरी आपण त्याच काहीच करत नाही. आपण पुढाऱ्यांच कौतुक करतो सैनिकांचं नाही करत, कारण आपल्या पुस्तकात सैनिकांचं कमी आणि पुढाऱ्यांच जास्त लिहिलेलं आहे.. 

आपण खरच स्वतंत्र आहोत का ? सहा पदक मिळाली म्हणून खूप खुश झालो, अरे पण लोक संख्या किती? पदक किती? जी मिळाली ती पण त्या सार्यांच्या स्व कष्टाने सरकारच काही अनुदान नाही कि मदत नाही, तरी आपल्या कडे दिव्या खाली बसून अभ्यास करण्याची प्रथा आहेसच तीच लोक खूप पुढे गेलीत.

चीन म्हणे लहान मुलांना प्रशिक्षण देत त्रास देत म्हणून त्यांना इतकी पदक अरे मी म्हणतो आपल्याकडे काय कमी गरीब लोक आहेत त्यांना  उचला आणि शिकवा दोन वेळ खाईला द्या मिळवा पदक, भिकारी होऊन मारण्या पेक्षा, किमान खाईला तरी मिळेल त्यांना ...

शेवटी काय तर एक दिवस सुट्टी मिळाल्याचा आनंद घायचा T V पहायचा आणि मस्त झोप काढायची देश काय माझ्या वर अवलंबून नाही.. 

जय हिंद .





शनिवार, ११ ऑगस्ट, २०१२

आशा....

हल्ली सगळच बदलेल आहे, चांगली माणसं असतात न? ती बावळट आणि बदमाश माणस successful   असा नियम. माझी boss (खवीस आहे, का हडळ?) म्हणते लोकांना झाप, ओरड दम भर, म्हणजे लोक काम करतील. मला जमत नाही, मी माणूस शोधतो हो, साफ चुकतो, तीच (माझी boss)बरोबर आहे लोक चांगली माणस ह्यांना उल्लू समजतात, म्हणजे मी लोकांना समजून घेतो, सगळे मला फसवायला बघतात. मी नाही बदलणार एक दिवस (आत्ता नाही तर १०० वर्ष नंतर तरी?) मी बरोबर आहे हे कुणाला तरी पटेल.
काल दही हंडी होती, आधी दुपारी सगळं समपुन जाईच हल्ली  दुपारी सगळ सुरु होत. आमच्या दत्तापाड्याला तीन हंड्या लागायच्या दुपारी साधारण दोन अडीच पर्यंत सगळ संपायच आणि काल मी साडेसात ला परत आलो (रात्री)तरी लोक जमा होती  आणि कुणी तरी गाण म्हणत होत दही हंडी तशीच (आंबट झाल असेल दही) लटकत होती, सगळं नंगा नाच चाईला. मोठे बंनेर्स मोठी नाव आणि काय हवंय? मला परवा थोडा रस्ता नीट दिसला, काल समजल दही हंडी बांधली तिथे रस्त्यावर डांबर टाकल होत, मला किळस आली. ह्या लोकांना रात्री झोप लागत असेल?
मला तर हल्ली सण आले कि धडकी भरते, गणपती म्हणजे काय विचारूच नका, नवरात्र तर सगळी गम्मत. अरे ह्यात देव कुठे संस्कार कुठे? लोक काय पण करतात, सिधीविनायाकाला चालत शिर्डीला चालत, त्याने काय होणार? सगळे साले स्वार्थी... आज तर कहर झाला एका माणसाने रस्त्यात मधेच गाडी थांबून गप्पा मारल्या कुणाशी तरी मागे traffic आहे हे न जुमानता एक दहा सेकंदात त्याच्या समोर एक माणूस थांबला तर ह्या माणसाने होर्न मारून त्याला हैराण केल, भांडला, किती स्वार्थी पणा, म्हणजे कळतंय , कळतंय बर का पण वळून नाही घ्यायचं.
फाशीच द्या प्रत्येक गुन्ह्य करता द्या एक तरी फाशी लोक घाबरतील, मी मूर्ख आहे चांगुल पणा वगेरे काही नसत, सगळे स्वार्थी. हल्ली तर खोट बोलण्याची fashion  आहे, म्हणजे उगाच खोट बोलायचं, अरे का कशाला ? मी बोलतो खोट चूक आहे पण नेहमी नाही, हे म्हणजे कुणाला तरी आपण हॉटेल मध्ये  भेटलो आणि तो म्हणाला कि अरे पुस्तक बदलायला आलो होतो... गम्मत आहे, सगळी नाती विस्कटली आहेत, प्रेमाचा, धर्माचा गैर वापर ...
कधी कधी येत नैराश्य, मग मुलगीच माझी काही तरी निष्पाप पणे बोलून जाते...तिला टोकाव वाटत, मग वाटत राहूदेत तीच घडवणार न पुढला भारत ?  अजून आशा आहे खोटी का होईना? आहे आशा....





शनिवार, ९ जून, २०१२

मी एक पंच्याहत्तर टक्के !!!!

मी एक पंच्याहत्तर टक्के !!!!

मी कायम ह्या अश्या चौकटीत अडकलो "पंच्याहत्तर टक्के", म्हणजे माझ्या मागे खूप मुल होती पण पुढे पण थोडी होती, त्यांना मी मागे नाही टाकू शकलो, नाही म्हणायला एकदा एका प्रोग्राम मध्ये पहिला आलो होतो पण ते तेवढंच. कधी तरी एखादी क्रिकेटची म्याच झिन्कून दिली असेल नाहीतर नाटकात केलेल्या कामच कौतुक, म्हणजे सगळ्यात छान तूच अस म्हणायचे प्रसंग तसे तुरळकच. मला वाटत नंतर नंतर मी स्पर्धे मध्ये भाग घेणाच बंद केल, म्हणजे मनाने, सारख काय हरायचं? पण का हो माझ्या सारखी मांस असतीलच न? मी कधी खूप सिगरेट  नाही  की कधी खूप दारू   नाई ढोसली.

पूर्ण विराम पर्यंत मी गोष्टी नाई  नेल्या, सगळच अर्धवट. म्याराथोन धावलो तरी तेच, म्हणजे ठीक ठाक तक्रार नाही, पण शाबासकी पण नाई. नोकरीत पण तेच, काम छान पण अप्रतिम नाई, संसार ठीक अगदी वाईट नाई पण अगदी आदर्श पण नाई, दिसायला पण चार चोघांसारखा (जरा बरा), पण खूप देखणा नाई. सगळच पंच्याहत्तर टक्के. मी रोज धावतो ते पण तसच, चार लोकांपेक्षा जास्त धावतो पण एक दोघ माझ्या पेक्षा जास्त वेळ आणि जास्त जोरात धाऊ शकतात. स्वयपाक छान करतो पण बोट चाटत राहण्या सारख नाई आणि टाकाऊ पण नाई. गाडी आहे चांगली आहे, मला उपयोगी आहे, पण चार लोक वळून बघतील अशी नाई.


पण जर माझ्या सारखी माणस नातील तर? हुशार आणि ढ मुलांच्या मधली दरी भरून कुणी काढली असती?

 
मला अस वाटत न, कि मी खूप पुढे नाई जाऊ शकणार, म्हणजे माझ्या कुवती पेक्षा शिक्षणा पेक्षा नक्कीच जाईन पण वर पर्यंत नाही जाणार , काम पण तसच..... चांगल मेहनत खूप सारी पण निकाल पुन्हा
पंच्यात्तर टक्के
पण हे जग चालत माझ्या सारख्यान मुळेच, सगळेच १०० टक्के कशे चालतील ते कुणाला काम देतील? कुणाला शिकवतील? कुणाला ओरडतील? कुणा कडून काम करून घेतील आणि सुधारतील?
 
म्हणून मी खुश असतो जग माझ्या मुळेच चालत .....


शुक्रवार, ८ जून, २०१२

जात पात

जात पात 

मला लोक नेहमी विचारतात कुलकर्णी म्हणजे? "CKP" सारस्वत का ब्राह्मण? मी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण सांगतो (कारण येजुर्वेदी  पण असतात देशस्थान मध्ये), मला खूप अभिमान आहे मी ब्राह्मण असल्याचा जसा मी मराठी असल्याचा आहे मी भारतीय असल्याचा आहे तस.  मला तर माझ्या मोठ्या नाकाचा, एक रूम किचन घराचा, माझ्या साध्या शाळेचा, मी केलेल्या प्रेमाचा सगळ्याचाच अभिमान आहे.ला
मला  न खूप सारी वर्ष  माहित  सुधा न्हवत  कि ब्राह्मण म्हणजे काय महार म्हणजे   काय  ते? कळल ते "मंडळ" आणल तेव्हा मी कॉमर्स वाला त्या मुळे आरक्षण चा फटका मला न्हवता लागला, पण प्रचंड नीच पणा आहे ते समजल, पण तरी मी कधी कुणाचा द्वेष नाही केला, अजून नाही करत अजून मी कुणाला तुझी जात काय अस नाही विचारात?
हल्ली फार झालंय हो जात पात, प्रेम करताना बघत नाहीत, पण लग्न करताना पाहतात, छळ करतात, तेव्हा मला प्रचंड राग येतो, काहीच अर्थ नाही ह्याला. माणूस महत्वाचा न? मला तर कितेक वर्षाने माझ्या मित्रांची जात समजली, एक मित्र होता (होता....), एकदा तो कॉलेज मधून तीनशे रुपये घेऊन आला. मलाच कळलंच नाही, मला म्हणाला कि तो SC  ST  आहे तेव्हा कळल कि तू SC का ST  आहे ते समजल, त्याला रिफंड मिळाला होता, गरीब मुल बिचारी सगळे पैशे भरायचे आणि हा श्रीमंत मुलगा (कारण त्या काळी १९८७ साली बाईक आणायचा आणि गळ्यात सोन्याची चैन घालायचा)  सगळी फी घेऊन मजा मारायचा, बापाला कुठे माहिती होत? तो कस्टम मध्ये लोडर होता एवढा पैसा कसा  हे मला माहित नाही :). 
 
साठ टक्क्याला मेडीकल ला admission  आणि आम्हाला नौवाद टाक्याला नाही ....आमच्या ओळखीची एक मुलगी आहे तिला बारावीत नौवाद च्या पुढे टक्के होते आणि तिला medical ला जाईची इच्छा होती तिला नाही जात आल ओं तिच्या मैत्रीणाला सत्तर टाक्याला मिळाली , तुटली मैत्री ...

हे सगळ परत आणलं वी पी सिंघ ह्याने , आता मेलेल्या माणसांबद्दल काही बोलू नये म्हणा पण मला नाही पटत ..... आधी अन्याय झाला म्हणून परत अन्याय आणि तास पण साठ वर्ष झाली तरी किती टक्के लोकांची प्रगती झाली ह्या मुळे? शहरात नाही हे सगळं मी मित्रान पैकी कुणाच ही उष्ट खातो मला काय जाती माहित आहे सगळ्यांच्या? आई ने पण कधी कुणाची जात नाही विचारली शिवा शिवी नाही पाळली, म्हणून मला हल्ली ऐकलं अस काही की प्रचंड नवल आणि भयानक राग येतो , ह्या मुळेच नंतर सगळ होत आणि गावात तर हे अगदी चालत, पण ह्या वर इलाज असा नाही न? फुकट मिळाल न सगळ कि किंमत नाही राहत कमावल कि राहत.
 
 
 
 
 
 
 

सोमवार, २८ मे, २०१२

शिर्डी

शिर्डी 

मी हा लेख लिहिण्या आधी एक नमूद करतो मला साई बाबान बद्दल नितांत आदर आहे आणि भारता मध्ये जातीये मतभेद दूर करायला त्यांच्या इतका सक्षम कुणी नाही.

मी आस्तिक आहे का नास्तिक ? हे माझं मला कळत नाही , म्हणजे मी देवाला पाहून नमस्कार करतो मला आमच्या देवी वर नितांत श्रद्धा आहे, मी रोज गायत्री मंत्र म्हणतो, झालच तर आठवड्यात दोन दिवस शाकाहारी खातो , माझा माझ्यावर विश्वास आहे.

मी ह्याच दिवशी अमुक करत नाही तमुक करत नाही , फार सोळ ओळ करत नाही , माझे काही विचार पुरोगामी आहेत सैतानीच म्हणा , बाजूला बसलेल मला आवडत नाही, सगळ्याच देवांना मी काही चटकन नमस्कार करत नाही. हे केल कि ते होत ते केल कि हे होत, माझा पत्रिका, बुआ ह्या कश्यावर विश्वास नाही. मला आमची देवी आणि गणपती ह्या व्यतिरिक्त कुणा वर फारसा विश्वास नाही.

मी पहिल्यांदा शिर्डी ला गेलो ते १९९० साली, त्या काळी फार त्रास न्हवता झाला, पण पुन्हा तिथे जावस न्हवत वाटल कारण तिथली लोक.. सगळे चोर वाटले अगदी देउळ मध्ये दाखवल आहे तस , तेव्हा एवढी गर्दी न्हवती झोंबा झोंबी करत लोक रांगेत न्हवते राहायला एवढ महाग न्हवत, पण साई बाबा सोडले तर सगळच fraud  वाटल, नंतर १९९८ ला गेलो आणि मग मात्र ठरवल कि नाही जाईच पुन्हा, पण साई बाबांच्या मनात काही वेगळ होत, माझी बाईको प्रचंड भक्त आहे, त्या मुले जाण भाग होत.

मला तिथे गेल कि मानसिक त्रास खूप होतो, म्हणजे ह्या वेळ्चाच अनुभव सांगतो, गेल्या गेल्या प्रचंड  गर्दी , खूप वाहन , खूप धूळ पार्किंग ची सोय वगेरे नाही.... एक मुलगा धावत धावत आमच्या गाडी पुढे आम्हाला पार्किंग ला घेऊन गेला आणि मग त्याच्याच मागे फुलांच  ताट घ्यायला लावल,  अवाच्या सवा किमती सांगितल्या, आपण आम्ही घेतो हल्ली सगळीकडे तेच असत , मग तिथे एक माणूस आला आणि चादर घ्या असा आग्रह धरला, मी काहीच बोलत नसतो अश्या वेळेस , पण त्य माणसाच्या तोंडातून प्रचंड दारूचा वास येत होता, हे सगळ देवळाच्या आवारात ....आता  बोला ? चादरीची किंमत 
११०० आणि  बाईको  म्हणाली कि त्यावर डाग होते, म्हणजे वाहलेली परत विकायला :) .

तीन तास रांगेत उभा राहून, जेव्हा दर्शन होत, तेव्हा ती माणस, गुरांना ढकलावी तशी ढकलतात , माझ्या मुलीला आणि बैकोला ढकललं , त्या मुले माझ दर्शन झालच नाही, भांडण मात्र झाल :) . देवा  जवळ उभ राहून दानवा सारख वागायचं , देवाला बर चालत... देव नसेल आताशा तिकडे, लांब जाऊन तमाशा बघत असेल , नाहीतर कुणाला मदत तरी करत असेल .....तिथे देवच वास्तव्य असणं शक्य नाही हो, माणुसकी नाही तिथे देव तरी कसा असेल?

तिथे भिंतीन वर लिहील आहे, साई बाबा लोकां कडून मागून खात, लोकांना अन्न वाटत आणि आत गेल्यावर मात्र सोन्याचा मुकुट, सोन्याची भिंत आणि भिकारी चहा तरी द्या असा म्हणत असतात काय रे देवा.....एक बाई तर आम्हाला म्हणली हे दूध पाजा कुत्र्याला, साई बाबांचा आहे ......

पण एक मात्र खरय मी सबुरी मात्र नक्की शिकलो त्या रांगेत राहून,  मी अगदी शांत असतो, कारण घाई करून तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही, फक्त पुढे जाता येत , लोकांना अजून श्रद्धा आणि सबुरी नाही जमलीये , तिथे घुसतात, भांडतात घाई घाईने दर्शन घेतात .

राहायला खूप महाग आहे, जेवण बेचव पण लाज मात्र नाही ....एवढे करोडोने कमावतात, पण रस्ते    नीट करत नाहीत, वीज नाही, पाणी नाही, शाळा पण नसतील कारण तिथून कुणी बोर्डात पाहिलं आलेला स्मरणात नाही कि खेळत नाही कि धंद्यात नाही कि नाटकात नाही .

त्या रांगेत एक कुत्रा गाड झोपला होता, मधेच उठला आणि दुसरीकडे जाऊन झोपला, त्याला काशाच काही घेण देण  न्हवत  ......साई बाबांच्या वरती असा मजला सारख आहे तिथे फोटो लावले आहेत , तिथे कोळीष्टक होती ती मला दिसली आणि, तेवढ्यात ती काढायला माणस आली, म्हणजे देवळात प्राणी आपले नित्य नियमित काम करत होते.

एक म्हणजे रांगेत खूप मोठे बोर्ड्स आहेत, त्यावर ठळक अक्षरात लिहील आहे " चोरान पासून सावधान " मी देव देव करत नसलो तरी देवळात ....देवळात कशाला?  कुठेही चोरी न करण्या इतका अस्थिक तरी नक्कीच आहे.

दिव्या खाली अंधार म्हणतात, ते ह्यालाच असेल ......माझा मित्र मला सांगत होता कि त्या देवळालाला लागून एक पडकी शाळा आहे, देवाला  सोन्याची कवल आणि कोवळ्या मुलांना धड छप्पर पण नाही....

अजब तुझे सरकार ......लवकर काही तरी करा देवा, तुमचच  नाव खराब होतंय....

































गुरुवार, १७ मे, २०१२

ambulance


ambulance

मी इंग्लंड ला असताना, एकदा रस्त्यात चालत होतो (फूट पाथ वर, तिथे गाड्याच चालतात रस्त्यावर )
तेव्हा लांबून एका ambulance चा आवाज आला, तेव्हा पुढच्या सगळ्या गाड्या पटापट बाजूला झाल्या, म्हणजे सगळ्यात पुढची गाडी बाजूला आणि बघता बघता त्या मागे सगळ्या गाड्या झटकन ती ambulance निघून गेली, एक पाच सेकंदात ती पहिली गाडी निघाली निघाली आणि मागे सगळ्या गाड्या. हे सगळा अवघ्या अर्ध्या मिनटात घडल.

आज रस्त्यात मला पाठून आवाज आला ambulance  चा आणि मी वळून मागे बघण्याचा वायफळ प्रयत्न केला , तरी थोडा डावीकडे जिचा प्रयत्न केला, पण कुणीच हलेना , एखादा बाजूला झालाच तर लगेच पाटचा मध्ये घुसायचा , तो जेव्हा कसा बसा पुढे गेला तेव्हा त्याला टेकून एक महागड्या गाडी वाला सुसाट त्याच्या मागे जात होता......किती नीच वृत्ती असते माणसाची ....

आपण साले सगळे स्वार्थी आहोत

मी पण असेनच? कुणत्या तरी ambulance च्या मागे गेलो असेनच न हो? किव्हा जागा मिळाली कि घुसलो असेन, ambulance  फक्त प्रतीक आहे , वृत्ती असते आपली , आपल्यला मुळात हे शिकवतच नाहीत , स्वार्थी व्हा अशी शिक्षण पद्धती आहे , सगळा साला basic मध्ये राडा ......

शनिवार, २४ मार्च, २०१२

कशाचं काय

त्या दिवशी रात्री आरे मधून येताना , पोलिसांची गाडी कडेला थांबली होती, मी स्कूटर वर होतो म्हणून जरा स्कूटर हळू करून बघितलं तर झाडा मागून एका जोडप्याला बाहेर काढून दटावत होते आणि त्यांच्या व्यान मध्ये बस म्हणत होते.

आता आरे मध्ये बरीच लोक येता जाता थांबतात शू करतात थुंकतात त्यांना पोलिसांनी हटकलेल  मला तरी कधी दिसलं नाहीये आता पोलिसांना झाडा मागे जाऊन का बर अस करावा अस वाटत असेल, वास्तविक त्या जोडप्याचा कुणाला त्रास होत न्हवता मला कुणाला दिसले पण नसते , पण पोलिसांना बरोबर माहित होत.

अश्लील पणा आपण सिद्ध कसा करणार ? म्हणजे  मी काय फार modern आहे अस नाहीये , खूप revealing  कपडे  घालून मुलींनी सगळीकडे फिरू  नये असे मला वाटत , आता भिकार्यान पुढे मी मुद्दामून खात नाही किव्हा माझ्या किश्यातल्या पैशे हातात घेऊन फिरत नाही, घराला गाडीला lock करतो , तेच logic .

जेव्हा मी गाडीतून (train ) जायचो तेव्हा बोरीवली स्टेशन वर जी माणस ट्रेन अक्सिडेंत मध्ये मरायची त्यांना (मेलेली माणसाचं प्रेत ) ठेवायचे , तर लोक काय आवडीने ते बघायचे.  सांगायचा
मुददा  असा कि आपण खूप विकृत आहोत, रस्त्यात घाण केली कि  आवडत पण प्रेमाने मिठी मारली कि नाही आवडत.

पण आपल्याकडे एक प्रोब्लेम आहे लोक गैर फायदा  जास्त घेतात,  मिठी allow  केली तर लोक फार पुढे जातील. बंधन घालाव पण खूप घातल कि मग आपण ते तोडायला बघतो, म्हणून झाडा पाठी काही होत असेल तर त्याच्या कडे दुर्लक्ष करायला हरकत नाही.

आपण खूप छोट्या गोष्टीन कडे खूप जास्त लक्ष देतो म्हणून आपण मतदान पण नाही करत पण काही झाल कि मेणबत्या लावायला मात्र जातो, कशाला किती महत्व द्यायचं हेच कळत  नाही आपल्याकडे.

 
आपल्या basic मध्ये राडा आहे, कुणी राष्ट्र गीताला उभ नाही राहिला तर आपण रागावतो पण नियम मोडला कि लाच मात्र बिनदिक्कत देतो, खर देश प्रेम कशात आहे तेच नाही कळत (मला सुद्धा). तर सांगायचा मुद्दा असा कि आपण उगाच बाऊ करतो फालतू गोष्टींचा आणि मग महत्वाच्या गोष्टीन कडे दुर्लक्ष करतो. लग्नाचा बाऊ करतो आणि मग?  नंतर सगळ granted घेतो. रोहितला मी लग्न का कराव आणि का करू नये हे दोन्ही सांगून convince केल होत, तर एक दिवस त्याने सांगितल माझा साखरपुडा झाला :).   

आमच्या ऑफिसात एक मुलगी होती हेमाली ती म्हणाली होती, कि मी जैन आहे आणि मला दारू न पिणारा शाकाहारी, सिगारेट न ओढणारा हुशार वगेरे नवरा हवाय  , मी तिला अभिषेक दाखवला, तिचा खास मित्र, खूप छान मुलगा आहे, पण दारू पितो, शाकाहारी नाही, पण खूप सभ्य आहे, तिला मग आणखी एक लंपट माणूस दाखवला, मुली त्याला थोड्या जपून असतात पण तो एकदम शाकाहारी, दारू वगेरे नाही, हुशार, श्रीमंत. तिला म्हंटल कोण चालेल नवरा म्हणून? हसायला लागली, पटलं तिला, म्हणजे लग्न करायला कशाला महत्व द्यायचं? हे नको का कळायला?

साला आपल्या basic मधेच राडा आहे .














शनिवार, २८ जानेवारी, २०१२

शाळा

शाळा नावाचं पुस्तक वाचल होत मी २००६ साली, दीदीने दिलं होत मी इंग्लंड ला गेलो तेव्हा. मला काहीच माहित न्हवत पुस्तका बद्दल, म्हणजे एखाद्या पुस्तका बद्दल आपण ऐकतो आणि मग वाचतो, पण शाळा मी तसच वाचल परदेशात, शाळा सोडून वीस वर्षा नंतर......(इंग्लंड हा विषय वेगळा आहे आणि त्यावर एक अखका ब्लोग लिहिला आहे)

आपण बघा जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा एक इमेज तयार करतो तशी मनात एक शाळा तयार केली मी, त्यातली माणसं , मुलं तयार केली होती. बहुदा सिनेमा आणि पुस्तकात तफावत असते कारण आपण मनात एक चित्र तयार करतो म्हणून.  आजच मी शाळा बघितला (सिनेमा पाहिला).

सिनेमा म्हणून चांगलाय, पुस्तक वाचल असेल तर जरा कुठे तरी कमी पडतो अस वाटतं, पण माहित नसेल काहीच तर छान आहे. पुस्तकात सगळ्या गोष्टी रंगवल्या आहेत, सिनेमात तेवढासा वेळ नाही मिळालाय म्हणजे त्या शाळेच्या आधी त्या इमारती मध्ये बसतात मुलं ती जागा पुस्तकात छान रंगवली आहे,  सगळ्यांचा लहान पणी एक अड्डा असतो, तो एकदम पटतो पुस्तकात, सिनेमात अजून रंगवायला हवा होता,  हिरो चा आणि शिरोडकर च प्रेम, लाईन पुस्तकात जेवढा आहे तेवढा सगळं घेतलंय पण म्हणून ते  जास्त  वाटत, आणीबाणी पुस्तकात चान दाखवली आहे ते इथे कमी पडत चित्रे ह्याचा क्यारेक्टर अजिबात रंगवल नाहीये, जरा वाईट वाटत कारण न दोन घनिष्ट मित्र कधीच खूप बोलत नाहीत एक मेकांशी, पण सगळ दोघांना माहित अस्त. नाही म्हणायला स्काउट ची पिकनिक दाखवली आहे, पण चित्रे आणि जोशी ह्यांची मैत्री नीट नाही रंगवली. चित्रे च खूप छान व्यक्तिमत्व दाखवल आहे पुस्तकात, मला जाम आवडला होता, म्हणून असेल, पण एक चांगला मित्र हा असाच असतो तो थोडा कमी रंगवला आहे.

पण कस आहे न कि नुसता सिनेमा म्हणून पाहिला तर छान आहे.  एक तर सगळ्यांचे अभिनय अतिशय सुरेख, जी पात्र निवडली आहेत ती अगदी चपखल बसली आहेत. शिरोडकर तर फार गोड आहे (मोठे पणी सुंदर होईल) म्हात्रे , फावडा, मामा, आई , बाबा , शाळेतला शिपाई अगदी "perfect". जागा जी निवडली आहे ती फार छान, कॅमेरा , संगीत सगळं हव तस, म्हणजे मी जस माझ्या मनात चित्रित केल होत त्याच्या जवळ पास आहे.

आता गोष्ट सांगायला हरकत नाही :).

सिनेमा सुरु होतो शाळेत, गावातली शाळा , मराठी मध्यम, छान सुंदर बाई असते शिकवायला जास्त वेळ न घालवता त्यांनी सरळ विषयाला हात घातलाय, म्हणजे शाळेत अभ्यास असतो एक हुशार मुलगा एक सगळ करणारा एक गुंड पण चांगला दोन चार छान मुली शाळेतली गम्मत. वेळ असते १९७५ emergency ची , ते रंगवलं नाही पुस्तक वाचलत तर लक्षात येत. एक कडक बाई असते ती खूप मारते पोरांना, एक चान लाडके सर असतात त्यान्च्या विषयी थोड दाखवल आहे, मग एक
mod मुलगी येते.   पुढे आपण शाळेत करतो तसच, मुलींना बघण , इम्प्रेस करण तसच. मला हल्लीच माहित नाई, पण मी शाळा ८५ साली संपवली ही शाळा ७५ सालची आहे, फरक आहे पण तेवढा नाही (हल्ली सहा महिन्यात मोबाइल च नाव मोडेल येत). पण सगळ्याचं बालपण तसच अस्त ना हो?  आपल्याला उगीच वाटत कि नवीन पिढी आगाऊ, पण आपल्या बद्दल पण लोक तसच म्हणत असतील न?

सिनेमात सगळ्यांची नाती फार सुरेख दाखवली आहेत, मामा भाचा पण छानच, वडील मुलगा छान, मित्र छान, बहिण भाऊ समर्पक आईची काळजी योग्य, तो मुलगा आणि मुलगी भेटतात ते पण छान वाटत, अजून रंगवल अस्त तर अवडल अस्त.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा हा सिनेमा लहान मुलांचा नाही, शाळा सोडून अनेक वर्ष झालेल्यान साठी आहे :).

कलाकार सगळे चांगले आहेत, दिलीप प्रभावळकर, नंदू माधव, संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी आणि सगळी बचे मंडळी

आणखी काही सांगत नाही पाहूनच या, एक नम्र विनंती download करून पाहू नका ही चोरी आहे,  तुम्ही चोर आहात का? असाल तर करा आणि पहा.......मला कळल तर मी १०० टक्के तक्रार करेन.

























शनिवार, २१ जानेवारी, २०१२

sahajach

माझी मावशी वारली, सुरता ला रहायची , कष्ट केले आयुष्य भर पण तशी सगळ नीट होउन गेली, माझी मावस बहिण वारल्या नंतर खच्लीच ती.

पण मी लिहायला बसलो त्याचा  कारण vegala  आहे.  मी सूरते ला दोन वर्षा दोनदा गेलो आणि दोन्ही वेळेला असा गेलो, दोन्ही वेळेला दोन दिवस ठेवला होता दोघिना मोर्ग मधे कारण माझी भावंड USA मधे रहातात आणि दोन्ही वेळेला बॉडी आणायला मी गेलो. माणुस गेला की आपन लगेच बॉडी म्हणतो, म्हणजे जीव असेल तर व्यक्ति आणि गेल्यावर नुसती बॉडी आपण सरळ  अगदी साधा हिशोब ठेवला आहे ,  बाकीच्या वेळी उगीच गुनता करतो, अगदी अलिप्त होतो कधी कधी.

गेल्या खेपेस जेव्हा "बॉडी" आत सोडली अग्नि मधे  (इलेक्ट्रिक होत) आणि बाहर बसलो होतो वाट पाहत तीथे  दुसरे कुणी लोक पण  आली होती , वेगळी कोणाला तरी घेउन आले असतील, आणि थोडा वेळ होता म्हणून त्याने फरसान काढल आणि खायला बसले तीथेच स्मशानात , बापरे अजबच.

आता  ह्या वेळी पण स्मशानात जत्रा होतो अगदी लहान मूल पण होती मजा म्हणून आणि आम्हाला ढकलून ती लोक पुढे बघ्याची गर्दी करत होती माला फार विचित्र वाटल हसू का रडू  ते पण नाही समजल.....

रविवार, १५ जानेवारी, २०१२

Marathon 2012

पहाटे चार चा गजर लावला पण सवयी प्रमाणे रात्र  भर  घड्याळ बघत होतो , शेवटी पाऊणे चार ला उठलो . मी का Marathon धावतो ? (मी खूप गोष्टी का करतो? )  हा  प्रश्न मी सकाळी मलाच विचारतो , छान  गुलाबी थंडीत महिना भर practice  करताना पण मी हाच विचार करायचो , ह्याचं उत्तर मला तासा भारत मिळालं एका माणसाच्या t -shirt  वर लिहीलं होत, "Pain is temporary, acievement is permanent" .

माझ्या चेहरयावर enquiry counter चा बोर्ड आहे का कोण जाणे मलाच सगळे प्रश्न विचारतात, अगदी बंगलोर असो कि गुरगाव, अगदी कानडीत मला विचारायचे लोक अमुक अमुक रस्ता कुठे आहे म्हणून? (नाई म्हणायला बडोद्याला एका छान दिसणाऱ्या मुलीने मला गुजराती कम इंग्रजी मध्ये काहीस विचारलं होतो तेव्हा मला बारा वाटलं होतो म्हणा, पण तिला रस्ता माहित असणार कारण ती पुढच्या गाळीतच वळली , असो ) स्टेशन वर पण त्या स्टोल वाल्या माणसाने विचारला किधर जा रहे सब लोग? म्हंटल धावायला बांद्रा ते वी टी, काय वेड्या सारखं असा चेहरा केला त्याने.

पण मुंबईकरांचा उत्साह मात्र बघण्या सारखा आहे रस्त्यात किती लोक असतात बघायला. धावणारे ३०००० तर बाग्णारे लाख, सकाळी फक्त प्रोत्साहन द्य्याला येतात, बिस्कीट म्हणू  नका केळी म्हणू नका पाणी म्हणू नका सगळ देतात , मोठ्याने गाणी लाऊन cheer up करतात.

मी परीक्षेच्या  आधी कुणाशी काही बोलत नाही, लोकांनी खूप अभ्यास केला आणि मला काहीच येत नाही असा वाट्त, गेल्या आठवड्यात मी पेपर उघडला आणि जाम घाबरलो, लोक दोन तास रोज धावतात काय काय खातात , बापरे मी तर साधी  भाजी पोळी आमटी खातो, काम असेल तर रोज धावत पण नाही, काही खर नाही अस वाटलं, पण जमल बुवा , जवळ पास १५ की मी धावलो न थांबता, पण शेवटचे ५ की मी तास घेतात.

सगळ्यांची धावण्याची पद्धत फार वेगळी असते,  आणि एक म्हणजे नवीन धावणारे लगेच कळतात, सुरवातीला जोरात धावतात आणि मग ढेपाळतात, काही लोकांना मुलगी पुढे गेली कि त्रास होतो मग जोरात जातात आणि फसतात. काही लोक मस्त धावतात साध सरळ सोप ... मिलिंद सोमण ला पहिला, साला चिकना आहे, सेहेचाळीस चा असेल पण ४२ की मी धावतो.


marathon  मला आवडत कारण त्यात पाहिलं येण्याची गरज नसते, पूर्ण धावलो तरी झिन्कल्या सारखं असत आणि सगळे धावणारे एक मेकांना मदत करतात, सकाळी एक माणसाने मला विचारला  choclate ? नको म्हंटल मी, tired ?  मी नाई म्हंटल हसला आणि गेला पुढे, वाटेत लोक काहीतरी वाटत असतात पण ते रस्त्याच्या कडेला मी मध्ये धावत होतो आणि एक बाई संत्र वाटत होती सोललेला, आपल्यला आता कळत नाई पण धावताना खूप फरक पडतो एका फोडीने , तर मला धावताना परत बाजूला जाऊन घेण्याची ताकत न्हवती बाजूला एक मुलगी धावत होती तिला कळल मला हवंय, घेतला तिने आणि पुढे येऊन मला दोन फोडी दिल्या, ह्या छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो, टी वी वाले फक्त गोरे दाखवतात हे सगळ नाही दाखवत , ही खरी मुंबई आणि हेच ते स्पिरीट .

वाटेवर एक बाई wheelchair वर आम्हाला प्रोत्साहन देत होती, आलंच झाला थोडाच बाकी आहे असा म्हणाली :) , लोकांचा उत्साह बघूनच आम्ही उरलेले अंतर कापतो.   चर्चगेट ते वी ती अंतर दीड एक की मी आहे, पण येत येत नाही २० आणि २१ की मी मध्ये खूप अंतर असत :). गम्मत म्हणजे रस्ता माहित असला न की जास्त त्रास होतो, अजून खूप अंतर आहे अस वाटत राहत ,
fountain पासून एक की मी अंतर ऊर्त मला एकाने विचारलं, किती उरलंय, म्हंटल हे आल, त्याला माहित होत अंतर, हसला आणि Thanks buddy  म्हणला.

भवन्स कॉलेज च्या बाजूला पारसी लोकांची छान घर आहेत, तिथे एक बाई तिच्या (धावणाऱ्या ) मुलीकडे बघून म्हणाली "स्वीटी यु आर लुकिंग जस्त ग्रेट", सगळ्यांनी वळून पाहिलं (मी पण ) खरच सुंदर होती मुलगी :), अश्याच गोष्टींची मजा असते.

सगळ्यात आनंद होतो ते , अंतर संपल्यावर सगळं कष्ट केलायचं समाधान वाटत. काही लोक तर शेवटी धूम पाळतात, मला जाम नवल वाटत,  पाय उचलत सुधा नाहीत नंतर तर.

पण एकदा तरी सगळ्यांनी धावायला हवच एक अनुभव आहे, अडीच तीन तासाचा प्रवास एकदा करून बघा, मुंबई का बेस्ट आहे ते कळेल, त्या देल्ली वाल्यांनी गुल पनांग ला एकटी गाठून चाळे केले होते आणि इकडे बघा लोक, फुकट गोष्टी वाटतात आणि अनोळखी माणसांना प्रोत्साहन देतात, मुंबईचा कंटाळा आला , सोडली पाईजे अस म्हंटल की अस काही तरी hot मग आम्ही परत त्या सगळ्या शिव्या देत इथेच राहतो...










  

शनिवार, १४ जानेवारी, २०१२

Jogging

मी दररोज सकाळी धावतो (म्हणजे तबियती साठी   एरवी , पोटासाठी , आपल्यांसाठी , आपल्यान पासून संकटापासून , संकटा पाठी........) कारण मी माराथोन मध्ये भाग घेतो २१ K .M  धावतो सगळं नाही, वेळ मिळाला कि जातो  धावायला, आमच्या इथे एक पार्क आहे तिथे जातो रसत्या वर जात नाही (कारण कुत्रे मागे लागतात आणि मी कुत्र्यांना घाबरतो, हे धीट पणे सांगतो ). पण धावताना बाकीच्या लोकान कडे बघतो (बाईका कमीच येतात, नाहीच म्हणा न ), नुसते काय धावायचा १०-१२ फेर्या , दोन नंतर कंटाळा येतो तेच तेच बघायला, म्हणजे बघा झाड कसा दहा फेर्या नंतर तसच दिसतं, पण माणूस बघा तिसर्या फेरी पर्यंत घामेघूम होतो हळू धावतो, चालतो, मजेशीर तोंड पण करतात काही माणसं.

आमच्या ground  मध्ये एक Forest  Gump येतो , म्हणजे नुसता धावतो सुसाट (म्हणजे जोरात. मी मैदाना मध्ये नाही सुसाट, बाकी खूप सारं सुसाट :). ).  म्हणजे मी दोन एक महिने जातो Marathon जवळ यायला लागली कि , खूप नाही पण १० -१२ फेर्या मारतो, पण हा पठठा माझ्या आधी धावत असतो आणि नंतर पण, फक्त एकदाच त्याला लवकर जायचं होत म्हणून माझ्या आधी गेला, मग मी पण जोश्यात अजून दोन मारल्या फेर्या . कितेक वर्ष त्याला बघतो मी, पण काही हसत वगेरे नाही तो, बाकीचे लोक स्मित तरी करतात , संघाचा आहे तो (राष्ट्रीय स्वम्सेवक संघ) , शाखा  असते नंतर त्यात तो असतो, मी जाईचो शाकेत लहान पणी, अजून इथे नाही गेलो घाईत असतो मी म्हणून हे झालं कि जाईन एक दिवस, अजून बर्यापैकी प्रार्थना  येते माला (नमस्ते सदा वत्सले मातृभूमे....).

काही लोक इस्त्रीचे कपडे घालून अंघोळ दाढी करून येतात काही लोक उगीच येतात एखादी  फेरी मारली की गप्पा मारतात, काही बाईका  येतात नित्य नियमाने मुलांना शाळेत सोडून, नवर्याला दाबा द्यायच्या आधी, फटाफट फेर्या मारतात आणि जातात, कुठे हि बघत नाहीत, काही लोक फोन वर पण बोलतात, काही फोन वरच बोलायला येतात विशेष करून मुली  (धन्य बाबा ते प्रेमी युगल), काही लोक अगदी नित्य नियमाने येतात ती कामात अगदी हुशार असतील , नीट नेटकी असतील. काही तर अनवाणी धावतात काही च्प्लान  मध्ये धावतात, पण येतात, मध्ये मध्ये एक watchman पण यायचा, (दिवस भर झोप काढतो , म्हणून येत असणार ) कौतुक वाटत मला. काही लोक अगदी खरे खुरे धावतात नित्य नियमाने, ठरलेलं फेर्या मारतात चड्डी बनिअन आणि नैकी चे बूट घालतात.

काही म्हातारे बिचारे नुसते येऊन बसतात मग चार लोक आली कि बोलतात मी जाई पर्यंत जात नाहीत (काही तरी विचार येतात, जाऊ दे आता ) मग काही तिथे लाफ्टर क्लब मध्ये येतात, दिवस भारत तेवढेच हसणारे लोक पण असतात त्यात, पण त्यात एक लीडर असतो तो सांगतो टाळ्या वाजवा हसा , एक दोन दा मी दचकलो होतो त्यांचा अवज ऐकून,  हीईईए हा हा हा ईई हा असा काई तरी करत होते.

खूप लोक योगा करतात, काई भर भर चालतात काई खेळतात, पण वातावरण छान असत. गम्मत म्हणजे जॉग करताना काई लोक शर्यत लावतात मी पुढे गेलो  कि जोरात पुढे जातात, काई लोक रमत गमत चालतात आणि मध्ये येतात आमच्या . पण त्यांना ते लक्षात येतच नाई. काई माणसं नुस्त झोपाळ्यावर बसतात.

तिथे एक जाड जूड  माणूस ते फळांचे  आणि पानांचे रस  विकतो, मला अजून माहित नाई काय आहे ते, मी नुस्त mix  मागतो कारण मालां काय मागायचा तेच माहित नाईये, पण मी  पितो कारण मला ते सगळं आवडता, कडू असतं ते, पण मी तोंड वाकड न करता पितो (तक्रार न करण्याचा स्वभाव).

पण मला वाटत कि सगळ्याच ठिकाणी असच होत असणार...




















रविवार, १ जानेवारी, २०१२

Happy New year

Happy  New  year 

एकदा मला माझा मित्र विक्टर पाडव्याला म्हणाला ,  कि काय करणार घरी , म्हंटल  काही गोड असेल, देवळात जाऊ आणि झाल . तो म्हणाला कैसे हो दारू नाही मटण नाही मग celebrate कसं करता ? खरय न? पण मला आवडत, मी एकतीस डिसेंबर पण साजरी करतो (ती पण वर्षातून खूप वेळा)  :) , पण नवीन वर्ष मात्र एकदम आळशी जातं, झोपेत, त्या पेक्षा पाडवा बरा.

दर वर्षी मी ठरवतो कि ह्या वर्षी नवीन वर्ष अगदी छान साजरा करू पण नेमका एकतीस ला कुणी भेटतं आणि सगळं फूस होत. हल्ली मी मी काय करणार वर्षात काय सोडणार अस काही ठरवत नाही,  एक साधा दिवस हा म्हणून एक जानेवारी कडे बघतो. आज सकाळी म टा वाचत होतो , त्यात पु.लंचा एक लेख होता , बाकी सर्व सोडून तो आधी वाचला , एकदम बरं वाटला, राहून गेलेली गोष्ट हे सदर आहे , त्यांचं पण काही राहून गेलं करायचं? असा वाटलं न ? म्हणजे मला तर अनेक जन्म घ्यावी लागतील त्यंनी केलेल्या अर्ध्या गोष्टी करायला , प्रामाणिक पणे लिहिलं होत, ह्या वर्षी  थोडं जास्त लिहायचं गेल्या वर्षी पेक्षा.    पण नवीन वर्षी सकाळी सकाळी पर्वणीच म्हणायची , अनपेक्षित   मिळालेल्या गोष्टींचं अपरूप  जास्त वाटत , तुमच्या ब्लोग विषयी अनपेक्षित मिळालेलं कमेन्ट मनाला सुख देऊन जात.

मी पण ठरवलंय ह्या वर्षी मनात फार ठेवायचं नाही , वाईट बोलायचं नाई , एखादी गोष्ट आवडली कि मात्र लगेच बोलायचं , मनापासून बोललं न कि समोरच्या ला पण ते पटतं. स्वताला आवडेल त्या गोष्टी करायच्या , स्वतावर पण  थोडं प्रेम करायचं , अभ्यास कारायचा :) , प्रामाणिक राहायचा स्वताशीच , मी स्वताशीच फार खोटं बोलतो (जगाशी मात्र खर), म्हणून जास्त त्रास होतो.

मी लहान पणी पेटी शिकलो होतो आता विसरलो साफ, ती परत शिकायची आणि marathon ची प्रक्टिस जुलै मध्ये चालू करायची ....एवढा झाल तरी पुरे :)