शनिवार, २४ डिसेंबर, २०११

आरे



माझे आणी आरे colony चे जुने ऋणानुबंध आहेत, मग नंतर आरेच्या प्रेमात पडलो, traffic मध्ये अडकलो , झाडाखाली बसलो ....

आमच्या शाळेची पिकनिक नेहमी आरे मधेच जायची , म्हणजे माझी शाळा होती बोरीवलीला आणि आरे गोरेगावला , पण चार पाच वर्ष आम्ही तिथेच जायचो, एका वर्षी  मुंबई दर्शन ला गेलो (त्या वेळी होती मुंबई दर्शनीय). आम्ही लहान पणी कधी कुठे बाहेर फिरायला गेल्याच मला फार नाही, म्हणजे आम्ही गरीब वगेरे न्हव्तो , खाउन  पिउन सुखी. दिवाळीत नवीन कपडे, फटाके ,  मोठा होताना सायकल, तस  सुखवस्तू, पण फिरायला मात्र कुठेच जायचो नाही, आम्हाला गावच न्हवत, गेलोच तर अक्का पंतांकडे पुण्याला .. तस आमचे वडील आम्हाला शनिवारी चर्चगेट ला बोलवायचे ऑफिस ला हाफ डे असला कि, मला फार आवडायचं चर्चगेट एक तर स्वछ आहे बंद, म्हणजे झाकलेल, उघड नाहीये, बाहेर छान इमारती , समुद्र . सगळच. आम्ही akbarallys मध्ये जाईचो सिनेमा पाहायचो, पण गावात मात्र कधी नाही गेलो राहायला.

शाळे मध्ये असताना दर वर्षी पिकनिक ला मात्र न चुकता आरे मिल्क कोलोनी,  पण इतकी वर्ष आरे मध्ये जाऊन सुधा कधी आम्हाला ती factory दाखवली नाही कि कधी फुकट (फुकट चीमजा काही औरच असते) दुध पाजलं नाही, पण त्या वेळी लक्षात नाही आल, आम्ही त्या  आरे गार्डेन  मध्ये खेळायचो आणि परत घरी यायचो दमून भागून, त्यातच फारा मज्जा होती, आता ते आरे गार्डेन जरा बकाल झालंय त्या वेळी हिरवळ होती हुंदडायला जाम बर वाटायचं छोटा काश्मीर ला  तर मी लग्ना  नंतर गेलो  पहिल्यांदा (काय उपयोग?), त्या आधी फक्त सिनेमात बघायचो . माझी खरी मैत्री जमली आरेशी ते मी Baan मध्ये असताना, सकाळी लवकर जायचो साधारण साडेसात पावणे आठला 2001साली, तेव्हा वेड्यागत न्हवता ट्रफिक  गाड्या ही कमी होत्या, मी बाइक वर जायचो, तिथे जो रस्ता MIDC  कडे वळतो न? तिथे सूर्य दिसायचा वर येताना झाडातून, थंडीत बरेचदा मी दहा पंधरा मिंट बाइक  बाजूला उभी करून तिथेच बसायचो तो उगवता सुर्य पाहत, मस्त हिरव गवत थंड वार्याची झुळूक ताज्या हवेचा सुवास, ते सुंदर दृश्य, morning walk ला   आलेली लोक ...मुंबईत असून नसल्या सारख, आता बरीच वर्ष नाही थांबलोय तिथे आणी हल्ली सकाळी सुद्धा इतका ट्रफिक असतो कि धुराचा वास जास्त येतो . पण आहे अजून आरे कॉलनी  थंड आहे .

मला गाव नाही (नाही म्हणायला गिरगावात जायचो), म्हणून निसर्गाचा तसा संबंध आरेमुळेच  आला माझा. तरी माझा मित्र म्हणायचा कि आरेच्या आत  जंगल आहे,  मस्त मजा येते (त्याची मजा वेगळी असायची म्हणा), मला आधी खर वाटायचं नाही (म्हणजे जंगल आहे ते , त्याची मजा  नाही) पण मग आतले रस्ते शोधत गेलो मग पटायला लागल , आवडायला लागल.

आरे मध्ये एक आतला रस्ता   आहे, (new zealand हॉस्टेल चा ) बाहेर ट्रफिक असलं कि आतून काढतात हल्ली , पण मला हा रस्ता फार पूर्वी पासूनच माहित होता, पण तो जाणवला फार नंतर अनेक वर्षांनी, सकाळी तर  झाडातून सूर्य कीर्ण वाट काढून येतात,  तिथेच छोटी छोटी घर आहेत, एक   वाण्याच दुकान सुद्धा आहे, गोठा तर आहेच, तिथे लोक सकाळी चूल पेटवून पाणी गरम करतात, त्या मुळे त्या धुरा  मध्ये सूर्यकिरण अडकला कि मस्त वातावरण निर्मिती होते, तिथेच थांबून निसर्गाचा आनंद घेत बसाव वाट्त (पण कुणी तरी मूर्ख मागून जोरात होर्न  मारतो आणि आपण मुंबईतच असल्याची जाणीव करून देतो )ते सगळ डोळ्यात भरून घेऊन मी तिथून निघून जातो. आरे मधली ती वेडी वाकडी वळण पण त्या सगळ्याला साजेशी आहेत , कवलारू  घर , आजूबाजूला हिरव रान, पलीकडे थोड जंगल , एक हि  बिल्डींग दिसत नाही  , ताज तवानं वाटत . तिकडे न बाक ठेवली आहेत बसायला  वेग वेगळ्या ठिकाणी आहेत, लोक असतात कधी कधी, मला  पण खूप दिवसान पासून बसायचं आहे त्या बाकावर, बघू कधी योग येतोय.  नेहमी घाईतच जातो हल्ली मी  तिथून        

एकदा रात्री आरेतून येताना मी आधीच आतला रस्ता घेतला (modern bakery कडून, ह्याला पण वर्ष लोटली ) पुढून आत जावच लागत म्हणून आधीच, थोडा खराब आहे रस्ता खड्डा होता  मोठा तिथे, थोडा पुढे गेलो तसा अंधार होता बुदुक आणी नशीबाने गाड्या पण नव्हत्या , मी हेड लाईट  सुद्धा बंद  करून पहिला (उगीच आगाऊ पणा ) रस्ता माहितीतला होता , मस्त  काळोख झाला, बाक पण दिसली झाड पण दिसली पण जाणवली वेगळी. म्हणजे बघा आपण आपल्याला आवडलेली एखादी जागा, वस्तू , मुलगी कुणाला मुद्दाम दाखवली कि आपण त्यांच्या नजरेतून पहायचा प्रयत्न करतो मग आणखी येते मजा, तस  मला अंधारात दिसल आरे . पुढे आल्यावर (लाईट लाऊन)   त्या घरातून चुलीचा धूरदिसला , अंधार होता, जंगल दिसत न्हवत पण जाणवत होत , दिसण्या पेक्षा जाणवण्यात जास्त मज असते न? म्हणजे कॉलेज मध्ये, शाळेत ऑफिसात  एखादी व्यक्ती दिसली नाही तरी चालते, पण आहे हे जाणीवेने बर वाटत , म्हणून सेंड ऑफ ला वाईट वाटतच न? आपण काय लोकांना रोज भेटत नाही पण ते आता नसणार ही  जाणीव आपल्याला त्रास देते.  तर ते हे जंगल तस जाणवल. आत थंड असते   नेहमीच (कोण  जाणे मला अस  वाटत  कि बाहेरची गर्दी बघून थंडी इथे आत  आरे मध्ये लपून बसली असणार, कारण सिग्नल आला कि एकदम उकडायला लागत  तिला   आणू बाहेर बोलून परत ), तसलीच ती घर बाहेर बसलेली वस्तीतली माणस दुकानात असलेली लोक, गुर ढोर गोठयात तसाच तो मिणमिणता दिवा   …. त्या वेळी हे पाहून ऑफिस चा सगळा क्षीण  निघून जायचा  … असच ठेवा रे आमच आरे     
 





















गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

महलक्ष्मि

काही विचार !

मी रविवारी महलक्ष्मि च्या देवळात गेलो होतो , मुंबई मध्ये राहून सुधा मी दुसर्यांदा  गेलो . गर्दी होती थोडी, म्हणजे आरती सुरु होती म्हणून थांबून ठेवल होत लोकांना. तरी झालं लवकरच, देवळ्याच्या पाठी खूप सुंदर समुद्र दिसतो . तुम्ही रात्री आपली शाळा किव्हा कॉलेज बघितलाय? सकाळी इतका प्रसन्न वाटणारी शाळा कॉलेज रात्री  इतकं भयाण दिसत , सगळं सुनं सुनं वाटत, पण समुद्र मला सुंदरच वाटतो . सुसाट वारा सुटला होता, दहा मिनटा पूर्वी traffic मध्ये असा अंदाज पण येत नाही कि थोड्या वरती इतकं सुंदर सगळं असेल.
देवळात ती माणसं (volunteers ) सगळ्यांना धक्का देऊन बाजूला काढतात म्हणजे तास भर वाट बघून दहा सेकंद पण दर्शन  होत नाही . ते सगळं तसच झालं , पण हल्ली मला ह्या गीष्टींचा त्रास होत नाही मी सध्या आनंदात आहे :). 

देऊळ छान आहे प्रसन्न एकदम , गार वारा सुटला होता कुणीतरी सनई वाजवत होतं, खूप गजबजाट, मला अस आवडत देउळ , europe मधल्या चर्च सारखं नाही , सगळीकडे शांतता आणि पांढरे कपडे घातलेले ते पाद्री , जरा आवाज झालं कि शु असा करणारे लोक, मी कधी बाहेर पडतो अस झालं होतं मला तेव्हा . (http://mazapravasvarnan.blogspot.com/).

त्या गर्दी मध्ये मला एक द्रिष्य दिसलं , दोन हिजडे (तृतीय पंथी लोक, हल्ली सगळ्यांच्या भावना दुखावतात ) दिसले छान  साडी नेसली होती, डोक्याला  कुंकू हातात ताट, एकाने डोक्यावर पदर घेतला डोकं टेकलं आणि डोळे मिटून प्रार्थना केली, काही तरी मागितलं असणार , काय मागितलं असेल? मला काही झालं कि मी लेगच देवावर चिडतो , मीच का रे?  असा विचारतो रुसतो . पण ह्या लोकांनी देवा कडे काय मागितलं असेल हो? चार पैशे जास्त मिळो? आज कमी शिव्या मिळो? घर? गाडी? काय मागणार? ....मरण मागितलं असेल का हो? का पुढच्या जन्मी नक्की काय ते कर असं नको ठेउस...कुणास ठाऊक. मी खूप वेळ त्यांच्या कडे बघत होतो. ते खरे देव भक्त, असं होऊन सुधा श्रद्धा कायम होती हो, आपण सगळे ढोंगी  सगळं मिळून सुद्धा तक्रार करतो समाधानी नाही राहत , मला त्यांच्याशी बोलायचा होतं, विचारायचा होतं, पण नाही विचारला.

देवीच्या पाठी गणपती आणि मारुती चं देउळ आहे ते बघायला गेलो, वारा खाल्ला समुद्र बघितला आणि बाहेर पडलो कुठे गेले ती दोघं कळलंच नाही .

बाहेर पडून वडा खाल्ला worli sea face ला बसलो , विसरलो सगळं, आता आठवला म्हणून लिहिलं.....मनाला चारा.


रविवार, ४ डिसेंबर, २०११

देव

देव आनंद :

आमच्या बिल्डिंग मध्ये एक बाई होती,  कुणी मेला बिल कि लगेच येऊन सांगायची एरवी बघत ही नसे पण काय सुप्त आनंद मिळायचा कुणास ठाऊक तिला? तिची नणंद म्हण्याची "आमच्या वाहिनीला सुतकी विभागात नोकरी मिळेल". 

आज सकाळी jogging  करून आलो तेव्हा आमच्या समोरच्या aunty (अजून मी कुणाला तरी aunty म्हणू शकतो ) दार उघडून मला म्हणाल्या , सागर समझा क्या? मी काय? असा म्हणालो "देव आनंद गुजर गया"......मला खूप वाईट वाटला खर तर मी स्वामी दादा नंतर चा एकही picture  नाही पहिला देव आनंद चा , पण तरी मी मोठा fan आहे (कदाचित म्हणून असेल ). आता खर तर मी देव आनंद ची जुनीच  गाणी ऐकणार ,  बघणार,  नवीन सिनेमा पहायची हिम्मत मी तरी करू शकणार नाही, कधी भेटलो नाही,  भेटलोही नसतो तरी वाईट वाटलं.

माझी देवानंद शी  ओळख खूप लहान पणी  झाली , म्हणजे प्रतेक्षात नाही. प्रेक्षक म्हणून, त्याचा कारण म्हणजे माझ्या वडलांना देव आनंद म्हाण्याचे. दिसायचे खरे ते, अजून दिसतात आणि मुख्य म्हणजे जीवन जगण्याची पद्धत , खूप आनंद घेत. लोक अश्या लोकांना वेडं म्हणतात पण वेडी माणसं खूप खुश असतात.

देव आनंद शी मैत्री करण्याचाआणखी एक कारण, रफी आणि किशोर , काय ती गाणी अजून ही ऐकत राहावाशी अशी. मला खूप भावला म्हणजे हम दोनो,  अनेक  वेळा बघितला आहे मी , पण उमगला नंतर, हेरोईने केंद्रित picture खरा तर त्याचे picture असेच असायचे . साधना चा त्याग बघा, खूप आरडा ओरडा  नाही, सगळा अगदी subtle . म्हणजे खूप आदर्श अशी बाई, कितीछान वाटतं, हल्ली हे T V वाले म्हणजे बाईकांना हडळ नाहीतर चेटकीण दाखवतात , अस नसतं न हो ? तेरे घर के सामने मधली नूतन बघा (black  and  white  मध्ये पण खूप सुंदर दिसते ), किती निर्मळ प्रेम , love  story असून मिठी सुधा मारत नाहीत ते अख्या picture  मध्ये .  "दिल का  भावार करे पुकार " मध्ये एक हि वाक्य नाही नूतन ला, सोन केलन गाण्याचा तीघाने,  sorry  पाच जणांनी (गोल्डी आणि बर्मन दाला विसरून चालणार नाही ). Jewel Thief मधला सुस्पेन्से, त्यातली  पण heroine ची होणारी ओढाताण .जॉनी मेरा नाम, मधली गाणी कथा . राज कपूर आणि देव मधला एक मुख्य फरक म्हणजे देव चे सगळे चित्रपट स्त्री प्रधान , राज कपूर ने फक्त स्त्री ला दाखवलं. 

त्या काळी तलत ला घेऊन गाणी करण्याची हौस पण त्याने भागून घेतली दिलीप कुमार ने केला (अये मेरे दिल काही और चल) मग  देव ने " जाये तो जाये कहा " केलं , पण खर यश लाभलं ते रफी मुले आणि बर्मन दा  मुळे. आणि नंतर जयदेव आणि पंचम आणि किशोर कुमार . मला अस वाटत कि जो पर्यंत goldie direct करायचा न तो पर्यंत खूपछान काम झालं, गाईड तर भांडून घेतला विजय आनंद ने, नसतं घेतला तर आपण गाईड सारख्या सिनेमा ला मुकलो असतो . cycle वर चा romance " ए मैने कसम ली " मध्ये personify  केलं, ते बघून आपल्या चेहऱ्या वर एक स्मित नक्कीच येत . त्याच्या प्रत्येक सिनेमाचा मी ब्लॉग लिहू शकेन मला उमगलेला सिनेमा म्हणून.  

त्याचे सिनेमे  कुणी हिट केले? तर मी म्हणेन जितका हात  वरसांगितलेल्या लोकांचा होता तितकाच तो देव चा होता , chocolate  hero ची संकल्पना त्यानेच आणली वेडा वाकडा चालायचा, तोंड्यात्ला तोंडात बोलायचा, पण तरी मला आवडायचा . आयुष्य जगला त्याच्या परीने , त्याने सिनेमे काढले तुम्हाला नाही आवडले हा तुमचा प्रोब्लेम आहे त्याचा नाही. आयुष्य जगावं तर अस पूर्ण पणे.

आता काय वरती शम्मी कपूर, देव आनंद, रफी, किशोर, बर्मन दा, पंचम सगळेच जमलेत स्वर्गीय संगीत नक्कीच मिळणार .

Rest  in peace  देव साब .

शनिवार, ३ डिसेंबर, २०११