शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

मा श्री उद्धव ठाकरे- एक पत्र

मा श्री उद्धव ठाकरे,

     स. न. वि. वि.

कोकणात दोन भावांच्या भांडणात एक शेट दुकान, जागा हडप्तो अस होऊन सुधा दोघ भाऊ खुश असतात कि कशी जिरवली म्हणून . कारण मुळात शत्रू कोण हेच ठाऊक नसतं तस  सध्या मला सेना आणि भाजप कडे बघून वाटतंय. 

मी गेली पंचवीस वर्ष मतदान करतो आहे, अगदी न चुकता आणि मत कायम युती ला होत त्या मुळे झाल काय कि, ह्या खेपेस कुणाला मत द्यायचं हे कळेच ना कारण मत कायम सेना भाजप अस  होत. 

पण एकमात्र नक्की कि तुम्हाला  सगळ्यांनी मिळून फसवलन आणि तुम्हाला अजून हे लक्षात येत नाही ह्याच आश्चर्य वाटतंय. 

जास्त प्रेम, मोह  तुम्हाला कसला आहे? सत्ता का राज्य? उत्तर मला नकोय ते मला दिसलंय. पण ह्यात तुमच नुकसान तर झालच पण महाराष्ट्रच  जास्त झाल न?  साफ गंडवल तुम्हाला, आणि तुमच्या कडे अशी माणसं   पण नाही जी लोक ही खेळी ओळखू शकतील. ह्या खेपेस  खूप सुवर्ण संधी आली होती तर तुम्हाला सोन्याच अंड नको होत अख्की कोंबडीच हवीशी झाली. प्रत्येक खेपेस पहिलच येणे गरजेच नसत साहेब. आत्ता काय झाला बघा हातातल  सोन्याच अंड जाउन नुसतच अंड आल. 

शरद पवार साहेबांकडून कडून हे शिकण्यासारख आहे, त्यानी एकाच खेळीत अनेक गोष्टी केल्या ….  युती फोडली, भाजप ला लोकांच्या मनातून उतरवल आणि स्वतावरच संकट दूर लोटलं , मानल त्यांना. 

आपण साहेब काय केलत? हातातली सत्ता घालवली लोकसभेत मंत्रिपद आणि लोकांचा आदर आणि प्रेम. पवारांची भूमिका तुम्ही घेतली अस्तीत तर? भाजपला हव तेव्हा तुम्ही दंडका  देऊ शकला असता , आता अगदी  समोर जाऊन बसलाय त्यांना कळतंय तुम्ही काय करणार ते, कधी तरी पाठून मारा, सारख समोर जाउन मारामारी करण्याचे दिवस गेले. आता निवडणूक झाल्या कि काय् होणार आहे अगदी उघड आहे, ते तुम्हाला दिसायला हवय. 

तुमचा शत्रू तुम्ही  ओळखलाच नाहीत , भाजप हा शत्रू न्हवता कधीच ….  तुम्ही समजलात आणि चुकीच्या दिशेने हल्ले केलेते लोकांच्या मनातून उतरलात , आता अस  लोकांना शिव्या देऊन नाही चालत, मध्यम वर्गीयांच्या मनातून उतरलात साहेब, कुणाचा बाप वगेरे काढायला हा काही सिनेमा नाही, तुमच वाक्य आणिक कुणी म्हंटल तर? जीवे मारल असत लोकांनी …. मग आपला बाप तो बाप आणि लोकांचा काय? 

कुणी टीका केली कि लगेच हाणून (मारून ) नका पाडू , जरा आत्म परीक्षण करा, नवीन लोकांना विचारा (घरच्या नाही ), अजून थोडी असतील आजूबाजूला चाचपडून पहा. शत्रू कडून पण शिकण्यासारख असत हे ध्यानात घ्या आधी शत्रू कोण हे ओळखा … 

शिवेसेनेला जशी महराष्ट्राची गरज आहे तेवढीच महाराष्टाला सुधा अजून सेने ची गरज आहे. 

आपल नम्र 

सागर कुलकर्णी 










मा श्री देवेंद्र फडणवीस - एक पत्र

मा श्री देवेंद्र फडणवीस ,

      स न वि वि,

पत्र लिहिण्यास कारण कि गेल्या आठ  दिवसात तुमच्या बद्दल , कौतुक, आदर  जिव्हाळा, राग , चीड ह्या सगळ्या भावना मनात आल्या आणि आता नैराश्या आणि वैफ़ल्य आल आहे.

कौतुक ह्याच्या करता वाटल कि चांगला सुशिक्षित, हुशार , तरुण  आमच्यातलाच  एक,   आता मुख्य मंत्री झाला अस वाटल , म्हणजे लग्नात मुंजीत कुणाचा  भाचा काका असतो न , जो थोडा हुशार असतो आणि लोक म्हणतात अरे हा फडणवीस , हुशार आहे पुढे जाईल , बाइको बँकेत आहेत … चांगल कुटुंब आहे  वगेरे त्यातलाच वाटलात म्हणून जिव्हाळा  वाटला  (न ला न आणि ण ला ण म्हणता हे ऐकून सुधा खूप आनंद झाला ) तुमच्या मुलखाती मध्ये तुम्ही म्हणालात कि सत्ता ठेवण्या  साठी सत्ता नाही ठेवणार … अवडल होत आदर वाटला  आणि  खर सुद्धा वाटल होत तेव्हा.

जेव्हा सेनेला तुम्ही  उत्तर नाही दिल झुलवत ठेवलं तेव्हाही चांगल वाटल, हट्टी  मुलाला असाच धडा द्यायला हवा असा वाटल तेव्हा, पण काल अगदीच सगळ फौल ठरवल फडणवीस तुम्ही साफ अपेक्षा भंग. हुशार म्हणता म्हणता तुम्हाला बनवल कि , शेवटी पश्चिम महाराष्ट्र सरस ठरला , तुम्हाला बंदूक दिली चालवायला पण गोळ्या मात्र पवार साहेबान कडेच आहेत,  किती दिवस नुसत्या बंदुकीचा धाक दाखवणार  बे … आज न उद्या कळणारच लोकांना कि उगा फुका मारून राहिले हे  फडणवीस,……  रागावतील लोक

आम्हाला दिल्ली ची सत्ता नको होती म्हणून तुम्हाला निवडल , पण तुमच्या वर दिल्ली आणि  गुजरात दोघांची सत्ता , कस होणार आमच?  महाराष्ट्रच नशीब वाईट , त्या नारायाण राव पेशव्यांना मारला न  त्याचे  भोग अजून भोगतोय , त्या काळात फडणवीस होते , ज्यांनी दिल्ली  आणि इंग्रज ह्यांना समर्थ पणे तोंड दिल आणि राज्य राखलं, इथे तर तुम्ही दिली च  ऐकून अगदी राघोभांचाच आधार घेतला ,  अहो फडणवीस त्यांना सत्ता हवी आहे हे नाही लक्षात येत तुमच्या.  मला सुधा एवढ कळत आणि चीड येते.

आता वर्ष भरात निवडणुका होतील (तेही आमच्याच पैशांनी),  तुम्हाला  आमची  काय तुमची मत पण  मिळायची नाहीत पण त्यांना मात्र त्यांची मत मिळणार , पुन्हा तेच किमान दहा  वर्ष आमचे बारा वाजवणार  धरणात मुतणार मुंबईत हल्ले झाले कि वेड्यागत बोलणार शेत्कारांच्या आत्महत्या होतच राहणार, आणिक  शंभर  ठिकाणी टोल लागणार . तुम्ही फार फार तर लोक सभेत जाऊन एखाद मंत्रिपद घ्याल आणि धन्य व्हाल …. कधी कधी वाटत हा कट महाराष्ट्राला गुजरातच्या पाठी मागेच  ठेवण्याचा तर न्हवता ना ? नसेलही  पण नुकसान मात्र मराठी माणसाचच झाल  आणि त्यात फडणवीस तुमचा सिंहचा वाट असणार , (इथेच नको होता हो माझा महाराष्ट्र) आणि ह्याचे प्रतिसाद लोक सभेत हि उमटणार ….  उशः काल होता होता काळ  रात्र झाली . 

 देव करो, फडणवीस करो का तावडे करोत का आणि कुणी करोत , तुम्हाल सुबुद्धी होऊन आमचा अपेक्ष भंग टळो …हीच मी महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो.

आपला विनम्र

सागर कुलकर्णी

ता. क.

आता मुंजीत तुमच्या कडे बघून बोट दाखून लोक म्हणतील (मी सुधा ) हाच तो फडणवीस, गळ्यात घड्याळ घातलेला .

कुलकर्णी