गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

Prince Tiwari - teresatheoceanofhumanityfoundation

लोक बहुदा देवळात देव शोधतात, पण काही भिकाऱ्यांना देवळाच्या बाहेरच देवाने सावरलं. कालच वाचनात एका २१ वर्षाच्या मुलाच हे कामआल . देवळात त्याला लहान मुल भिक  मागताना दिसली ( आपल्याला सुद्धा  हीच जास्त दिसतात) त्याने तो बेचेन झाला आणी  कुठे जातात ती मुल, म्हणून त्यांच्या पाठी गेला. कांदिवली fly over  खाली जी कुटुंब राहतात तिथली मुल होती ,  शिक्षणाच काय? हा पप्रश्न  पडला, मुन्सिपालटी शाळेत जातात, शीकले  काहीच नाहीत, फक्त जेवायला मिळत म्हणून जातात हे कळल, वह्या कोऱ्या. ह्या मुलाने (तेव्हा वय १७ -  १८  असेल)त्यांना शिकवायचं  ठरवल आणी  लागला    न कामाला , दोन वर्षा नंतर २५ मुलांना इंग्रजी medium शाळेत घातल आणी हे करत असताना स्वतः CA झाला ……स्थानिक "नेत्यांनी" त्याला illegal काम करतोस fly over खाली म्हणून दम दिला, ह्या मुलाने त्यांनाच सांगीतल कि मला एक जागा द्या ह्या मुलांना शिकवायला, तसे ते ह्याला टाळायला लागले. शिकवायला विरोध हा घरच्यान कडून सुद्धा   होताच तो ही त्याने दूर केला 

आता तो १०० मुलांना शिकवतो, एक खोली घेतली  आहे आता एक बस घेतोय, मुलांना शाळेत सोडायला. मी त्याला भेटायचा प्रयत्न करतोय भेटलो कि  आणीक माहिती देइनच. वाचून खूप  कवतुक वाटल त्यातला एक मुलगा जरी भिखारीहोण्या पासून वाचला तरी सुद्धा खूप आहे,  पण इथे तर आत्ताच १०० आहेत.  माझा खारीचा वाटा असेलच त्याच्या अशिक्षित ते शिक्षणा कडे  नेणाऱ्या  सेतू मध्ये, जमल तर आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करूया ……  त्या मुलाच  नाव Prince Tiwari :) आहे google केल तर एखादा लेख सापडेल. 

नवीन वर्षात ह्याला मदत करण्याचा निर्धार मी केलाय, एक तर माझ्या घरा जवळच आहे आणि दुसर म्हणजे शिक्षणातूनच प्रगती होईल अस वाटत 

सगळ्यांना Happy New  Year 

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

रफी

काल मी रफीच्या जयंती बद्दल लिहील म्हणून अजून थोड :)

किशोर च्या उगवत्या काळात रफी चा confidence एवढा गेला कि कुणीही त्याला  काहीही बोलायला लागला,  नौशाध एकदा मुद्दामून रेकॉर्डिंग studio मध्ये गेला  आणी  अस पाहिलं कि ऐरे गैरे रफीला बोलायचे , नौशाध ने रफी ला झापला जाम आणी खड्सावला, कि तू ग्रेट आहेस आणी हे कोण तुला शिकवणारे? ह्यावर न थांबता एक भैरवी मधल एक गाण करून घेतल, मला खर तर भैरव आणी भैरवितला फरक कळत नाही (खर तर केदार आणि भैरव मधला पण कळत नाही ) पण अस   वाचल आहे. त्याच वर्षी "तेरी गालीयो मे  न रखेंगे कदम" ला film fare मिळाला आणी रफीचा confidence  परत आला. 
confidence जायचं कारण कि, आराधना करताना बर्मन दा आजारी पडले म्हणून पंचम  ने धुरा  सांभाळला, म्हणून "बागो मे बहार हय"  हे रफी आणी  मग "रूप तेरा मस्ताना" किशोर , त्या नंतर म्हणतात तस , rest is  history. पण ज्या माणसाने एके काळी सगळ्या सुपर हिट्स पिक्चर च्या  हिरो ला आवाज  दिला तो असा होऊ शकतो? पंचम रफी चा चाहता न्हवता, तस अनील  बिस्वास आणि सी  रामचंद्र ही रफी विरोधक होतेच आणि थोड्या प्रमाणात  सलील  चौधरी सुद्धा, बघा न बहुतेक गाणी मुकेश, तलत किव्हा मन्ना डे  आहेत सलील  चौधरी साठी गायलेले . "धीरे धीरे चल" मध्ये पण लता बाई चिडल्या होत्या म्हणे  आणी सलीलदा ने  बाजू तिचीच घेतली.  पण सांगायचा मुद्दा असा कि आला परत confidence, niche skill  होत आवाज सुमधुर, आणी तालमीतला  आवाज … 
पण ह्या वरून एकच  कि, तुम्ही  किती वर गेलात, तरी कुणी तरी तुमच्या पेक्षा सरस येऊ शकतो आणी  एका प्रसंगा मुळे  आपण परत वर येऊ शकतो …   
हे वरच सगळ राजू भारतनच्या एका लेखातून आणी थोडस माझ्या बुद्धीतून … 
Happy  New Year!!!!  


गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

थंडी

हल्ली जरा थंडी पडायला लागली आहे, पण अजून तेल नाही गोठल आणि तोंडातून धूर पण नाही येत, सकाळी, म्हणजे थंडी मुळे धूर नाही येत. शाळेत जाताना आम्ही वर बघून हां हा अस केल कि एखाद महिना तरी यायचा धूर , national park मधेच येतो हल्ली. तर सांगायचं म्हणजे आज मी  स्कूटर न आणता  हाफिसात गाडी आणली (थंडी आहे न फार, मी गारठतो मी काय तेल नाही ) आणी रेडियो वर "तुमसा नाही देखा "  आणी  लगेचच "मै झीन्दगी का साथ निभाता चला गया " लागल , म्हंटल  सकाळीच लॉटरी  .... मग समजल कि आज रफी दि ग्रेट ची 91st जयंती. मस्त वाटल बाहेर थंडी आणि आत काचा बंद करून रफी, साहीर आणी  जयदेव  ....
तुम्हा सगळ्यांना थंडीच्या आणी रफी च्या जयंतीच्या शुभेछा 

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

(b)AAP रे बाप

गेले  कित्तेक दिवस ह्या विषया वर लिहीन म्हणतोय, पण टाळत होतो. काल AAP ने जो तमाशा मांडला त्यावरून वाटल लिहूनच टाकाव. एक तर AAP चा विशेष  राग आहे कारण त्यानी सरळ सरळ फसवलंय, म्हणजे दारू बंदी चा मोर्चा काढणारयाने, दारू पियुनच तो काढला तर? अस आहे ह्याचं, एक तर त्या केजरीवाल ला कुणी तरी सांगा हो की अरे बाबा तूच आहेस देल्हीचा शिल्पकार, आता तू काही मोर्चा काढणारा आणि रस्त्यावर आडवा पडणारा नाही राहिलास, तुझीच सत्ता आहे  आणि सारख हमरी तुमरीवर नाही चालत. पण त्याला तो तरी काय करणार? दिल्लीत सगळेच हमरी तुमरी वर येतात.


एक तर मुख्य मंत्र्याला  साधारण पणे  एक  पोच ठेवायला हवा आणी  भाषा जरा जपून वापरावी, प्रधान मंत्रीला काहीही बोलायच्या आधी लक्षात ठेवायला हवय कि तो तुझ्या बापाचा माल नाही (अरेरे काय हि भाषा ?) अख्या भारताने निवडून दिलेला तो एक आपलाच प्रतिनिधी आहे, त्याला शिव्या म्हणजे आपल्या सगळ्यांना शिव्या आहेत त्या. भाषेवरून लायकी कळते , म्हणजे तुम्ही जसा चार लोकात आणि चार लोकांशी बोलता त्या  वरून , भाषा म्हणजे हिंदी मराठी नाही. लहान पोर खेळताना भांडण झाल कि कशी बरळतात  तसा बरळतोय, रोज काहीतरी आठवून शिवराळ पणा.  इथे अण्णा  हजार्यांशी संबंध चांगले दाखऊन लालू ला मिठ्या  मारायच्या आणी हे सगळ AAP च्या कार्यकर्त्यांना चालत?

हल्ली RSS बद्दल वाईट बोलण्याची फ्याशन आहे, कुणीही उठत आणि RSS वाईट अस म्हणत काही लोक तर ISIS सारखेच आहे हो,  हे अस म्हणतात . एका माझ्या ओळखीच्या अतिशय सुज्ञ आणी आदरणीय माणसाने मला बोलण्याच्या ओघात  अस सांगीतल कि मोदी पेक्षा लालू बरा, माझ्या करता हे खूप धक्कादायक आहे.  मी स्वतः शाकेत जायचो कितेक वर्ष, अगदी शाखा घेऊन अनेक ठिकाणी जायचो, बर्याच संघातल्या (RSS च्या शाखा होत्या आमच्या लहान पणी ) लोकांना मी चांगल्या पणे  ओळखतो , चांगले सुशीक्षित, संसारी आणि संस्कारी लोक  आहेत, माझ्या देखत कुणीही बंदूक काढून खून केलेला मी पहिला नाही, किंबहुना ती लोक त्यातली नाहीच, मी करेन का अस काही? मग ही लोक ISIS सारखी कशी? लालू ने 12 हजार करोड खालले आणी बिहार ला पार मागे नेल, त्या  मनान गुजरातच बर चालला आहे अस दिसतंय, तरी लालू बरा? दीड वर्षात देशातले विरोधक सोडले तर फार काही वाईट लोक बोलत नाहीत आणी काहीतरी होताना दिसतंय.  भारता बाहेरच्या नेत्यांच मत सुधा चांगलच आहे (तरी लालू बरा?) आणि परदेश दौरा म्हणजे काही ITमध्ये onsite जाण्या सारखा नाही, गुंतवणूक दिसते आहेच न? सगळ्यांना instant noodles हवेत, लग्न  केल असत मोदीने  तरी अरे अजून गरोदरच बायको? दहा मुल होतील अस वचन  दिल होत, वर्ष झाल तरी अजून काही नाही? अस  म्हणणारी लोक कमी नाहीत (तरी लालू कसा बरा, त्याने पण एका वर्षात नाही काढली 9 मुल ?).

भीती  ह्याची वाटते कि आज लालू आला (खूप भीती दायक आहे, बिहारी माणसाला विचारा ), उद्या पप्पू येईल,बुद्धी जीवी खुश होतील (पैसा खाऊ द्या हो, गाय खायला विरोध नाही न?) मध्यम वर्गीय परत वैतागणार, मतच नाही देणार (लालू वाले नक्की  देतील), बाहेर  (परदेशात)जायचा प्रयत्न करणार, हे आताच नाहीये आधी सुद्धा लोकांना बाहेरचा  (बिहारचा नाही ) मोह होताच  तो राहणार. हिंदून  बद्दल बोललात  कि तुम्ही जातीयवादी. मला त्या दिवशी दोघ हा ब्राह्मण आहे अस म्हणाले(म्हणजे सहजच) , कॉलेजात हा भट आहे अस ही मुल बोलायची (मला काही त्याच सोयर सुटक नाही म्हणा), पण उद्या मी जर  कुणाला जाती वरून हाक मारली तर मला तो कोर्टात  नेऊ शकतो. म्हणजे ती तुमची असहीश्रुन्ता subjective आहे काही लोकांनी केली तरच एरवी OK अस्त. 

मी आज का लहिल? कारण एक तर  फार लोक फार  काही बोलतायेत आणि generally वाईटच  बोलतायेत, पण एक चांगल म्हणजे लोकांना आता बोलावसं वाटतंय कारण कुणी तरी ऐकेल अस होतंय ही चांगलीच बाब आहे   .....पण तरी लालू कसा बरा? हे उत्तर नाही मिळाल आणी  ह्या काळात परत हिटलर होईल हे अशक्य आहे ...


जाता जाता एकच ....त्या अमृता ला प्लीज कुणीतरी सांगा हो, कि तू फक्त घरी गात जा, मुखमंत्री बरा असला  आणी आम्ही  कितीही साहिश्र्णु असलो म्हणून काय झाल?  फार अंत नाही  पाहू ग लोकांचा  

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

Appraisal - Decoded


Our new Pune office was inaugurated 3 (or was it 4?) years back, but I got a chance to visit the sprawling complex (?)only recently and then it’s now become almost weekly,  one good thing is the office has provided a shuttle service between our Mumbai  offices and Pune office. The travel time to and fro  is about 9 hours and there is not much  you  can do, but to watch the road or sleep or listen to music or talk about Projects (L very interesting), once all the options are over, you think and then you contemplate. I have now reached the stage of contemplating and have  given lots of thought on traffic movement the road, about life in general and then  of course life in office and then I think if I  really need to travel?  Why do I waste 9 hours of my life each week staring at nothing, looking in the  oblivion and get thoughts of writing a book on the lines of “Zen and the art of motor cycle maintenance” and sometimes as bright as working in the food mall or as a toll booth operator…

The other day I was chatting with the driver and got to know him, his life (gosh what has my company made me in to), his employer and stuff… Then I thought let me rate him, what if his employer takes his appraisal (at least he must be getting something). So I  just did a little recap, The bus timing is at 6:30 in the morning from Prism Tower (Malad) office, he came at 6:20 at the gate went to the office at 6th floor and the bus left at 6:30, went to the G5 office at Vikhroli, the driver collected the courier for Pune office came back, more people joined the bus, water was kept and we left in 5 to 10 minutes, further down the road at LBS marg the driver got down purchased newspaper for the staff and we continued . He was wearing seat belt, AC temperature was at 24, which was comfortable (the bus is not really much comfortable) and  he was stopping at the  designated points where more people (from our office of course) hopped on to travel to Pune. On the expressway he was driving exactly at 80 K.M. per hour, perfectly normal driving.  The bus halted at the Food mall for 20 minutes and we  continued  to Pune. The same  story repeated in the evening. 

Let me rate him now:
·         The driver was  wearing an uniform – expected – 3
·         Arrived on time  - expected – 3
·         Collected courier from office - expected – 3
·         Driving at  designated speed - expected – 3
·         Halting at  food mall and designated  places - expected – 3

He also told me that once his boss (employer)  had asked him to undertake extra work on weekend and fill in for a driver, since the shuttle is only from Monday to Friday, but it  was  so hectic that he could not report to work on Monday as he returned from the extra shift on Sunday midnight. If a  bell curve  is in place he may lose his rating, since he did not take up oraganisational activity and lacked team spirit, but will still rate hi 3  as of now. He  does not do a single thing extra, does not help people in loading the  luggage, does not greet us in the morning, does not talk much.  He does  not fight either or compromise our safety, but that is obviously expected from him so no extra points.

Like very few people here, the driver one day decided to take a vacation and go to his mulluk  (native place)for a month and  we had a replacement.

At PT the usual bus came a new fellow  alighted with someone (probably the owner) went up to the office collected the courier, told something to the driver and went away. The driver started and asked us the destination (no proper handover, inefficient transition manager)someone said Vikhroli , he was a driver so knew how  to drive, however he did not know the office address  so did not take the office route, so we had to guide him till the G5 office, explained him to collect the courier (we were the end users of the customer)  he however did not buy the papers (sigh!) had to be told where to stop and also the Pune address and the shortest route. Coming back was OK, but he was not aware which foodmall to stop, but did halt wherever people had to get down.

Now if we are to rate the replacement:

·         The driver was  wearing an uniform – expected – 2 (he was replacement and does not justify the expense so 3 )
·         Arrived on time  - expected – 3
·         Collected courier from office - expected – 2, he was not aware of deliverables, did not ask and he is at fault, owner will not tell, the employee has to ask and not assume
·         Driving at  designated speed - expected – 3
·         Halting at  food mall and designated  places - expected – 2.5, he must be stopping at a different food mall, its only because we are used to a  certain place he need not stop there.

I wanted now revise and rate my regular driver at 5.

But thinking again from an HR or owner’s point of view, did he really deserve anything more than 3? The replacement one was only expected to drive which he did and was not given a proper handover, but the regular driver does not do anything extra, spectacular and mind blowing, did not bring any new customer, no new revenue, I never hugged him good night nor did I (or as  far as I remember) anyone else called  up his employer to thank him for providing such a wonderful person to ferry me every day. He has not helped the office boys also (I don’t know what it means, but he should help people around). He had not created a backup, he should have foreseen the issue and taken a driver on his own expenses to Pune and explain the process (contingency plan), so he will barely be able to get even 3 now.

He may (will) not get a raise, the diesel prices have already been revised and maintenance cost is high so whatever the increase of rate if any (usually we offer discounted rate year after year)that the customer may be offering, the owner would still be making a loss technically and  he is also expanding his business by purchasing (or acquiring from other transporters)couple of Volvo busses, so this in turn will benefit the business and ultimately (and hopefully) make a positive impact on the driver (whatever it  means).

So my friends if I compare “yours faithfully” (and probably most of us)with the driver, its simple (and business) logic that we will get a rating of 3 and surely don’t deserve a raise or increment, since we seldom do anything extra. I am really feeling better after the analysis and completely understand the way it works, why do we have bell curves and all the nice stuff. The company is benefiting in the end  and  in its growth lies my growth.

You are free to go ahead and chose a new bus, the existing owner will not be  affected (the end users probably would for some days), but no guarantee that the new owner will be different than the old one and we also know the route now, why move when we can still see lot of cheese?


Sagar

p.s.: You can always buy a new bus if you have the money and the … I can share my  driving license details 

रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

"मुलगी वाचवा" "मुलगी शिकली प्रगती झाली"


मी आज हेमाली च्या चित्रकलेच्या प्रदर्शना  गेलो होतो, हेमाली आमच्या software कंपनी मध्ये काम करत होती, पण तिच्या कलागुणांची ख्याती बरीच पसरली होती, कोणत्याही creative  गोष्टी मध्ये तिलाच पाहिलं पारितोषिक मिळायचं, मग ते रांगोळी स्पर्धा असो  कि cubicle  decoration , काहीही असो ती खूप सुरेख चित्र काढायची. नाही  म्हणायला तिने माझ पण एक caricature  केल आहे (चेहराच देवाने असा दिलाय न कि cartoon काढायचं हुरूप येत अश्णार लोकांना, म्हणून हिमांशू ने पण माझ काढल होत).  तिला आम्ही अक्षरशः बाहेर ढकललं कंपनीच्या , मग  तिने IIT  मधून Mster of Design (M.Des) in Animation  आणी त्या नंतर ती Florence (Italy) जाउन पण एक वर्ष राहून classical realistic art शिकून आली आणि आज हे प्रदर्शन. 

पण हा लेख हेमाली चा नसून तिच्या आई वडलांचा आहे, हेमाली ही एक्लुती एक गुजराती कुटुंबात जन्मलेली मुलगी. वडील Chemical  Engineer आणि स्वतःची factory, ही मुलगी Engineer, अभ्यासात हुशार अश्णार कारण आमच्या कडे first क्लास आलेल्या  मुलांना (आणि मुलींना, हल्ली फार ताप झालाय नुस्त मुल म्हंटल कि लगेच चार लोक झेंडा घेऊन पुढे येतात, असो तर ह्यांनाच) नोकरी मिळायची, दोन वर्ष नोकरी करून तिने राजीनामा दिला आणि वडलांच्या factory  मध्ये पण एक वर्ष काम केल, पण शेवटी चित्र कलाच करणार हे तिने सांगितला आणि त्या प्रमाणे शिक्षण घ्यायला सुरुवात केली, तिच्या पालकांनी तीला दिलेला पाठींबा फार महत्वाचा आहे अस  मला वाटत, तीच कौतुक आहेसच, पण हल्ली मुल (आणी मुली), आई वडलांची स्वप्न जगत  असतात (कितेक उधार्ण आहेत) आणि इथे पालक मुलिच स्वप्न जगत आहेत. एकुलती एक मुलगी लग्नाच वय होत आलंय किव्हा एव्हाना तरी  होईला हव  होत हो, अस दहा लोक तरी म्हणाली असणार, गप्प गुमान कारखान्यात येउन बस हे म्हणण सोप असेल, पण तरी सुधा अस न  करता तिला पाठींबा देण कठीण  काम त्यांने केल .  आज तिची आई भेटली मला, म्हणालि कि एकदा चित्र काढायला बसली कि भान राहत नाही तिला मग मी  पण जागते रात्र भर तिच्या बरोबर   तिला juice  दे दूध दे, अशक्त होते फार . तुमच्या कडे कुणी आहे का artist? मी विचारल नाही म्हणल्या मीच काढायची रांगोळी तेव्हा ही बघायची, मामा होता शेजारी, म्हणाला कायम पाहिलं पारितोषिक मिळायचं चित्रकले मध्ये … म्हणजे इथून आलाय हा गुण चित्र कलेचा …  नाही नाही ही फारच सुंदर काढते म्हणाल्या आणी गाते पण :) लगेच लेकीचा आणीक एक गुण, मला खूप आदर वाटल आणि गम्मत सुधा. 

हल्ली आपण "मुलगी वाचवा" "मुलगी शिकली प्रगती झाली" वगेरे म्हणतो न? ह्या  अश्या लोकांचा गौरव करायला हवा ह्या पालकांनी गप गुमान लग्न कर  आणि कर नोकरी अस म्हंटल असत तर आज इतकी प्रगती खरच ती करू शकली असती का? त्या माउलीला माझं  मन  पासून वंदन ….

http://hemalivadalia.com/






शुक्रवार, १७ जुलै, २०१५

किल्ला

किल्ला

दिगदर्शक हा मुळचा कॅमेरा मन आहे हे पिक्चर च्या पाचव्या मिनटाला कळत  तो नक्की चित्रकार सुद्धा अश्णार. एक तर कोकणच  फार सुंदर आहे, पण ते  चित्रकाराच्या डोळ्यातून पाहीची संधी किल्ला ह्या चित्रपटा मुळे आपल्याला मिळते .

सांगण्यासारखी गोष्टी  अशी काही नाही, म्हणजे एक 20 एक पानी कथा होईल फार तर, पण एक तर मांडणी आणि अभिनय, म्हणजे ती मुल तिथलीच शाळेतली वाटतात तेच त्यांच घर, शाळा, परिसर मित्र मंडळी  सगळी तिथलीच वाटतात इतका सहज सुंदर अभिनय.

एक तर सगळ्याच गोष्टी सांगितल्या नाहीत त्या तुमच्या तुम्ही  उलगडून घ्याच्या, म्हणजे त्या चिन्मय च्या आई ची घुसमट, एकाकी पणा, तिचा लढा वर वर प्रसंगातून दाखवलाय. एक तर खूप समंजस, पण लढाऊ  बाई दाखवली आहे आणि अमृता सुभाष ला सगळा पिक्चर शांत ठेवणं खूप अवघड अश्णार आणि melodramatic दाखवणं सहज सोप असताना आणी खपून जाइल अस असताना बांधून ठेवण म्हणजे खरच  कौतुक (संदीपला ला पण नाही जमलं श्वास मध्ये). त्या मुलाच्या आतल वादळ, लहान वयात, अस  कठीण प्रसंगाला सामोरा जाव लागण,  त्यात नवीन मित्र अगदीच वेगळे, गावणढल, काय म्हणतात त्याला इंग्रजीत? "Raw ,unpolished " खेळ वेगळे, वागण वेगळ, पण  त्यातून तो कसा वाट  काढतो, वादळात आपली  नाव कशी मार्गी लावतो, हे सगळ नुस्त  प्रतीकात्मक. त्या मुलाने तर अप्रतिम अभिनय  करून हे सगळ वागण्यात दाखवलाय, अगदी मीत  भाषी, पण आपल्या हालचालीन वरून म्हणा किव्हा चेहेऱ्यावरून म्हणा खूप बोलून जातो.

त्याचा तो मित्र त्यालाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय अमीताभ  बरोबर काम केलय  त्याने, तो त्याला आपल्या आई वडील  कशे मेले हे सांगताना अगदी matter of factly सांगतो  कि बस ड्रायवर झोपला आणि दरीत बस  कोसळली,  अंगावर एक झखम न होता गेले  .... मग त्याच वागण आपल्या पटायला लागत  अगदी बालपणी आई वडील गेले काका कडे राहत असलेला थोडा दुर्लक्षित म्हणून वांड, मोठ्या मुलाशी मैत्री करून लहान  मुलांना ओरडणारा दम दाटी करणारा कारण  घरात तेच असणार, हकनाक कुणाला तरी पिडायचं   हा उद्योग, पण चेहरा निष्पाप आणि वेळेला मित्रांना मदत करणारा, जो मूळ  स्वभाव किव्हा बाल सुलभ .  पण लहान मुल तशीच असतात, आधी तरी होती .

आई मुलाचे संवाद पण छान आहेत ती  अजिबात  मोठ्याने ओरडून आपली बाजू मांडत नाही, त्यालाच आपो आप कळत आणि नंतर आई ला मिठी मारतो, बस  तेवढच  काय ते नंतर परत नॉर्मल  उगा अश्रू उधळ नाही. छान उलगडणारा नात 

समुद्रात होडीतला आणि किल्ला मधला प्रसंग ज्याने त्याच आयुष्य बदलत  घडत ते अगदी पिक्चर चे high points.   सगळ्यांनी एकदा तरी निश्चित ही काल्कृती पहावी ... 






शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

हिंदू धर्म

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय? हा धर्म कधी स्थापन्न झाला?म्हणजे त्या जू लोकांचा तो मोसेस का कुणी होता क्रीस्चन लोकांचा येशु आणि मुसलमानांचा मोहोम्मद. झालंच तर सिद्धार्थ चा जेव्हा गौतम बुद्ध होतो ते ही आपल्याला ठाऊक आहे , जैन लोकांचा महावीर , शीख लोकांचे धर्म गुरु हे आपल्याला माहित आहेत. 

पण हिंदू धर्म  हा established कधी झाला? तो Pvt. Ltd. कधी झाला हे मला कुणी सांगेल का? का हा धर्म होताच आणि आपल्याला हे माहीतच न्हवत? जेव्हा मुहम्मद घानी / चेंगीझ खान व इतर तत्सम परकीय  लोकांनी हल्ला केला तेव्हा आपल्याला समजलं  कि  ही लोक मुसलमान आणि आपण असे नाही , कालानतराने पोर्तुगीज आले (त्यानी खर तर conversion सुरु केले इंग्रज ह्या भानगडीत नाही पडले म्हणून राज्य करू शकले) आणि  हे ख्रिस्त म्हणजे आपण हे सुधा नाही , म्हणून  आपण हिंदू अस  आहे का? "Its a way of life" हे बरोबर आहे का? मी हिंदू आहे का? कश्यावरून?

आता काही लोक  तोकडे कपडे धर्मा  विरुद्ध आहे अस म्हणतात, पण शिलाई दोन हझार वर्षान पूर्वी होती का? त्या सेरिअल मध्ये दाखवतात तस  फॉल वगेरे लाऊन साडी होती का?ब्लाउज होते का? का साध फडक चोळी म्हणून बांधायचे? का फक्त साडी किव्हा नुस्त अंगाला गुंडाळलेल वस्त्र असायचं ? त्याने बाईची पाठ , पोट, कंबर, पाय दिसायचे का? ते अश्लील होत का? का बाइका कैक हजारो वर्ष डोक्यावर पदर घेऊन फिरायच्या? मुलींनी कमी कपडे घातले म्हणून माणूस भरकटला अस  म्हणणारे लोक हजार वर्षान पूर्वी होते का?माझ्या वाचनात किव्हा  गोष्टीन मधून हे समजलंय कि  इंद्र अप्सरांना पाठवून (देवांचा राजा सुधा काम करत नाही) ऋषी मुनींची तपशचर्या मोडायला लावायचा, मग ते मोहित होयचे(पण कुणी अप्सरेवर बळजबरी केल्याचं वाचण्यात आलेलं नाही), म्हणजे जी लोक बलात्कार करतात ते थोर ऋषी मुनी असतात/आहेत का?आणी ह्या मुलींना इंद्र पाठवतोय का?आणी  आपल्याला ते माहित नाही का?

हिंदूंच्या कोणत्या पुस्तकात मी काय खाइच आणि नाही हे लिहून ठेवलय ? ते पुस्तक कुणी लिहील आहे? देवळात खूप वेळा आरती करतात किती वेळा हे अस कुठे सांगितलंय का? देवाला कांदा लसूण चालत नाही अस देवाने कुणाला खाजगीत सांगितलंय का? कधी? ते इतरांना कस समजल?दहा हजार वर्षान पूर्वी शेती होती का?लोक अन्न शिजवायचे का? तेव्हा प्राणी मारून  खाईचे का? गाय मारायचे का? ती खाईला कधी व कुणी बंदी घातली? रामायणा मध्ये लोकांच जेवण काय होत? तेव्हा लोक लग्न करायची का?किती करू शकायचे? हा एक पत्नी चा नियम रामा मुळे पडला का? कारण महाभारतात तर एका पुरुषाला (पांडवांना सुधा)एका पेक्षा जास्त बाइका  होत्या आणि एका बाईलाच  एका पेक्षा जास्त नवरे होते. आपण आता मागास आहोत का तेव्हा होतो ?













गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

शोभा D(ivte)e

का उगीच त्या बिचाऱ्या बाईला सगळे त्रास देतात, एक तर तिचा आवडता, गोड, गोंडस, गोरा गोमटा, राजकारणी (मोठा विनोद आहे), सध्या बेपत्ता आहे, तिचा लाडका नट सध्या नाशीक कारागृहात, इतकया वेळा पाकिस्तानात जाऊन सुद्धा तिला एकदाही नाही भेटला मुलखात द्यायला (किती वाईट वाटल असेल). म्हणून अस काही बाही बरळते आणी एका स्त्री वर असा हल्ला? अरे अरे अरे …हाच का तुमचा मराठी बाणा? 

खर तर मला तीच लेखन कळत नाही, उच्च कोटीच लिहिते , तिची पुस्तक वाचण्या पेक्षा मी "सविता भाभी" वाचेन , सरळ, सोप, लगेच कळत. तेच लिहायचं मग उगाच आढे वेढे कशाला? तीच बिचारिचा काही उद्देश मराठी माणसाला दुखवायचं न्हवता यार, तिला "माझं  नाव शोभा " एवढंच काय ते मराठी येत असेल, ती कशाला मारायला मराठी सिनेमे पाहील ? कारण एकदा तरी तिच्या स्तंभातून (articles) एका तरी सिनेमाचा (चांगला) उल्लेख झाला असता. त्या बापडी करता मराठी खाणं  म्हणजे मीसळ आणि वडा  ह्याच पुरत सीमित आहे, म्हणून ते लिहिलं, उगा त्रास  नका देऊ तिला. बंगाली खाणं, continental, oriental अस सांगा लिहायला, बघा शंभर पान लिहील …  

जाउद्या हो फडणवीस दुर्लक्ष करा De madam कडे , लोकांना नाना फडणवीस नाही उमगले तर तुम्ही कशे कळणार?  त्यांना घरी बोलवा चांगला वांगी भात, ठेचा वगेरे बेत घाला…. 

(शोभा madam  ना कुणी तरी सांगा कि नाना फडणवीस हे देवेन्द्रचे आजोबा नाहीत)


शीकवण

 आज सकाळी (स्कूटर वरून) ऑफिस ला येताना , एका सिग्नल पाशी  (लाल होता म्हणून ) मी थांबलो. पाठून हॉर्न , मी लक्ष दिल नाही, सवय झाली आहे. परत होर्न , पाठच्या गाडीत एक माणूस (चांगला जन्टेल म्यान होता) आपल्या मुलीला गाडी शिकवत होता, मोठा L चा बोर्ड , मला खुणावतो जा , मी सिग्नल कडे बोट दाखवल , तरी परत हाताने जा म्हणाला, मी म्हंटल जा बाजूने , त्या माणसाने आपल्या मुलीला गाडी बाजूनी घेऊन जाईला सांगून मोडला सिग्नल, सुरेख शिकवण :). उद्या तिला सवय होणार आणि एक दिवस अन्दाज चुकला कि धडकणार आणि जीवाच  बर वाईट झाल  कुणाच्या (ही गाडीत हिला काय होणार?), तर हा माणूस जवाबदार असणार ती मुलगी नाही.  

त्याच्या मागून चार पाच गाड्या (सिग्नल तोडून ) गेल्या आणि माझ्या कडे "काय वेडा माणूस आहे " अस बघत गेल्या.  आंधळ्यांना कसा दिसणार दिवा? म्हणून त्यांची कीव करत  हसलो. 

रविवार, ५ एप्रिल, २०१५

राहुल देशपांडे / शंकर महादेवन

मगाशी झी वर एक कार्यक्रम पहिला त्यात महेश एलकुंचवार याचं भाषण आणि राहुल देशपांडे / शंकर महादेवन ह्याचं गाण अप्रतिम झाल.

गाण्याने "नशा" ह्यांची परिसीमा ओलांडली. एखाद्या संध्याकाळी सुर्य मावळत असतो ढगांना खेळायची हुक्की येते , आकाशात रंगांची उधळण होते , पक्षी हि त्यात सामील असतात वारा हळूच आपल्याल्या खुणावतो, आपण नुस्त त्या सूर्याकडे पाहत असतो ती दहा मिंट कशी जातात कळतच नाही, तों खेळ एकट्या सूर्याचा नास्तो अखं निसर्ग अस्त  त्यात सामावलेलं, आज शंकर आणि राहुल अशे काही गायले कि मेथ, गांजा, अफू झक  मारतील ह्या नशे पुढे … कुणाच्या friend  list वर ही दोघ असतील तर त्यांना माझा साष्टांग दंडवत सांगा … आज  वसंतराव नाहीत , मी काय त्यांना गाताना पहिले नाही, पण आज राहुल ने त्यांची उणीव भरून  काढली… शब्द अपुरे पडण ह्याची खंत आज प्रकर्षाने जाणवली…  

बुधवार, ११ मार्च, २०१५

बाइक वाले

 जश्या बाइका बाइकानच्या शत्रू असतात न तशेच हे बाइक  वाले बाइक वाल्यांचे शत्रू असतात म्हणजे बघा ladies first अशी रीत असते तशे बहुदा गाडी वाले बस वाले अगदी रिक्षावाला सुद्धा बाईकला जाऊ देतात पण दुसरा बाईक वाला समोर असेल तर ठोकेल पण जाऊ काही देणार नाही. एक तर काही लोकांना वाटत कि ते अमर आहेत किव्हा कवच कुंडल धारण केलेले आहे, अगदी अंग चोरून पण जातात पण त्यांना हे कळत नाही ती तुमची बाइक कशी चोरणार अंग ?  आणी हल्ली बेशिस्ती वाढली आहे सिग्नल तोडून पाळण्यात तर हे एक नंबर, समोरून सुसाट गाडी येत असली तरी हे पळतात. त्या दिवशी flyover माझ्या डावीकडून एक बाइक वाला मला अगदी खेटून ८०- ९० च्या वेगाने गेला म्हणजे मी जर अर्धा इंच जरी डावीकडे गेलो असतो तर तो  bridge वरून खाली आणी मी उजव्या बाजूच्या गाडीच्या खाली, गेल्या वर्षी  असच एका रिक्षावाल्याने  पाठून ठोकल्या नंतर  मी जर दबकूनच गाडी चालवतो त्यात हे अशे दीड शहाणे आणखी दहशत निर्माण करतात. 

परवा मी सिग्नलला उभो होतो (मी अजीबात मोडत नाही सिग्नल ) आणी  जरा तंद्रीत होतो, बाजूने एका बाइक वाल्याने इतका कर्कश  हॉर्न मारला कि मी दचकून सीट वरून उडालोच , मी दचकलो म्हणून तो हि दचकला आणि माझा बाजूला वाला एकदम गडबडला(पडलाच जवळ जवळ), मग आम्ही सगळेच हसलो, पण त्याला विचारल मी अरे भल्या माणसा का पण का वाजवलास हॉर्न? मी काय गंमत म्हणून रोज स्कूटर घेऊन ह्या सिग्नल ला उभा राहतो अस वाटल का तुला? म्हणून मला अद्दल घडवायला दच्काव्तोस? नाही अंकल (डोक्यात जात मला अंकल) जरा (म्हणजे दोन इंच)पुढे गेलो असतो  अस बोलल ते येड.….



मंगळवार, १० मार्च, २०१५

expert comments

सकाळी Cricket commentary ऐकत होतो आणि stump mike मध्ये सुरेश रैना चा अवाज आला "भाई उमेश अंदर हय उसको थोडा बाहर जाने को बोलो" सौरभ गांगुली (तो commentary करत होता ) ने त्याच्या बरोबर असलेल्या माणसाला  विचारला कि तुला समजला का काय म्हणाला ते ? थोड , पण नीट नाही अस तो  माणूस म्हणाला, फक्त "He is in tell him to  go out " अस न म्हणता, गांगुली म्हणाला कि रैना सांगतोय कि "umesh yadav is a little fine , I want him squarer", मस्त ज्याला cricket कळत  त्याला  लगेच कळल असणार रैना चा बोलण्याचा उद्देश, म्हणजे expert comments चा खरा अर्थ समजला, नुस्त इंग्रजी  अनुवाद न करता क्रिकेट चा अनुवाद करण किती महत्वाच ते त्याने दाखवलं …जियो दादा !!

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

बदलापूर

बदलापूर

चांगला सिनेमा तो असतो जो आपण आपल्या बरोबर सिनेमा घराच्या बाहेर घेऊन येतो आणि मी बदलापूर, दारातून बाहेर घेऊन आलो, स्कूटर वर येताना माझ्या समोर एक रिक्षा वाला थुंकला तरी मी दुर्लक्ष केल कारण  माझ्या मनात सिनेमाचा Climax घोळत होता . Paradigm Shift च मला एक उत्तम उधारण आशिष नी दिल   होतं .

"एकदा तो ट्रेन ने मुंबईला परत येत होता आणि त्याच्या शेजारी एक माणूस आणि त्याचा एक तीन चार वर्षांचा मुलगा होता तो सारखा टाहो फोडत होता, मधेच आई पाहिजे अस ओरडायचा , तो माणूस त्या मुलाला समजावत  न्हवता कि अरे आपण जाऊ थोड्या तासांने भेटेल आई, हे चोकलेट  घे , कि आणि काही , अगदी निर्विकार होता. लोक आपापसात बोलत होती काय लहान मुलाला एकट पाठवला आणि बाप असा . शेवटी न राहून एका काकूंनी विचारलं कि अरे समजाव त्याला जाऊ आईकडे आणि कशाला पाठवलं तुमच्या बरोबर तुम्हाला नाही सांभाळता येत ते? तो म्हणाला बाइको चार दिवसी पूर्वी वारली माझी, मुलाला परत घरी घेऊन चाललोय माहेरी होती ती … काय समजाऊ मुलाला?  सगळ Compartment सुन्न झाल, म्हणजे हा Paradigm Shift." आधी त्या माणसाला काय माणूस आहे? अस म्हणणारे अरेरे काय माणूस आहे अस झाल 

म्हणजे प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला Villain आणि त्या त्या वेळेला Hero असतो . दिग्दर्शकाला आख्खा  चित्रपट तोंडपाठ होता पुढे काय होणार माहित होत , त्या मुळे एक गती होती. थोडा लांबला, अजून छोटा असता तर आणखी परिणामकारक झाला असता. अभिनय उत्तम, म्हणजे अगदी हवालदारने पण उत्तम अभिनय, नावाझुद्दिन बद्दल काय बोलणार त्याला साजेशी भूमिका सहज अभिनय त्याचा राग येतो हसू येत कीव येते चीड येते. वरुण खूप  शिकला असेल , प्रगती आहे, जे सांगितलय ते केलंय, विनय पाठक  गुणी आहेच, हुम  खुरेशी ला rating  ४ पैकी ५ कारण ती येउन तिच  नुस्त काम करून जाऊ शकली  असती पण  तिने ते आणखी चांगल केलय, विनय पाठक  च्या बाईकोच काम अप्रतिम झाल आहे. 

पावसाचा उपयोग गूढ पणा वाढवायला उत्तम केलाय (आपण Romance करता कमी करतो उपयोग पावसाचा ), कारण खूप पाउस रात्री भयाण वाटतो. ज्या माणसाचा आयुष्य एका क्षणात उध्वस्त झाल  असत तो उरलेलं आयुष्य फक्त एकाच ध्यासान फिरत राहतो. पण मग बदला घेतल्यावर काय? सस्पेन्स वगेरे नाही अजिबात, पहिल्याच  पाच मिनटात कुणी खून केलाय का केला ते समजत आता वरुण काय करणार हे माहित असत, पण मग अचानक त्याने काय कराव ह्याचा विचार आपण करतो बरोबर का चूक हा वाद आपण आपल्याशीच घालतो, एक वाक्य  जे  नावाझुदिन म्हणतो ते खूप सांगून जातो तो म्हणतो मी खून केला कारण मी चिडलो होतो घाबरलो होतो दोन मिंट होती, पण तुझ्या कडे पंधरा वर्ष होती  मग असा का वागलास? आणि मग ते जो करतो त्याला आपण  कसा react करायचं ते कळतच नाही , अगदी अनपेक्षित. सूड , बदला म्हणजे काय? कश्यासाठी हे विचार करायला लावतो. Mind Games म्हणजे काय हे उत्तम दाखवल आहे नक्की माणूस काय विचार करत असतो हे आपल्याला कळू शकत नाही हे फार छान दाखवल आहे 

सिनेमा मध्ये गाण  नाही कारण गरज नाहीये, रोमान्स नाही, violent  आहे पिक्चर पण वेगळा, डार्क सिनेमा म्हणले लोक, असेल, पण मनाला इजा करतो म्हणून violent. दोन चार गोष्टी नाही पटत ते ठीक आहे. पण बघण्यासारखा आहे, अती क्रूरता दुष्टपणा सहन करू शकला तर, गम्मत म्हणून बघण्य सारखा नाही हा सिनेमा. 

एक सांगायचं म्हणजे अगदी climax ला पाठी एका गुजराती माणसा ला फोन आला आणि तो आणि त्याची बाइको हसून बोलले पाच मिंट, पण तरीही मी पाठी वळून त्यांना काही नाही बोललो … बिचारे वाया गेले पैशे त्यांचे उगीच आले होते.  




















शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

AIB

मी  आज AIB चा कार्यक्रम you tube वर पाहिला …. हसायला येतच जर तुमची शिव्या  
ऐकायची हरकत नसेल आणि तुम्हाला अश्लील विनोद आवडत असतील तर बघाच  मला आवडला … म्हणजे मी स्वतः  जाऊन काही तिथे भाग घेऊ शकणार नाही (मला कशाला कुणी बोलवेल?).  अक्षरशः आई बहिण …. म्हणजे आ   ई    ब     ही   ण काढली  आहे सगळ्यांनी सगळ्यांची …… म्हणजे तुम्हाला एक तर प्रसिद्ध असावा लागेल आणि तिथे भाग घेण्याची हिम्मत. खर म्हणजे  अगदी खर बोलले आहेत आणि बरचस आपल्या मनातलं (शिव्यान सकट), करण जोहर बद्दल त्याच्या समोर आणि   त्याने सुधा स्वतःवर विनोद केलाय आणि हस्लाय … खूप जास्त अश्लील आहे मान्य आहे पण तस  आधी सांगितल आहे … हव तर घ्या नाहीतर द्या सोडून … उगीच रस्त्या वर पडलेली काडी कानात (किव्हा तुम्हाला हवी तिथे ) घालायची आणि कान दुखतो म्हणून ओरडत बसायचं , त्यातला प्रकार आहे 

हा विनोद भारतीय स्वरूपाचा नाहीच , आपण मित्रान मध्ये आई बहिणी काढतो पण चार चौघात नाही , पण आता जग बदलत  आहे जस आपण बर्गर स्वीकारला तस  हे हरकत नाहीये (इलाजही नाहीये)…. मला कुणी बर्गर खा अशी जबरदस्ती करत नाही न? तशी मला कुणी AIB बघ अशी जबरदस्ती करत नसेल तर मला त्यात गैर वाटत नाही …. अस असेल तर आधी "होणार सून मी ह्या घरची बंद करा" (हे फक्त एक  उधारण होत , सगळ्याच बंद करायला हव्यात खर तर ) काय पण दाखवतात आम्हाला उल्लू समजतात आमच्या अकलेचे आई बहिण काढतात , इथे तर लोक स्वतः  स्वखुशीने जातायेत आणि तीन एक हझार  रुपये देऊन (एका तिकिटाचे). मग एस्सेल वर्ल्ड बंद करा तिथे लोकांना तुम्ही वरून खाली टाकता  गोल फिरवता घाबरवता आणी  रग्गड पैसे  घेता , त्याला तुमची ना नाही न? तर मग ह्याला का? लोकांनी कृपा करून इतरांनी कश्यावर हसायचं आणि हसू नये हे ठरवू नये … आणि भारतीय संस्कृती बद्दल तर अजिबातच बोलायचं काम नाही …  

आपण  हल्ली खूप impatient   झालोय, पण विनोद बुद्धी पण विसरलोय का ?  तिथे  सर्व अपमान स्व खुशीने होतोय रग्गड पैसा मिळतोय सगळ्यांना आणि ते सुधा त्यांना सांगून त्यांच्या मर्जीने (its scripted रे ),  मग हे का? कशाला? जर एवढ बबाल झाल नसत तर मी हे पाहिलं पण नसत. किव्हा  त्यांचाच हाच  हेतू  नसेल न?  बघितल माझ्या मनात पण शंका आली आता …  जाऊदे यार मजा करा जरा लोकांना हसू द्या स्वतःवर  आणि  इतरांवर आणि त्यांच्या संमतीने …… 





बेशिस्त

मी परवा बडोद्याला गाडी घेऊन गेलो होतो … NH8, छान आहे रस्ता , फक्त एके ठिकाणी  भारुच्ला वाईटट  (ट ला ट) अडकलो आणि म्हणून थोडक्यात ज्या करता गेलो ते नाही झाल . वडीलांची मावशी वारली वय वर्ष ९४ - ९५ . बातमी आल्यावर तातडीने निघालो, पण तिथे स्मशान आठाला  बंद म्हणे, त्या मुळे  शेवटच दर्शन हुक्ल. पण हा नियम समजला नाही मला, एरवी अतिशय बेशिश्त लोक, हे असले फाजील नियम का घालतात आणि पाळतात कुणास ठाऊक, आता वेळ सांगून येते का? 

तीथे  गेल्यावर मला कुणी विचारल गुजरातचे रस्ते कशे आहेत आमच्या? मी म्हणालो महाराष्ट्रात जास्त चांगलाय आणि  लवकर येता येत गुजरात आल कि सगळा गोंधळ, लोक उलट काय येतात , पहिल्या लेन मध्ये काय हळू हळू काय  चालवतात , म्हणजे सगळे नियम अगदी धाब्यावर , कुणाला पडलीच नसते कुणाची स्वार्थी सगळे …  आणि हे लक्षात सुधा येत नाही कुणाच्या की त्यांच्या मुळे सगळ्यांना हळू जावं  लागत. एक तर आपल्या राज्याला देशाला दुसऱ्या कुणी बोललं कि मला नाही चालत, ते आमच आम्ही पाहू आणि मुंबईत आपण थोडे जास्त शिस्तीने वाहन चालवतो (पूर्वीची मुंबई नाही हो राहिली आता ), चाईला मला काय विचारता रस्त्याबद्द्दल शिस्ती  बद्दल . माकडा कडे चांगला पेन दिल म्हणजे तो काय छान  चित्र काढेल का? मुळात अंगात असेल तर दिसेल , हो  कि नाही ? 

पण मला आता गुजरात च्या यशा बद्दलच शंका वाटू लागली आहे, कारण सारख नियम मोडून  आणि मोडीत काढणारी ही जमात इतकी कशी पुढे जाऊ शकते आणि प्रगती करू शकते? आम्ही येताना सुरत ला गेलो तेव्हा येताना एक छोटस रेल्वे च फाटक लागल, तर ही शूर वीर माणस अख्ख फाटक अडून उभे होते म्हणजे अर्धा भाग जाईला  आणि अर्धा यायला असा हवा न? तर दोन्ही बाजूला लोक फाटकाला चिकटून उभे ,  गाडी गेली फाटक उघडल तरी कुणीच पुढे जाऊ शकत न्हवत ,  सामोरा समोर लोक उभी ठाकलेली, एकाच जागी पाउण  तास …. कठीण आहे सगळ.  म्हणजे शिस्ती पेक्षा बेशिस्त फायद्याची आहे का?
















शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

प्रामाणीक

प्रामाणीक

मी कधी कधी (खूप पोट वाढलय सागर,  अस कुणी म्हंटल कि लगेच )सकाळी (पहाटे  नाही )national park ला cycling करायला जातो,  तिथे वाटेत लहान मुल , मुली पेरू, काकडी, संत्री विकायला बसतात.  मी नेहमी त्यांच्या कडून काहीतरी घेतोच,  कारण ती सकाळी थंडीत उठून आईवडील म्हणत असतील म्हणून बसतात त्यांना चार पैसे मिळाले तर त्यांना हुरूप येईल सकाळी उठायचं सार्थक होईल अस वाटत म्हणून. आज एका मुलाला विचारल कि बाबा कुठे राहतोस तर तिथेच पाठी कोणत्यातरी पाड्यात म्हणाला (वीज नाही घरी ….  मुंबईत असून), सहावीत शिकतो (school bus नाही ट्यम्पो ने जातो म्हणाला  ) पार्क च्या बाहेर बोरीवली पूर्वेला आहे शाळा .
त्याला विचारलं कि काय रे पेरू गोड आहे का (उगीच कायच्या काय विचारायचं म्हणून) ?  मला म्हणला  माहित नाही … विकत आणलाय …  ह्याला प्रामाणिक पणा म्हणायचा का निरागस पणा?