आज सकाळी (स्कूटर वरून) ऑफिस ला येताना , एका सिग्नल पाशी (लाल होता म्हणून ) मी थांबलो. पाठून हॉर्न , मी लक्ष दिल नाही, सवय झाली आहे. परत होर्न , पाठच्या गाडीत एक माणूस (चांगला जन्टेल म्यान होता) आपल्या मुलीला गाडी शिकवत होता, मोठा L चा बोर्ड , मला खुणावतो जा , मी सिग्नल कडे बोट दाखवल , तरी परत हाताने जा म्हणाला, मी म्हंटल जा बाजूने , त्या माणसाने आपल्या मुलीला गाडी बाजूनी घेऊन जाईला सांगून मोडला सिग्नल, सुरेख शिकवण :). उद्या तिला सवय होणार आणि एक दिवस अन्दाज चुकला कि धडकणार आणि जीवाच बर वाईट झाल कुणाच्या (ही गाडीत हिला काय होणार?), तर हा माणूस जवाबदार असणार ती मुलगी नाही.
त्याच्या मागून चार पाच गाड्या (सिग्नल तोडून ) गेल्या आणि माझ्या कडे "काय वेडा माणूस आहे " अस बघत गेल्या. आंधळ्यांना कसा दिसणार दिवा? म्हणून त्यांची कीव करत हसलो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा