का उगीच त्या बिचाऱ्या बाईला सगळे त्रास देतात, एक तर तिचा आवडता, गोड, गोंडस, गोरा गोमटा, राजकारणी (मोठा विनोद आहे), सध्या बेपत्ता आहे, तिचा लाडका नट सध्या नाशीक कारागृहात, इतकया वेळा पाकिस्तानात जाऊन सुद्धा तिला एकदाही नाही भेटला मुलखात द्यायला (किती वाईट वाटल असेल). म्हणून अस काही बाही बरळते आणी एका स्त्री वर असा हल्ला? अरे अरे अरे …हाच का तुमचा मराठी बाणा?
खर तर मला तीच लेखन कळत नाही, उच्च कोटीच लिहिते , तिची पुस्तक वाचण्या पेक्षा मी "सविता भाभी" वाचेन , सरळ, सोप, लगेच कळत. तेच लिहायचं मग उगाच आढे वेढे कशाला? तीच बिचारिचा काही उद्देश मराठी माणसाला दुखवायचं न्हवता यार, तिला "माझं नाव शोभा " एवढंच काय ते मराठी येत असेल, ती कशाला मारायला मराठी सिनेमे पाहील ? कारण एकदा तरी तिच्या स्तंभातून (articles) एका तरी सिनेमाचा (चांगला) उल्लेख झाला असता. त्या बापडी करता मराठी खाणं म्हणजे मीसळ आणि वडा ह्याच पुरत सीमित आहे, म्हणून ते लिहिलं, उगा त्रास नका देऊ तिला. बंगाली खाणं, continental, oriental अस सांगा लिहायला, बघा शंभर पान लिहील …
जाउद्या हो फडणवीस दुर्लक्ष करा De madam कडे , लोकांना नाना फडणवीस नाही उमगले तर तुम्ही कशे कळणार? त्यांना घरी बोलवा चांगला वांगी भात, ठेचा वगेरे बेत घाला….
(शोभा madam ना कुणी तरी सांगा कि नाना फडणवीस हे देवेन्द्रचे आजोबा नाहीत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा