मी परवा बडोद्याला गाडी घेऊन गेलो होतो … NH8, छान आहे रस्ता , फक्त एके ठिकाणी भारुच्ला वाईटट (ट ला ट) अडकलो आणि म्हणून थोडक्यात ज्या करता गेलो ते नाही झाल . वडीलांची मावशी वारली वय वर्ष ९४ - ९५ . बातमी आल्यावर तातडीने निघालो, पण तिथे स्मशान आठाला बंद म्हणे, त्या मुळे शेवटच दर्शन हुक्ल. पण हा नियम समजला नाही मला, एरवी अतिशय बेशिश्त लोक, हे असले फाजील नियम का घालतात आणि पाळतात कुणास ठाऊक, आता वेळ सांगून येते का?
तीथे गेल्यावर मला कुणी विचारल गुजरातचे रस्ते कशे आहेत आमच्या? मी म्हणालो महाराष्ट्रात जास्त चांगलाय आणि लवकर येता येत गुजरात आल कि सगळा गोंधळ, लोक उलट काय येतात , पहिल्या लेन मध्ये काय हळू हळू काय चालवतात , म्हणजे सगळे नियम अगदी धाब्यावर , कुणाला पडलीच नसते कुणाची स्वार्थी सगळे … आणि हे लक्षात सुधा येत नाही कुणाच्या की त्यांच्या मुळे सगळ्यांना हळू जावं लागत. एक तर आपल्या राज्याला देशाला दुसऱ्या कुणी बोललं कि मला नाही चालत, ते आमच आम्ही पाहू आणि मुंबईत आपण थोडे जास्त शिस्तीने वाहन चालवतो (पूर्वीची मुंबई नाही हो राहिली आता ), चाईला मला काय विचारता रस्त्याबद्द्दल शिस्ती बद्दल . माकडा कडे चांगला पेन दिल म्हणजे तो काय छान चित्र काढेल का? मुळात अंगात असेल तर दिसेल , हो कि नाही ?
पण मला आता गुजरात च्या यशा बद्दलच शंका वाटू लागली आहे, कारण सारख नियम मोडून आणि मोडीत काढणारी ही जमात इतकी कशी पुढे जाऊ शकते आणि प्रगती करू शकते? आम्ही येताना सुरत ला गेलो तेव्हा येताना एक छोटस रेल्वे च फाटक लागल, तर ही शूर वीर माणस अख्ख फाटक अडून उभे होते म्हणजे अर्धा भाग जाईला आणि अर्धा यायला असा हवा न? तर दोन्ही बाजूला लोक फाटकाला चिकटून उभे , गाडी गेली फाटक उघडल तरी कुणीच पुढे जाऊ शकत न्हवत , सामोरा समोर लोक उभी ठाकलेली, एकाच जागी पाउण तास …. कठीण आहे सगळ. म्हणजे शिस्ती पेक्षा बेशिस्त फायद्याची आहे का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा