काल मी रफीच्या जयंती बद्दल लिहील म्हणून अजून थोड :)
किशोर च्या उगवत्या काळात रफी चा confidence एवढा गेला कि कुणीही त्याला काहीही बोलायला लागला, नौशाध एकदा मुद्दामून रेकॉर्डिंग studio मध्ये गेला आणी अस पाहिलं कि ऐरे गैरे रफीला बोलायचे , नौशाध ने रफी ला झापला जाम आणी खड्सावला, कि तू ग्रेट आहेस आणी हे कोण तुला शिकवणारे? ह्यावर न थांबता एक भैरवी मधल एक गाण करून घेतल, मला खर तर भैरव आणी भैरवितला फरक कळत नाही (खर तर केदार आणि भैरव मधला पण कळत नाही ) पण अस वाचल आहे. त्याच वर्षी "तेरी गालीयो मे न रखेंगे कदम" ला film fare मिळाला आणी रफीचा confidence परत आला.
confidence जायचं कारण कि, आराधना करताना बर्मन दा आजारी पडले म्हणून पंचम ने धुरा सांभाळला, म्हणून "बागो मे बहार हय" हे रफी आणी मग "रूप तेरा मस्ताना" किशोर , त्या नंतर म्हणतात तस , rest is history. पण ज्या माणसाने एके काळी सगळ्या सुपर हिट्स पिक्चर च्या हिरो ला आवाज दिला तो असा होऊ शकतो? पंचम रफी चा चाहता न्हवता, तस अनील बिस्वास आणि सी रामचंद्र ही रफी विरोधक होतेच आणि थोड्या प्रमाणात सलील चौधरी सुद्धा, बघा न बहुतेक गाणी मुकेश, तलत किव्हा मन्ना डे आहेत सलील चौधरी साठी गायलेले . "धीरे धीरे चल" मध्ये पण लता बाई चिडल्या होत्या म्हणे आणी सलीलदा ने बाजू तिचीच घेतली. पण सांगायचा मुद्दा असा कि आला परत confidence, niche skill होत आवाज सुमधुर, आणी तालमीतला आवाज …
पण ह्या वरून एकच कि, तुम्ही किती वर गेलात, तरी कुणी तरी तुमच्या पेक्षा सरस येऊ शकतो आणी एका प्रसंगा मुळे आपण परत वर येऊ शकतो …
हे वरच सगळ राजू भारतनच्या एका लेखातून आणी थोडस माझ्या बुद्धीतून …
Happy New Year!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा