एक सत्यकथा
हल्ली जे काही गाजतंय म्हणून मला एक घटना आठवली , मला कुणी तरी सांगितलेली....जशी सांगितली तशीच लिहित आहे...
"मी आधी एका क्लासेस मध्ये शिक्वायची , कॉलेज मधली मुल मुली होती सगळी , तिथे एक गोड चुणचुणीत मुलगी यायची छान होती तरतरीत, सरळ नाक, छान केस..मला आवडायची ...मला एकदा आमच्या एका पिउन ने तिच्याशी गप्पा मारताना पाहिलं आणि मला म्हणाला "बाई जास्त बोलू नका तिच्याशी चांगली नाही ती " असा मला आणखी कुणी सल्ला दिला , माझ्या लक्षात आल कि ती नेहमी मुलान मध्ये जास्त असते, मुली तिला टाळतात , पण मी मात्र कुणाच ऐकल नाही , मी बोलायची , तिला बर वाटत असेल कदाचित , ती खूप बोलायची.
एकदा बस मध्ये मला "मी बसू इथे " अस विचारल कुणी तरी , बघते तर हीच , अरे बस न , मी म्हंटल , डोळे लाल वाटले मला , मी काही बोलले नाही तीच बोलायला लागली , "बाई मी का येते माहिती आहे शिकायला? मला न ह्यातून बाहेर पडायचं नोकरी करायची आहे म्हणून शिकते त्रास होतो कधी कधी, मन मेलय म्हणा पण तरी सुधा कधी काहि झाल, घडल कि निराश होइला होत, पण जिद्द नाही सोडत पुन्हा अंग झटकून सुरु होते ".
पुढे तिने मला जे सांगितल ते ऐकून मी सुन्न झाले . त्या मुलीच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता , वडील भावाला घेऊन गेले आणि मुलगी म्हणून आई कडे हिला ठेवल , आई ने दुसर लग्न केल आणि तेव्हा ही लहान होती खूप , पण तिला काय ते फार अवडल न्हवत जशी मोठी होऊ लागली त्या सावत्र बापाची नजर तिला बोचायला लागली आणि एक दिवस त्याने जे नाही करायचा ते केल , रडली खूप आई आली तेव्हा आई कडे रडत गाऱ्हाणं सांगितल तिला वाटल आता आई त्याला हाकलून लावेल आपण दोघीच राहू आनंदाने , पण झाला भलतच आई हिलाच ओरडली आणि बदडून काढल , बापाची तक्रार करते म्हणून आणि मग तर आई सांगायला लागली जा बोलावतो आहे. हे अस अनेक वर्ष सुरु आहे, म्हणजे ती वयात आल्या पासून.
लहानग्या वयात एवढा आघात सहन करायचा म्हणजे? पण ती म्हणाली मला हे नॉर्मल वाटू लागल बापाच प्रेम मिळालंच न्हवत त्या मुळे हे असच असेल अस वाटू लागल , आता तर हे एक काम आहे अस वाटतंय म्हणाली , मन साफ मेल कसल काही वाटत नाही अस म्हणाली . पण बाई मला ह्यातून बाहेर पडायचं असेल तर रडून कस चालेल? मी शिकणार नोकरी करणार चार पैशे आले कि आधी घर सोडणार कुठे हि राहेन कहि खाइन , जगात आणखी त्रास काही होऊ शकेल का मला? जन्म दाती आई जर वैरी असेल तर काय त्रास होणार बाकीच्यांचा ?
मी त्या दिवशी खूप बेचैन झाले त्याच बस ने उलटी घरी आले आणि विचार करत बसले , ती प्रेम शोधत फिरते आहे म्हणून कुणाशीही बोलते , मुलांना काय तेच हव असत , तिला घरात जाईला आवडत नसे , म्हणून मुलान बरोबर हिंड, इथे जा तिथे जा अस करत फिरे. लोकांनी मात्र किती वेगळा अर्थ लावला होता.
काहि कारणाने मी शिकवायचं बंद केल , म्हणून तिचा संपर्क नाही राहिला त्या काळी सेल फोन न्हव्ते आणि मला एक दिवस कळल कि तिने आत्महत्या केली दिवाळीच्या पणतीने पेटून घेतल स्वताला ...
माझा विश्वास बसेना कारण हे अशक्य होत, इतकी वर्ष जिद्दीने लढलेली मुलगी अशी आत्महत्या नाही करणार , खूप विषण्ण वाटल मी तिला मदत नाही करू शकली हेही खुपत राहील . पुढे तिचा खून केला होता तिच्याच आईने आणि त्या माणसाने म्हणून त्यांना अटकही केली ....पण त्याचा काय उपयोग? कुंपणच शेत खात म्हणजे काय ते मला तेव्हा कळल ".