सोमवार, २८ मे, २०१२

शिर्डी

शिर्डी 

मी हा लेख लिहिण्या आधी एक नमूद करतो मला साई बाबान बद्दल नितांत आदर आहे आणि भारता मध्ये जातीये मतभेद दूर करायला त्यांच्या इतका सक्षम कुणी नाही.

मी आस्तिक आहे का नास्तिक ? हे माझं मला कळत नाही , म्हणजे मी देवाला पाहून नमस्कार करतो मला आमच्या देवी वर नितांत श्रद्धा आहे, मी रोज गायत्री मंत्र म्हणतो, झालच तर आठवड्यात दोन दिवस शाकाहारी खातो , माझा माझ्यावर विश्वास आहे.

मी ह्याच दिवशी अमुक करत नाही तमुक करत नाही , फार सोळ ओळ करत नाही , माझे काही विचार पुरोगामी आहेत सैतानीच म्हणा , बाजूला बसलेल मला आवडत नाही, सगळ्याच देवांना मी काही चटकन नमस्कार करत नाही. हे केल कि ते होत ते केल कि हे होत, माझा पत्रिका, बुआ ह्या कश्यावर विश्वास नाही. मला आमची देवी आणि गणपती ह्या व्यतिरिक्त कुणा वर फारसा विश्वास नाही.

मी पहिल्यांदा शिर्डी ला गेलो ते १९९० साली, त्या काळी फार त्रास न्हवता झाला, पण पुन्हा तिथे जावस न्हवत वाटल कारण तिथली लोक.. सगळे चोर वाटले अगदी देउळ मध्ये दाखवल आहे तस , तेव्हा एवढी गर्दी न्हवती झोंबा झोंबी करत लोक रांगेत न्हवते राहायला एवढ महाग न्हवत, पण साई बाबा सोडले तर सगळच fraud  वाटल, नंतर १९९८ ला गेलो आणि मग मात्र ठरवल कि नाही जाईच पुन्हा, पण साई बाबांच्या मनात काही वेगळ होत, माझी बाईको प्रचंड भक्त आहे, त्या मुले जाण भाग होत.

मला तिथे गेल कि मानसिक त्रास खूप होतो, म्हणजे ह्या वेळ्चाच अनुभव सांगतो, गेल्या गेल्या प्रचंड  गर्दी , खूप वाहन , खूप धूळ पार्किंग ची सोय वगेरे नाही.... एक मुलगा धावत धावत आमच्या गाडी पुढे आम्हाला पार्किंग ला घेऊन गेला आणि मग त्याच्याच मागे फुलांच  ताट घ्यायला लावल,  अवाच्या सवा किमती सांगितल्या, आपण आम्ही घेतो हल्ली सगळीकडे तेच असत , मग तिथे एक माणूस आला आणि चादर घ्या असा आग्रह धरला, मी काहीच बोलत नसतो अश्या वेळेस , पण त्य माणसाच्या तोंडातून प्रचंड दारूचा वास येत होता, हे सगळ देवळाच्या आवारात ....आता  बोला ? चादरीची किंमत 
११०० आणि  बाईको  म्हणाली कि त्यावर डाग होते, म्हणजे वाहलेली परत विकायला :) .

तीन तास रांगेत उभा राहून, जेव्हा दर्शन होत, तेव्हा ती माणस, गुरांना ढकलावी तशी ढकलतात , माझ्या मुलीला आणि बैकोला ढकललं , त्या मुले माझ दर्शन झालच नाही, भांडण मात्र झाल :) . देवा  जवळ उभ राहून दानवा सारख वागायचं , देवाला बर चालत... देव नसेल आताशा तिकडे, लांब जाऊन तमाशा बघत असेल , नाहीतर कुणाला मदत तरी करत असेल .....तिथे देवच वास्तव्य असणं शक्य नाही हो, माणुसकी नाही तिथे देव तरी कसा असेल?

तिथे भिंतीन वर लिहील आहे, साई बाबा लोकां कडून मागून खात, लोकांना अन्न वाटत आणि आत गेल्यावर मात्र सोन्याचा मुकुट, सोन्याची भिंत आणि भिकारी चहा तरी द्या असा म्हणत असतात काय रे देवा.....एक बाई तर आम्हाला म्हणली हे दूध पाजा कुत्र्याला, साई बाबांचा आहे ......

पण एक मात्र खरय मी सबुरी मात्र नक्की शिकलो त्या रांगेत राहून,  मी अगदी शांत असतो, कारण घाई करून तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही, फक्त पुढे जाता येत , लोकांना अजून श्रद्धा आणि सबुरी नाही जमलीये , तिथे घुसतात, भांडतात घाई घाईने दर्शन घेतात .

राहायला खूप महाग आहे, जेवण बेचव पण लाज मात्र नाही ....एवढे करोडोने कमावतात, पण रस्ते    नीट करत नाहीत, वीज नाही, पाणी नाही, शाळा पण नसतील कारण तिथून कुणी बोर्डात पाहिलं आलेला स्मरणात नाही कि खेळत नाही कि धंद्यात नाही कि नाटकात नाही .

त्या रांगेत एक कुत्रा गाड झोपला होता, मधेच उठला आणि दुसरीकडे जाऊन झोपला, त्याला काशाच काही घेण देण  न्हवत  ......साई बाबांच्या वरती असा मजला सारख आहे तिथे फोटो लावले आहेत , तिथे कोळीष्टक होती ती मला दिसली आणि, तेवढ्यात ती काढायला माणस आली, म्हणजे देवळात प्राणी आपले नित्य नियमित काम करत होते.

एक म्हणजे रांगेत खूप मोठे बोर्ड्स आहेत, त्यावर ठळक अक्षरात लिहील आहे " चोरान पासून सावधान " मी देव देव करत नसलो तरी देवळात ....देवळात कशाला?  कुठेही चोरी न करण्या इतका अस्थिक तरी नक्कीच आहे.

दिव्या खाली अंधार म्हणतात, ते ह्यालाच असेल ......माझा मित्र मला सांगत होता कि त्या देवळालाला लागून एक पडकी शाळा आहे, देवाला  सोन्याची कवल आणि कोवळ्या मुलांना धड छप्पर पण नाही....

अजब तुझे सरकार ......लवकर काही तरी करा देवा, तुमचच  नाव खराब होतंय....

































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: