पहाटे चार चा गजर लावला पण सवयी प्रमाणे रात्र भर घड्याळ बघत होतो , शेवटी पाऊणे चार ला उठलो . मी का Marathon धावतो ? (मी खूप गोष्टी का करतो? ) हा प्रश्न मी सकाळी मलाच विचारतो , छान गुलाबी थंडीत महिना भर practice करताना पण मी हाच विचार करायचो , ह्याचं उत्तर मला तासा भारत मिळालं एका माणसाच्या t -shirt वर लिहीलं होत, "Pain is temporary, acievement is permanent" .
माझ्या चेहरयावर enquiry counter चा बोर्ड आहे का कोण जाणे मलाच सगळे प्रश्न विचारतात, अगदी बंगलोर असो कि गुरगाव, अगदी कानडीत मला विचारायचे लोक अमुक अमुक रस्ता कुठे आहे म्हणून? (नाई म्हणायला बडोद्याला एका छान दिसणाऱ्या मुलीने मला गुजराती कम इंग्रजी मध्ये काहीस विचारलं होतो तेव्हा मला बारा वाटलं होतो म्हणा, पण तिला रस्ता माहित असणार कारण ती पुढच्या गाळीतच वळली , असो ) स्टेशन वर पण त्या स्टोल वाल्या माणसाने विचारला किधर जा रहे सब लोग? म्हंटल धावायला बांद्रा ते वी टी, काय वेड्या सारखं असा चेहरा केला त्याने.
पण मुंबईकरांचा उत्साह मात्र बघण्या सारखा आहे रस्त्यात किती लोक असतात बघायला. धावणारे ३०००० तर बाग्णारे लाख, सकाळी फक्त प्रोत्साहन द्य्याला येतात, बिस्कीट म्हणू नका केळी म्हणू नका पाणी म्हणू नका सगळ देतात , मोठ्याने गाणी लाऊन cheer up करतात.
मी परीक्षेच्या आधी कुणाशी काही बोलत नाही, लोकांनी खूप अभ्यास केला आणि मला काहीच येत नाही असा वाट्त, गेल्या आठवड्यात मी पेपर उघडला आणि जाम घाबरलो, लोक दोन तास रोज धावतात काय काय खातात , बापरे मी तर साधी भाजी पोळी आमटी खातो, काम असेल तर रोज धावत पण नाही, काही खर नाही अस वाटलं, पण जमल बुवा , जवळ पास १५ की मी धावलो न थांबता, पण शेवटचे ५ की मी तास घेतात.
सगळ्यांची धावण्याची पद्धत फार वेगळी असते, आणि एक म्हणजे नवीन धावणारे लगेच कळतात, सुरवातीला जोरात धावतात आणि मग ढेपाळतात, काही लोकांना मुलगी पुढे गेली कि त्रास होतो मग जोरात जातात आणि फसतात. काही लोक मस्त धावतात साध सरळ सोप ... मिलिंद सोमण ला पहिला, साला चिकना आहे, सेहेचाळीस चा असेल पण ४२ की मी धावतो.
marathon मला आवडत कारण त्यात पाहिलं येण्याची गरज नसते, पूर्ण धावलो तरी झिन्कल्या सारखं असत आणि सगळे धावणारे एक मेकांना मदत करतात, सकाळी एक माणसाने मला विचारला choclate ? नको म्हंटल मी, tired ? मी नाई म्हंटल हसला आणि गेला पुढे, वाटेत लोक काहीतरी वाटत असतात पण ते रस्त्याच्या कडेला मी मध्ये धावत होतो आणि एक बाई संत्र वाटत होती सोललेला, आपल्यला आता कळत नाई पण धावताना खूप फरक पडतो एका फोडीने , तर मला धावताना परत बाजूला जाऊन घेण्याची ताकत न्हवती बाजूला एक मुलगी धावत होती तिला कळल मला हवंय, घेतला तिने आणि पुढे येऊन मला दोन फोडी दिल्या, ह्या छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो, टी वी वाले फक्त गोरे दाखवतात हे सगळ नाही दाखवत , ही खरी मुंबई आणि हेच ते स्पिरीट .
वाटेवर एक बाई wheelchair वर आम्हाला प्रोत्साहन देत होती, आलंच झाला थोडाच बाकी आहे असा म्हणाली :) , लोकांचा उत्साह बघूनच आम्ही उरलेले अंतर कापतो. चर्चगेट ते वी ती अंतर दीड एक की मी आहे, पण येत येत नाही २० आणि २१ की मी मध्ये खूप अंतर असत :). गम्मत म्हणजे रस्ता माहित असला न की जास्त त्रास होतो, अजून खूप अंतर आहे अस वाटत राहत ,
fountain पासून एक की मी अंतर ऊर्त मला एकाने विचारलं, किती उरलंय, म्हंटल हे आल, त्याला माहित होत अंतर, हसला आणि Thanks buddy म्हणला.
भवन्स कॉलेज च्या बाजूला पारसी लोकांची छान घर आहेत, तिथे एक बाई तिच्या (धावणाऱ्या ) मुलीकडे बघून म्हणाली "स्वीटी यु आर लुकिंग जस्त ग्रेट", सगळ्यांनी वळून पाहिलं (मी पण ) खरच सुंदर होती मुलगी :), अश्याच गोष्टींची मजा असते.
सगळ्यात आनंद होतो ते , अंतर संपल्यावर सगळं कष्ट केलायचं समाधान वाटत. काही लोक तर शेवटी धूम पाळतात, मला जाम नवल वाटत, पाय उचलत सुधा नाहीत नंतर तर.
पण एकदा तरी सगळ्यांनी धावायला हवच एक अनुभव आहे, अडीच तीन तासाचा प्रवास एकदा करून बघा, मुंबई का बेस्ट आहे ते कळेल, त्या देल्ली वाल्यांनी गुल पनांग ला एकटी गाठून चाळे केले होते आणि इकडे बघा लोक, फुकट गोष्टी वाटतात आणि अनोळखी माणसांना प्रोत्साहन देतात, मुंबईचा कंटाळा आला , सोडली पाईजे अस म्हंटल की अस काही तरी hot मग आम्ही परत त्या सगळ्या शिव्या देत इथेच राहतो...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा