शनिवार, ९ जून, २०१२

मी एक पंच्याहत्तर टक्के !!!!

मी एक पंच्याहत्तर टक्के !!!!

मी कायम ह्या अश्या चौकटीत अडकलो "पंच्याहत्तर टक्के", म्हणजे माझ्या मागे खूप मुल होती पण पुढे पण थोडी होती, त्यांना मी मागे नाही टाकू शकलो, नाही म्हणायला एकदा एका प्रोग्राम मध्ये पहिला आलो होतो पण ते तेवढंच. कधी तरी एखादी क्रिकेटची म्याच झिन्कून दिली असेल नाहीतर नाटकात केलेल्या कामच कौतुक, म्हणजे सगळ्यात छान तूच अस म्हणायचे प्रसंग तसे तुरळकच. मला वाटत नंतर नंतर मी स्पर्धे मध्ये भाग घेणाच बंद केल, म्हणजे मनाने, सारख काय हरायचं? पण का हो माझ्या सारखी मांस असतीलच न? मी कधी खूप सिगरेट  नाही  की कधी खूप दारू   नाई ढोसली.

पूर्ण विराम पर्यंत मी गोष्टी नाई  नेल्या, सगळच अर्धवट. म्याराथोन धावलो तरी तेच, म्हणजे ठीक ठाक तक्रार नाही, पण शाबासकी पण नाई. नोकरीत पण तेच, काम छान पण अप्रतिम नाई, संसार ठीक अगदी वाईट नाई पण अगदी आदर्श पण नाई, दिसायला पण चार चोघांसारखा (जरा बरा), पण खूप देखणा नाई. सगळच पंच्याहत्तर टक्के. मी रोज धावतो ते पण तसच, चार लोकांपेक्षा जास्त धावतो पण एक दोघ माझ्या पेक्षा जास्त वेळ आणि जास्त जोरात धाऊ शकतात. स्वयपाक छान करतो पण बोट चाटत राहण्या सारख नाई आणि टाकाऊ पण नाई. गाडी आहे चांगली आहे, मला उपयोगी आहे, पण चार लोक वळून बघतील अशी नाई.


पण जर माझ्या सारखी माणस नातील तर? हुशार आणि ढ मुलांच्या मधली दरी भरून कुणी काढली असती?

 
मला अस वाटत न, कि मी खूप पुढे नाई जाऊ शकणार, म्हणजे माझ्या कुवती पेक्षा शिक्षणा पेक्षा नक्कीच जाईन पण वर पर्यंत नाही जाणार , काम पण तसच..... चांगल मेहनत खूप सारी पण निकाल पुन्हा
पंच्यात्तर टक्के
पण हे जग चालत माझ्या सारख्यान मुळेच, सगळेच १०० टक्के कशे चालतील ते कुणाला काम देतील? कुणाला शिकवतील? कुणाला ओरडतील? कुणा कडून काम करून घेतील आणि सुधारतील?
 
म्हणून मी खुश असतो जग माझ्या मुळेच चालत .....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: