माझी मावशी वारली, सुरता ला रहायची , कष्ट केले आयुष्य भर पण तशी सगळ नीट होउन गेली, माझी मावस बहिण वारल्या नंतर खच्लीच ती.
पण मी लिहायला बसलो त्याचा कारण vegala आहे. मी सूरते ला दोन वर्षा दोनदा गेलो आणि दोन्ही वेळेला असा गेलो, दोन्ही वेळेला दोन दिवस ठेवला होता दोघिना मोर्ग मधे कारण माझी भावंड USA मधे रहातात आणि दोन्ही वेळेला बॉडी आणायला मी गेलो. माणुस गेला की आपन लगेच बॉडी म्हणतो, म्हणजे जीव असेल तर व्यक्ति आणि गेल्यावर नुसती बॉडी आपण सरळ अगदी साधा हिशोब ठेवला आहे , बाकीच्या वेळी उगीच गुनता करतो, अगदी अलिप्त होतो कधी कधी.
गेल्या खेपेस जेव्हा "बॉडी" आत सोडली अग्नि मधे (इलेक्ट्रिक होत) आणि बाहर बसलो होतो वाट पाहत तीथे दुसरे कुणी लोक पण आली होती , वेगळी कोणाला तरी घेउन आले असतील, आणि थोडा वेळ होता म्हणून त्याने फरसान काढल आणि खायला बसले तीथेच स्मशानात , बापरे अजबच.
आता ह्या वेळी पण स्मशानात जत्रा होतो अगदी लहान मूल पण होती मजा म्हणून आणि आम्हाला ढकलून ती लोक पुढे बघ्याची गर्दी करत होती माला फार विचित्र वाटल हसू का रडू ते पण नाही समजल.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा