जात पात
मला लोक नेहमी विचारतात कुलकर्णी म्हणजे? "CKP" सारस्वत का ब्राह्मण? मी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण सांगतो (कारण येजुर्वेदी पण असतात देशस्थान मध्ये), मला खूप अभिमान आहे मी ब्राह्मण असल्याचा जसा मी मराठी असल्याचा आहे मी भारतीय असल्याचा आहे तस. मला तर माझ्या मोठ्या नाकाचा, एक रूम किचन घराचा, माझ्या साध्या शाळेचा, मी केलेल्या प्रेमाचा सगळ्याचाच अभिमान आहे.ला
मला न खूप सारी वर्ष माहित सुधा न्हवत कि ब्राह्मण म्हणजे काय महार म्हणजे काय ते? कळल ते "मंडळ" आणल तेव्हा मी कॉमर्स वाला त्या मुळे आरक्षण चा फटका मला न्हवता लागला, पण प्रचंड नीच पणा आहे ते समजल, पण तरी मी कधी कुणाचा द्वेष नाही केला, अजून नाही करत अजून मी कुणाला तुझी जात काय अस नाही विचारात?
हल्ली फार झालंय हो जात पात, प्रेम करताना बघत नाहीत, पण लग्न करताना पाहतात, छळ करतात, तेव्हा मला प्रचंड राग येतो, काहीच अर्थ नाही ह्याला. माणूस महत्वाचा न? मला तर कितेक वर्षाने माझ्या मित्रांची जात समजली, एक मित्र होता (होता....), एकदा तो कॉलेज मधून तीनशे रुपये घेऊन आला. मलाच कळलंच नाही, मला म्हणाला कि तो SC ST आहे तेव्हा कळल कि तू SC का ST आहे ते समजल, त्याला रिफंड मिळाला होता, गरीब मुल बिचारी सगळे पैशे भरायचे आणि हा श्रीमंत मुलगा (कारण त्या काळी १९८७ साली बाईक आणायचा आणि गळ्यात सोन्याची चैन घालायचा) सगळी फी घेऊन मजा मारायचा, बापाला कुठे माहिती होत? तो कस्टम मध्ये लोडर होता एवढा पैसा कसा हे मला माहित नाही :).
साठ टक्क्याला मेडीकल ला admission आणि आम्हाला नौवाद टाक्याला नाही ....आमच्या ओळखीची एक मुलगी आहे तिला बारावीत नौवाद च्या पुढे टक्के होते आणि तिला medical ला जाईची इच्छा होती तिला नाही जात आल ओं तिच्या मैत्रीणाला सत्तर टाक्याला मिळाली , तुटली मैत्री ...
हे सगळ परत आणलं वी पी सिंघ ह्याने , आता मेलेल्या माणसांबद्दल काही बोलू नये म्हणा पण मला नाही पटत ..... आधी अन्याय झाला म्हणून परत अन्याय आणि तास पण साठ वर्ष झाली तरी किती टक्के लोकांची प्रगती झाली ह्या मुळे? शहरात नाही हे सगळं मी मित्रान पैकी कुणाच ही उष्ट खातो मला काय जाती माहित आहे सगळ्यांच्या? आई ने पण कधी कुणाची जात नाही विचारली शिवा शिवी नाही पाळली, म्हणून मला हल्ली ऐकलं अस काही की प्रचंड नवल आणि भयानक राग येतो , ह्या मुळेच नंतर सगळ होत आणि गावात तर हे अगदी चालत, पण ह्या वर इलाज असा नाही न? फुकट मिळाल न सगळ कि किंमत नाही राहत कमावल कि राहत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा