शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

वेडा

दत्तपाड्याला आमच्या शेजारच्या बिल्डिंग चा नाव होत चंद्रतेज आमची जय हरी आणी  आमच्या बाजूला कृष्णकमळ. चंद्रतेज मध्ये ग्राउंड फ्लोर ला अनेक फ्लॅट्स होते, पाठी दोन होते, पुढे एक अर्धाच असा होता थोडं विचित्र होते ते, लहान लहान दोन, एक सिंगल रूम चा होता. त्या ठिकाणी खूप लोक येऊन गेली, काही घरात बघा लोक नाही टिकत सारखी बदलतात, तसेच होते ते रूम्स, सारख्या बदलायच्या फॅमिलीस. 

एकदा तिकडे एक माणूस आला त्याची बायको आणी एक मुलगा होता वाटतं ; चांगला होता माणूस, शांत वयस्कर थोडा, पण समोर आला कि हसायचा. शाळेत असेन मी, मुलगा अगदीच लहान होता. तो माणूस सकाळी जाऊन संध्याकाळी यायचा परत. खूप एक महीन्यानी  का वर्षांनी तो घरीच दिसायचा. फॅक्टरी मध्ये स्ट्राईक वगैरे झाला अस कळलं आमहाला, मला आधी स्ट्राईक वगैरे म्हणजे माहीतच न्हवत  तेव्हाची गोष्ट आहे,(गिरणगावची वाताहत झाली ते नंतर समजल)थोडे महिने झाले तरी हा घरीच दिसायचा, त्यांच्या कडे पैसे नाहीत अस कळलं मला, त्यांच्याच बिल्डिंग मधल्या मुलानं कडून. शाळेत बघा आपण आपण मित्र जमा होतो आणी काही गप्पा मारतो म्हणजे काही पण आपण घरून ऐकून येतो आणी बडबडतो, त्यातच एकदा  मला कुणीतरी सांगितलं   अस सहज बोलता बोलता आम्ही नुसतं ह्म्म्म.... अच्छा असं केल. त्या  वयात पैसा म्हणजे काय ?त्याच महत्व काय? स्ट्राईक वगैरे गोष्टींच महत्वच कळत  न्हवत . मोठेपणी कळत आपल्याला, कष्ट म्हणजे काय? त्याच काय आणि किती महत्व असत ? असो तेव्हा नीटस कळलं नाही पैसा  नाही वगैरे म्हणजे. 

मग काही दिवसाने त्याची बायको जाईची सकाळी कामावर, कुठे जाईची कोण जाणे, कंपनीत वगैरे असेल ,ती पण संध्याकाळी घरी यायची सकाळी जाऊन. मग घरच काम हा माणूसच करायचा. संध्याकाळी बायकोची वाट बघत उभा राहायचा गेट वर, ते गेट चे दोन गज पकडून, आम्हाला मैदानात खेळताना बघत बसायचा , लांबून दिसली बायको,  कि छान हसायचा. आता आठवल कि वाटत  कि करुणहसायचा ,   खूप तोंड भर हसायचा  पण डोळ्यात काही तरी दिसायच त्याच्या, माझ्या बालमनाला उमगण्या पलीकडे होत ते. 

शांत माणूस, कधी भांडण नाही काही नाही कुणाच्या अज्ञात  ना मद्यात, मुलाचे लाड करायचा, आमच्या कडे बघून पण हसायचा , प्रेमळ हसायचा बोलायचा नाही अजीबात,मुलाशी पण अगदी हळू आवाजात बोलायचा. ती लोक कधी फिरायला जाताना पण नाही पहिली मी.   

मग काही वर्ष गेली आणी तो गायब झाला. अचानक. कुठे गेला कळलंच नाही, बायको पण ते घर सोडून गेली मुलाला घेऊन.  त्याच्या बिल्डिंगची लोक   म्हणायचे की वेड लागल त्याला, मला काहीखर नाही वाटल  ते   खूप साधा सरळ होता , पण एके दिवशी आमच्या समोरच्या ग्राउंड मध्ये तो बसला होता , दाढी वगैरे वाढली होती,फाटके कपडे, एक पोत  होत हातात .  मी कॉलेज ला जात असेन तेव्हा, पण खर  सांगतो तुम्हाला, एकदम सुन्न झाल डोकं.  सण कन अस काहीस झाल  मला. नेहमी यायचा तो माणूस, तिकडेच बसायचा मैदानात  बिल्डिंग कडे बघत त्या गेट कडे बघत, नेहमी सारखाच हसायचा नुसता, आजूबाजूच्या बिल्डिंग मधली लहान मूल पण त्याच्या कडे बघून स्माईल दयायची, हा पण हलकेच हसायचा, एक दोघ  लहान मुल जवळ पण जायची, तो नुसता त्यांना शेक हॅन्ड वगैरे करायचा, पण वेड्या सारखं काही नाही मारामारी नाही आरडा ओरडा पण नाही करायचा, लहान मुलांना बघा कधी कधी आपल्याला वाटली तरी त्याना नाही वाटत भीती , त्यांच काहीतरी वेगळच असत sixth sense का काय ते. 

मग तो माणूस पण यायचा बंद झाला.   काय होत त्या फॅमिलीच माहीत नाही मला. स्ट्राईक झाला कंपनीत म्हणून वेड लागलं का आणखी काही होत ? कळलंच नाही. माझ्या मनात मात्र राहील होत  कित्येक वर्ष पण तो माणूस अजून लक्षात आहे माझ्या. 

कुणाला कधी आणी का वेड लागेल ते सांगता येत नाही.....  










शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

बैल गाडी

बैल गाडी 

गाव कुठलं रे तुझं? लहान पणी हा प्रश्न अगदी common होता (आता चायला राज्य कोणतं असं असत)मग मी मुंबई हे उत्तर द्यायचो ..... अरे तस नाही गाव अस विचारल मी, मला काहीच कळायचं नाही लोकांना खर बोललं कि पटत नाही खोट अगदी लगेच पटत (कोर्टात खरं सिद्ध करायला २० वर्ष लागतात), मग मी गिरगाव अस सांगायचो, मग चेष्टा होईची, अरे  मुंबईच्या बाहेर काही आहे कि नाही गाव ? एक तर लोकांना काय करायचंय? नसेल ह्याला गाव हे पटायला काय हरकत आहे?

आम्ही सुट्टीत कधीच कुठे नाही गेलो, अतुल दर वर्षी त्याच्या गावाला जाईचा कोकणात (येताना खोबऱ्याची वडी वगैरे आणायचा माझ्या साठी नाही असं नाही)   आणी मग काय काय सांगायचा गावा बद्दल त्या घरा बद्दल नारळाची झाड  आंबे, मस्त वाटायचं ऐकायला. 

पण आम्हाला गावाचं नाही त्याला मी तरी काय करणार?    नंतर नंतर (आणी आत्त्ता सुद्धा)मी सांगायला लागलो, माझं गाव वारुड भुसावळ जवळ, खान्देशी आहे मी , वडील आठ वर्षांचे असताना आजोबा आणि एक बहीण वारली म्हणून आजी त्यांना आणि आत्याला घेऊन बडोद्याला गेली  (खर तर खूप ठिकाणी, पण जे लोकांना पटकन कळत ते सांगायला शिकलो, मग धींनोज, महिसाणा, आवाखाल हे सांगितलं तर गाडी भलतीकडेच जायची), वडील  सुद्धा  फक्त एकदाच गेले तिथे कूळ कायद्यात जमीन गेली तेव्हा सह्या करायला आणि ७/१२ आणायला (हे ७/१२, कूळ कायदा एकदम भारी होत, मग लोक थोडे बॅक फूट वर जातात ), बर बर म्हणतात कारण त्यातल्या निम्याहून अधिक लोकांना ७/१२ म्हणजे काय? ते माहित नसत  आणी बऱ्याच लोकांची समजूत कूळकायदा म्हणजे कुलकर्ण्यांचा काही तरी कायदा असेल अस वाटत (तरी मी कुल आहे कूळ नाही हे विसरतात). माझी लगेच बाजू सर आणी आणखी काही विचारल  तर हा सागर हा कुळून काढेल म्हणून गप्प बसतात. 

वडिलांचं असं तर आई गिरगावातली म्हणजे १००% मुंबईकर, तस तिची  आजी राहायची जोगोडीला, म्हणजे पुण्याहून जेजुरीला (हल्ली फार फार्मात आहेत राव म्हणून हा reference दिला, तर तिथेच वाटेत)   जाताना लागत, बिनाताई एकदा गेली होती (तिच्या) लहान पणी, आता जमीन गेली तिथली , म्हणजे विकली (आम्हाला मातीच मिळाली) आत्ता तिथेच कुणी नसत आणि खूप वर्ष कुणिच न्हवत. म्हणजे दोन्ही कडून गाव नाहीच. तर सांगायचा मुद्दा असा कि मी मला गाव नाही, किव्हा मुंबईच माझं गाव.    

तर गाव आम्ही नुसतं मित्रांकडून म्हणा चित्रात (आणि चित्रपटात) पाहील होत, कधी तरी पुण्याला जायचो (आत्ता काय तेव्हा सुद्धा गाव म्हंटलं असत तर मुळा मध्ये बुडवला असत आम्हाला, तेव्हा असायचं बाबा पाणी मुळा नदी मध्ये) आणी अक्का (आईची आई ) राहायची  पर्वतीच्या पायथ्याशी  म्हणजे मेन पुण्यात नाही (त्या वेळच्या) ते थोडं गाव बाहेर होत म्हणजे गावच्या बाहेर होता अक्काचं घर म्हणून सदाशिव पेठ हे गाव  अस म्हणायचं, पण पुण्याला गाव नाही म्हणायचं? कारण ते शहर आहे (किचकटच लोक सगळी) . म्हणजे सुट्टीत चुकून आम्ही गेलो कधी बाहेर तर ते पुण्याला आणि ते गाव  न्हवत. 

गावात शिकायला खूप मिळत असं माझं मत आहे कारण सगळं नैसर्गिक असत आपल्या इथे सगळंच कृत्रिम आहे एकदम रेडी मेड, नंतर नंतर मी बऱ्यापैकी फिरलो आणी ऑडिट ला तर फॅक्टऱ्या गावात असायच्या, गवत शेत, झाड प्राणी सगळीच वेगळी असतात तिथे. 

मला एक खूप मोठा धडा मिळाला होता ते एका गावात, नाव हि आठवत नाही मला आता आणी त्या शिक्षकाचे तर मी  नाव सुद्धा न्हवत विचारलं. कारण मला त्यातला अर्थ किव्हा बोध का काय ते २० एक वर्षांनी उमगला (म्हणून कृष्ण लागतो अर्जुनाला) .  

मी एका शुगर फॅक्टरीच्या ऑडिट साठी वगैरे साठी गेलो होतो तर तिथे खूप सारा ऊस घेऊन शेतकरी यायचे कारण साखर बनवायला ऊस लागतो (म्हणजे ऊसच लागतो)तो ऊस  शेतकरी लोकजवळ असेल तर  बैल गाडीतून आणायची (आता ट्रॅक्टर वर पण नेतात) आणी ती  गाडी अगदी ओतप्रत भरायची. बैल बिचारी वजनाने वाक वाक वाकायची, ओझ्याने वाकण म्हणजे काय हे मी अगदी पाहिलंय. काही काही बैल खूप उमदे, उंच गोरे रुबाबदार  असतात  (काही लोक बघा अशी रुबाबदार असतात पण अगदी बैलोबा आहे असं म्हणतो आपण?)काही मध्यम असतात, कधी कधी काटकुळे बैल पण बांधतो एखादा माणूस गाडीला आणि तोंडातून फेस येतो त्या बैलाच्या, म्हणजे तोंडातून फेस येतो म्हणजे काय हे पण मी पाहिलंय   (सगळं गाव कडे).

मी असाच एकदा त्या गावातल्या एका रस्त्या वरून चालत असताना समोरून एक बैल गाडी येत होती, दोन्ही बैल  एकदम उमदे होते उंच, पण तो बैल गाडी वाला स्वतः बैल होता, गाडी हाकताना त्याच्याच तोंडातून फेस येत होता. मी म्हंटल, अरे हे बैल इतके मस्त आहेत पण गाडी अशी काय हळू हळू आणि वाकडी तिकडी येतेय ? बाजूला एक गाय चारणारे (गाईला घेऊन फिरणारे )आजोबा होते, ते म्हणले की बैल जोडी न घेता ह्याने वेगळी बैल  लावली हायेत एकत्र  ..... complete confusion ...  अरे पोरा  दोन्ही बी बैल उत्तम असून  न्हाई चालत ती जोडी उत्तम हवी .... एक बैल दुसऱ्या पेक्षा ताकतवर असला तर तो दुसऱ्याला खेचणार  आणी मग दुसराची फरफट मग ह्यो त्याला रोखणार, झाली ना गडबड? गाडी जाईची कशी ती पुढ?अन जर दोग बी ताकतवर असली अन त्यांच  पटत नसल की बैल गाडी दोग बी इरुद्ध दिशेला खेचनार . एक घाबरत असला तर दुसरा त्याला चेपनार आणि तो मग लवकर मरनार कारण सगळा भार तोच पेलनार अन दोघे बी सारखीच हवी स्वभावानं.......... अन वळू न्हाई बांधत गाडीला, समजलं काय? 

कुनी एकाला कमी न्हाई चालत खायला दिल तर, एकाला पौष्टिक अन एकाला साधा चारा न्हाई चालत दोगांना बी तेवढच काम अन तेवढाच आराम.  मंग सोपं असतंय होय? बैल गाडी म्हंजी घेतले बैल अन बांधले कि न्हाई व्हत, प्रानी हाई मोटार न्हाई  नीट बघून गाडी बांधून आणि मंग काळजी घ्यावी लागते तव्हा कुठं नीट चालतंय     

आता ह्यो मानूस, ह्याने ह्यो  ऊस काढून झाला कि दोघांना बी येगळं न्ह्यायला हवं ही जोडी कधी बी चालायची न्हाई त्यात बैल गाडीवाला बी खपनार ... ..... 

हे लॉजिक कळायला मला य वर्ष गेली कारण  मी फक्त बैल जोडी बघत होतो , पण ही गोष्ट  सगळ्याच जोड्यांना लागू होते, टेनिस मध्ये बघा बॅडमिंटन, क्रिकेट बघा two bowlers always hunt in pairs  म्हणतात, opening batsman पण दोघे एकमेकांना किती complementary हे जास्त महत्वाचं. नुसतेच best असून नाही चालत आपला जोडीदार सगळ्यात best असण्या पेक्षा माझ्या करता best आहे का? हे बघायला हवं.  किती तरी उधाहरणं आहेत. आपले पेस आणी सानिया बघा डबल्स मध्ये खूप चमकले, पण सींगल्स नाहीत. पण ती दोघे एकत्र खेळली तेव्हा नाही चमकली. भूपती तर फक्त पेस असतानाच चमकला.  म्हणजे compatibility महत्वाची.      

लग्न झालेल्या जोड्या बघा, कधी कधी किव्हा बहुतेकदा एकच माणूस ओढतो गाडी संसाराची, ओझ्या खाली दबणं, काम करून तोंडातून फेस येणं हे सगळंच आपण बघतो (अनुभवतो) कारण  आपण दोन उत्तम माणसं जोडण्याचा प्रयत्न करतो आणी कधी विस्कटलच तर आश्चर्यचकित होतो, खूप जोडपी असच खेचतात आयुष्य कुणीच सुखी नाही आणि ते जो संसार वाहतात त्याची वाताहत होत असते आणी त्यात त्या कुटुंबाची सुद्धा. संसार आला कि हे होतच असं म्हणतो. 

पण जोड्याच जर निट लावल्या तर? ते बैल गाडी सारखच same logic  लावल तर? संसाराचा गाडा दोघांनी खेचायचा असतो नाहीतर वर  त्या आजोबांनी सांगितल्या  सारखं होत आणी  बाहेरच्या लोकांना ज्यांना  दिसतंय कि संसारत नुसती ओढाताण होतेय तर ती लोक बैल वेगळी का नाही काढत? एका बैलाची गाडी सुद्धा असतेच ना? लागली जोडी तर लागली, नाहीतर नाही, आयुष्य तरी वाढेल बैलाचं (म्हणजे बैलीच सुद्धा) ....   

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

ADHM

मी करण जोहर चित्रपटाला बंदी घाला किव्हा त्या पाकिस्तानी माणसाला घेतलय म्हणून मी अजिबात बघणार नाही हे काही करणार नाही, करण जोहरचे पिच्चर मला  अजिबात आवडत नाहीत म्हणून मी काय तो जाऊन बघणार नाही . उद्या तुम्ही गेल्यावर्षी चा वर्ल्ड कप ला झालेली भारत पाकिस्तानची मॅच बघू नका म्हणाल, आता त्या फवाद ला घेऊन नवीन पिच्चर काढू नका ह्याला माझा पाठिंबा आहे अजिबात पाकिस्तानशी खेळू नका हे पण मी सांगेन (मी कशाला गावस्कर, गांगुली , गंभीर सगळेच म्हणतात). मला काय त्या फवाद चा पुळका नाहीये आणि त्या कारण चा तर   अजिबात नाही, पण एकदम बंदी घाला बघू नका म्हणून त्याला फुकट पब्लिसिटी तर मी नाहीच देणार आणी  हल्ली लोक मूर्ख नाहीयेत उगाच ५०० रुपये देऊन फालतू गोष्ट पाहायला  जाणार नाहीत.  फार बाऊ नका करू जो तो त्याच्या कर्माने मारतो आणी त्या पिक्चर मुळे करण जोहर च अजिबात नुकसान होणार नाही, त्याला मिळाले रिटर्न्स.  झालंच तर त्या कामगारांचं होईल जी लोक पोस्टर्स लावतात वरची काम करतात स्पॉट बॉईझ ना पगार थोपवेल तो जोहर.   सिनेमा हॉल्स वाल्यांचे हाल, तो फवाद पैशे घेऊन गेला सुद्धा आपण का उगाच भांडायचं? गप्प बसा आणी फराळ करा दिवाळी चा 

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

काळी पॅन्ट

काळी पॅन्ट 

माझ्या कडे फार कपडे न्हवते कॉलेज मध्ये, अजून बाकींच्याच्या मानाने कमीच आहेत . एक जीन  ची होती बस्स.  मग आर्टिकल शिप करताना एक दोन घेतल्या होत्या, व्ह्याच काय कि मी जो हाताला लागेल तो शर्ट आणी त्याच दोन पॅन्ट घालायचो खूप दा रंग संगती जरा विसंगत व्ह्याची . त्या काळी नवीन कपडे फक्त दिवाळीतच घायचो आणि मला तसा पगार पण न्हवता नव नवे कपडे घ्यायला सारखे सारखे, तर त्या वर्षी मी एक काळी पॅन्ट पहिल्यांदा विकत घेतली, म्हणजे तीच दिसली मला आणि मी फार चिकित्सक नाहीये पण मला जामआवडली, मला तरी   म्हणले लोक अरे काळी पॅन्ट काय घेतोस? वेगळा रंग वगैरे घे उठून दिसेल... मी   थोडा हट्टी आहेच  आणि मला फार लोकांच्या बोलण्याने फरक नाही  पडत मी तीच घेतली . 

छान होती कॉटन ची आणि मग मला लक्षात आलं कि ती पॅन्ट कशावर ही चालते, म्हणजे त्या    पॅन्ट  वर काहीही उठून दिसत (माझंच मी काय कौतुक करायचं म्हणा ) अगदी निळ्या शर्ट पासून ते पांढऱ्या ते ग्रे  झालंच तर tshirt  वर (का खाली ?) पण चालायची. मी  एकदम खुश, खूप जास्तच खूष,   छोट्या गोष्टी किती आनंद देतात हे सांगणं कठीण आहे, पण मग मी तीच पॅन्ट   सारखीच  घालायचो एक तर ती फार मळ्याची नाही म्हणजे कुणाला कळायचं नाही , ही casual म्हणून चालायची   formal म्हणून तर अगदीच सरस. 

मला मग जाणवलं कि ह्या आधी माझं कपाट कस अपूर्ण  होत आणी मी तयार व्ह्यचो तरी कसा? आयत्या वेळेची पॅन्ट ही होती आणी  छान तयार होऊन जायला  पण हीच, म्हणजे मी  अर्धवट होतो का मला माझी गरज माहित न्हवती. जाम जीव होता आणि आहे माझा काळया  पॅण्ट   वर माझ्या, अचानक मला मिळालेल्या पॅन्ट वर संपूर्ण पणे  अवलंबून   झालो  होतो, एक तरी काळी  पॅन्ट  सगळ्यांकडे कडे हवीच.  

तू माझी काळी पॅन्ट आहेस :) 


सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

जय भवानी जय शिवाजी!!!

पर्वा नवी मुंबई काल कोल्हापूर आज ठाणे अरे अरे अरे ...स्वतःच्या हातावरच्या तागदि   वरचा विश्वास संपला ..... आता पसरा ... शोक कश्याचा  करायचा? तलवार म्यान केली ह्याचा ? का लढल्या वाचून फुकट मिळतं हा साकशातकार झाला  ह्याचा ?

जय भवानी जय शिवाजी!!! माफ करा महाराज तुम्ही आमच्या करता व्यर्थ लढलात , त्या पेक्षा दिलेले किल्ले साम्भाळायचेत .....
का दिलीत आम्हाला आस,
कि  आमच्या मनगटात आहे ताकद ह्याचा विश्वास,
पसरले असतेत हात, बसल्या बसल्या मिळाला असता ना थाट?

अजून तरी आणि ह्या पुढे मला कुणीहि  आरक्षित म्हणणार नाही  :)  हर हर महादेव !!!!

फडणवीस  देऊन टाका.

मागणाऱ्या पेक्षा देणारा मोठा असतो... मी  कधीच मागणार नाही, शिवाजी माझा आदर्श आहे, आडनाव भोसले नसले तरीही ....  


रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

सात्विक

सात्विक
जोशी काकू खूप सात्विक आहेत आणि त्यांच्या खूप ठाम कलपना आहेत. अमुक म्हणजेच सात्विक तमुक म्हणजे वाह्यात वगैरे. कुणी जरा तोकडे कपडे घातलेत की त्या एखाद्याला साफ नालायक आहे असं ठरवून टाकतात, कुणी मुलगी जरा मुलांशी बोलताना दिसली की लगेच कशे संस्कार नाहीत वगैरे, चार लोकात मुलांनी कस वागावं ? ह्या बद्द्दल एकदम clear आहेत. मुलांनी मुलींशी  बोलूच नये असं मताच्या , देव धर्म करावा वगैरे वगैरे , पण पर्वा त्यांनी त्यांच्या मुलीचे डोहाळे जेवण अगदी थाटात केले  , हा मोठा विनोद, अगदी त्या मुलीला सजवून झोपाळ्यावर बसवून छान  फोटो वगैरे, त्यांना विचारू का जाऊन? काय हो काकू कशी झाली ही गरोदर?  

उगाच डोक्याला त्रास

माझा मित्र संदीप मला जाम आवडतो (मला माझे सगळेच मित्र फार आवडतात ) एकदम प्रामाणिक आणि बेसिक ला धरून असतो , खूप लोकांना तो जंगली वाटतो raw वाटतो पण म्हणून तो मला आवडतो. मला त्या दिवशी म्हणाला "पुनर जन्म असतो रे,मला  आलाय अनुभाव " चायला माझे  आणि ह्याचे विचार कधी कधी   जुळतात, पण हे म्हणजे फारच होत ,   का रे का वाटत तुला अस? "अरे ते जन्मो जन्मो का नातं असं  म्हणतात   न?  मला आला रे अनुभव? गेल्या तीन जन्मातल्या माझ्या बायका, म्हणजे wife  मला भेटल्या?" भेटल्या ?  मेल्या तुझं लग्न झालच नाहीये म्हणजे तू केलस नाहीस ह्या बायका कोण? "अरे गेल्या तीन जन्मी च्या, दोन  वर्षात तीन भेटल्या, एकदम काय तरी झालं"  कुणाला? "दोघांना" आणि असं तीन दा झालं? "हो, सात जन्म असतात ना" अरे हो पण मग? "मग काय नाही, आम्ही भेटलो"  नवरा बाईको सारखे? "हो रे, मागल्या जन्मात गेल्या सारखं वाटलं रे " "  सात जन्म तरी असतात न रे, अजून चार तरी भेटतील ?"

कधी कधी मला ह्याचा राग येतो आणू मत्सर सुद्धा वाटतो, तो त्याच्या भावना कधीच लपवत नाही, एक झेपेनाशी होते आणि हा पठ्ठा अजून चार बायका  शोधतोय आणि हे सार  त्याच्या मैत्रिणी सांभाळून .

सुनामीच्या वेळी त्याचा फोन, "मी महिना भर नाहीये, जरा घराकडे बघ" कुठे निघालास? "नक्की नाही, मद्रास ला जाईन तिथून ठरवेन, खूप वाताहत झाली आहे रे, मी सडाफटिंग, माझी मदत होईल का ते विचारतो, मला चिखलाची  घाण वाटत नाही कि प्रेतांची भीती, मी काहीही खातो, त्या मुळे  बघू काही जमेल ते करू "     हे टोक.

काय करायचं ह्याच? गेल्या जन्मीची बायको सापडली म्हणून  संबंध ठेवतो सुनामीत वाताहत झाली  म्ह्णून सगळं सोडून तिथे जातो लोकांन साठी . ह्याला खूप लोक असभ्य, चालू म्हणतात , पण हा स्वतःहून कुणाच्या अंगचाटी जात नाही लंपट पण नाही, एकच लक्ष्य , साधा सरळ आयुष्य, भूक लागली कि भागवतो, मग ती कोणतीही   असेल .

जोशी  काकूंना हा संदीप फार रुचत नाही, मला जोशी काकू , मी त्यांना आवडतो आणि मला संदीप , सगळाच लोचा .












  

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

शरद पोंक्षे ह्यांनी लिहिलेला लेखाला उत्तर

बरेच दिवस झाले एक ब्लॉग सारखा मला येत होता , शरद पोंक्षे ह्यांनी लिहिलेला लेख . मला अभिनेता म्हणून नितांत आदर  आहे, टिव्ही असो नाटक असो गुणी कलाकार, पण तो लेख मला झेपला नाही. नशिबाने  माझ्या बहिणीशी बोलताना लक्षात आलं कि तिला हि माझ्या सारखच वाटलं, म्हणजे काही लोकांना खटकलं असेलच ना? म्हणून माझं हे मत मांडतो आहे. 

म्हणजे मला थूनकू नको सांगतोस? अंघोळ कर म्हणतोस? अंगण साफ ठेव सांगतोस ? नाही करत जा आधी माझ्या बाजूवाल्याला सांग तो पण अंघोळ नाही करत दाढी पण नाही करत कचरा पण नाही काढत. आहे हिम्मत त्याला सांगायची ? मग ? चूप बस मी घाण करणार आवाज करणार ..... हे एकदम असं . म्हणजे नक्की म्हणणं काय आहे पोंक्षे ह्यांचं? आपण आवाज करत राहायचं? झाड कपात राहायची? पाणी दूषित करत राहायचं? पर्यावरणाची वाट लावत राहायची? कुणी बकरा कापतो म्ह्णून आपण झाड कापायचं? तलावात plaster of paris चा गाळ करायचा? तो वेडा म्हणून आपण सात वेडे होऊन दाखवायचं? त्यानं काय होईल? तुम्ही शहाणे आहात ना? मग वेड होईच हट्ट का? आणि कश्यासाठी?

बकरा मारणं आणि हरण (का काळवीट?) मारणं ह्यात  फरक नाही? बकरे खाण्यासाठी पाळतात तो अजून तरी extinct घोषित केला नाहीये आणि बोकड आपण पण मारतोच कि (अगदि सर्रास) आणी खातो सुद्धा आणी  हे म्हणजे जैन लोकान सारखय ह्या दिवसात कुणी अमुक खाऊ नका तमुक खाऊ नका, उद्या कांदा वर्ज करतील, चक्कर येऊन पडला माणूस तर त्याला काय भेंडी लावायची नाकाला?  हा सगळाच अतिरेक. त्यांने केला न?मग  मी पण करणार  हा हट्ट मला विचित्र वाटतो. 

तेव्हा पण बकरा कापायचे आता पण तोच कापतात आणि तुमच्या घरी आणून तरी कापत नाहीत ना  अजून तरी? आता पोंक्षे वाचन वगैरे करत असतील, म्हणजे करतात असं वाटत .  टिळकांनी जेव्हा गणपती उत्सव साजरा करायचा ठरवल त्या काळी आणि हल्ली  जो घाट घालतात त्यात फरक त्यांना जाणवत नाही का? शाडू ची मूर्ती वापरा  गोंगाट करू नका हे सांगणं गैर ते कस? मिरवणुकीत दारू पिऊन झीनघाट घालणं हे सांस्कृतिक कस?  सैराट होऊन धिंगाणा घालणं धार्मिक कस? त्याचा धर्म वाईट म्हणून माझा चांगला, हे logic मला पचायला जड आहे (एक वेळ बकरा पचेल).

हल्ली माझा धर्म कसा पहिला येईल ह्या स्पर्धेत का असतो आपण? त्या पेक्षा olympic मध्ये पाहिलं यायला झटा न. आपल्याला ठाऊक आहे न कि आपला धर्म स्तुतनीय वंदनीय आदरणीय आणि पालनीय आहे , अरे पण ठीक आहे.  लोकांना का टाहो फोडून सांगायचं कि तुम्ही अस करता? बघा मी कस  करतो ते, म्हणून माझा  धर्म  जास्त मोठा आणि चांगला मला नका शहाणं पण शिकवू .

आमच्या कॉलेजात एकदा एका मुलाला काही तरी चोरी करताना पकडलं, त्याला मग दम  देऊन सोडल, त्याच्या मित्रान पैकी कुणीतरी सांगायला गेलं त्याच्या आईला कि काकू अस  झालं म्हणुन, तर त्या बाई ह्या मुलांनाच ओरडायला लागल्या, तुम्ही कस बंक करता पिक्चर बघता आणी तो तुमचा मित्र सिगारेट ओढतो!  वाह सांगू का तुमच्या घरी, चालते व्हा .आत्ता 20 वर्ष नंतर  तो मुलगा काय करतोय हे सांगायला नकोय. पोंक्ष्याचा असं काही तरी होतंय असं वाटतंय मला.  म्हणजे मला नका सांगू मी काय करायचं ते तुम्ही बकरा कापायचं थांबवा (अरे तुम्ही नको खाऊ  आम्ही खातोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ?) . फार तर पहाटे बांग  नका मारू हे ठीक आहे .  आपल्याला त्रास होत असेल तर बोला 

थोड  हास्यास्पद वाटतंय ते म्हणजे वाघ आणी  बकरा ह्यांची  तुलना केली आहे, त्यांनी चक्क  असं लिहिलंय कि वाघ मारू नका अस म्हणताय ना? मग बकरा मारू नका अस म्हणा. हे थोडं अति आहे. 

मी पोंक्षे  ह्यांच्याशी अजिबात सहमत नाहीये, हिंदू धर्मा बद्दल लिहिण्याची ही वेळ नाही आणि दाभोळकर ह्यांच्या संस्थे विषयी सुद्धा नाही, मी नक्की लिहीन, पण तो खूप विशयनंतर होईल सध्या मला फक्त एवढच म्हणायचं आहे कि धर्म  ह्या नावाखाली जो बाजार आपण हिंदूंनी  मांडलाय तो आपणच थांबवू शकतो 40 फूट मूर्ती आणली म्हणजे काय तो माझ्या पेक्षा  उंच कोटींचा हिंदू होत नाही, खूप गोंगाट करून आणि 100 स्पीकर्स लावून मिरवणूक काढली म्हणजे माझा धर्म  जास्त मोठा होत नाही, दही हंडीच्या उंचीवरून  माझी श्रद्धा खुजी होत नाही. धर्माचं  पाश्चती करण जे चालवलं आहे ते थांबवा, कोणत्या ग्रंथा मध्ये असं गणपतीच्या मूर्ती ची उंची म्हणा कि  आवाज म्हणा  असे तपशील असतील तर मला कृपा करून  दाखवा मी सुद्धा पुढच्या वर्षी एक मोठा स्पीकर चा खर्च स्पॉन्सर करेन ....

तो वर कृपा करून शांतता राखा               

सागर कुलकर्णी