सात्विक
जोशी काकू खूप सात्विक आहेत आणि त्यांच्या खूप ठाम कलपना आहेत. अमुक म्हणजेच सात्विक तमुक म्हणजे वाह्यात वगैरे. कुणी जरा तोकडे कपडे घातलेत की त्या एखाद्याला साफ नालायक आहे असं ठरवून टाकतात, कुणी मुलगी जरा मुलांशी बोलताना दिसली की लगेच कशे संस्कार नाहीत वगैरे, चार लोकात मुलांनी कस वागावं ? ह्या बद्द्दल एकदम clear आहेत. मुलांनी मुलींशी बोलूच नये असं मताच्या , देव धर्म करावा वगैरे वगैरे , पण पर्वा त्यांनी त्यांच्या मुलीचे डोहाळे जेवण अगदी थाटात केले , हा मोठा विनोद, अगदी त्या मुलीला सजवून झोपाळ्यावर बसवून छान फोटो वगैरे, त्यांना विचारू का जाऊन? काय हो काकू कशी झाली ही गरोदर?

उगाच डोक्याला त्रास
माझा मित्र संदीप मला जाम आवडतो (मला माझे सगळेच मित्र फार आवडतात ) एकदम प्रामाणिक आणि बेसिक ला धरून असतो , खूप लोकांना तो जंगली वाटतो raw वाटतो पण म्हणून तो मला आवडतो. मला त्या दिवशी म्हणाला "पुनर जन्म असतो रे,मला आलाय अनुभाव " चायला माझे आणि ह्याचे विचार कधी कधी जुळतात, पण हे म्हणजे फारच होत , का रे का वाटत तुला अस? "अरे ते जन्मो जन्मो का नातं असं म्हणतात न? मला आला रे अनुभव? गेल्या तीन जन्मातल्या माझ्या बायका, म्हणजे wife मला भेटल्या?" भेटल्या ? मेल्या तुझं लग्न झालच नाहीये म्हणजे तू केलस नाहीस ह्या बायका कोण? "अरे गेल्या तीन जन्मी च्या, दोन वर्षात तीन भेटल्या, एकदम काय तरी झालं" कुणाला? "दोघांना" आणि असं तीन दा झालं? "हो, सात जन्म असतात ना" अरे हो पण मग? "मग काय नाही, आम्ही भेटलो" नवरा बाईको सारखे? "हो रे, मागल्या जन्मात गेल्या सारखं वाटलं रे " " सात जन्म तरी असतात न रे, अजून चार तरी भेटतील ?"
कधी कधी मला ह्याचा राग येतो आणू मत्सर सुद्धा वाटतो, तो त्याच्या भावना कधीच लपवत नाही, एक झेपेनाशी होते आणि हा पठ्ठा अजून चार बायका शोधतोय आणि हे सार त्याच्या मैत्रिणी सांभाळून .
सुनामीच्या वेळी त्याचा फोन, "मी महिना भर नाहीये, जरा घराकडे बघ" कुठे निघालास? "नक्की नाही, मद्रास ला जाईन तिथून ठरवेन, खूप वाताहत झाली आहे रे, मी सडाफटिंग, माझी मदत होईल का ते विचारतो, मला चिखलाची घाण वाटत नाही कि प्रेतांची भीती, मी काहीही खातो, त्या मुळे बघू काही जमेल ते करू " हे टोक.
काय करायचं ह्याच? गेल्या जन्मीची बायको सापडली म्हणून संबंध ठेवतो सुनामीत वाताहत झाली म्ह्णून सगळं सोडून तिथे जातो लोकांन साठी . ह्याला खूप लोक असभ्य, चालू म्हणतात , पण हा स्वतःहून कुणाच्या अंगचाटी जात नाही लंपट पण नाही, एकच लक्ष्य , साधा सरळ आयुष्य, भूक लागली कि भागवतो, मग ती कोणतीही असेल .
जोशी काकूंना हा संदीप फार रुचत नाही, मला जोशी काकू , मी त्यांना आवडतो आणि मला संदीप , सगळाच लोचा .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा