शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

वेडा

दत्तपाड्याला आमच्या शेजारच्या बिल्डिंग चा नाव होत चंद्रतेज आमची जय हरी आणी  आमच्या बाजूला कृष्णकमळ. चंद्रतेज मध्ये ग्राउंड फ्लोर ला अनेक फ्लॅट्स होते, पाठी दोन होते, पुढे एक अर्धाच असा होता थोडं विचित्र होते ते, लहान लहान दोन, एक सिंगल रूम चा होता. त्या ठिकाणी खूप लोक येऊन गेली, काही घरात बघा लोक नाही टिकत सारखी बदलतात, तसेच होते ते रूम्स, सारख्या बदलायच्या फॅमिलीस. 

एकदा तिकडे एक माणूस आला त्याची बायको आणी एक मुलगा होता वाटतं ; चांगला होता माणूस, शांत वयस्कर थोडा, पण समोर आला कि हसायचा. शाळेत असेन मी, मुलगा अगदीच लहान होता. तो माणूस सकाळी जाऊन संध्याकाळी यायचा परत. खूप एक महीन्यानी  का वर्षांनी तो घरीच दिसायचा. फॅक्टरी मध्ये स्ट्राईक वगैरे झाला अस कळलं आमहाला, मला आधी स्ट्राईक वगैरे म्हणजे माहीतच न्हवत  तेव्हाची गोष्ट आहे,(गिरणगावची वाताहत झाली ते नंतर समजल)थोडे महिने झाले तरी हा घरीच दिसायचा, त्यांच्या कडे पैसे नाहीत अस कळलं मला, त्यांच्याच बिल्डिंग मधल्या मुलानं कडून. शाळेत बघा आपण आपण मित्र जमा होतो आणी काही गप्पा मारतो म्हणजे काही पण आपण घरून ऐकून येतो आणी बडबडतो, त्यातच एकदा  मला कुणीतरी सांगितलं   अस सहज बोलता बोलता आम्ही नुसतं ह्म्म्म.... अच्छा असं केल. त्या  वयात पैसा म्हणजे काय ?त्याच महत्व काय? स्ट्राईक वगैरे गोष्टींच महत्वच कळत  न्हवत . मोठेपणी कळत आपल्याला, कष्ट म्हणजे काय? त्याच काय आणि किती महत्व असत ? असो तेव्हा नीटस कळलं नाही पैसा  नाही वगैरे म्हणजे. 

मग काही दिवसाने त्याची बायको जाईची सकाळी कामावर, कुठे जाईची कोण जाणे, कंपनीत वगैरे असेल ,ती पण संध्याकाळी घरी यायची सकाळी जाऊन. मग घरच काम हा माणूसच करायचा. संध्याकाळी बायकोची वाट बघत उभा राहायचा गेट वर, ते गेट चे दोन गज पकडून, आम्हाला मैदानात खेळताना बघत बसायचा , लांबून दिसली बायको,  कि छान हसायचा. आता आठवल कि वाटत  कि करुणहसायचा ,   खूप तोंड भर हसायचा  पण डोळ्यात काही तरी दिसायच त्याच्या, माझ्या बालमनाला उमगण्या पलीकडे होत ते. 

शांत माणूस, कधी भांडण नाही काही नाही कुणाच्या अज्ञात  ना मद्यात, मुलाचे लाड करायचा, आमच्या कडे बघून पण हसायचा , प्रेमळ हसायचा बोलायचा नाही अजीबात,मुलाशी पण अगदी हळू आवाजात बोलायचा. ती लोक कधी फिरायला जाताना पण नाही पहिली मी.   

मग काही वर्ष गेली आणी तो गायब झाला. अचानक. कुठे गेला कळलंच नाही, बायको पण ते घर सोडून गेली मुलाला घेऊन.  त्याच्या बिल्डिंगची लोक   म्हणायचे की वेड लागल त्याला, मला काहीखर नाही वाटल  ते   खूप साधा सरळ होता , पण एके दिवशी आमच्या समोरच्या ग्राउंड मध्ये तो बसला होता , दाढी वगैरे वाढली होती,फाटके कपडे, एक पोत  होत हातात .  मी कॉलेज ला जात असेन तेव्हा, पण खर  सांगतो तुम्हाला, एकदम सुन्न झाल डोकं.  सण कन अस काहीस झाल  मला. नेहमी यायचा तो माणूस, तिकडेच बसायचा मैदानात  बिल्डिंग कडे बघत त्या गेट कडे बघत, नेहमी सारखाच हसायचा नुसता, आजूबाजूच्या बिल्डिंग मधली लहान मूल पण त्याच्या कडे बघून स्माईल दयायची, हा पण हलकेच हसायचा, एक दोघ  लहान मुल जवळ पण जायची, तो नुसता त्यांना शेक हॅन्ड वगैरे करायचा, पण वेड्या सारखं काही नाही मारामारी नाही आरडा ओरडा पण नाही करायचा, लहान मुलांना बघा कधी कधी आपल्याला वाटली तरी त्याना नाही वाटत भीती , त्यांच काहीतरी वेगळच असत sixth sense का काय ते. 

मग तो माणूस पण यायचा बंद झाला.   काय होत त्या फॅमिलीच माहीत नाही मला. स्ट्राईक झाला कंपनीत म्हणून वेड लागलं का आणखी काही होत ? कळलंच नाही. माझ्या मनात मात्र राहील होत  कित्येक वर्ष पण तो माणूस अजून लक्षात आहे माझ्या. 

कुणाला कधी आणी का वेड लागेल ते सांगता येत नाही.....  










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: