शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

बैल गाडी

बैल गाडी 

गाव कुठलं रे तुझं? लहान पणी हा प्रश्न अगदी common होता (आता चायला राज्य कोणतं असं असत)मग मी मुंबई हे उत्तर द्यायचो ..... अरे तस नाही गाव अस विचारल मी, मला काहीच कळायचं नाही लोकांना खर बोललं कि पटत नाही खोट अगदी लगेच पटत (कोर्टात खरं सिद्ध करायला २० वर्ष लागतात), मग मी गिरगाव अस सांगायचो, मग चेष्टा होईची, अरे  मुंबईच्या बाहेर काही आहे कि नाही गाव ? एक तर लोकांना काय करायचंय? नसेल ह्याला गाव हे पटायला काय हरकत आहे?

आम्ही सुट्टीत कधीच कुठे नाही गेलो, अतुल दर वर्षी त्याच्या गावाला जाईचा कोकणात (येताना खोबऱ्याची वडी वगैरे आणायचा माझ्या साठी नाही असं नाही)   आणी मग काय काय सांगायचा गावा बद्दल त्या घरा बद्दल नारळाची झाड  आंबे, मस्त वाटायचं ऐकायला. 

पण आम्हाला गावाचं नाही त्याला मी तरी काय करणार?    नंतर नंतर (आणी आत्त्ता सुद्धा)मी सांगायला लागलो, माझं गाव वारुड भुसावळ जवळ, खान्देशी आहे मी , वडील आठ वर्षांचे असताना आजोबा आणि एक बहीण वारली म्हणून आजी त्यांना आणि आत्याला घेऊन बडोद्याला गेली  (खर तर खूप ठिकाणी, पण जे लोकांना पटकन कळत ते सांगायला शिकलो, मग धींनोज, महिसाणा, आवाखाल हे सांगितलं तर गाडी भलतीकडेच जायची), वडील  सुद्धा  फक्त एकदाच गेले तिथे कूळ कायद्यात जमीन गेली तेव्हा सह्या करायला आणि ७/१२ आणायला (हे ७/१२, कूळ कायदा एकदम भारी होत, मग लोक थोडे बॅक फूट वर जातात ), बर बर म्हणतात कारण त्यातल्या निम्याहून अधिक लोकांना ७/१२ म्हणजे काय? ते माहित नसत  आणी बऱ्याच लोकांची समजूत कूळकायदा म्हणजे कुलकर्ण्यांचा काही तरी कायदा असेल अस वाटत (तरी मी कुल आहे कूळ नाही हे विसरतात). माझी लगेच बाजू सर आणी आणखी काही विचारल  तर हा सागर हा कुळून काढेल म्हणून गप्प बसतात. 

वडिलांचं असं तर आई गिरगावातली म्हणजे १००% मुंबईकर, तस तिची  आजी राहायची जोगोडीला, म्हणजे पुण्याहून जेजुरीला (हल्ली फार फार्मात आहेत राव म्हणून हा reference दिला, तर तिथेच वाटेत)   जाताना लागत, बिनाताई एकदा गेली होती (तिच्या) लहान पणी, आता जमीन गेली तिथली , म्हणजे विकली (आम्हाला मातीच मिळाली) आत्ता तिथेच कुणी नसत आणि खूप वर्ष कुणिच न्हवत. म्हणजे दोन्ही कडून गाव नाहीच. तर सांगायचा मुद्दा असा कि मी मला गाव नाही, किव्हा मुंबईच माझं गाव.    

तर गाव आम्ही नुसतं मित्रांकडून म्हणा चित्रात (आणि चित्रपटात) पाहील होत, कधी तरी पुण्याला जायचो (आत्ता काय तेव्हा सुद्धा गाव म्हंटलं असत तर मुळा मध्ये बुडवला असत आम्हाला, तेव्हा असायचं बाबा पाणी मुळा नदी मध्ये) आणी अक्का (आईची आई ) राहायची  पर्वतीच्या पायथ्याशी  म्हणजे मेन पुण्यात नाही (त्या वेळच्या) ते थोडं गाव बाहेर होत म्हणजे गावच्या बाहेर होता अक्काचं घर म्हणून सदाशिव पेठ हे गाव  अस म्हणायचं, पण पुण्याला गाव नाही म्हणायचं? कारण ते शहर आहे (किचकटच लोक सगळी) . म्हणजे सुट्टीत चुकून आम्ही गेलो कधी बाहेर तर ते पुण्याला आणि ते गाव  न्हवत. 

गावात शिकायला खूप मिळत असं माझं मत आहे कारण सगळं नैसर्गिक असत आपल्या इथे सगळंच कृत्रिम आहे एकदम रेडी मेड, नंतर नंतर मी बऱ्यापैकी फिरलो आणी ऑडिट ला तर फॅक्टऱ्या गावात असायच्या, गवत शेत, झाड प्राणी सगळीच वेगळी असतात तिथे. 

मला एक खूप मोठा धडा मिळाला होता ते एका गावात, नाव हि आठवत नाही मला आता आणी त्या शिक्षकाचे तर मी  नाव सुद्धा न्हवत विचारलं. कारण मला त्यातला अर्थ किव्हा बोध का काय ते २० एक वर्षांनी उमगला (म्हणून कृष्ण लागतो अर्जुनाला) .  

मी एका शुगर फॅक्टरीच्या ऑडिट साठी वगैरे साठी गेलो होतो तर तिथे खूप सारा ऊस घेऊन शेतकरी यायचे कारण साखर बनवायला ऊस लागतो (म्हणजे ऊसच लागतो)तो ऊस  शेतकरी लोकजवळ असेल तर  बैल गाडीतून आणायची (आता ट्रॅक्टर वर पण नेतात) आणी ती  गाडी अगदी ओतप्रत भरायची. बैल बिचारी वजनाने वाक वाक वाकायची, ओझ्याने वाकण म्हणजे काय हे मी अगदी पाहिलंय. काही काही बैल खूप उमदे, उंच गोरे रुबाबदार  असतात  (काही लोक बघा अशी रुबाबदार असतात पण अगदी बैलोबा आहे असं म्हणतो आपण?)काही मध्यम असतात, कधी कधी काटकुळे बैल पण बांधतो एखादा माणूस गाडीला आणि तोंडातून फेस येतो त्या बैलाच्या, म्हणजे तोंडातून फेस येतो म्हणजे काय हे पण मी पाहिलंय   (सगळं गाव कडे).

मी असाच एकदा त्या गावातल्या एका रस्त्या वरून चालत असताना समोरून एक बैल गाडी येत होती, दोन्ही बैल  एकदम उमदे होते उंच, पण तो बैल गाडी वाला स्वतः बैल होता, गाडी हाकताना त्याच्याच तोंडातून फेस येत होता. मी म्हंटल, अरे हे बैल इतके मस्त आहेत पण गाडी अशी काय हळू हळू आणि वाकडी तिकडी येतेय ? बाजूला एक गाय चारणारे (गाईला घेऊन फिरणारे )आजोबा होते, ते म्हणले की बैल जोडी न घेता ह्याने वेगळी बैल  लावली हायेत एकत्र  ..... complete confusion ...  अरे पोरा  दोन्ही बी बैल उत्तम असून  न्हाई चालत ती जोडी उत्तम हवी .... एक बैल दुसऱ्या पेक्षा ताकतवर असला तर तो दुसऱ्याला खेचणार  आणी मग दुसराची फरफट मग ह्यो त्याला रोखणार, झाली ना गडबड? गाडी जाईची कशी ती पुढ?अन जर दोग बी ताकतवर असली अन त्यांच  पटत नसल की बैल गाडी दोग बी इरुद्ध दिशेला खेचनार . एक घाबरत असला तर दुसरा त्याला चेपनार आणि तो मग लवकर मरनार कारण सगळा भार तोच पेलनार अन दोघे बी सारखीच हवी स्वभावानं.......... अन वळू न्हाई बांधत गाडीला, समजलं काय? 

कुनी एकाला कमी न्हाई चालत खायला दिल तर, एकाला पौष्टिक अन एकाला साधा चारा न्हाई चालत दोगांना बी तेवढच काम अन तेवढाच आराम.  मंग सोपं असतंय होय? बैल गाडी म्हंजी घेतले बैल अन बांधले कि न्हाई व्हत, प्रानी हाई मोटार न्हाई  नीट बघून गाडी बांधून आणि मंग काळजी घ्यावी लागते तव्हा कुठं नीट चालतंय     

आता ह्यो मानूस, ह्याने ह्यो  ऊस काढून झाला कि दोघांना बी येगळं न्ह्यायला हवं ही जोडी कधी बी चालायची न्हाई त्यात बैल गाडीवाला बी खपनार ... ..... 

हे लॉजिक कळायला मला य वर्ष गेली कारण  मी फक्त बैल जोडी बघत होतो , पण ही गोष्ट  सगळ्याच जोड्यांना लागू होते, टेनिस मध्ये बघा बॅडमिंटन, क्रिकेट बघा two bowlers always hunt in pairs  म्हणतात, opening batsman पण दोघे एकमेकांना किती complementary हे जास्त महत्वाचं. नुसतेच best असून नाही चालत आपला जोडीदार सगळ्यात best असण्या पेक्षा माझ्या करता best आहे का? हे बघायला हवं.  किती तरी उधाहरणं आहेत. आपले पेस आणी सानिया बघा डबल्स मध्ये खूप चमकले, पण सींगल्स नाहीत. पण ती दोघे एकत्र खेळली तेव्हा नाही चमकली. भूपती तर फक्त पेस असतानाच चमकला.  म्हणजे compatibility महत्वाची.      

लग्न झालेल्या जोड्या बघा, कधी कधी किव्हा बहुतेकदा एकच माणूस ओढतो गाडी संसाराची, ओझ्या खाली दबणं, काम करून तोंडातून फेस येणं हे सगळंच आपण बघतो (अनुभवतो) कारण  आपण दोन उत्तम माणसं जोडण्याचा प्रयत्न करतो आणी कधी विस्कटलच तर आश्चर्यचकित होतो, खूप जोडपी असच खेचतात आयुष्य कुणीच सुखी नाही आणि ते जो संसार वाहतात त्याची वाताहत होत असते आणी त्यात त्या कुटुंबाची सुद्धा. संसार आला कि हे होतच असं म्हणतो. 

पण जोड्याच जर निट लावल्या तर? ते बैल गाडी सारखच same logic  लावल तर? संसाराचा गाडा दोघांनी खेचायचा असतो नाहीतर वर  त्या आजोबांनी सांगितल्या  सारखं होत आणी  बाहेरच्या लोकांना ज्यांना  दिसतंय कि संसारत नुसती ओढाताण होतेय तर ती लोक बैल वेगळी का नाही काढत? एका बैलाची गाडी सुद्धा असतेच ना? लागली जोडी तर लागली, नाहीतर नाही, आयुष्य तरी वाढेल बैलाचं (म्हणजे बैलीच सुद्धा) ....   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: