बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

काळी पॅन्ट

काळी पॅन्ट 

माझ्या कडे फार कपडे न्हवते कॉलेज मध्ये, अजून बाकींच्याच्या मानाने कमीच आहेत . एक जीन  ची होती बस्स.  मग आर्टिकल शिप करताना एक दोन घेतल्या होत्या, व्ह्याच काय कि मी जो हाताला लागेल तो शर्ट आणी त्याच दोन पॅन्ट घालायचो खूप दा रंग संगती जरा विसंगत व्ह्याची . त्या काळी नवीन कपडे फक्त दिवाळीतच घायचो आणि मला तसा पगार पण न्हवता नव नवे कपडे घ्यायला सारखे सारखे, तर त्या वर्षी मी एक काळी पॅन्ट पहिल्यांदा विकत घेतली, म्हणजे तीच दिसली मला आणि मी फार चिकित्सक नाहीये पण मला जामआवडली, मला तरी   म्हणले लोक अरे काळी पॅन्ट काय घेतोस? वेगळा रंग वगैरे घे उठून दिसेल... मी   थोडा हट्टी आहेच  आणि मला फार लोकांच्या बोलण्याने फरक नाही  पडत मी तीच घेतली . 

छान होती कॉटन ची आणि मग मला लक्षात आलं कि ती पॅन्ट कशावर ही चालते, म्हणजे त्या    पॅन्ट  वर काहीही उठून दिसत (माझंच मी काय कौतुक करायचं म्हणा ) अगदी निळ्या शर्ट पासून ते पांढऱ्या ते ग्रे  झालंच तर tshirt  वर (का खाली ?) पण चालायची. मी  एकदम खुश, खूप जास्तच खूष,   छोट्या गोष्टी किती आनंद देतात हे सांगणं कठीण आहे, पण मग मी तीच पॅन्ट   सारखीच  घालायचो एक तर ती फार मळ्याची नाही म्हणजे कुणाला कळायचं नाही , ही casual म्हणून चालायची   formal म्हणून तर अगदीच सरस. 

मला मग जाणवलं कि ह्या आधी माझं कपाट कस अपूर्ण  होत आणी मी तयार व्ह्यचो तरी कसा? आयत्या वेळेची पॅन्ट ही होती आणी  छान तयार होऊन जायला  पण हीच, म्हणजे मी  अर्धवट होतो का मला माझी गरज माहित न्हवती. जाम जीव होता आणि आहे माझा काळया  पॅण्ट   वर माझ्या, अचानक मला मिळालेल्या पॅन्ट वर संपूर्ण पणे  अवलंबून   झालो  होतो, एक तरी काळी  पॅन्ट  सगळ्यांकडे कडे हवीच.  

तू माझी काळी पॅन्ट आहेस :) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: