रविवार, १५ जानेवारी, २०१२

Marathon 2012

पहाटे चार चा गजर लावला पण सवयी प्रमाणे रात्र  भर  घड्याळ बघत होतो , शेवटी पाऊणे चार ला उठलो . मी का Marathon धावतो ? (मी खूप गोष्टी का करतो? )  हा  प्रश्न मी सकाळी मलाच विचारतो , छान  गुलाबी थंडीत महिना भर practice  करताना पण मी हाच विचार करायचो , ह्याचं उत्तर मला तासा भारत मिळालं एका माणसाच्या t -shirt  वर लिहीलं होत, "Pain is temporary, acievement is permanent" .

माझ्या चेहरयावर enquiry counter चा बोर्ड आहे का कोण जाणे मलाच सगळे प्रश्न विचारतात, अगदी बंगलोर असो कि गुरगाव, अगदी कानडीत मला विचारायचे लोक अमुक अमुक रस्ता कुठे आहे म्हणून? (नाई म्हणायला बडोद्याला एका छान दिसणाऱ्या मुलीने मला गुजराती कम इंग्रजी मध्ये काहीस विचारलं होतो तेव्हा मला बारा वाटलं होतो म्हणा, पण तिला रस्ता माहित असणार कारण ती पुढच्या गाळीतच वळली , असो ) स्टेशन वर पण त्या स्टोल वाल्या माणसाने विचारला किधर जा रहे सब लोग? म्हंटल धावायला बांद्रा ते वी टी, काय वेड्या सारखं असा चेहरा केला त्याने.

पण मुंबईकरांचा उत्साह मात्र बघण्या सारखा आहे रस्त्यात किती लोक असतात बघायला. धावणारे ३०००० तर बाग्णारे लाख, सकाळी फक्त प्रोत्साहन द्य्याला येतात, बिस्कीट म्हणू  नका केळी म्हणू नका पाणी म्हणू नका सगळ देतात , मोठ्याने गाणी लाऊन cheer up करतात.

मी परीक्षेच्या  आधी कुणाशी काही बोलत नाही, लोकांनी खूप अभ्यास केला आणि मला काहीच येत नाही असा वाट्त, गेल्या आठवड्यात मी पेपर उघडला आणि जाम घाबरलो, लोक दोन तास रोज धावतात काय काय खातात , बापरे मी तर साधी  भाजी पोळी आमटी खातो, काम असेल तर रोज धावत पण नाही, काही खर नाही अस वाटलं, पण जमल बुवा , जवळ पास १५ की मी धावलो न थांबता, पण शेवटचे ५ की मी तास घेतात.

सगळ्यांची धावण्याची पद्धत फार वेगळी असते,  आणि एक म्हणजे नवीन धावणारे लगेच कळतात, सुरवातीला जोरात धावतात आणि मग ढेपाळतात, काही लोकांना मुलगी पुढे गेली कि त्रास होतो मग जोरात जातात आणि फसतात. काही लोक मस्त धावतात साध सरळ सोप ... मिलिंद सोमण ला पहिला, साला चिकना आहे, सेहेचाळीस चा असेल पण ४२ की मी धावतो.


marathon  मला आवडत कारण त्यात पाहिलं येण्याची गरज नसते, पूर्ण धावलो तरी झिन्कल्या सारखं असत आणि सगळे धावणारे एक मेकांना मदत करतात, सकाळी एक माणसाने मला विचारला  choclate ? नको म्हंटल मी, tired ?  मी नाई म्हंटल हसला आणि गेला पुढे, वाटेत लोक काहीतरी वाटत असतात पण ते रस्त्याच्या कडेला मी मध्ये धावत होतो आणि एक बाई संत्र वाटत होती सोललेला, आपल्यला आता कळत नाई पण धावताना खूप फरक पडतो एका फोडीने , तर मला धावताना परत बाजूला जाऊन घेण्याची ताकत न्हवती बाजूला एक मुलगी धावत होती तिला कळल मला हवंय, घेतला तिने आणि पुढे येऊन मला दोन फोडी दिल्या, ह्या छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो, टी वी वाले फक्त गोरे दाखवतात हे सगळ नाही दाखवत , ही खरी मुंबई आणि हेच ते स्पिरीट .

वाटेवर एक बाई wheelchair वर आम्हाला प्रोत्साहन देत होती, आलंच झाला थोडाच बाकी आहे असा म्हणाली :) , लोकांचा उत्साह बघूनच आम्ही उरलेले अंतर कापतो.   चर्चगेट ते वी ती अंतर दीड एक की मी आहे, पण येत येत नाही २० आणि २१ की मी मध्ये खूप अंतर असत :). गम्मत म्हणजे रस्ता माहित असला न की जास्त त्रास होतो, अजून खूप अंतर आहे अस वाटत राहत ,
fountain पासून एक की मी अंतर ऊर्त मला एकाने विचारलं, किती उरलंय, म्हंटल हे आल, त्याला माहित होत अंतर, हसला आणि Thanks buddy  म्हणला.

भवन्स कॉलेज च्या बाजूला पारसी लोकांची छान घर आहेत, तिथे एक बाई तिच्या (धावणाऱ्या ) मुलीकडे बघून म्हणाली "स्वीटी यु आर लुकिंग जस्त ग्रेट", सगळ्यांनी वळून पाहिलं (मी पण ) खरच सुंदर होती मुलगी :), अश्याच गोष्टींची मजा असते.

सगळ्यात आनंद होतो ते , अंतर संपल्यावर सगळं कष्ट केलायचं समाधान वाटत. काही लोक तर शेवटी धूम पाळतात, मला जाम नवल वाटत,  पाय उचलत सुधा नाहीत नंतर तर.

पण एकदा तरी सगळ्यांनी धावायला हवच एक अनुभव आहे, अडीच तीन तासाचा प्रवास एकदा करून बघा, मुंबई का बेस्ट आहे ते कळेल, त्या देल्ली वाल्यांनी गुल पनांग ला एकटी गाठून चाळे केले होते आणि इकडे बघा लोक, फुकट गोष्टी वाटतात आणि अनोळखी माणसांना प्रोत्साहन देतात, मुंबईचा कंटाळा आला , सोडली पाईजे अस म्हंटल की अस काही तरी hot मग आम्ही परत त्या सगळ्या शिव्या देत इथेच राहतो...










  

शनिवार, १४ जानेवारी, २०१२

Jogging

मी दररोज सकाळी धावतो (म्हणजे तबियती साठी   एरवी , पोटासाठी , आपल्यांसाठी , आपल्यान पासून संकटापासून , संकटा पाठी........) कारण मी माराथोन मध्ये भाग घेतो २१ K .M  धावतो सगळं नाही, वेळ मिळाला कि जातो  धावायला, आमच्या इथे एक पार्क आहे तिथे जातो रसत्या वर जात नाही (कारण कुत्रे मागे लागतात आणि मी कुत्र्यांना घाबरतो, हे धीट पणे सांगतो ). पण धावताना बाकीच्या लोकान कडे बघतो (बाईका कमीच येतात, नाहीच म्हणा न ), नुसते काय धावायचा १०-१२ फेर्या , दोन नंतर कंटाळा येतो तेच तेच बघायला, म्हणजे बघा झाड कसा दहा फेर्या नंतर तसच दिसतं, पण माणूस बघा तिसर्या फेरी पर्यंत घामेघूम होतो हळू धावतो, चालतो, मजेशीर तोंड पण करतात काही माणसं.

आमच्या ground  मध्ये एक Forest  Gump येतो , म्हणजे नुसता धावतो सुसाट (म्हणजे जोरात. मी मैदाना मध्ये नाही सुसाट, बाकी खूप सारं सुसाट :). ).  म्हणजे मी दोन एक महिने जातो Marathon जवळ यायला लागली कि , खूप नाही पण १० -१२ फेर्या मारतो, पण हा पठठा माझ्या आधी धावत असतो आणि नंतर पण, फक्त एकदाच त्याला लवकर जायचं होत म्हणून माझ्या आधी गेला, मग मी पण जोश्यात अजून दोन मारल्या फेर्या . कितेक वर्ष त्याला बघतो मी, पण काही हसत वगेरे नाही तो, बाकीचे लोक स्मित तरी करतात , संघाचा आहे तो (राष्ट्रीय स्वम्सेवक संघ) , शाखा  असते नंतर त्यात तो असतो, मी जाईचो शाकेत लहान पणी, अजून इथे नाही गेलो घाईत असतो मी म्हणून हे झालं कि जाईन एक दिवस, अजून बर्यापैकी प्रार्थना  येते माला (नमस्ते सदा वत्सले मातृभूमे....).

काही लोक इस्त्रीचे कपडे घालून अंघोळ दाढी करून येतात काही लोक उगीच येतात एखादी  फेरी मारली की गप्पा मारतात, काही बाईका  येतात नित्य नियमाने मुलांना शाळेत सोडून, नवर्याला दाबा द्यायच्या आधी, फटाफट फेर्या मारतात आणि जातात, कुठे हि बघत नाहीत, काही लोक फोन वर पण बोलतात, काही फोन वरच बोलायला येतात विशेष करून मुली  (धन्य बाबा ते प्रेमी युगल), काही लोक अगदी नित्य नियमाने येतात ती कामात अगदी हुशार असतील , नीट नेटकी असतील. काही तर अनवाणी धावतात काही च्प्लान  मध्ये धावतात, पण येतात, मध्ये मध्ये एक watchman पण यायचा, (दिवस भर झोप काढतो , म्हणून येत असणार ) कौतुक वाटत मला. काही लोक अगदी खरे खुरे धावतात नित्य नियमाने, ठरलेलं फेर्या मारतात चड्डी बनिअन आणि नैकी चे बूट घालतात.

काही म्हातारे बिचारे नुसते येऊन बसतात मग चार लोक आली कि बोलतात मी जाई पर्यंत जात नाहीत (काही तरी विचार येतात, जाऊ दे आता ) मग काही तिथे लाफ्टर क्लब मध्ये येतात, दिवस भारत तेवढेच हसणारे लोक पण असतात त्यात, पण त्यात एक लीडर असतो तो सांगतो टाळ्या वाजवा हसा , एक दोन दा मी दचकलो होतो त्यांचा अवज ऐकून,  हीईईए हा हा हा ईई हा असा काई तरी करत होते.

खूप लोक योगा करतात, काई भर भर चालतात काई खेळतात, पण वातावरण छान असत. गम्मत म्हणजे जॉग करताना काई लोक शर्यत लावतात मी पुढे गेलो  कि जोरात पुढे जातात, काई लोक रमत गमत चालतात आणि मध्ये येतात आमच्या . पण त्यांना ते लक्षात येतच नाई. काई माणसं नुस्त झोपाळ्यावर बसतात.

तिथे एक जाड जूड  माणूस ते फळांचे  आणि पानांचे रस  विकतो, मला अजून माहित नाई काय आहे ते, मी नुस्त mix  मागतो कारण मालां काय मागायचा तेच माहित नाईये, पण मी  पितो कारण मला ते सगळं आवडता, कडू असतं ते, पण मी तोंड वाकड न करता पितो (तक्रार न करण्याचा स्वभाव).

पण मला वाटत कि सगळ्याच ठिकाणी असच होत असणार...




















रविवार, १ जानेवारी, २०१२

Happy New year

Happy  New  year 

एकदा मला माझा मित्र विक्टर पाडव्याला म्हणाला ,  कि काय करणार घरी , म्हंटल  काही गोड असेल, देवळात जाऊ आणि झाल . तो म्हणाला कैसे हो दारू नाही मटण नाही मग celebrate कसं करता ? खरय न? पण मला आवडत, मी एकतीस डिसेंबर पण साजरी करतो (ती पण वर्षातून खूप वेळा)  :) , पण नवीन वर्ष मात्र एकदम आळशी जातं, झोपेत, त्या पेक्षा पाडवा बरा.

दर वर्षी मी ठरवतो कि ह्या वर्षी नवीन वर्ष अगदी छान साजरा करू पण नेमका एकतीस ला कुणी भेटतं आणि सगळं फूस होत. हल्ली मी मी काय करणार वर्षात काय सोडणार अस काही ठरवत नाही,  एक साधा दिवस हा म्हणून एक जानेवारी कडे बघतो. आज सकाळी म टा वाचत होतो , त्यात पु.लंचा एक लेख होता , बाकी सर्व सोडून तो आधी वाचला , एकदम बरं वाटला, राहून गेलेली गोष्ट हे सदर आहे , त्यांचं पण काही राहून गेलं करायचं? असा वाटलं न ? म्हणजे मला तर अनेक जन्म घ्यावी लागतील त्यंनी केलेल्या अर्ध्या गोष्टी करायला , प्रामाणिक पणे लिहिलं होत, ह्या वर्षी  थोडं जास्त लिहायचं गेल्या वर्षी पेक्षा.    पण नवीन वर्षी सकाळी सकाळी पर्वणीच म्हणायची , अनपेक्षित   मिळालेल्या गोष्टींचं अपरूप  जास्त वाटत , तुमच्या ब्लोग विषयी अनपेक्षित मिळालेलं कमेन्ट मनाला सुख देऊन जात.

मी पण ठरवलंय ह्या वर्षी मनात फार ठेवायचं नाही , वाईट बोलायचं नाई , एखादी गोष्ट आवडली कि मात्र लगेच बोलायचं , मनापासून बोललं न कि समोरच्या ला पण ते पटतं. स्वताला आवडेल त्या गोष्टी करायच्या , स्वतावर पण  थोडं प्रेम करायचं , अभ्यास कारायचा :) , प्रामाणिक राहायचा स्वताशीच , मी स्वताशीच फार खोटं बोलतो (जगाशी मात्र खर), म्हणून जास्त त्रास होतो.

मी लहान पणी पेटी शिकलो होतो आता विसरलो साफ, ती परत शिकायची आणि marathon ची प्रक्टिस जुलै मध्ये चालू करायची ....एवढा झाल तरी पुरे :)




शनिवार, २४ डिसेंबर, २०११

आरे



माझे आणी आरे colony चे जुने ऋणानुबंध आहेत, मग नंतर आरेच्या प्रेमात पडलो, traffic मध्ये अडकलो , झाडाखाली बसलो ....

आमच्या शाळेची पिकनिक नेहमी आरे मधेच जायची , म्हणजे माझी शाळा होती बोरीवलीला आणि आरे गोरेगावला , पण चार पाच वर्ष आम्ही तिथेच जायचो, एका वर्षी  मुंबई दर्शन ला गेलो (त्या वेळी होती मुंबई दर्शनीय). आम्ही लहान पणी कधी कुठे बाहेर फिरायला गेल्याच मला फार नाही, म्हणजे आम्ही गरीब वगेरे न्हव्तो , खाउन  पिउन सुखी. दिवाळीत नवीन कपडे, फटाके ,  मोठा होताना सायकल, तस  सुखवस्तू, पण फिरायला मात्र कुठेच जायचो नाही, आम्हाला गावच न्हवत, गेलोच तर अक्का पंतांकडे पुण्याला .. तस आमचे वडील आम्हाला शनिवारी चर्चगेट ला बोलवायचे ऑफिस ला हाफ डे असला कि, मला फार आवडायचं चर्चगेट एक तर स्वछ आहे बंद, म्हणजे झाकलेल, उघड नाहीये, बाहेर छान इमारती , समुद्र . सगळच. आम्ही akbarallys मध्ये जाईचो सिनेमा पाहायचो, पण गावात मात्र कधी नाही गेलो राहायला.

शाळे मध्ये असताना दर वर्षी पिकनिक ला मात्र न चुकता आरे मिल्क कोलोनी,  पण इतकी वर्ष आरे मध्ये जाऊन सुधा कधी आम्हाला ती factory दाखवली नाही कि कधी फुकट (फुकट चीमजा काही औरच असते) दुध पाजलं नाही, पण त्या वेळी लक्षात नाही आल, आम्ही त्या  आरे गार्डेन  मध्ये खेळायचो आणि परत घरी यायचो दमून भागून, त्यातच फारा मज्जा होती, आता ते आरे गार्डेन जरा बकाल झालंय त्या वेळी हिरवळ होती हुंदडायला जाम बर वाटायचं छोटा काश्मीर ला  तर मी लग्ना  नंतर गेलो  पहिल्यांदा (काय उपयोग?), त्या आधी फक्त सिनेमात बघायचो . माझी खरी मैत्री जमली आरेशी ते मी Baan मध्ये असताना, सकाळी लवकर जायचो साधारण साडेसात पावणे आठला 2001साली, तेव्हा वेड्यागत न्हवता ट्रफिक  गाड्या ही कमी होत्या, मी बाइक वर जायचो, तिथे जो रस्ता MIDC  कडे वळतो न? तिथे सूर्य दिसायचा वर येताना झाडातून, थंडीत बरेचदा मी दहा पंधरा मिंट बाइक  बाजूला उभी करून तिथेच बसायचो तो उगवता सुर्य पाहत, मस्त हिरव गवत थंड वार्याची झुळूक ताज्या हवेचा सुवास, ते सुंदर दृश्य, morning walk ला   आलेली लोक ...मुंबईत असून नसल्या सारख, आता बरीच वर्ष नाही थांबलोय तिथे आणी हल्ली सकाळी सुद्धा इतका ट्रफिक असतो कि धुराचा वास जास्त येतो . पण आहे अजून आरे कॉलनी  थंड आहे .

मला गाव नाही (नाही म्हणायला गिरगावात जायचो), म्हणून निसर्गाचा तसा संबंध आरेमुळेच  आला माझा. तरी माझा मित्र म्हणायचा कि आरेच्या आत  जंगल आहे,  मस्त मजा येते (त्याची मजा वेगळी असायची म्हणा), मला आधी खर वाटायचं नाही (म्हणजे जंगल आहे ते , त्याची मजा  नाही) पण मग आतले रस्ते शोधत गेलो मग पटायला लागल , आवडायला लागल.

आरे मध्ये एक आतला रस्ता   आहे, (new zealand हॉस्टेल चा ) बाहेर ट्रफिक असलं कि आतून काढतात हल्ली , पण मला हा रस्ता फार पूर्वी पासूनच माहित होता, पण तो जाणवला फार नंतर अनेक वर्षांनी, सकाळी तर  झाडातून सूर्य कीर्ण वाट काढून येतात,  तिथेच छोटी छोटी घर आहेत, एक   वाण्याच दुकान सुद्धा आहे, गोठा तर आहेच, तिथे लोक सकाळी चूल पेटवून पाणी गरम करतात, त्या मुळे त्या धुरा  मध्ये सूर्यकिरण अडकला कि मस्त वातावरण निर्मिती होते, तिथेच थांबून निसर्गाचा आनंद घेत बसाव वाट्त (पण कुणी तरी मूर्ख मागून जोरात होर्न  मारतो आणि आपण मुंबईतच असल्याची जाणीव करून देतो )ते सगळ डोळ्यात भरून घेऊन मी तिथून निघून जातो. आरे मधली ती वेडी वाकडी वळण पण त्या सगळ्याला साजेशी आहेत , कवलारू  घर , आजूबाजूला हिरव रान, पलीकडे थोड जंगल , एक हि  बिल्डींग दिसत नाही  , ताज तवानं वाटत . तिकडे न बाक ठेवली आहेत बसायला  वेग वेगळ्या ठिकाणी आहेत, लोक असतात कधी कधी, मला  पण खूप दिवसान पासून बसायचं आहे त्या बाकावर, बघू कधी योग येतोय.  नेहमी घाईतच जातो हल्ली मी  तिथून        

एकदा रात्री आरेतून येताना मी आधीच आतला रस्ता घेतला (modern bakery कडून, ह्याला पण वर्ष लोटली ) पुढून आत जावच लागत म्हणून आधीच, थोडा खराब आहे रस्ता खड्डा होता  मोठा तिथे, थोडा पुढे गेलो तसा अंधार होता बुदुक आणी नशीबाने गाड्या पण नव्हत्या , मी हेड लाईट  सुद्धा बंद  करून पहिला (उगीच आगाऊ पणा ) रस्ता माहितीतला होता , मस्त  काळोख झाला, बाक पण दिसली झाड पण दिसली पण जाणवली वेगळी. म्हणजे बघा आपण आपल्याला आवडलेली एखादी जागा, वस्तू , मुलगी कुणाला मुद्दाम दाखवली कि आपण त्यांच्या नजरेतून पहायचा प्रयत्न करतो मग आणखी येते मजा, तस  मला अंधारात दिसल आरे . पुढे आल्यावर (लाईट लाऊन)   त्या घरातून चुलीचा धूरदिसला , अंधार होता, जंगल दिसत न्हवत पण जाणवत होत , दिसण्या पेक्षा जाणवण्यात जास्त मज असते न? म्हणजे कॉलेज मध्ये, शाळेत ऑफिसात  एखादी व्यक्ती दिसली नाही तरी चालते, पण आहे हे जाणीवेने बर वाटत , म्हणून सेंड ऑफ ला वाईट वाटतच न? आपण काय लोकांना रोज भेटत नाही पण ते आता नसणार ही  जाणीव आपल्याला त्रास देते.  तर ते हे जंगल तस जाणवल. आत थंड असते   नेहमीच (कोण  जाणे मला अस  वाटत  कि बाहेरची गर्दी बघून थंडी इथे आत  आरे मध्ये लपून बसली असणार, कारण सिग्नल आला कि एकदम उकडायला लागत  तिला   आणू बाहेर बोलून परत ), तसलीच ती घर बाहेर बसलेली वस्तीतली माणस दुकानात असलेली लोक, गुर ढोर गोठयात तसाच तो मिणमिणता दिवा   …. त्या वेळी हे पाहून ऑफिस चा सगळा क्षीण  निघून जायचा  … असच ठेवा रे आमच आरे     
 





















गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

महलक्ष्मि

काही विचार !

मी रविवारी महलक्ष्मि च्या देवळात गेलो होतो , मुंबई मध्ये राहून सुधा मी दुसर्यांदा  गेलो . गर्दी होती थोडी, म्हणजे आरती सुरु होती म्हणून थांबून ठेवल होत लोकांना. तरी झालं लवकरच, देवळ्याच्या पाठी खूप सुंदर समुद्र दिसतो . तुम्ही रात्री आपली शाळा किव्हा कॉलेज बघितलाय? सकाळी इतका प्रसन्न वाटणारी शाळा कॉलेज रात्री  इतकं भयाण दिसत , सगळं सुनं सुनं वाटत, पण समुद्र मला सुंदरच वाटतो . सुसाट वारा सुटला होता, दहा मिनटा पूर्वी traffic मध्ये असा अंदाज पण येत नाही कि थोड्या वरती इतकं सुंदर सगळं असेल.
देवळात ती माणसं (volunteers ) सगळ्यांना धक्का देऊन बाजूला काढतात म्हणजे तास भर वाट बघून दहा सेकंद पण दर्शन  होत नाही . ते सगळं तसच झालं , पण हल्ली मला ह्या गीष्टींचा त्रास होत नाही मी सध्या आनंदात आहे :). 

देऊळ छान आहे प्रसन्न एकदम , गार वारा सुटला होता कुणीतरी सनई वाजवत होतं, खूप गजबजाट, मला अस आवडत देउळ , europe मधल्या चर्च सारखं नाही , सगळीकडे शांतता आणि पांढरे कपडे घातलेले ते पाद्री , जरा आवाज झालं कि शु असा करणारे लोक, मी कधी बाहेर पडतो अस झालं होतं मला तेव्हा . (http://mazapravasvarnan.blogspot.com/).

त्या गर्दी मध्ये मला एक द्रिष्य दिसलं , दोन हिजडे (तृतीय पंथी लोक, हल्ली सगळ्यांच्या भावना दुखावतात ) दिसले छान  साडी नेसली होती, डोक्याला  कुंकू हातात ताट, एकाने डोक्यावर पदर घेतला डोकं टेकलं आणि डोळे मिटून प्रार्थना केली, काही तरी मागितलं असणार , काय मागितलं असेल? मला काही झालं कि मी लेगच देवावर चिडतो , मीच का रे?  असा विचारतो रुसतो . पण ह्या लोकांनी देवा कडे काय मागितलं असेल हो? चार पैशे जास्त मिळो? आज कमी शिव्या मिळो? घर? गाडी? काय मागणार? ....मरण मागितलं असेल का हो? का पुढच्या जन्मी नक्की काय ते कर असं नको ठेउस...कुणास ठाऊक. मी खूप वेळ त्यांच्या कडे बघत होतो. ते खरे देव भक्त, असं होऊन सुधा श्रद्धा कायम होती हो, आपण सगळे ढोंगी  सगळं मिळून सुद्धा तक्रार करतो समाधानी नाही राहत , मला त्यांच्याशी बोलायचा होतं, विचारायचा होतं, पण नाही विचारला.

देवीच्या पाठी गणपती आणि मारुती चं देउळ आहे ते बघायला गेलो, वारा खाल्ला समुद्र बघितला आणि बाहेर पडलो कुठे गेले ती दोघं कळलंच नाही .

बाहेर पडून वडा खाल्ला worli sea face ला बसलो , विसरलो सगळं, आता आठवला म्हणून लिहिलं.....मनाला चारा.


रविवार, ४ डिसेंबर, २०११

देव

देव आनंद :

आमच्या बिल्डिंग मध्ये एक बाई होती,  कुणी मेला बिल कि लगेच येऊन सांगायची एरवी बघत ही नसे पण काय सुप्त आनंद मिळायचा कुणास ठाऊक तिला? तिची नणंद म्हण्याची "आमच्या वाहिनीला सुतकी विभागात नोकरी मिळेल". 

आज सकाळी jogging  करून आलो तेव्हा आमच्या समोरच्या aunty (अजून मी कुणाला तरी aunty म्हणू शकतो ) दार उघडून मला म्हणाल्या , सागर समझा क्या? मी काय? असा म्हणालो "देव आनंद गुजर गया"......मला खूप वाईट वाटला खर तर मी स्वामी दादा नंतर चा एकही picture  नाही पहिला देव आनंद चा , पण तरी मी मोठा fan आहे (कदाचित म्हणून असेल ). आता खर तर मी देव आनंद ची जुनीच  गाणी ऐकणार ,  बघणार,  नवीन सिनेमा पहायची हिम्मत मी तरी करू शकणार नाही, कधी भेटलो नाही,  भेटलोही नसतो तरी वाईट वाटलं.

माझी देवानंद शी  ओळख खूप लहान पणी  झाली , म्हणजे प्रतेक्षात नाही. प्रेक्षक म्हणून, त्याचा कारण म्हणजे माझ्या वडलांना देव आनंद म्हाण्याचे. दिसायचे खरे ते, अजून दिसतात आणि मुख्य म्हणजे जीवन जगण्याची पद्धत , खूप आनंद घेत. लोक अश्या लोकांना वेडं म्हणतात पण वेडी माणसं खूप खुश असतात.

देव आनंद शी मैत्री करण्याचाआणखी एक कारण, रफी आणि किशोर , काय ती गाणी अजून ही ऐकत राहावाशी अशी. मला खूप भावला म्हणजे हम दोनो,  अनेक  वेळा बघितला आहे मी , पण उमगला नंतर, हेरोईने केंद्रित picture खरा तर त्याचे picture असेच असायचे . साधना चा त्याग बघा, खूप आरडा ओरडा  नाही, सगळा अगदी subtle . म्हणजे खूप आदर्श अशी बाई, कितीछान वाटतं, हल्ली हे T V वाले म्हणजे बाईकांना हडळ नाहीतर चेटकीण दाखवतात , अस नसतं न हो ? तेरे घर के सामने मधली नूतन बघा (black  and  white  मध्ये पण खूप सुंदर दिसते ), किती निर्मळ प्रेम , love  story असून मिठी सुधा मारत नाहीत ते अख्या picture  मध्ये .  "दिल का  भावार करे पुकार " मध्ये एक हि वाक्य नाही नूतन ला, सोन केलन गाण्याचा तीघाने,  sorry  पाच जणांनी (गोल्डी आणि बर्मन दाला विसरून चालणार नाही ). Jewel Thief मधला सुस्पेन्से, त्यातली  पण heroine ची होणारी ओढाताण .जॉनी मेरा नाम, मधली गाणी कथा . राज कपूर आणि देव मधला एक मुख्य फरक म्हणजे देव चे सगळे चित्रपट स्त्री प्रधान , राज कपूर ने फक्त स्त्री ला दाखवलं. 

त्या काळी तलत ला घेऊन गाणी करण्याची हौस पण त्याने भागून घेतली दिलीप कुमार ने केला (अये मेरे दिल काही और चल) मग  देव ने " जाये तो जाये कहा " केलं , पण खर यश लाभलं ते रफी मुले आणि बर्मन दा  मुळे. आणि नंतर जयदेव आणि पंचम आणि किशोर कुमार . मला अस वाटत कि जो पर्यंत goldie direct करायचा न तो पर्यंत खूपछान काम झालं, गाईड तर भांडून घेतला विजय आनंद ने, नसतं घेतला तर आपण गाईड सारख्या सिनेमा ला मुकलो असतो . cycle वर चा romance " ए मैने कसम ली " मध्ये personify  केलं, ते बघून आपल्या चेहऱ्या वर एक स्मित नक्कीच येत . त्याच्या प्रत्येक सिनेमाचा मी ब्लॉग लिहू शकेन मला उमगलेला सिनेमा म्हणून.  

त्याचे सिनेमे  कुणी हिट केले? तर मी म्हणेन जितका हात  वरसांगितलेल्या लोकांचा होता तितकाच तो देव चा होता , chocolate  hero ची संकल्पना त्यानेच आणली वेडा वाकडा चालायचा, तोंड्यात्ला तोंडात बोलायचा, पण तरी मला आवडायचा . आयुष्य जगला त्याच्या परीने , त्याने सिनेमे काढले तुम्हाला नाही आवडले हा तुमचा प्रोब्लेम आहे त्याचा नाही. आयुष्य जगावं तर अस पूर्ण पणे.

आता काय वरती शम्मी कपूर, देव आनंद, रफी, किशोर, बर्मन दा, पंचम सगळेच जमलेत स्वर्गीय संगीत नक्कीच मिळणार .

Rest  in peace  देव साब .

शनिवार, ३ डिसेंबर, २०११