विजया बाई गेल्या, पाठोपाठ नाना ला बोलावून घेतलं. बाईंना मी लांबून बघितलं होतं , NCPA ला एकदा २६ जानेवारीला पु लं झेंडा वंदन करायला येणार हे कुणी तरी सांगितलं होतं म्हणून मी बोरिवली हून निघून सकाळी ६:३० ला हजर झालो , नाही जमलं त्यांना म्हणून बाईंनी केलं होतं झेंडा वंदन, आम्ही थोडं रुसलो होतो पण त्या निमित्ताने बाई दिसल्या , पु लं ना भेटायचं राहिलं आणि ती सल मला आयुष्य भर राहील .
मला दोन चार लोकांना फार भेटायचं आहे, होतं , एक तर माझं दैवत पु लं , दुसरा नाना आणि एकदोन आहेत भेटलो तर नक्की लिहीन नाहीतर ते गेल्यावर लिहीनच पण नाना ला खूप भेटायचं होतं मला , ते हि राहिलं म्हणजे असं ठरवून वगैरे नाही अनौपचारिक भेटायचं होतं . असा हि तो औपचारिक वगैरे न्हवताच. पण माझ्या नशिबाने मी नाना ला प्रत्येक्ष असं स्टेज वर "पुरुष" मध्ये पाहिलं आहे , चंद्रकांत गोखले होते. इतकं जबरदस्त होतं सगळं, मी इंटर्वल ला बाथरूम ला पण नाही उठलो, चहा तर दुर. काय स्टेज प्रेझेन्स काय वावर काय आवाज काय अभिनय ... लिहिताना काटा आला ... तरी आधी तो सांगायचा कि बाबा (चंद्रकांत गोखले)ह्या वयात काम करतात तर माझ्या एंट्री ला टाळ्या शिट्या असतात (कारण परिंदा हिट झाला होता) तर तसं नका करू. तरी कुणी तरी ओरडलाच. लाईट लाव रे म्हणाला ... आणि जो हग्या दम दिला स्टेज वरून ... खाली येऊन थोबाड फोडेन म्हणाला... पिन ड्रॉप सायलेन्स ... एका मिनटात परत व्हिलन च्या रूपात .... खूप भारावलो मी ... दहा मिनटात त्याने चार पेग नंतर माणूस कसा बदलत जाईल हे दाखऊन दिलं, त्याला भेटायला जायची डेरिंग नाही केली मी ... आम्ही साले घाबरटच आणि नाना त्याच्या exact उलटा.
त्याचा सिंहासन बघितला होता, त्यात तर मेजवानी आहे , नाना फार तर पाच मिंट आहे पण लक्षात राहतो, बाकीचे कलाकार विचाराल तर , एक से एक. (अरुण सरनाईक सारखा एक मोठा नट आपल्याला अजून थोडा काळ लाभायला हवा होता असा खूप वाटलं) लहान होतो मी तेव्हा म्हणून नंतर मोठा झाल्यावर परत बघितला. तेव्हा नाना खूपच मोठा झाला होता.
नानाचं सगळ्यात कौतुक हिंदीत पण दादागिरीनेच वागला , कधीही मिंध्या सारखी कामं नाही केलीत कि नोकराची वगैरे नाही कामं केली , राजकुमार सारख्या माणसाच्या पण नजरेला नजर भिडवून डायलॉग फेकले आणि त्याचे जास्त हिट झालेत.
मला नाना जास्त भावला ते एक माणूस म्हणून, बाबा आमटेंच्या आश्रमात जा किव्हा हेमलकसा ला जा, त्याचा मोठे पणा कळेल. सामाजिक भान आणि त्या करता काही तरी करणं हे फार महत्वाचं आहे. किती कलाकार आहेत असे सांगा मला? कलाकार संवेदनशील असतो असं आपण म्हणतो पण नाना जे काही केलंय ते खरच ग्रेट आहे आणि हे तो नाही बोलला कधी.
निर्भीड धीट प्रामाणिक असे विशेष गुण आहेत त्याच्यात, बाळा साहेबांना पण त्याने पु लं वरून बोलून दाखवलं होतं अजित पवार शरद पवार फडणवीस राज ठाकरे ह्यांच्या मध्ये अगदी सहज पणे वावरायचा स्फशठ मत मांडायचा. चायला इतका कॉन्फिडन्स येतो कुठून? शाहरुखला टपली मारायची हिम्मत त्याच्या कडेच होती. लोकं त्याची कॉपी नाही करू शकले , नक्कल करता आली पण कॉपी नाही केली. त्या अंतरा ,मळीचा एक पिक्चर आला होता "में माधुरी दीक्षित बनना चाहती हू" नावाचा (बरा होता) तसं आपण मला नाना व्हायचंय असं करायला हवंय हल्ली सगळेच गळ चेपी करतात आपण नुसतं घाबरून इथे पळा तिथे पळा, डोळ्यात डोळे घालायची हिम्मत नाहीच कुणात. तो सच्चा होता म्हणून लोकं त्याला टरकायचे आणि आदर करायचे.
असो अशी माणसं हवी आहेत सध्या, चुकीचे लोकं हिरो करतो आपण.