देव आनंद :
आमच्या बिल्डिंग मध्ये एक बाई होती, कुणी मेला बिल कि लगेच येऊन सांगायची एरवी बघत ही नसे पण काय सुप्त आनंद मिळायचा कुणास ठाऊक तिला? तिची नणंद म्हण्याची "आमच्या वाहिनीला सुतकी विभागात नोकरी मिळेल".
आज सकाळी jogging करून आलो तेव्हा आमच्या समोरच्या aunty (अजून मी कुणाला तरी aunty म्हणू शकतो ) दार उघडून मला म्हणाल्या , सागर समझा क्या? मी काय? असा म्हणालो "देव आनंद गुजर गया"......मला खूप वाईट वाटला खर तर मी स्वामी दादा नंतर चा एकही picture नाही पहिला देव आनंद चा , पण तरी मी मोठा fan आहे (कदाचित म्हणून असेल ). आता खर तर मी देव आनंद ची जुनीच गाणी ऐकणार , बघणार, नवीन सिनेमा पहायची हिम्मत मी तरी करू शकणार नाही, कधी भेटलो नाही, भेटलोही नसतो तरी वाईट वाटलं.
माझी देवानंद शी ओळख खूप लहान पणी झाली , म्हणजे प्रतेक्षात नाही. प्रेक्षक म्हणून, त्याचा कारण म्हणजे माझ्या वडलांना देव आनंद म्हाण्याचे. दिसायचे खरे ते, अजून दिसतात आणि मुख्य म्हणजे जीवन जगण्याची पद्धत , खूप आनंद घेत. लोक अश्या लोकांना वेडं म्हणतात पण वेडी माणसं खूप खुश असतात.
देव आनंद शी मैत्री करण्याचाआणखी एक कारण, रफी आणि किशोर , काय ती गाणी अजून ही ऐकत राहावाशी अशी. मला खूप भावला म्हणजे हम दोनो, अनेक वेळा बघितला आहे मी , पण उमगला नंतर, हेरोईने केंद्रित picture खरा तर त्याचे picture असेच असायचे . साधना चा त्याग बघा, खूप आरडा ओरडा नाही, सगळा अगदी subtle . म्हणजे खूप आदर्श अशी बाई, कितीछान वाटतं, हल्ली हे T V वाले म्हणजे बाईकांना हडळ नाहीतर चेटकीण दाखवतात , अस नसतं न हो ? तेरे घर के सामने मधली नूतन बघा (black and white मध्ये पण खूप सुंदर दिसते ), किती निर्मळ प्रेम , love story असून मिठी सुधा मारत नाहीत ते अख्या picture मध्ये . "दिल का भावार करे पुकार " मध्ये एक हि वाक्य नाही नूतन ला, सोन केलन गाण्याचा तीघाने, sorry पाच जणांनी (गोल्डी आणि बर्मन दाला विसरून चालणार नाही ). Jewel Thief मधला सुस्पेन्से, त्यातली पण heroine ची होणारी ओढाताण .जॉनी मेरा नाम, मधली गाणी कथा . राज कपूर आणि देव मधला एक मुख्य फरक म्हणजे देव चे सगळे चित्रपट स्त्री प्रधान , राज कपूर ने फक्त स्त्री ला दाखवलं.
त्या काळी तलत ला घेऊन गाणी करण्याची हौस पण त्याने भागून घेतली दिलीप कुमार ने केला (अये मेरे दिल काही और चल) मग देव ने " जाये तो जाये कहा " केलं , पण खर यश लाभलं ते रफी मुले आणि बर्मन दा मुळे. आणि नंतर जयदेव आणि पंचम आणि किशोर कुमार . मला अस वाटत कि जो पर्यंत goldie direct करायचा न तो पर्यंत खूपछान काम झालं, गाईड तर भांडून घेतला विजय आनंद ने, नसतं घेतला तर आपण गाईड सारख्या सिनेमा ला मुकलो असतो . cycle वर चा romance " ए मैने कसम ली " मध्ये personify केलं, ते बघून आपल्या चेहऱ्या वर एक स्मित नक्कीच येत . त्याच्या प्रत्येक सिनेमाचा मी ब्लॉग लिहू शकेन मला उमगलेला सिनेमा म्हणून.
त्याचे सिनेमे कुणी हिट केले? तर मी म्हणेन जितका हात वरसांगितलेल्या लोकांचा होता तितकाच तो देव चा होता , chocolate hero ची संकल्पना त्यानेच आणली वेडा वाकडा चालायचा, तोंड्यात्ला तोंडात बोलायचा, पण तरी मला आवडायचा . आयुष्य जगला त्याच्या परीने , त्याने सिनेमे काढले तुम्हाला नाही आवडले हा तुमचा प्रोब्लेम आहे त्याचा नाही. आयुष्य जगावं तर अस पूर्ण पणे.
आता काय वरती शम्मी कपूर, देव आनंद, रफी, किशोर, बर्मन दा, पंचम सगळेच जमलेत स्वर्गीय संगीत नक्कीच मिळणार .
Rest in peace देव साब .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा