रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

आवडता शिक्षक


आमच्या (जिमच्या)परुळेकर सरांना मी गुरुजी म्हणतो :) मस्त माणूस आहे, व्यायामाचं ज्ञान देतोच पण त्या बरोबर आयुष्य, जीवन आणी इतर बरच काही, म्हणजे शिकायला जातोय का आणि हा माणूस मला शिकवतोय काय? मी शिकलो अश्या बऱ्याच लोकांन  कडून आणि अजूनशिकतोय.  त्या दिवशी जिम मधून बाहेर पडताना माझा मनात आलं कि ह्या सगळ्यांनी ज्यांनी मला शिकवल त्यात माझा सगळ्यात आवडता शिक्षक कोण ?

 .....हाच प्रश्न तुम्हाला कुणी विचारला तर? तर साधारण पणे शाळेतले किव्हा कॉलेजातले सर किव्हा बाई असं म्हणाल , फार तर शिकवणीचे एखादे मास्तर,  एखाद अगदीच गुणी मुल, "माझे पहिले वाहिले शिक्षक माझे बाबा व माझी आई!" असं हि म्हणेल (म्हणूं दे हो माझा काही विरोध नाही),  माझी बायको अस म्हणणारा प्रामाणिक वर्ग ही असेल.  

पण माझं काय? मला  शाळेतल्या किव्हा कॉलेजातल्या शिक्षकांनी काय शिकवलं? अभ्यास?  पण मला अभ्यास कधीच आवडला नाही.   मी शाळेतल्या,  कॉलेजातल्या वर्गात काहीच शिकलो नाही (नाही म्हणायला लिहायला वाचायला शिकलो हे काय कमी नाही). साक्षर झालो शिक्षित नाही, पण असा आवडता शिक्षक? सांगण फार कठीण. माझ्या  अनाहूत पणे मी शिकत गेलो, बसवून कुणी शिक, असं म्हंटल तर मी तसा शिकणाऱ्यान पैकी नाहीये, त्या मुळे नकळत खूप शिकता आल.

.

आमच्या चीनाय कॉलेजच्या  बाहेर पानाच्या  गादीवर तिवारी बसायचा, एकदा इकॉनॉमिक्स वर चरचा चालू असताना हा सटासट मार्क्स वगैरे बोलून गेला,  पाना ऐवजी पाय दे म्हणालो. त्याला विचारल रे बाबा तुला एवढं कस माहित, मला आत बसून येत नाही तुला पानाच्या गादीवर बसून कस येत? तो म्हणाला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी चा MA आहे मी Economics मध्ये केल. माझा तो पण एक शिक्षक होता आणी खूप चांगला. MA करून क्या मिळाल त्याला काय ठाऊक? शेवटी विड्याच विकायचा.  पण ते एकॉनमिकस त्याला धंद्यात किती कामाला येतंय ते ठाऊक नाही, त्याच्या ह्या ज्ञाना  मुळे कायम मुलांच्या (आणी त्याच्या गिराहीकाच्या ) घोळक्यात असायचा. 

लहान पणी आम्ही साठ्यांच्या कयऱ्या तोडायचो म्हणजे कयऱ्या होत्या अंब्याच्याच पण त्या साठ्यांच्या  वाडीत होत्या, आम्ही त्या वाडीच्या बाजूच्या बिल्डिंग मधून तोडायचो दगड मारून, मग ते साठे आमच्या मागे धावायचे, आम्ही धूम ठोकायचो, वास्तविक कयऱ्यान मध्ये न आम्हाला रस होता ना त्यांना, सगळी मजा दगड मारून पळण्यात होती, त्यांना आमचं घर ठाऊक होत म्हणजे ते कधीही घरी येऊ शकले असते, पण त्यांनी तस केल नाही कधीच, (दत्तपाड्यात साठ्यांच्या कैऱ्या न तोडलेला माणूस तुम्हाला मिळण अशक्य. म्हणजे त्या काळी आता तिथे इमारत आहे मोठी).   पण त्यातून खूप शिकायला मिळाल मला तेव्हा  मझ्या एका मित्रा कडून, तो आत उडी मारून आणायचा  कैरी, पण साठे कधी पाठी पळतील आणि कधी नुसती हूल देतील ते त्याला कळायचं तो गुण मला अजून उपयोगी पडतो कोण नुसती हूल देतोय आणी कोण कधी अंगावर येतोय हे कळायला सोप जात. चुकतो अंदाज कधी कधी, पण बहुतेक बरोबर असतो. तो मुलगा चाळीत राहणारा त्याला सवय असेल अस करायची आणी पळायची, त्याने बरच उद्योग केले असतील पण माझा तेव्हा तो आवडता शिक्षक होता, काय पण विनोद आहे बघा :).

तसा मी एकदा वर्गात पण शिकलोय . Baan मध्ये असताना "Presentation skills" अश्या एका कोर्स साठी मला पाठवल होत, ३ दिवस residential होता कोर्स , तिथे मला अरविंद नाडकर्णी नावाच एक संथान भेटलं , त्यांनी ३ दिवस आम्हाला कस presentation द्यायचं ?हेच नुसतं शिकवल नाही तर एकूण आयुष्या कडे कस पहावं ?माणूस कसा ओळखावा ? तुम्ही जीवन कस जगावं? हे शिकवलं . म्हणजे त्यांनी फक्त PPT कशी चांगली बनवायची हेच खर तर सांगितलं , पण त्यात कस उभं राहायचं ?तुमचा प्रेक्षक कसा ओळखायचा? content काय हव? शब्दानं पेक्षा हाव भाव , आवाज , उच्चार हेच कसे जासत महत्वाचे ते सांगितलं . जगात चांगल किव्हा वाईट काहीच नसत फक्त परिणाम असतात . There is nothing good or bad, only consequences. हे मी शिकलो, लोक तुम्ही बोलताना मुद्दाम तुम्हाला त्रास देतील, पण आपण आपला focus कायम ठेवायचा, नन्हाचा पाढा गिरवायचा नाही.........  अजून सगळ वळत नाहीये, पण खूपदा त्यांची शिकवण कामाला येते . त्या ३ दिवसात मीच सगळ्यात जास्त शिकलो , PPT फक्त एक १०% होत ९०% बाकी सगळ , नाही म्हणायला मी पहिला आलो सगळ्यान  मध्ये  कारण बहुदा ते  नकळत शिकवत गेले तेच शिकत गेलो आणि PPT आपोआप येत गेली . शेवटी त्यांनी जे शिकवलं ते आयुषयात जास्त उपयोगी आहे,  लोक ओळखणं , कुणाला काय आवडत ते देण , हाव भाव, हालचाली, positive  राहणं आणि अस बरच काही , साधा, सरळ आणि सोप 

गुरगावला असताना मला Financeच बाळकडू एका सायकल वर विड्या काड्या विकणाऱ्या माणसाने दिल होत. मी जीथे Finance च  ट्रेनिंग दयायला गेलो होतो तिथे, सायकल घेऊन उभा असायचा. त्याला विचारल मी कि किती  धंदा करतोस? 100 - 200 चा माल विकतोस का? किती वेळ काम करतोस ? मला म्हणाला "साहब  रोज का 500 का मुनाफा हो इतना भेचता हूं सायकल है आप का लंच टाइम हो जायेगा उसके बाद ओह कॉल सेंटर वाले है फिर ओह शाम को ओह फॅक्टरी चुटती है  फिर रात मे  कॉल सेंटर. अगर जल्दी हो गया तो शाम मे घर नही तो रात को मॉल के बाहर". हे उलट calculation मला शिकायला कित्येक वर्ष गेली आणी हा माणूस ज्याला साधा sms पण वाचता येत न्हवता त्याला..  हे उपजात होत? का तो धंदा करता करता शिकला? हे तुम्हाला कुणीच कधीच शिकवत नाही, हे तुम्हीच स्वतः शिकता.

ही अशी अनेक माणस मला भेटली ज्यांच्या कडून मी शिकत गेलो,  काय शिकवायचं होत त्यांना आणि मी काय शिकलो. तुम्ही  पण आठवून बघा असे बरेच शिक्षक तुम्हाला आठवतील . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: