सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

माणुसकी

दिनेश  गोहिल साहेब हे एक श्वान प्रेमी आहेत, आधी ते (पण) गावठी कुत्र्यांना घाबरायचे, त्यांच्या गल्लीत खूप होती, रात्री अंगावर वगैरे यायचे एकदम. मग वेग वेगळे विचार आले त्यांना संपवण्याचे. अचानक त्यांना वाटलं कि आपण root cause काय आहे हे पाहतच नाही, मग कोणत्या तरी  NGO ला पकडून सगळ्या कुत्र्यांचं operation करून, त्यांची संख्या कमी केली. आता त्यांच्याच घरात एका खोलीत सगळी कुत्री रात्री  झोपतात आणि हेच त्यांचा खाण पिणं आजारपण सगळ  बघतात. मी म्हंटल ग्रेट आहात सर. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट  सांगितली 

तर हे राहतात मीरा रोड ला , आता खूप पसरलय आणि गाड्यांची वर्दळही वाढलीये .  पण कैक वर्षान पूर्वी विरार ला दर पंधरा ते वीस मिनिटाला एक गाडी होती , तेव्हा रात्री स्टेशन वर वर्दळ पण कमी असायची. एकदा ते दहिसर ला गाडी साठी थांबले होते, साधारण दहा साडे दहा झाले असतील, पावसाळा होता, सगळे प्राणी माणस  गुडूप आडोश्याला बसली होती. तिथे एक म्हातारी आणि म्हातारा होते तिथेच राहत असतील, म्हातारीने एक पिशवी काढली त्यात काही जेवण वगैरे होत, तिने एक थाळी काढली आणि एक हाक दिली, तस एक कुत्र  आल पिशवीतलं थोडं त्याला  दिल  , त्याने खाल्यावर तेच ताट पावसाच्या खाली धून म्हाताऱ्याला दिल , मग तेच स्वछ करून आपण त्यात खाल्लं . तिथेच एक चादर ओढली आणि निजली ते कुत्र पण तिथेच वळकोटी करून झोपलं .

म्हणजे खायची  भ्रांत डोक्यावर छप्पर नाही, तरी माया केवढी आणि ती पण एका भटक्या कुत्र्यावर?   ते म्हणाले  मी अवाक होऊन बघत राहिलो.  त्यातूनच प्रेरणा घेतली असेल म्हणाले. 

पण गोहिल साहेब ग्रेट आहेत .... त्यांची स्टोरी पुन्हा कधीतरी          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: