मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

इतिहास

कैक वर्षा पूर्वी मी लंडन मध्ये फिरत असताना ट्रॅफलगर स्क्वेअर ला कुठे तरी एका बाप्याचा पुतळा पहिला (छान मेंटेन केला होता), त्या खाली सर अमुक अमुक वीर योध्याला १८५७ साली भारता मध्ये अमुक तमुक लोकांशी लढताना हौतात्म्य प्राप्त झालं ... असं काहीसं लिहिलं होतं (शब्द थोडे वेगळे असतील, पण तत्सम अर्थाचं काहीतरी). मी विचार केला कि हा कोण बाप्या आहे त्याला मारलेल्या माणसाचा आणि मग त्याला इंग्रजाने फाशी दिलेल्या वीर अश्या हुतात्म्याचा (होपफुली बऱ्या अवस्थेतल्या) पुतळ्या खाली नेमकं हेच लिहिलं असणारे . 

म्हणजे बघा हा! तीच घटना पण इतिहास वेगळा, किव्हा वेगळ्या नजरेतून पाहिलेला. जर्मनी आणि बाकी सगळ्या युरोपचा इतिहास वेग वेगळा आहे पण युद्ध तेच होतं . आपण इतिहास बदलत नाही दृष्टिकोण बदलतो आणि मग एक माणूस एके ठिकाणी शूर तर एके ठिकाणी क्रूर होतो. आपण आपल्या बाजूने बघतो इतिहास , तुमचा खोटा इतिहास माझा खरा असं म्हणतो, खरं तर ज्या तऱ्हेनं सांगितलं जातं इतिहास तसाच घडत जातो, बदलतहि जातो. त्याला रंगवता येतो, वर्तमान रंगवता येत नाही, इतिहास आणि भविष्य विकता येतं वर्तमानात जगावं लागतं आणि हे थोडं कठीण असतं. फार चर्चा करायला इतिहास बरा पडतो म्हणून लोकं चगळत बसतात.  

इतिहासात डोकवायचं असतं फक्त मुक्काम नसतो करायचा. 

The farther backward you can look, the farther forward you are likely to see असंहि चर्चिल म्हणून गेलाय, पण बघा जाऊन बसू नका  

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

दशावतार

OTT  वर रविवारी दशावतार पहिला,  बरं झालं .... 

बरं झालं कि मी सिनेमा हॉल मध्ये जाऊन नाही पहिला ते.  हा पिक्चर इतका का चालला तेच कळत नाही , अप्रतिम कलाकार  पण बाकी? कांतारा सारखं काही तरी करायचं , कशाला? एक तर सुरवातीलाच टायटल च्या आधी त्या डायरेक्टर चा शाहरुख च्या पोस मधला फोटो आणि त्याच्या बद्दल चे गौरव उदगार पाहून मला थोडा अंदाज आला होता पण कलाकारांसाठी मी रेटला ... नाही हो नाही. अजून काही लिहिवत पण नाही.  काहीच पटत नाही असा सिनेमा. सगळंच एकाच पिक्चर मध्ये दाखवायचं आहे ...  प्रभावळकर , मांजरेकर , जाधव , तावडे , झालंच तर केंकरे,  उत्तम नट पण हे काय करून ठेवलं कोण जाणे?

तुम्हाला जर खरंच दशावतारावर एक  उत्तम सिनेमा पाहायचा असेल तर जाऊन पिकासो बघा , प्रसाद ओक नि सुंदर काम केलंय आणि सगळ्याच कलाकारांनी , स्त्री पार्टी तर अप्रतिम आहे. कोकण, त्याचं सौंदर्य , कलाकारांच्या खऱ्या व्यथा , इतक्या छान दाखवल्यात कि आपण खरंच त्यात जातो. कुठे हि भडक किव्हा भम्पक नाही, शो शा नाही, सगळं वास्तव, म्हणजे कले साठी लोकं काय करतात ते उत्तम दाखवलं आहे. गाणी नाही उगाच रोमान्स नाही खोटे खोटे व्हिलन तर नाहीच नाही. नक्की बघा आणि मला कळवा. 

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

"आपणांस" वाढ दिवसाच्या शुभेच्छा" !!!

अरे हि कोण माणसं आहेत? आणि हि काय विकृती आहे ? सकाळ धावायला बाहेर पडलो कि मोठे पोस्टर्स आधी दिसतात, ज्यात  एक गाव गुंड असतो आणि खाली अनेक लोम्बते ते आणिक भयानक दिसतात आणि मजकूर तोच  "आपणांस" वाढ दिवसाच्या शुभेच्छा , प्रेरणा स्थान वगैरे पण असतं कधीतरी ... अरे तो "आपणांस"  पोस्टर च्या बाहेर दिसला तर ओळखू पण नाही यायचा, हल्ली जास वाढलंय , आम्ही वाढत असताना असं काही दिसत न्हवतं आणि हल्ली दिखावा पण वाढलाय म्हणा ...

 हाच गाव गूंड आम्हाला आमच्या गणपतीला दिवाळी आमचं स्वागत आमच्याच गल्लीत करतो . (सगळे काय गाव गूंड नसतील म्हणा, पण कोणाला  आपला आपला फोटो चव्हाट्यावर मांडलेला आवडेल)? लहान पणी आम्ही असं पुस्तकातल्या बायकांना , म्हणजे त्यांच्या फोटो ला मिशी आणि दाढी काढायचो आणि पुरुषाला टिकली, लिपस्टिक आणि लांब केस काढायचो, आता पोस्टर्स जरा उंच असतात... 

सकाळी कसं लहान मुलं शाळेत जाताना दिसावीत पक्षी दिसावेत, दुरून एखादी देवळातली घण्टा कानावर  पडावी प्राजक्ताच्या फुलांचा सडा दिसावा, तो डोळ्याला आणि नाकाला पण सुखद असतो  ... तर हे "आपणांस"  गल्लो गल्ली,  नाक्या नाक्या वर ... आणि मुळात "आपणांस"   असा काही शब्द आहे का हो?

आणि एक गम्मत म्हणजे मध्यम वर्ग हा कायम श्रीमंतांना किव्हा गरिबांना कॉपी करत असतो ... हल्ली त्या whatsapp च्या स्टेटस वर Happy birthday Sister brother mother father son daughter Wife , आता  wife ठीके म्हणा, चार चौघात बायकोचा वाढदिवस लक्षात आहे हे सांगणं ह्यात शहाणपणा असतो आणि काही जणांना तो करावा लागतो . .. पण शेजारी असलेल्या आई बाबा भाऊ मुलगा मुलगी ह्यांना जागतिक पातळी वर Happy Birthday ? हे का कश्या साठी?अजून न सुटलेलं कोडं आहे , हे म्हणजे आतले कपडे बाहेर बाल्कनीत वाळत घालण्या सारखं आहे, कसं दिसतं ते ? सगळेच घालतात (आतले कपडे) पण म्हणून मिरवायचं कशाला? नाही का ? ? 

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

वारी

 वारी ---

जून २०२५

माझ्या बकेट लिस्ट मध्ये अनेक वर्ष वारी होती , आमचे भाऊ करायचे वारी, अनेक वर्ष केली त्यांनी , मी लहान होतो तेव्हा, भाऊ काही तरी करतात हे ठाऊक होतं,  माझ्या आत्याने एकदा सांगितलं होतं मला , कि आळंदी ते पंढरपूर चालत जातात म्हणून, आत्याने केली का मला आठवत नाही (केलं असेल १००%), पण नवऱ्याने केली ह्यात ती खुश होती. 

मग थोडं कळायला लागलं, ज्ञानेश्वर माउली हे खूप मोठं काही तरी आहे हे कळायला लागलं , थोडी (फार) ज्ञानेश्वरी वाचली गेली (अजून कळली नाहीये ). पण मग हळू हळू जाणवायला लागलं कि आपण इथे राहून एकदाही वारी बघितली पण  नाहीये. 

कट टू २०२५- अतुलचा फोन आला (अगदी जिवश्श कंटशश तरी चार महिन्याने एकदा बोलतो आम्ही ), चल वारी ला जाऊ , मी म्हंटल चल ... as simple as that . आमचा एक शुक्रवार ठरवला ,  वारीचा "path" पहिला आणि एक अर्धा दिवस जाऊन येऊ म्हटलं. लोणाद  ला जाऊ असं ठरलं आणि तिथून तरडगाव ते फलटण असा रूट करायचं ठरलं .  म्हणजे मुंबई ते लोणाद  ड्राईव्ह मग तिथे रात्री राहून, तरडगाव मध्ये  ६/७ किलोमीटर वारीत चालून  परत मुंबई. 

आम्हाला काहीहि माहित न्हवतं,  गुगल मॅप लावून लोणाद ला पोचलो, नशिबाने एका लॉज मध्ये रूम मिळाली आणि त्या मॅनेजर ला विचारपूस करून त्याच्या साहेबा कडून माहिती काढली . साहेब म्हणाले सडे तीन ला वगैरे निघा आणि गाडी अलीकडे लावा,  सहा ला पालखी निघते ... हे एवढंच. सकाळी बरोबरसाडे  तीन ला गाडी घेऊन निघालो-  तर पोलीस म्हणाले रस्ता बंद आहे साहेब ... आली का पंचाईत , किती किलोमीटर आहे? ७ म्हणाले पोलीस वाले.  म्हंटल ७ मग पुढे अजून ७ आणि परत ७ आणि ७ आणि २०० किलोमीटर ड्राइव्ह ... अश्या चिंतेत असतानाच,  एक मायाळू पोलीस वाला मला म्हणाला,  "इथून पाठी जावा आणि st स्टॅन्ड वरून लेफ्ट मारा गावातून आहे रस्ता पण तरडपूरला जातोय". लगेच गाडी फिरवून आम्ही निघालो. 

गुगल बाई आम्हाला एका अंधाऱ्या रस्त्यावर घेऊन गेली आणि मध्येच थांबून...  you have arrived म्हणाली , पाऊणे चारला खेडे गावात (आता खेडं नाहीच राहीलं  म्हणा ) कोण कशाला बाहेर पडेल? त्यात बारीक पाऊस पडून गेला होता . तिथे खाकी कपड्यात एक माउली जणू आमचीच वाट पाहत उभी होती .. तोच प्रश्न ..तरडपुर? "समोर जा फाटक  लागेल मग गावा गावातून जा " .." माउली, सोडू का कुठे?"  "नाही हो, मी पुण्याला जायलो , येष्टी असती ५ ची, त्या करता थांबलोय " .. थँक यु "... पुढे फाटक लागलं, बंद होतं,  त्या माणसाने आम्हाला  खूप जास्त confusing रस्ता सांगितलं , पण नशिबाने पाठी मागून एक गाडी आली आणि त्या माणसाला तोच रस्ता लगेच कळला , हिथून  जायलोय  काय? चालतंय कि , असं काही तरी बोलून ती गाडी निघाली , तिच्या मागे आम्ही आणि एक दहा मिनटात असंख्य दिंड्या  दिसायला लागल्या , असंख्य माणसं नुसती चालत होती , हातात एक तारा , झाँजा , झेंडे अगदी शांत पणे निघाले होते सगळे , पहाटे साडे चार - पाऊणे पाच वगैरे झाले असतील पाऊस रात्री पडून गेला होता आणि एक एनर्जी होती, vibrations होते ... वाटेत आम्ही दोघांना विचारलं माउली कुठे सोडू का? त्या माउली  आम्हाला पालखी पर्यंत घेऊन गेल्या.  बीड जिल्हा, वर्षातून एकदा हे करतो म्हणाले , दिंडी क्रमांक २८ का काही सा  होता , पाठी सोय होती राहायची म्हणाले , आता नोंद करून चालत जाणार ... 

अगदी पहिलीच वेळ असल्या मुळे काहीहि  कळत न्हवतं . पण एक सांगायचं म्हणजे सगळ्या दिंडी registered असतात हजारो आहेत एका दिंडीत ३०० -४०० लोकं , त्यांना सकाळी किती माणसं आहेत आणि संध्याकाळी किती? ह्याची नोंद द्यावी लागते. 

आम्ही मग जिथून पालखी निघते तिथे थांबलो, तासाभराने निघाली पालखी आम्ही तिच्या पाठी आणि आमच्या पाठी - पुढे जन समुदाय ---- अलोट गर्दी म्हणालो असतो पण हि गर्दी न्हवतीच मुळी ... लाख काय जास्तच लोकं असतील,  शांत पणे एका मागे एक "ग्यानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम" करत निघाले होते, आरडा ओरडा नाही धक्का बुक्की नाही मोठं music नाही , सगळं लयबद्ध ... भारवल्यागत आम्ही चार एक किलोमीटर गेलो ... आणि मग सूर्य सुद्धा दर्शनाला हळू हळू झिंक चक झिका , झिंक चक झिका , झिंक चक झिका करत वर आला ... मी खरं तर देव भोळा वगैरे नाहीये अगदीच नास्तिक नसलो तरी फार आस्तिक नाहीये, पण तो एक aura होता ना तो खूप सॉलीड होता , माझ्या ५० वर्षाच्या अस्थिथवात फार कमी क्षण त्या क्षणा सारखे असतील....  ते तुम्ही तुमचे अनुभवायचे असतात मी काय वर्णन करणारे ?

पाच सहा किलोमीटर चालून आम्ही परतीला लागलो , वाटेत अप्रतिम अशी पिठलं भाकरी विकणारे एक छोटे कुटुंब भेटले , सकाळी ३ ला उठलेलो भूक लागली होतीच, दोन चार भाकऱ्या दोन चार प्लेट पिठलं खाऊन पण तो माणूस बाचकत आम्हाला ८० झाले म्हणाला ... मी थोडे जास्तच दिले , माऊलीची कृपा आहे म्हंटला ... लोभ नाही काही नाही अरे कोण  आहेत हि सगळी माणसं , त्या दिवशी मलाच का भेटली ? एस्टी स्टॅन्ड वर कुणी भेटले , त्या पालखी जवळ दोन एक पोलीस वाले पण आम्हाला सांगून गेले, इथे थांबा , दर्शन होईल , पुढे गर्दी असेल, हे सांगून गेले. 

परतीचा २०० किलोमीटर चा प्रवास शांततेत गेला ... आम्ही मारे world economics आणि AI आणि कसं जग बदललं वैगरे गप्पा मारतो ... त्याची ना पर्वा ना फिकर करून लोकं अनेक वर्ष २०-२५ दिवस कसली हि अपेक्षा न करता चालतात मदत करतात कुणाला हि माउली म्हणून नमस्कार करतात, हसतात भजन गात जातात ना गोंगाट ना DJ नुसती श्रद्धा ... ह्यातून लौकिक - मौलिक दृष्ट्या  मिळतं तरी काय? ... आम्हाला तरी काय मिळालं? हा अनुभव?  छोटी छोटी बातो कि है यादी बडी सारखं काही तरी. कुणीही न बोलावता कुठले हि बॅनर्स न लागता १००० वर्ष लोटली तरी माणसं येतच जातात .. वाढतच जातील .  वारी हि एक केस स्टडी आहे आपण किमान एक वाक्य तरी वाचून आलो हेच काय ते मनाला समाधान. 

एकदा तरी वारी करा अगदी मना पासून करा .... 

माउली माउली ...!!!


सागर कुलकर्णी 









पुणे ते फलटण हा रस्ता अगदी सुंदर आहे , म्हणजे आम्ही घोडबंदर वाल्या लोकांना तर अश्चर्यचा सुखद धक्का ... त्या कॉन्ट्रॅक्टर ला इथे बोलवायला हवंय ... माउली त्यांना सद्बुद्धी देवो. 

घाडगे बाबा कायम वारीच्या पाठीच का गेले ते हि कळलं , स्वछ्तेचा जरा अभाव आहे , पण ती चूक प्रशासनाची  आहे ... नुसतं हेलिकॉप्टर नि जाऊन पूजा करून काय होणारे? पायी जाऊन बघायला हवंय एकदा... असो . 








बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

उन्हाळ्याची सुट्टी

हल्ली दहावीची परीक्षा एक दीड महिना असते म्हणे... बापरे!!! आमची आठ दिवसात संपली होती, त्यात मराठी आणि geography एकाच दिवशी होता पेपर. 

पण आता ह्या बिचाऱ्या मुलांना लगेच IIT च्या क्लास ला बसावं लागेल ना? मग मुलं उंडारणार कुठे आणि कधी? माझ्या लहान पणीच्या सगळ्या रम्य आठवणी , मैदानातल्या , वाळूतल्या, खेळताना , मित्राच्या खांद्या वर हात टाकून गाव फिरतानाच्या आहेत.  सुट्टीत कित्तेक दिवस आम्ही काहीच करायचो नाही , काहीच म्हणजे काहीच नाही , आता सारखं काही तरी activity करायला लावतो आपण , पण काहीच न करण्यातच खूप काही होतं. bonding होतं आमचं. मी कित्येकदा इतका दमायचो कि रात्री जेवतानाच डुलकी लागायची. दोन महिने सुट्टी म्हणजे सुट्टी होती, नुसती धमाल मस्ती. आता परीक्षाच दीड महिना मग क्लास. आता तर रिस्ल्ट च्या आधीच शाळा सुरु होते म्हणे त्या ICSE वाल्यांची , काय तरी अजब आणि मग पुन्हा सुट्टी. किती confusion. 

प्रत्येक generation वेगळी मजा असते आणि वेगळं challenge असतं.  

मज्जा करा रे पोरांनो अभ्यास आणि शिक्षण आयुष्य भर आहेच पण सुट्टीत काहीही न करायचं फक्त हेच वय आहे. 

सोमवार, २० जानेवारी, २०२५

just do it

Just do It


आज मी दोन वर्षांनी पुन्हा एकदा मॅरेथॉन मध्ये थोडा धावलो ... थोडा म्हणजे धावलो start to finish, पण ते दहाच किलोमीटर आणि हि शर्यत नसतेच मुळी आपण आपापलं धावायचं असतं. 

मी खूप वर्ष धावतोय, आधी २१ किलोमीटर आणि आता १०.   लिहायचं विशेष कारण म्हणजे मी आज धावलो ते फार जास्त प्रॅक्टिस न करता , एरवी मी एक दोनदा तरी धावायचो महिन्यात ह्या खेपेस वर्ष भर फक्त चाललो आणि डायरेक्ट मॅरेथॉन ला धावलो. नियमित चालत सुद्धा न्हवतो खरं तर. नाव देताना सवयी प्रमाणे फॉर्म भरला.  जस जसा धावायचा दिवस जवळ येत गेला तस तसा थोडा विचार करायला लागलो self doubt , कि जमेल का धावायला, एकदम पडलो तर? इजा झाली तर असे सगळे निगेटिव्ह विचार .  पण म्हंटल बघूया  तरी जाऊन आपल्याला कुठे पहिलं यायचंय? अगदीच जड गेलं धावायला तर चालत शर्यत संपवूया कारण चालायला काय प्रॉब्लेम?

तयारी करू म्हणुन गेल्या महिन्यात नवीन शूज आणले nike चे , पण ते मला फार जमले नाहीत (जुन्या शूज मध्येच धावलोय )पण तरी शूज चा मोठा फायदा झाला , तो म्हणजे त्या बॅग चा.... पर्वा काही साफ करताना मला ती बॅग दिसली , त्या वर लिहिलं होतं "just do it" ... म्हणजे करून टाक ना किव्हा असच करून टाक... करचं  किव्हा करूनच टाक असं न घेता मी करून तर बघू,  म्हणून धावलो . विशेष म्हणजे नेहमी धावतो त्याच वेळेत धावलो कहीही त्रास न होता. 

आपण कधी कधी ओझं घेतो एखादं  काम करायचं त्या पेक्षा  just do it करायला हवं .   मी खूप वर्ष झाले धावताना nike  वापरतो , कारण मला सूट होतात बाकी काही नाही , पण मला त्या बोध वाक्याचा अर्थ पर्वा उमगला ... 


गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

बिस्किटाचा चुरा

तुम्ही कधी बिस्किटाचा चुरा विकत घेऊन खाल्लाय का?

एकदा असाच माझ्या लहानपणी, मी आमच्या राजेंद्र स्टोर मध्ये काही बिस्कीट का ब्रेड का टोस्ट काहीतरी आणायला गेलो होतो , तेव्हा माझ्या ओळखीचा एक मुलगा पण आला होता तिथे बन्सी चाळीतला, त्याने १० पैशाचा चुरा मागितला, माझ्या करता ते फार नवल आणि नॉवेल होतं, कारण मी कायम बिस्कीट किव्हा टोस्ट विकत घेतले होते. तो मित्र म्हणाला मस्त रेहताय खाया क्या कभी? तू भी ले? चुरा हा काय प्रकार आहे मला कळलं नाही कारण त्या पोराने पुडीत बांधून घेतलं. माझं प्रश्नार्थक चेहरा बघून तो स्टोर वाला म्हणाला तू सोड ते, त्या पोराला पिटाळलं आणि मला माझा ब्रेड का पुडा काय तो दिला. 

मग माझा इंटरेस्ट आणिक वाढला काय हे चुरा प्रकरण? मग एक दिवस मला ते गुपित समजलं (ती स्टोरी वेगळी), राजेंद्र स्टोर किव्हा केळकर स्टोर किव्हा असल्या दुकानात ना बिस्कीट ,खारी , टोस्ट बरणीत ठेवायचे आणि मग ती बिस्किटं  सम्पली कि खाली चुरा उरायचा , ते फेकून द्यायच्या ऐवजी हि लोक ते १० पैश्याला वगैरे विकायचे. मग तो चुरा चहात टाकून ती खायचे. आमचं नशिब चांगलं होत म्हणून बरणीतली बिस्कीटच होती खालचा चूरा नाही.

आज आठवलं कारण सहज म्हणून मी आज घरातल्या बरणीत बिस्कीट भरत असताना तो उरलेला चुरा खाऊन बघितला (काय हौस बघा) कुरकुरीत नसला तरी खुशखुशीत मात्र नक्कीच होता ... 

काय तरी आठवणी असतात.  एक कण भर चुरा पण मनाला मण भर चारा देऊन गेला ... 

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

Kota - Students

News are so mundane this days, I mean the print media, same news again and again. The roads in Mumbai or in general  are in bad condition, there is nothing new right? 

A similar news which is a routine is of young students dying by suicide... 27th in Kota that was reported, may be much more (Suicide is still a stigma at places and mental health is still a taboo subject), this cannot be a news any more. The minister said there may be a love angle... that can be a story. This are just the numbers of Kota, calculate the numbers form all over the country.

Share of Students Among Suicide Victims in India Grew 70% Over Past Decade. And the population has increased by you know how much? Just do the maths and you will know what I am talking about. Coming to maths, why are we so much obsessed with Maths? 

Everyone who has a kid knows about Kota (and quota), the place where they churn out entrance examination toppers, it is a big industry estimated to about 6000 crore annually. Take a minute to digest that. People are spending 6000 crores to get their child eligible for IIT or MBBS entrance, about 2.5 lakhs students come to Kota, many of them from middle or lower middle class, taking loans or borrowing from relatives, selling off assets. Now just imagine a kid from a village or small town who is extremely intelligent but has no interest in becoming an engineer or a doctor, but since it was thrust upon him that all the "bright" students are suppose to go to IIT and since good tuitions are available in a place outside of his village 1000 of kilometres away from his family and he is packed off there... A 17 year old in an unknown place where people may not speak his language he may not get his food and people who are able to do maths faster than him. With no emotional support the kid in an unknown place and  all lost, what do you think will become of the kid?

Is it not high time that we stop glorifying academically bright students? Why have posters showing top rankers from different institutes for whom coaching is a business (none of my business) which is ok, since everyone earns money and wants to earn more and more and more. Education should be focussed on learning rather than earning.

For the parents it is ok if the kid is not in IIT, let the child do what it wants. It is more of a peer pressure from the parents' friends than the kids liking that forces people to go for Kota. 

There are students who really want to become an engineer have an ambition to become a doctor give them the best you can, but let the child decide.

Couple of examples a child being brilliant and still not in IIT is Sachin Tendulkar, M S Dhoni you can add Kohli to the list too for his super dedication. Are this people not brilliant? Look at all the young actors, singers artists all are brilliant. The rich and famous, D Mart founder, he is not from IIT. The new age chefs, Ranveer, Vikas Khanna all are brilliant. Singing , playing, running a business all requires brains.

In olden times when people had to rely on a job and specific lines of education it was mandatory for a few of them to get in to the IIT, but times have changed now, entrepreneurs are growing all over, artists who show their skills on you tube or insta still make huge money...

Do you ever remember the name of the person who stood first in the 10th or 12th standard? But you surely remember the name of the famous actor cricketeer born in the same year as you have.

Education is must, a basic degree is must, but to push a kid beyond his limit is not fair... seer salamat to pagdi hazaar is the famous quote, बच्चा बचा तो डिग्रिया हज़ार should be the new quote.

Learn from the kids, what we have learnt is of little use in this new world, kids are smarter wiser, don't teach them, just help them.

It is a big world many avenues to build innumerable seas to cross and much mountains to climb... The world is much beyond the college, let them learn unlearn climb and fall... 

Let them explore and find the beauty... they will be alive for long after we are gone...

 Sagar Kulkarni

रविवार, १६ एप्रिल, २०२३

आमने सामने

आमने  सामने :

बरेच दिवस  (महिने,वर्ष.. ) माझ्या बकेट लिस्ट मध्ये आमने  सामने होतं, पण योग काही येत न्हवता एक म्हणजे ठाण्यात फार प्रयोग न्हवते लागत आणि लागला कि एका दिवसात पहिला दहा रांगा गेल्याच म्हणून समजा पण शेवटी नाटक पाहायचा योग्य आलाच. 

एक अतिशय नाजूक विषय थोडा बंड खोरीचा अगदी contemporary. एवढं असून सुद्धा अप्रतिम सादरीकरण साधा सेट सगळं साधं पण अप्रतिममांडणी . उत्कृष्ट अभिनय (आमच्या बोरिवलीच्या लीना भागवत नि सगळ्यात बेस्ट केलंय हे सांगायला नकोच) आणि खूप छान फ्लो. कुठेही भडक नाही melodrama नाही अचूक भावना टिपणारा आणि विषयाला धरून ठेवण्याची अचूक सांगड. हे सगळं जमून आलेलं नाटक म्हणजे  आमने  सामने

जुनं नवीन वाईट चांगलं ह्याचा खूप सुंदर मेळ घातला आहे , अमुक एक रूढी म्हणजे बरोबर अमुक म्हणजे चूक हे कसं चूक आहे हे फार छान दाखवणारी एक उत्तम कलाकृती. मला खूप मोह होतोय स्टोरी सांगायचा पण तो मी टाळतोय. 

हे नाटक तरुण मुला मुलींनी माध्यम वयीन मुला मुलींनी आणि ज्यांना तरुण मुलं मुली आहेत त्यांनी आवर्जून आणि एकूण सगळ्यांनी स्टोरी दिगदर्शन आणि अभिनय ह्या करता नक्की पाहावं.  

सगळ्या टीम चं खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा 


शुक्रवार, २४ मार्च, २०२३

भूषण शिंदे - कप्तानजी

२४ मार्च २०२३

काल दुपारी नेहमी सारखं ऑफिसचा  कॉल कॉल खेळत असताना, माझ्या एका मित्राचा (चुकीच्या इंग्रजीत) मेसेज आला कि भूषण सकाळी हार्ट अटॅक नि गेला, मी कॉल ताबोडतोब बंद करून फोन केला म्हणलं कोण भूषण ...शिंदे म्हणाला, विश्वास बसला नाहीच म्हणून अजून दोघांना फोन केला कन्फर्म झालं  ... मी पाच मिंट थंड पडलो , काहीच सुचेना मला. गुढी पाडव्याला आमच्या जुन्या ऑफिसच्या ग्रुप वर त्याचाच मेसेज होता शेवटचा (त्याच ग्रुप मीच तो गेल्याचा मेसेज टाकला त्याच्या मेसेजच्या खाली).  रिक्षा करून लागलीच त्याच्या घरी निघालो.. 

भूषण ला मी २००७ साला पासून ओळखतो , तेव्हा मिशी होती त्याला, नंतर काढली ४ एक वर्षाने, बायको ला चेंज नको का मला म्हणाला, त्याच्या इतका हजर जवाबी आणि त्याच्या इतका sense of humour असणारा माणूस  मी तरी पहिला नाही . situational आणि spontaneously विनोद करण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नाही (आता तर नुसता हात सुद्धा धरण्याच्या पल्याड गेलाय). सगळ्यांशी चांगले सम्बंध ठेऊन असणारा, म्हणजे बॉस असो कि अगदी नवोदित, हा एक मित्रा सारखाच होता. मी त्याला पॉलिटिक्स करताना पण नाही पाहिलं कधी, पण तो चतुर आणि सतर्क होता म्हणून इतका निर्मळ मनाचा असून आज इतक्या वरच्या position ला होता. त्याच्या कडून मी खूप सल्लेघ्यायचो , संमजवण्याची पद्धत पण अफाट होती त्याची, आमच्या पेक्षा वयाने लहान असून टीम चा कॅप्टन होता (half century तरी पूर्ण करायची कप्तानजी). एकदम रॉयल माणूस आणि अगदी complete family man. 

पाच वर्ष झाली मला कम्पनी सोडून, कधी घरी जायचा योग् नाही आला आणि आला तो असा. आई वडील दोन  बहिणी बायको (खूप कौतुक होतं त्याला आणि तो बोलून दाखवायचा पण नेहमी)एक मुलगी एक लहान मुलगा आणि आमच्या सारखा मोठा असा मित्र परिवार होता काल त्याच्या घरी. 

मी मध्यन्तरी स्पिती ला गेलो होतो हिमाचल ला, तेव्हा ते डोंगर बघून अबब झालं होतं मला , मी सह्याद्री वर पोसलेला आणि तेच डोंगर मोठ्याले वाटणारा , पहिल्यांदाच हिमालयन मौनटन रेंजेस पहिले आणि डोंगर किती मोठे असू शकतो ह्याचा प्रत्यय आला ...जाऊन बघा म्हणजे कळेल मी काय म्हणतो ते, काल भूषणच्या  घरी जाऊन आलो तेव्हा मला तसा दुःखाचा डोंगर दिसला , आपण लोणावळा घाट  पण किती मोठा म्हणतो, मग हे काय म्हणणार. सडे दहा ला कॉल संपवून, जरा अस्वस्थ वाटतंय म्हणाला आणि कोलॅप्स होऊन गेला ... ह्याला काय अर्थ आहे , थोडा टाइम तरी द्यायचा ना , एरवी बोलण्यात अचुक टाईमिंग साधणारा इथे नियतीच्या टाईमिंग पुढे विकेट गमावून बसला आमचा कॅप्टन. चुकलास  मित्रा. एरवी तोंड उघडलं कि आम्हाला हसवणारा आज शांत झोपला असताना आमच्या डोळ्यात अश्रू देऊन गेला. प्रचंड चटका लावून गेला... 

आमच्या  मधला असा हा पहिलाच गेला , बाकी ओळखीचे असे खूप गेलेत. डिसेम्बर ला त्याचा वाढदिवस होता, मी नेहमी सारखं  कुणीतरी happy birthday केलं म्हणून मम केलं, एकदा बसू ,  भेटू असं नुसतं बोलणं झालं खूपदा. (साला जाम गिल्ट येते ), आपण नुसतं म्हणतो आपल्याला काहीहि होणार त्यांना झालं, झालं कि कळतं.  पण मी एक ठरवलं कि नुसतं मम न करता फोन करायचा दोन मिंट का होईना? वर्षातून एकदाच का होईना बोलायचं थोडं तरी , पन्नाशी आल्यावर आली अक्कल. आणि आता फार हेवे दावे नाही उरले फार कुठे पोचायचं ध्येय फार मोठी ambitiion . पण नाही आता, नाती जपा असं झालंय आमचं. तुम्हाला कुणी फोन केला तर नक्की उत्तर द्या मीटिंग मध्ये असाल तर दहा सेकंड घ्या आणि कळवा करतो म्हणून नन्तर (आणि करा), ऊगाच कपाळावर आठ्या नका आणू . क्षण भंगुर बोलायला सोपं असतं. अनुभव आला कि कळतं आणि तो कुणावरच येऊ नये हि ईश्वर चरणी प्रार्थना.  

आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर. अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर - बहिणा बाई 


रविवार, १९ मार्च, २०२३

वणी - सप्तशृंगी

वणी - सप्तशृंगी  

वणीच्या सप्तशृंगी  ला दर वर्षी मी जातोच , कोविड मुळे काय ती दोन वर्ष राहून गेलं. आमची कुलदेवी त्या मुळे नियम म्हणून आणि अपार श्रद्धा असल्या मुळे,  नाही गेलं कि चुकल्या चुकल्या सारखं होतं . आधी आम्ही सगळा डोंगर - गड चढून जायचो, म्हणजे मी लहान असताना त्या बायका असायच्या, ज्या लहान मुलांना कडेवर घेऊन जायच्या तेव्हा पासून . ते झालं कि मग ५०० हुन अधिक पायऱ्या चढायच्या आणि मग कुठं दर्शन व्हायचं. पण एकदा देवळात गेलं कि सगळं विसरायला व्ह्याचं आपोआप हात जोडले जायचे डोळे पाणवायचे सगळा थकवा पळून जायचा. 

मग रस्ता झाला , फक्त ST जाईची मग थोडा बरा केला, आम्ही गाडी घेतली ती नेऊ लागलो , फक्त पायऱ्या होत्या अनेक वर्ष म्हणजे अगदी ३ वर्षां पूर्वी त्यांनी रोप वे केला, खूप बरं झालं , गर्दी वाढली ..बघता बघता खूप बदल झाले छान सोइ केल्या, स्वछ बाथरूम वगैरे पण आहेत पार्किंग आहे छान.... पण बदल करता करता आता देवीचं रूपच बदललं ... एकदम मॉर्डेन,  सडपातळ डोळे एकदम खाली झुकलेले काही तरी विचित्र हो. काहीतरी शेंदूर काढलाय म्हणे ... अरे पण असं रूप बदलायचं ??? 

आमच्या मनात एक प्रतिमा होती - आहे ती तुम्ही बदलता? म्हणजे उद्या माहेरपणाला एक मुलगी घरी आली आणि आईचा चेहराच बदलला तर? चालेल? नाही हो  नाही,  असं का सारखं बदलायचं आहे? आणि शेंदूर काढला म्हणून डोळे असे पेंगलेले? आधी कसं रूप होतं? काय भिशात पंगा घ्यायची? महिशासुर मर्दिनी वाटायला नको?

घोर निराशा झाली आधी दर्शन करताना भक्ती ने पाणी यायचं डोळयात आता वाईट वाटून आलं ... 

गुरुवार, १६ मार्च, २०२३

Vibrations

Have you ever felt that there are vibrations all around? the sound and visuals we see are also vibrations but the nature is full of vibrations, sound waves are what we feel but don't see. When you are alive there are vibrations from us , the soul vibrates the body,  if it matches with other person we feel good or positive and if it completely mismatches, we feel uncomfortable,  uneasy. Love is when the vibrations are in sync and create a new vibration altogether 

Vibrations heal, hurt, they comfort. Feel the vibrations, close your eyes and feel, when you exerices or run or work or cook or meditate , it is all different vibrations. Can we change the way we vibrate? Yes, observe your body and mind closely, feel the vibrations and try to keep the vibrations the same we feel when we are at peace. Get the rhythm in the vibrations. 

The sun rays the moon light are all vibrations of a different kind, the rain drops are the visible vibrations, when you chant any mantra or just say Om, you will feel the vibration more than anything else. 

I think the heart vibrates rather than beats, the brain is vibrating all the time bouncing off vibrations.

Think of all the activities and see if you can feel the vibrations.

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

तुटकी नाती

एखादं नातं असतं ना? ते लगेच तुटलं कि चांगलं कि हळू हळू संपत गेलेलं बरं? म्हणजे बघा एखादा माणूस हार्ट अटॅक येऊन फटकन जातो, चांगला असतो धड धाकट, एकदम शॉकिंग ... जवळच्यांना त्रास होतो खूप, आठवण तर कायम राहते काही राहिल्याची सल मात्र बोचत राहते आयुष्य भर ... पण ना,  त्रास नाही झाला  जास्त हा एक दिलासा असतो 

कधी कधी माणूस आजारी पडतो आणि मग जातो कधी कधी चिवट आजार होतो कॅन्सर सारखा, मग काही अवयव कापून छाटून,  अजून तग धरतो , कधी बरा होतो पुन्हा,  छान नव्याने अगदी पूर्वी सारखा होतो, कधी कधी ,  बरा होता होता जातो आणि कधी जाता जाता बरा होतो, पण एकूण अवधी, म्हणजे जायच्या किव्हा तारायच्या आधीची  त्रास दायकअसते , म्हणजे काय करायचं हे कळत नाही हो , आणि आपलाच माणूस मरू दे असं नाही म्हणता येत ना?

तसच काही नात्यांचं होत असतं , सुटत नाही, तुटत नाही, जात नाही, चिवट असतं ... कुणाला तरी वाटत असतं जगू दे, कुणी ते संपण्याची आशा करत असतो, कुणी ते असंच मोडकं ठिगळ लावलेलं पुढे ढकलत असतो, कुणी दुसरा ह्या आशेवर असतो कि होईल बरं, एवढे कष्ट काढले ... 

"आशा" नात्यातली किव्हा माणसाच्या आयुष्याची,  त्याला जिवंत ठेवते  ... hope म्हणतात, सगळ्यांना दिसत असलं तरी जगण्याची आणि नातं टिकवण्याची आस जो वर संपत नाही तो वर तसंच असतं .  

सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

"एकदा काय झालं"

जयवंत दळवींचं पुरुष नावाचं नाटक होतं , नाना करायचा काम , खूप असं अंगावर येत नाटक ते, म्हणजे तेव्हा यायचं, माझ्या नशिबाने (आणि वया मुळे) मी नाना आणि चंद्रकांत गोखले करायचे, ते version पाहिलं आहे. , पहिला अंक संपताना तो पुढारी म्हणजे नाना त्या मास्तरच्या मुलीवर बलात्कार करतो (म्हणजे नुसतं create केलं ते वातावरण ) आणि ओरडतो त्याच्या नोकरावर  "कोंब तीच गांधी टोपी तिच्या तोंडात "..... एक तर नाना चा आवाज, अंधार, ती मुलगी ओरडते ... असं खूप सुन्न करणारं सगळं असतं आणि पडदा पडतो , एक दोन मिंट सीट वरून कुणीच उठत नाही, म्हणजे तो impact तेवढा होता .  त्या नाटका संदर्भात एक किस्सा माझ्या मित्राने मला सांगितला होता, तो म्हणाला कि असा पडदा पडला आणि मी absolute stunned होऊन एक टक पडद्याकडे बघत होतो आणि शेजारचा माणूस, माला जरा जाऊदे म्हंटला आणि बायको कडे (स्वतःच्या) बघत म्हणाला काय आणू चोको बार का बटर स्कॉच ? 

अरे काय?  सगळा  तो impact घालवून टाकला, तुम्ही icecream खायला येता काय इथे? एक ठेऊन देणार होतो .  (त्या काळी थोडं theatre वगैरे चं वेड  होतं आम्हाला ). नशीब त्या माणसाला लगावली नाही ते (मित्र जरा violent होता). 

कट, टू पर्वा २०२२ ऑगस्ट - मी विवियाना मॉल मध्ये "एकदा काय झालं" पाहायला गेलो होतो (एकटाच) आणिशो VIP स्क्रीन मध्ये होता , छान खुर्च्या शेजारी टेबल  (महाग होतं तिकीट पण तरी बऱ्या पैकी भरलं होतं) ते VIP स्क्रीन म्हणून तुम्हाला अगदी मेनू कार्ड देऊन सीट वर आणून देतात ती लोक, ऑर्डर घेत फिरत असतात  . इंटर्वल ला त्या हिरो ला कॅन्सर आहे हे कळतं तो वर अगदी गोड छान असतं सगळं आणि मग ते लाईट लागले (पडदा काही पडला नाही ), तेव्हढ्यात तिथली बाई (म्हणजे ती serve करते ती ) पुढे आली आणि  म्हणाली would like to order some milk shake ? म्हंटलो मेले, मी शेक झालोय तो हिरो मरणार आता एका तासात आणि तुला मिल्क शेक सुचतोय होय? 

असं मी मनात म्हंटलो आणि गप गुमान बाहेर गेलो... तसं काही फार बदललं नाहीये हो. 


सागर कुलकर्णी 

शनिवार, १५ जानेवारी, २०२२

आज ६४ दिवसांनी कोणत्यातरी आगारात लाल  परी धावली, तुमच्या सारखं मी सुद्धा दुर्लक्ष केलं, (लाल परी म्हणजे ST सांगावं लागतं). 

पण काय झालं न, मी हल्लीच (२५ डिसेंबर च्या आस पास )संजय बरोबर  एक छोटी कोकण ट्रिप केली त्याच्या गाडीतून , मुंबई कोल्हापूर रत्नागिरी, गणपती पुळे, मग गुहागर, दाभोळ , दापोली हे बोटीतून आणि मग मंडणगड गोरेगाव , रोहा ,  पनवेल .... पण हि गोष्ट त्या निसर्गरम्य रोड ट्रिप ची नाही (त्यावर नक्की नन्तर ). 

गुहागर ला जेऊन आम्ही (काय जेवण सांगतो तुम्हाला.. )बोटीमार्गे ( बोटीत गाडी टाकून ) दाभोळ आणि दापोली जाणार होतो, (म्हणजे गेलो तसेच) जाताना रस्त्यात (किती वाईट रस्ता असावा?) उन्हात एक कोळीण टोपली घेऊन जात होती आणि तिने आमहाला हात दाखवला , एक ५ सेकंद विचार करून आम्ही तिला lift दिली, एक अडीच किलो मीटर अंतरावर बोट होती आणि भर उन्हात ती बाई चालत होती म्हणून तिला सोडू म्हणलं. संजय कोकणातलाच (त्याला सगळे रस्ते तोंड पाठ अगदी रायगड जिल्हा ते थेट गोवा , सलाम आहे त्याला) म्हणून त्याने विचारलं "कुठे जाते विकायला मासे?" गुहागर म्हंटली ती, तरी ३ एक किलोमीटर म्हणजे एकूण ५ (वन वे ), मी अंदाज बांधला , सकाळची जाते आणि आता घरी .. जाताना अशीच आणि येताना पन टोपली घेऊन ईक्ले मासे तर लवकर न्हाई तर उशीर .. मी (निरागस पणे) विचारलं वाहन नाही  का मिळत चालत जातेस का ? ती ST बंद आहे ना, करायचं काय आम्ही? तुमच्या सारखी देव माणसं रोज भेटो रे देवा तुम्हाला खूप आविष (आयुष्य ) मिळो ... असं म्हणून उतरली ... साधं सोपं सरळ ... मला म्ह्णून कोकण फार आवडतं .. 

साला आम्ही AC गाडीत , मला शेवटचा ST मध्ये कधी बसल्लो हे आठवत सुद्धा नाही... हि बाई गेले ६४ दिवस रोज १०  एक किलोमीटर माश्याची टोपली घेऊन (भर उन्हात )चालते... आणि आम्हाला मनोभावे खूप आयुष्य मिळो देवा कडे प्रार्थना करते ... किती वाईट आहे हे ... 

एक तर मी अनाडी आहे (आहेसच) किव्हा राजा आंधळा आहे ... आता राजा नाही राहिला हे विसरतो म्हणा ...   

आज अचानक ती बातमी ऐकली, ६४ दिवसांनी कोणत्यातरी आगारात लाल  परी धावली..  आणि सगळं एकदम उफाळून आलं, त्या जोकोविच चं आपल्याला माहितीये पण इथे आपली माणसं वण वण करतायेत ते नाही माहित म्हणून आज सांगावं वाटलं .. 



शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

मारहाण

 काल माझ्या घरात घुसून १० लोकांनी माला मारायचा प्रयत्न केला , हे वाक्य  ऐकून  वाईट  वाटतं थोडी भीतीही वाटते, पण जेव्हा आपल्याच सोसायटीतली २० ते २५ ह्या वयोगटातली सुशिक्षित आणि "सुसंस्कृत " घरातली मुलं एका पन्नाशीच्या माणसाला शारीरिक इजा व्हावी ह्या उद्देशाने घरात घुसून मारतात तेव्हा समाज म्हणून आपण हादरलो पाहिजे. 

हा प्रसंग नावररात्रीत माझ्या बरोबर घडला, थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या कडे दर वर्षी गोंगाटात अतिशय कर्कश अश्या आवाजात (अगदी १२० डेसिबल पर्यंत) खूप लोकं (काही आतली काही बाहेरची ) चांगले कपडे घालून नाचतात आणि त्याला "नवरात्र" असं धर्माचं लेबल लावतात (किती छान! सोजवळ आणि सोईस्कर न ?), मग तुम्हाला ते आवडो का न आवडो तुमचं वय ९० वर्ष असो का ९० दिवस, तुम्ही  आजारी असो का परीक्षा असो अगदी निमूट पणे ते सहन करावं लागतं कारण मग त्याला धर्माचा रंग चढतो (मग तो हिरवा असो वा भगवा तुम्ही त्याला बोट दाखवू शकत नाही) आणि तुम्हाला सगळा त्रास, नऊ दिवस (नऊहि  दिन है ना ? क्या प्रॉब्लेम है? असं हि लोकं मला म्हणाली आहेत) सहनच "चं"  करावा लागतो , दरवर्षी प्रमाणे यंदाही , (कायद्या मध्ये बसत नसतानाहि ) आमच्या घराखाली गरबा खेळण्यात आला. 

त्या दिवशी मी एका माणसाला फोन वर शिव्या घातल्या , तो खाली निवेदन करत  होता म्हणून त्याला, त्यानेही दिल्या आणि मग २० माणसं घेऊन माझ्या घरी आला आणि मला ओढून खाली घेऊन जाऊ लागला माझ्या हातातला फोन ती पोरं घेऊ लागली मी आरडा ओरडा केला तेव्हा आतल्या खोलीतून माझे ८९ वर्षांचे वडील आले , तेव्हा माझ्या नशिबाने ती लोक शांत झाली आणि खाली गेली. 

मुद्दा हा नाहीये कि लोकं गरबा खेळतात आवाज करतात मी शिव्या दिल्या त्याने दिल्या, मुद्दा हा आहे कि शिवी दिली म्हणून एकाच complex मध्ये २० वर्ष एकत्र राहणारी माणसं एवढी हिंस्त्र होतात? हि सगळी मध्यम वर्गीय सुशिक्षित लोकं, मला ओळखणारी माणसं हेही कबूल करतील कि कुणाच्या अंगावर धावून जाणे शिव्या देणे हे माझ्या मूळ स्वभावात नाही, तरीही एखाद्या माणसाला २० लोकांनी मारावं हा इतका मोठा गुनाह होता?

मदतीला एकही माणूस आला नाही, उलट काही ओळखीची माणसं त्यांना प्रोत्साहन देत होती हे जास्त क्लेशकारी होतं.  आपण नुसता देवाचा "धर्म" पाळताना, माणूस धर्म, शेजार, धर्म वैगेरे साफ विसरलोय का? का मुद्दाम अडगळीत टाकलेत? मग तालिबान ला का नावं ठेवा ? ती लोकं तर अशिक्षित आहे (मला मारायला आलेला माणूस एका IT कम्पनी मध्ये VP आहे, म्हणजे "सुशिक्षित" असणारच) तालिबानकडे बंदुका आहेत, मला मारायला येताना मुलं साधे pvc पाईप घेऊन आले होते हाच फरक , शेट्टी म्हणून एक आमच्या इथे एक माणूस राहतो, त्याचं समर्थन आहे ह्या सगळ्याला,   म्हणाला "वोह पाईप नही लगता", त्याला काय सांगू? जखम फक्त शारीरिक नसते. 

कांदिवली पूर्व जिथे मी राहतो तिथे सगळे मध्यम वर्गीय आहेत, पण मोजून चार लोकांनी मला पाठिंबा दिला,  एकाही कमिटी मधल्या माणसाने माझी विचारपूस सुद्धा केली नाही (त्यातलाएक तर त्यांचं समर्थन करतो , बाप को गाली दिया फिर घुस्सा आयेगा ना ? मग तू काय आयुष्य भर मारामारी करत फिरणार का?) ह्यांना काय म्हणायचं? ह्याच माणसाने शेजारचा १७ वर्षाचा मुलगा गिटार वाजतो म्हणून पोलीस ला बोलावून दम भरला होता, आवाजाचा त्रास होतो म्हणून. त्या वेळी त्या मुलाचा बाबा डेंगू नि हॉस्पिटल मध्ये होता. 

 माणुसकी म्हणून तरी विचारा, उद्या तुम्हाला हि मदत लागू शकतेच ना? बाकीच्यांना वाटतंय कि माझ्या घरी तर नाही नं आलं कुणी आणि सागर तर नेहमी त्या देवाच्या कार्यक्रमाला विरोध करतो,  असच पाहिजे. पण त्यांना हे कळत नाही कि हि प्रवृत्ती फार भयानक आहे ती लोकं आज माझ्या घरी आलीत उद्या त्यांच्या कडेजातील , जर एक सुशिक्षित (आणि सुंस्कृत असं म्हणणार होतो, पण आवरलं) माणूस हे करू शकतो तर बाकीचे काय करतील?

हि वृत्त्ती मुळा पासून नको का काढायला? आणि आत्ताच जर सगळ्यांनी मिळून ह्या प्रवृत्ती ला उखडून नाही फेकलं तर उद्या आपली मुंबई राहील का सुरक्षित? अजून पर्यंत माझ्या घरी नाही ना? मग राहूदे,  हे किती दिवस चालणार? उद्या हीच मुलं खाली दंगा करतील, किव्हा दारू पिऊन मुलींना छेडतील आणि कुणी काही बोललं तर ते घरी येऊन मारतील. 

खूप लोकं करतात म्हणून बरोबर आणि कुणी ह्याला विरोध केला तर त्याला मारा, धडा शिकवा,  हे जे सगळं चाललंय ना ते फार भीती दायक आहे. वाईट माणसं जशी कळपात असतात नं? तशी चांगली माणसं हि एकेकटी असतात पण वेळे प्रसंगी ह्या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मी म्हणतो तेच बरोबर आणि चांगलं म्हणा, किती भयाव्य आहे सगळं कधी जागे होणार आपण? 

आपण आपल्या मुलांनां काय धडे देतोय? त्या माणसा बरोबर त्याचा १८ वर्षांचा मुलगा आणि त्याचे मित्र होते, मोठे पणी तो मुलगा हेच करेल का?


गुरुवार, ७ मे, २०२०

आता मात्र फार झालं ....

आता मात्र फार झालं .... 

दहा बारा वर्षान पूर्वीची गोष्ट असेल, आम्ही कोकणातून  कोल्हापूर मार्गे येत होतो गाडीने, तेव्हा माझी लेक ५  का ६ वरशाची असेल आणि गाडी पण लहान होती,  (अगदी गुणी होती अजिबात कटकट नाही रड नाही हट्ट नाही) आधी दोन चार तास छान गेले, तिनी थोडी झोप काढली मग बाबा कधी येणार घर? हा प्रश्न म्हटलं खूप लागेल आठ दहा तास तरी लागतील, मग तिला मी ते बोर्ड दाखवले मुंबई अमुक एक किलोमीटर चे आणि त्याने अंदाज बांधायला सांगितला , पण का  कुणास ठाऊक ट्राफिक लागत गेलं आम्हाला, पण तिने बिचारीने हू का चू नाही केलं, जीव रमवायला तिने स्वतःला गोष्टी सांगितल्या , गाडीतल्या फडक्याने आतून गाडी साफ करते म्हणाली, ते झालं तरी मुंबई काही येई ना, मग आम्ही ब्रेक घेतला, एक्सप्रेस वे वरून पटकन आलो आणि मुंबईत परत ट्रॅफिक आणि मग कस झाल कि मुंबई आली आणि ते किलोमीटर पण कमी  झाले, पण घर काही येई ना, बाबा ... बाबा ... किती वेळ? मी हि खेकसलो, मग तिचा चेहरा आणिक छोटा झाला, मग मलाच माझा राग आला, मग बाहेरच्या वर ओरडलो, (ती विसरली मी नाही विसरलो) अस मजल दर मजल करत अगदी घरा पाशी आलो, तिलाही आता रस्ता ओळखीचा होता आणि घर अगदी एक किलोमीटर होत म्हणजे आपण आता आलोच हे लक्षात आल होत आणि परत, हे ट्रॅफिक लागलं , एकदम माझी मुलगी मला म्हणाली आता बस बाबा, हे खूप होतंय खूप त्रास दिला ह्या  लोकांनी आता आपण जाऊया चालत .... आता मात्र बस्स ... इतका हसलो ना .. नशिबाने ते ट्रॅफिक लगेच सुटलं म्हणा आणि पाचव्या मिनिटाला आम्ही बिल्डिंग मध्ये, तिच्या चिडून बोलण्या मुळे फरक पडला का कोण जाणे ? सध्या मला हे असं झालं आहे , आम्ही गप गुमान निमूट पणे सगळं सहन केलंय ना? आता बस्स ... 

हा जंतू काही जात नाही इथून अजून थोडे दिवस, महिने वर्ष, आपण आता काळजी घेतोय .हो ना? आता थोडं बाहेर पडूद्या कामाला तरी. ... १७ ला उघडणार म्हणताय, मग परत लोक गर्दी करणार, मग परत तुम्ही बंद करणार .. त्या पेक्षा हळू हळू थोड्या थोड्या लोकांना बाहेर येऊ द्या... आमच्या गरजा पण सरकार ठरवतंय (हे लै होतंय), म्हणून पंखे आणि ac विकण्याचं दुकान बंदच , पण दारू चालू केली..(काय लॉजिक असेल?)  लोकांना थंड वाटावं आणि सरकारी तिजोरी गरम व्हावी म्हणून, एक तर दारू बंदीला माझा विरोध आहे (आणि पंखे विक्री बंद केली त्याला पण) अरे स्टेशनरी पण बंद? का लोक काय गर्दी करून पेन घेणार? आहो गरजेला पेन लागत, मुलं घरी आहेत पुस्तक, वह्या, कागद, टेप, गम, स्टेपलर, रबर, खोड रबर, पिना (मारायला नाही) फोल्डर, फाईल, अनेक गोष्टी लागतात ...आणि हे लागतं हो ..रोज नाही लागल तरी गरजेची वस्तू आहे.  आता  पंखा बंद पडला तर माणूस उकाड्याने मरेल, पण कुणी तरी ठरवत कि जेवण फक्त गरजेचं उन्हाळ्यात पंखा नसला तरी चालेल, आता पंखा विक्री चालू केली तर काय लोक तो गळफास लावायला वापरतील हि भीती आहे का सरकारला? मार्च सरला, एप्रिल एकदाचा रखडत खरडत पार पडला मे आला आता जीव जातोय उकडून त्यात ट्यूब गेली आहे खूप जणांची, तरी अंधार चालेल, जेवायला मिळतंय ना? अरे? काय चाललंय काय? रोटी कपडा मकान हा प्रश्न खूप साऱ्या लोकांनी सोडवलाय, चार दिवस नाही मिळाली भाजी तरी वरण भट उसळ पोळी पिठलं भाकरी (किती भारी मेनू बघा भाजी वीणा ) किव्हा पोहे खाऊन सुद्धा जगतील लोक पण पंखा एक मिंट बंद करून बघा ... तर पंखा फक्त प्रतीकात्मक आहे.  अश्या खूप गोष्टी आहेत .. काही लोक फक्त अती श्रीमंत आणि अती गरीब लोकांचे प्रॉब्लेम्स बघतात .. मध्यम वर्ग ? त्याला गृहीत धरलाय ...  आता बस्स ... 

माझे दोन चार प्रश्न वजा सल्ले आहेत (हे आपले मलाच), एक तर होम डिलिव्हरी फक्त जेवण (काय जेवण जेवण चाललंय कोणास ठाऊक )बाकीचं काही नाही  का? आता तोच माणूस भाजीची डिलिव्हरी करणार आणि तोच कागद आणि  पेन, पण नाही (आम्ही pain सहन करायचा पण पेन नाही मिळणार) .. आता माझी बहीण चित्रकार आहे तिला रंग हवेत, पण नाही ते विविध रंगाची भाजी खा म्हणतात (बळी राजाचा बळी जाईल... ) पण रंग नाही देणार , (नाही म्हणजे नाही ..) आता ती काय फावल्या वेळेत राज्यकारण्यांच्या पोस्टर ला काळं फासणारे (इच्छा असो वा नसो)? आता हॉटेल बंद, बर डिलेव्हरी चालू करा तर ती स्वीगी आणि झोमॅटो ... बार आहेत त्यांना डिलेव्हरी का नाही करुदेत? ती पोर नुसती बसलीयेत त्यांना काम मिळेल empty mind is a devil's workshop . दारू दुकान बंद होती ती उघडली तर झुम्बड .. ती होणारच , (अमेरिकेत पण गर्दी असते) त्या पेक्षा त्यांना पण डिलेव्हरी चालू करू देत , फार तर बाहेर एक डबा ठेवा लोक त्यात आपली ऑर्डर लिहून टाकतील, फोन नंबर लिहितील , तो माणूस देईल घरी आणून, फक्त फोन वर ऑर्डर घ्या, रिक्षा ठेवा डेलिव्हेरी ला, ५० रुपये जास्त घ्या, लोक देतील, रिक्षावाल्यांना पण काम मिळेल, ती लोक भिकारी नाहीयेत, खूप दिवस लोकांच्या दयेवर नाही जगू शकणार, त्यांचा कॉन्फिडन्स नका घालवू काम करू द्या.   गर्दी करायला भाग पाडता आणि परत ढुंगणावर फटके मारता , जी लोक ह्यांना (दारू च्या रांगेत उभे राहणाऱ्यांना )हिणवतात तीच लोक, वाण्या कडे गर्दी करून सामान (एक्सट्रा)स्टॉक करत होती ......

सरकारला प्रॉब्लेम्स आहेतच,  मी असं म्हणत नाहीये कि सगळं मोकळं करा , तुम्ही हवी ती,  हवी तेवढी काळजी घ्याच, पण घरात सगळं उपलब्ध करून द्या... अत्यावश्यक म्हणजे फक्त जेवण नाही.   

१७ ला एकदम उघडलं तर लोक सगळी एकदम बाहेर सांडतील (मग दांडे कमी पडतील पण.. )त्या पेक्षा थोडं थोडं लोकांना बाहेर सोडा कारण १७ लाच फक्त केलत तर परत मोठा प्रॉब्लेम, शाळे मध्ये कस करतात? एक-  एक वर्ग सोडतात, शाळा सुटल्यावर, नाहीतर चेंगरा चेंगरी होईल ना? तस करा शनिवार पासून दुकान उघडा (पंखा , AC , ट्यूब ) रविवारी थोडं हॉटेल ला सूट द्या, सोमवारी एरिया प्रमाणे रिक्षा चालू द्या ओला उबर चालू करा, त्यांना नियमात बांधता येत, घरी जाऊन लोकांना रिपेर ची काम करू द्या , घरातल्या लोकांना सांगा तशी दक्षता घ्यायला , आता सवय झाली आम्हाला काळजी घ्यायची आणि करायची. आता वेड्या सारखं खरंच नाही वागणार .. 

power corrupts and absolute power corrupts absolutely .. आता तर काय झालंय ना कि बिल्डिंगच्या सेक्रेटरी ला पण पावर आली आहे, एरवी शिव्या खाणारा माणूस तो बिचारा आता तो म्हणेल तस , दरवाजा बंद कोई नाही आयेगा कोई नही जायेगा.... असं पावर काही लोकांना दिलंय त्या मुळे काय झालय कि, काही लोक त्या मुळे त्याचा गैर वापर करू लागली आहेत ... (साला पंखा दुकान बंद?). 

आता हा व्हायरस राहणार आहे, त्याच्या बरोबर जगायला शिकायला हवं, नुसतं किती वर्ष घरी बसणार. अजून? लस यायला ८ महिने लागतील किमान, तो पर्यंत काय? एक वाक्य आठवलं  "इतना भी मत डराव कि साला  डर का डर हि खतम हो जाये" लोक शांत आहेत कारण ती अजून तरी गुणी आहेत, लोकांचा फार अंत नका बघू. आम्ही शहाण्या सारखं वागलोय ना आता सरकारनी पण शहाण्या सारखं वागायला हवं ... (हसू नका.. मी सिरिअसली बोलतोय). 

आम्ही आता घर साफ केलं आहे, सगळ्यांशी गप्पा मारल्या आहेत (मी पोळ्या सुद्धा शिकलोय), नवीन छंद ट्राय करून पाहिलाय, वाचन केलंय, झोप काढलीये, मदत सुद्धा केली आहे (गरिबा पर्यंत पोचली असेल अशी अपेक्षा करतोय)आणि घरा पासून ३०० मीटर च्या आत फक्त फिरलोय, ते पण सामान आणायलाच, मित्रां बरोबर पार्ट्या सुद्धा नाही केल्या (बिल्डिंग मधल्या पण) , म्हणून विचारतो .. कधी जाऊ आम्ही बाहेर?

डॉक्टर , बाकी मेडिकल पॅरा मेडिकल , सफाई कामगार, पोलीस , वाणी वाले , भाजी वाले ट्र्क ड्राइव्हर आमचे वॉचमन दूधवाले पेपर वाले ...आणि अशी बरीच लोक ...  ह्यांना मोठा सलाम ... खूप स्तुत्य आहे सगळंच मानलं त्यांना  .. 

पण आम जनतेचं पण कौतुक आहे (लहान मुलांचं तर फारच),  गरीब कामगार , कष्टकरी वर्ग ह्यांना पण सलाम १३० करोड लोक आहेत, त्यातली ०. १ टक्का लोकं पण नियम मोडत नाहीयेत म्हणजे किती कौतुक बघा , आत्ता पर्यंत आम्ही सरकारच ऐकलं , उभे राहा- उभे राहिलो , दिवा लावला - दिवा लावला , घरात बसा..  बसलो टाळ्या  पिटा ... पिटल्या आता आमच जरा ऐका .. कुणी ऐकतय का?

सागर कुलकर्णी 

ता.क   

ते जरा पंखा आणि AC च तेवढं बघा जमतंय का ?
सागर

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

इरफान

पु ल म्हणतात ना? इतरांच्या डोळ्यात टचकन पाणी आणण आणि रडवणं ह्यात खूप बारीक धागा आहे, ज्यांना जमलं ते महान. ते स्वतः फार जास्त महान होते, म्हणून अनेकदा हसवता हसवता आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणायचे, अंतू बरवा , हरितात्या ... (आता आम्ही सूरदास ) , हे ऐकताना आपण रडत नाही, पण नकळत डोळे पाणावतात .. अशी अनेक लोक जी पुलंच्या पुस्तकात खेळली आणि त्यांच्या मार्फत आपल्या घरात घुसली आणि मनात बसली ..... काल इरफान गेल्याची बातमी वाचली आणि एक अर्ध्या तासाने, कुणाला तरी सांगताना माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि कंठ दाटला. तस पाहिला गेलो आपण, तर एक साधा नट (नट साधा न्हवता फार मोठा होता) , असे अनेक होऊन गेले, तसाच हा, ह्याच्या जाण्याने मला का रडू यावं, म्हणजे डोळे भरून  यावे? ह्याला कस जमलं बरोबर ? मला माहितहि न्हवत कि हा इतक्या आत गेला आहे ते, माझ्या मनात.  शांत अभिनय अगदी सय्यमाने बोलणारा, माझ्या नकळत इतका मला भावलाय ते काल कळलं, म्हणजे ह्याने मला रडवल नाही, डायरेक्ट काळजात हात घातला आणि निघून गेला, हात घातला होता ते निघून गेल्यावर कळलं, कारण तेव्हाच काळीज हल्ल. माझ्या पेक्षा फार तर  दोन एक वर्ष मोठा असेल, तसा मी दर महिन्याला पिक्चर पाहणारा पण नाही, पण ह्या माणसाचे जे काही पिक्चर पहिले ते डायरेक्ट आत गेले असणार. मला आठवत मी पहिल्यांदा मकबूल पहिला गेलो ते पंकज कपूर साठी आणि वीशाल भारद्वाज साठी, म्हणजे पंकज कपूरने  तर अप्रतिम काम केलंच आहे , पण फार लक्षात राहिला तो हा, म्हणजे व्हिलन सारखं आरडा ओरडा नाही,आदळ आपट नाही, बोलणं पण फार कमीच होत, पण लक्षात राहिला, फार जास्त, मग गुडगाव ला कामा निमित्त असताना मी दर रविवार पिक्चर पाहायचो (दुसरा उद्योग नव्हता रविवारी), तेव्हा एका रविवारी मी "नेमसेक" आणि लगेच "लाईफ इन अ मेट्रो पहिला", मला वाटत तो त्याचा पहिला किव्हा सुरवातीचा कॉमेडी सिनेमा, म्हटलं सलाम आहे माणसाला.  एकदा नेमसेक बघा आणि त्याचा एक विनोदी सिनेमा पहा, म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल.  मग त्याच्या करता पिक्चर पहिले मी बरेच (त्याच्याच करता जायचो) ... पैसे देऊन ज्याचे चित्रपट पाहावे असे फार कमी आहेत, म्हणजे मी जाईन ते, त्यात ह्याचा नंबर खूप वर लागतो. 

सध्या लोकडाऊन मुळे असेल म्हणा, मी पण खूप बेचैन आहे, म्हणून असेल किव्हा अगदीच आपल्यातला एक असा वाटणारा असेल म्हणा, मी त्याला भेटणं जवळ जवळ अशक्य असलं तरी कधी भेटलाच आणि मी हॅलो म्हटलं तर नक्की त्याच ट्रेडमार्क स्माईल  देऊन हॅलो म्हणेल असं वाटत असेल मला, महणून असेल, पण काल इरफान नि माझ्या डोळ्यात टचकन पाणी उभं केलं, जाताना पण तो मला कुठेतरी भिडला....

सागर 

ता.क.: आताच कळलं कि ऋषी कपूर सुद्धा टाटा करून गेला, पण मी काल ऑलरेडी रडलो आहे

रविवार, ५ एप्रिल, २०२०

कनू

आमच्या जय हरी बिल्डिंग मध्ये १६ ब्लॉक्स होते (आधी सगळे ब्लॉक नंबर म्हणायचे आता फ्लॅट झाले), सगळे वन रूम किचन, आत्ता सारखं सोसायटी - कमिटी असं काही नसायचं, वॉच मन पण न्हवता आणि गेट सुद्धा, कचरा न्यायला मात्र एक माणूस होता ..अशी अनेक येऊन गेली, पण लक्षात राहण्या सारखा कनू ... मी सातवी आठवीत असेन, रविवार सकाळ,  दार वाजलं (आमची बेल कधी चाललीच नाही) मी उघडलं तर एक इस्त्री केलेल्या पांढरा शर्ट आणि पॅन्ट घातलेला माणूस, म्हटलं काय हवं? कचरा .. म्हटलं का? तर तो म्हणाला आज से मे है कचरेवाला ... आयला एकदम हिरो टाईप (कपडे, दिसायला नाही).. एकदम ऐटीत,  नाव काय? अमित ... (डायरेक्ट अमित). 

अमित एकदम भारी होता ऐटीत असायचा कायम टाप टीप, केस पण हिरो टाईप्स  पण विडी तंबाकू कधी ओढताना खाताना पाहिलं नाही, तो खूप वेळ असायचा आमच्या इथे मग आमची मैत्री पण झाली, आई कडून बरेच दा पैसे उसने घेऊन जाईचा आणि तास तास उभा राहायचा गॅलरीच्या बाहेर, (आम्ही तळ मजल्यावर राहायचो) जाईचाच नाही अजिबात, खूप चिकाटी होती त्याची,  मग चिडून आई त्याला ५/१० रुपये द्यायची आता पुढच्या वेळेस नाही मिळणार समजलं? हि वर प्रेमळ धमकी, काय चेहरा खुलायचा त्याचा ५ रूपे बघून,  तो हां असं म्हणायचा आणि परत ये रे माझ्या मागल्या .. मी त्याला म्हटलं कि काय रे अमित असं का करतोस? नवीन पिक्चर आला कि मला बघायचा असतो म्हणून ...म्हणजे तो उसने पिक्चर पहिला न्यायचा.   तो शूटिंग बघायला  मढ ला जाईचा ... आणि मग मला रंगवून सांगायचा मी अमुक हिरोला पहिला हिला पहिला त्याला पहिला .. खर तर मी गावा वरून हिरो व्हायला आलो होतो , पण रोल मिळे पर्यंत टाइम पास आणि थोडे पैसे कमवायला हे करतो , लहान पणी आपल्याला पटत सगळं (मला अजून सगळ्यांचं सगळंच पटत). तू जातो कसा रे? मी त्याला विचारलं कारण आम्ही राहायचो बोरिवली पूर्व आणि तेव्हा रिक्षा वगैरे काही नसायच्या, मला मढ आयलंड ऐकून माहित होत  ... कचऱ्याच्या गाडीवरून..कनू म्हणाला  म्हटलं काय? कचऱ्याच्या गाडीवरून? तो मुन्सिपाल्टी मध्ये "रोजी" (डेली वेजेस) वर काम करायचा , दोन चार रुपये मिळायचे दिवसाला, (sub contract ,ती एक गोष्ट मला नंतर कळली होती  आता नसेल ती पद्धत, तेव्हा होती). हा इधर से फिर मै गाडी पे कचरा लेता है और फिर मढ का गाडी मिला तो शूटिंग ..... अनेक गोष्टी रंगवून सांगायचा मला.  कल किसको देखा होगा  सागर मैने ? बोल? मी -किसको? मिठून एकदम सॉलिड मेरी तरः एकदम व्हाईट मे (मेरी तरः म्हटलं त्याने हे आज मला लिहिताना लक्षात आलं ) मे उसको हात दिखाया (परत मे हात दिखाया ), सही दिखताय ... तेव्हा सगळं नवल  वाटायच. हे सगळं बोलणं गप्पा आमच्या सुट्टीत त्याच काम झालं कि अकरा वगैरे किव्हा कधी दुपारी, गाडी पे नही मिला काम इसलिये आज इधर हि.  मला बरा टाइम पास होता , पण त्याचं बिचाऱ्यच एक दिवसाचा मोबदला जाईचा हे कळण्याचं वय नह्व्त. 

मध्ये दोन चार महिने तो गायब झाला आणि त्या जागी एक बदली बाई देऊन गेला, एकदा तिला आईने विचारलं अरे अमित कभी आयेगा? (खूप महिने तिच्या कडे पण उसनं मागायला कुणी आलं नाही म्हणून तिला  पण चुकल्या चुकल्या सारखं वाटलं असणार) कोण अमित? अरे तुमको काम दिया ना बदलीका वोह ... ओह वोह, वोह कनू है अमित नही... उस्का नाम कनू है अमित कोन बोला आपको? अरे चोरा नाव पण खोटं .. तो कधी येऊन मी  त्याची फजिती करतोय असं झालं होत ... आला तो दोन चार महिन्याने ... मग मी त्याला क्या कनू? कैसा है ? असं म्हटल्यावर कसला उडाला ... सगळेच त्याला कनू .. ए कनू म्हणायला लागले, मुद्द्दाम  .... एकदा असच गप्पा मारताना (काय तरी बघा , कुणाशी गप्पा? पण माझ्या आईच मला आता खूप नवल आणि कौतुक वाटत कि तिने ह्याच्या बरोबर बोलू नकोस ह्याचाशी खेळू नकोस असं कधीच केलं नाही, म्हणजे कुणाहि  बद्दल, नुसतं कनू बद्दलच असं नाही,  माझ्या पुढल्या आयुष्या मी म्हणून कुणाला खालचा वरचा असं नाही समजलो सगळे शेम टू शेम, मी कुणात हि पटकन मिसळू शकतो त्याच बीज लहान पणिच हे असं  पेरल गेल ते आत्ता लक्षात येतंय ....) मला म्हणाला यार मेरेको मेरा नाम पसंद नहिये इसीलिये मे अमित बोला, तू मुझे अमित बोल ना .... मी किती हसलो त्याला म्हंटल अरे नाव काय वाईट नसतं .. तुला काय मला म्हणाला माझं नाव सागर असत तर मी अमित का केलं असत .. कनू हे काय नाव आहे का? मी उद्या पिक्चर मध्ये गेलो तर चालेल का असं नाव .. मला केवढं हसू आलं होत तेव्हा.. मी त्याला म्हटलं ठीके मी अमित अशीच हाक मारेन . आता वाटत कि आपण किती लेबल लावतो आणि नाव ठेवतो अगदी नावाला सुद्धा .. 

एक दिवस एका बाईला आणलं .. आई म्हणाली कोण रे हि ? बायको म्हणाला आणि लाजला तोच (जाम गोड ..) बायको पण स्वछ नीट नेटकी , कनूच काम सुधारलं मढ वगैरे बंद झालं (आमच्या गप्पा पण बंद झाल्या, असं हि मी कॉलेजला गेलो , मला हि वेळ नव्हता ). ती जोडी फार छान होती, त्याला बायको साठी काम हवं होत घर काम, आप रखलो , एकदम साफ है म्हणाला (काही गोष्टींचा अर्थ मला आता फार लागतोय तेव्हा नाही लागला), आई म्हणाली अरे ठेवली असती, माझ असं काही नाहीये (बाकीचे नाही म्हणले होते), पण माझ्या कडे बाई आहे तिला मी नाही काढू शकत, खूप वर्ष आहे ती. तिला आणि कुणी काम दिल नसतंच हे कनूला आणि तिलाहि  माहित होत, मला पण वाईट वाटलं, पण एका गरीबाच्या पोटावर लाथ मारून दुसऱ्या कस काम देणार? पण दोघे फार गप्पा मारायचे,  हसायचे, ती झाडू वगैरे नाही मारायची नुसती यायची अधून मधून.  एकदम प्रेमात असलेलं जोडपं होत . ती दिसायला पण नीटस होती नाहीतर आमचा कनू लग्न करणार? पण छान होते दोघे.  मधेच कनू पैसे मागायचा, मी पण दिलें त्याला एक दोन दा, नवीन सिनेमा आला असणार हे मला कळलं..

एकदा  बायको ला बर नाहीये पोटात दुखतंय, पैसे द्या म्हणाला, हे कारण नवीन होत, पण मग थोड्या दिवसाने म्हणाला,  गाव लेके जाताय, सगळ्यांना वाटलं बाळंतपणाला नेलं असणार, बदली माणूस देऊन गेला, वर्ष झालं तरी येईना .. त्या बदली माणसाला  विचारलं   कि कनू कभी आयेगा .. मालूम नाही म्हणला, उसकी बीवी कैसी है .. मर गई.. काय? हा पेट मे कॅन्सर था इधर से गया और महिने के अंदर मर गयी ... तो इतक्या सहजतेने मर गई म्हणाला .. कि हे  नॉर्मल आहे ह्यात काय एवढं? आमच्या सगळ्यांना खूप धक्का बसला, काय खाण्यात आलं का काय काही कळेना. पण अजून आठवलं तरी वाईट वाटत.  

सहा महिन्याने आला परत , पण एकदम लॉस्ट होता विडी ओढत होता, मी म्हटलं हे काय नवीन? नुसता धूर सोडला त्याने.  यायचा काम करायचा आणि जायचा कपडे मात्र पांढरे कडक इस्त्री वाले, पैसे पण सारखे मागायला लागला उधारी बंद केली आम्ही, एक दिवस एका बाई बरोबर आला आणि हातात एक मुलं दोन चार वर्षाचं , पेहेचानकी है, मी न विचारता सांगितलं, ती यायची रोज त्याच्या बरोबर काम पण थोडं करायची झाड लोट पण लग्न झालेले लोक कशी असतात तशी दोघे यायचे आणि जायचे, फार गप्पा नाही काही नाही.    पिक्चर च वेड कमी झाल होत .. हसरा होता, तसाच चेहरा सडपातळ बांधाच जाड वगैरे झाला नाही कधी , पण त्याच्या चेहऱ्यातल काहीतरी गेल होत.. आमच्या कट्ट्या वर जिथे आम्ही गप्पा मारायचो लहान पणी , तिथे एकदा विडी ओढत बसला होता, मला बघून म्हणाला सब ठीक कॉलेज और सब, ठीके म्हणालो आणि त्याला म्हटलं क्या कनू शूटिंग देखता है के नही?  नही म्हणाला अभी क्या करेगा ? अब चलता वैसा चलने दो, इतका करुण मी कनूला पहिल्यांदाच पहिला, मी एक क्षण त्याला मिठी मारू का असा विचार केला? पण त्याने नजर वळवून धूर सोडायला सुरवात केली होती,  काही न बोलता निघून गेलो तिथून तेच शेवटचं बोलणं असेल आमचं  .. त्याने नोकरी सोडली आमची.  त्या   नंतर पण खूप येऊन गेले खूप मजेदार काही मॅड .. पण कनू सारखा नाहीच आला ...

आज corona मुळे घरीच बसलोय आणि फक्त आमचा झाडू वाला न चुकता रोज प्रमाणे आजहि  आला आणि न चुकता रोज येतो म्हणून त्याला मी १०० रुपये दिले आणि त्याचा चेहरा एकदम खुलला, मला एकदम कनू आठवला....  का कनू आठवला म्हणून त्याला पैसे दिले कोण जाणे? 

मंगळवार, २४ मार्च, २०२०

बिरबल ची खिचडी

बिरबल च्या खिचडी सारखं आहे सध्या, रात्र किती मोठी आहे ते ठाऊक नाहीये, पण बिरबलाच्या गोहष्टीतल्या त्या थंड पाण्यात उभ्या असलेल्या माणसा सारखं आपण व्ह्याच आहे. मीही तेच करतोय आणि माझी खात्री आहे अनेक जण तेच करत असणार. हा curfew कधी संपेल ठाऊक नाही, म्हणून मी एक युक्ती केली ... हे झालं कि मी आधी हे करणारे असं माझं मलाच सांगतोय... म्हणजे काही तरी फँटसी मस्त असं काही जे मला आवडत,घरा बाहेर जाऊन,  मग मी त्यात आणिक रमतो थोडे अधिक रंग भरतो. आता  मी दीदी सारखे रंग भरू शकत नसलो तर देवाच्या दयेने चार चौघांन पेक्षा गोष्टी रंगवण्याची कला माझ्या कडे जास्त आहे आणि फसवायला किव्हा पटवायला आपल्या स्वतः पेक्षा जास्त सोपा माणूस जगात नाही, आपण आपल्यावर फार विश्वास ठेवतो आणि आपल्याला आपलच फार पटत, त्या मुळे मी हि युक्ती काढली आहे. आता , उद्या हे सगळं संपलं म्हणजे मी ती फँटसि करेनच असं नाही, कारण फँटसी मध्ये त्या त्या गोष्टी त्या वेळेला असतीलच असं नाही, पण दिल को बेहेलाने कि लिये गालिब ये खयाल अच्छा है ! असं म्हणत मी आपली रोजची काम करत सुटतो कारण मनात हे संपल कि पाहिलं ते करायचं. तुम्ही तुमची अशी एक फँटसी ठेऊन बघा, मधून मधून हळूच बघा, स्वतः खुश व्हाल काही लोक लाजतील पण आज पेक्षा ह्या नंतर काय छान हे बघण्यात तुम्ही खुश राहाल .. 

मला अजून एक मोठी प्रेरणा मला माझ्या watchman कडून आज मिळाली, त्याच्या वेळेला ड्युटी संपवून तो नित्य नियमाने जे करतो तेच आज करत होता, सगळ्या गाड्या पुसत होता आणि त्याच काम बघण्या सारखं आहे, अगदी मन लावून शांत पणे दोन तास गाडया पुसतो आजही तेच एकही गाडी तीन दिवस बाहेर पडली नाहीये पण तो तेच काम मन लावून करत होता , फक्त मध्ये त्याने तंबाकू मळल्यावर मी त्याला झापला (आवड ), कारण तो त्याच हाताने  तंबाकू मळून तोंडात टाकणार होता, पण मग घाबरून लगेच फेकून दिला, म्हटलं जा हात धू आणि मग खा, नको म्हंटला, इस बहाने आदत छुटेगी ... काही नाही तरी हा फायदा होईल त्याला ..(आणि आम्हाला)  पण सांगायचा मुद्दा म्हणजे, तो दोन तास सगळं विसरून आपलं काम करत होता, मनाला सांगितलंय कि सगळं नॉर्मल आहे, तसा तो शांत आणि संत आहे (४ मुलं आहेत, तंबाकू खातो) :). पण सध्याच्या परिस्थितीत पॉसिटीव्ह राहायला उत्तम उपाय, आपल्या मनाला सांगा  सगळं नॉर्मल आहे  ...