शुक्रवार, २४ मार्च, २०२३

भूषण शिंदे - कप्तानजी

२४ मार्च २०२३

काल दुपारी नेहमी सारखं ऑफिसचा  कॉल कॉल खेळत असताना, माझ्या एका मित्राचा (चुकीच्या इंग्रजीत) मेसेज आला कि भूषण सकाळी हार्ट अटॅक नि गेला, मी कॉल ताबोडतोब बंद करून फोन केला म्हणलं कोण भूषण ...शिंदे म्हणाला, विश्वास बसला नाहीच म्हणून अजून दोघांना फोन केला कन्फर्म झालं  ... मी पाच मिंट थंड पडलो , काहीच सुचेना मला. गुढी पाडव्याला आमच्या जुन्या ऑफिसच्या ग्रुप वर त्याचाच मेसेज होता शेवटचा (त्याच ग्रुप मीच तो गेल्याचा मेसेज टाकला त्याच्या मेसेजच्या खाली).  रिक्षा करून लागलीच त्याच्या घरी निघालो.. 

भूषण ला मी २००७ साला पासून ओळखतो , तेव्हा मिशी होती त्याला, नंतर काढली ४ एक वर्षाने, बायको ला चेंज नको का मला म्हणाला, त्याच्या इतका हजर जवाबी आणि त्याच्या इतका sense of humour असणारा माणूस  मी तरी पहिला नाही . situational आणि spontaneously विनोद करण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नाही (आता तर नुसता हात सुद्धा धरण्याच्या पल्याड गेलाय). सगळ्यांशी चांगले सम्बंध ठेऊन असणारा, म्हणजे बॉस असो कि अगदी नवोदित, हा एक मित्रा सारखाच होता. मी त्याला पॉलिटिक्स करताना पण नाही पाहिलं कधी, पण तो चतुर आणि सतर्क होता म्हणून इतका निर्मळ मनाचा असून आज इतक्या वरच्या position ला होता. त्याच्या कडून मी खूप सल्लेघ्यायचो , संमजवण्याची पद्धत पण अफाट होती त्याची, आमच्या पेक्षा वयाने लहान असून टीम चा कॅप्टन होता (half century तरी पूर्ण करायची कप्तानजी). एकदम रॉयल माणूस आणि अगदी complete family man. 

पाच वर्ष झाली मला कम्पनी सोडून, कधी घरी जायचा योग् नाही आला आणि आला तो असा. आई वडील दोन  बहिणी बायको (खूप कौतुक होतं त्याला आणि तो बोलून दाखवायचा पण नेहमी)एक मुलगी एक लहान मुलगा आणि आमच्या सारखा मोठा असा मित्र परिवार होता काल त्याच्या घरी. 

मी मध्यन्तरी स्पिती ला गेलो होतो हिमाचल ला, तेव्हा ते डोंगर बघून अबब झालं होतं मला , मी सह्याद्री वर पोसलेला आणि तेच डोंगर मोठ्याले वाटणारा , पहिल्यांदाच हिमालयन मौनटन रेंजेस पहिले आणि डोंगर किती मोठे असू शकतो ह्याचा प्रत्यय आला ...जाऊन बघा म्हणजे कळेल मी काय म्हणतो ते, काल भूषणच्या  घरी जाऊन आलो तेव्हा मला तसा दुःखाचा डोंगर दिसला , आपण लोणावळा घाट  पण किती मोठा म्हणतो, मग हे काय म्हणणार. सडे दहा ला कॉल संपवून, जरा अस्वस्थ वाटतंय म्हणाला आणि कोलॅप्स होऊन गेला ... ह्याला काय अर्थ आहे , थोडा टाइम तरी द्यायचा ना , एरवी बोलण्यात अचुक टाईमिंग साधणारा इथे नियतीच्या टाईमिंग पुढे विकेट गमावून बसला आमचा कॅप्टन. चुकलास  मित्रा. एरवी तोंड उघडलं कि आम्हाला हसवणारा आज शांत झोपला असताना आमच्या डोळ्यात अश्रू देऊन गेला. प्रचंड चटका लावून गेला... 

आमच्या  मधला असा हा पहिलाच गेला , बाकी ओळखीचे असे खूप गेलेत. डिसेम्बर ला त्याचा वाढदिवस होता, मी नेहमी सारखं  कुणीतरी happy birthday केलं म्हणून मम केलं, एकदा बसू ,  भेटू असं नुसतं बोलणं झालं खूपदा. (साला जाम गिल्ट येते ), आपण नुसतं म्हणतो आपल्याला काहीहि होणार त्यांना झालं, झालं कि कळतं.  पण मी एक ठरवलं कि नुसतं मम न करता फोन करायचा दोन मिंट का होईना? वर्षातून एकदाच का होईना बोलायचं थोडं तरी , पन्नाशी आल्यावर आली अक्कल. आणि आता फार हेवे दावे नाही उरले फार कुठे पोचायचं ध्येय फार मोठी ambitiion . पण नाही आता, नाती जपा असं झालंय आमचं. तुम्हाला कुणी फोन केला तर नक्की उत्तर द्या मीटिंग मध्ये असाल तर दहा सेकंड घ्या आणि कळवा करतो म्हणून नन्तर (आणि करा), ऊगाच कपाळावर आठ्या नका आणू . क्षण भंगुर बोलायला सोपं असतं. अनुभव आला कि कळतं आणि तो कुणावरच येऊ नये हि ईश्वर चरणी प्रार्थना.  

आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर. अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर - बहिणा बाई 


३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

हो रे, खूप वाईट बातमी दिलीस तू काल. कप्तानजी अशी विकेट टाकतील असे वाटले नव्हते. Never a dull moment with him around!! त्याचा सोबत पोस्ट लंच किवा Tea ब्रेक session's मग ते Akruti, Vikhroli किवा ऐरोली असो... किस्से आणि गोष्टी ... त्याची ती बोलण्याची शैली... खूप खूप आठवणी काल दाटून आल्या... त्याच्या सारखं दुसरा होणे नाही!!

अनामित म्हणाले...

सागर.. अगदी सोप्या भाषेत भूषण बद्दल लिहिलेस... ही बातमी काही केले तरी पटत नाही... नियती पुढे काय... पण सर्व IT मित्रानी खरच बोध घ्यावा... आपल्या नंतर काय....

अनामित म्हणाले...

अरेरे! मित्राचा मृत्यू आणि लेख दोन्ही चटका लावणारं😞