तुम्ही कधी बिस्किटाचा चुरा विकत घेऊन खाल्लाय का?
एकदा असाच माझ्या लहानपणी, मी आमच्या राजेंद्र स्टोर मध्ये काही बिस्कीट का ब्रेड का टोस्ट काहीतरी आणायला गेलो होतो , तेव्हा माझ्या ओळखीचा एक मुलगा पण आला होता तिथे बन्सी चाळीतला, त्याने १० पैशाचा चुरा मागितला, माझ्या करता ते फार नवल आणि नॉवेल होतं, कारण मी कायम बिस्कीट किव्हा टोस्ट विकत घेतले होते. तो मित्र म्हणाला मस्त रेहताय खाया क्या कभी? तू भी ले? चुरा हा काय प्रकार आहे मला कळलं नाही कारण त्या पोराने पुडीत बांधून घेतलं. माझं प्रश्नार्थक चेहरा बघून तो स्टोर वाला म्हणाला तू सोड ते, त्या पोराला पिटाळलं आणि मला माझा ब्रेड का पुडा काय तो दिला.
मग माझा इंटरेस्ट आणिक वाढला काय हे चुरा प्रकरण? मग एक दिवस मला ते गुपित समजलं (ती स्टोरी वेगळी), राजेंद्र स्टोर किव्हा केळकर स्टोर किव्हा असल्या दुकानात ना बिस्कीट ,खारी , टोस्ट बरणीत ठेवायचे आणि मग ती बिस्किटं सम्पली कि खाली चुरा उरायचा , ते फेकून द्यायच्या ऐवजी हि लोक ते १० पैश्याला वगैरे विकायचे. मग तो चुरा चहात टाकून ती खायचे. आमचं नशिब चांगलं होत म्हणून बरणीतली बिस्कीटच होती खालचा चूरा नाही.
आज आठवलं कारण सहज म्हणून मी आज घरातल्या बरणीत बिस्कीट भरत असताना तो उरलेला चुरा खाऊन बघितला (काय हौस बघा) कुरकुरीत नसला तरी खुशखुशीत मात्र नक्कीच होता ...
काय तरी आठवणी असतात. एक कण भर चुरा पण मनाला मण भर चारा देऊन गेला ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा