गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८

कीर्तन

बोरिवलीत दातापाड्यामध्ये, लहान पणी आमच्या घरा जवळ रामाचं देऊळ होत, राम नवमी च्या दहा दिवस आधी पासून ते राम नवमी पर्यंत तिथे कीर्तन होयच आणि ते सुद्धा दहा पर्यंत बंद, फार तर साडे दहा, एक बुआ हातात चिपळ्या घेऊन खाखणीत आवाजात भजन म्हणायचे मधेच एखादी छान गोष्ट सांगायचे.  आता अचानक KBC पाहताना एखाद पौराणिक प्रश्नावरच उत्तर पटकन येत, बहुदा आमच्या बाल मनावर काही गोष्टी कोरल्या गेल्या त्या उठून दिसतात मलाच. 

हे आठवायचं कारण म्हणजे काल आमच्या बिल्डिंग खाली माताकी चौकी नावाच्या कार्यक्रमात(?) अतिशय गोंगाट आणि हिंदी पिक्चर च्या गाण्यांच्या चालीवरची भजन एक माणूस दहा स्पीकर आणि कीबोर्ड आणि ढोलक साथीला घेऊन माईक घेऊन बेंबीच्या देठा पासून रेकत होता, आता ह्याला भजन म्हणणं म्हणजे एखाद्या भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या कुणी तरी डॉली नामक बाईला डायरेक्ट माधुरी दीक्षित म्हणून सत्कार करण्या सारख आहे. विशेष म्हणजे काही लोक मान सुद्धा डोलवत होती आणि तिथेच काही लहान मुलं पण बागडत होती. आमच्या बाल मनावर जे शांत सोज्वळ नकळत जे रुजले तसे ह्या लहानगांच्या मनावर काय कोरल जात असेल?

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

अविनाश

ऑफिसच्या एका ट्रेनिंग मध्ये ओळख (self introduction ) करून देताना मी सांगितलं कि मी बान मध्ये होतो, बान वाल्यांचं एक वेगळं विश्व आहे त्या मुळे तशी माणसं विरळ, विखूरलेली तरीही जोडलेली असतात, म्हणून मी फार काही बोललो नाही, फक्त बान consultant एवढच सांगितलं . ब्रेक मध्ये एक माणूस आला आणि मला म्हणाला तू बान मध्ये कधी होतास? आईला,  बान म्हणजे काय हे लोकांना ठाऊक नसत आणि हा माणूस मला एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न विचारात होता, पण नवल म्हणजे मी ह्याला ओळखत न्हवतो, मी सांगितल्यावर म्हणाला मी पण बान वर होतो पटणी मध्ये, मग अजून एक कंपनी, मग खूप ओळखी निघाल्या, खूप बर वाटलं, माणूस एकदम प्रसन्न होता, चेहऱ्या वर एक स्मित, genuine interest घेऊन मी काय बोलत होतो ते ऐकत होता, मग अच्छा भेटू असं झालं. कुणीतरी मला म्हणलं नवीन आहे एखाद वर्ष झालं असेल, येडा आहे, अरे, मला जाम राग आला कारण एक तर तो आमचा बान वाला होता, तसा मोठा माणूस होता आणि वर बोलायला एकदम friendly असा आमच्या ऑफिसात सापडणं कठीणच . एक तर मला इतकं judgemental होयला आवडत नाही आणि मला तो माणूस खरंच आवडला होता एकदम कनेक्ट झाला होता. पण आमच्या इथे बहुतेक सगळेच असेच judgemental  होते. 

चार एक महिन्याने  मी पुण्याला ऑफिसात गेलो असताना , तोच माणूस मला एका केबिन मध्ये बसलेला दिसला, म्हणजे मोठ्या पदावर होता, कारण खूप मोठा असल्या शिवाय केबिन मिळत नाही तुमहाला , मी काही त्याला आत जाऊन हॅलो वगैरे केल नाही , ह्याची दोन कारण होती, एक म्हणजे मला शाईन मारायची न्हवती कि मी ह्या मोठ्या माणसाला ओळखतो आणि मला शाश्वती न्हवती कि हा केबिन मधला माणूस कसा रिऍक्ट होईल , तर तोच बाहेर आला "अरे कधी आलास , मी मगाशी पहिलं पण तु लांबून जात होतास ?" मग परत जुन्या गप्पा, सासरी गेल्यावर एकदम आपल्या गावची एखादी सखी भेटली कि कस होत तस झालं मला, एकदम करेक्ट बान वाला निघाला. 

चल भेट पुन्हा आलास् कि म्हणाला आणि केबिन मध्ये गेला, दारावर अविनाश एवढीच पाटी होती. तर हा आपला अविनाश बसतो इथे असं मी मनात म्हंटल कारण मला वाटलं होत कि दुसराच एक अविनाश बसतो . 

मी पुण्याला गेलो कि फक्त लांबून हात दाखउन मान डोलावून वंदन होत, आमची खरी मैत्री जमली ती मी कामा करता वर्ष भर पुण्याला शिफ्ट झालो तेव्हा झाली, खर तर अविनाश हा जग मित्र आहे त्या मुळे मैत्री तुम्ही करता त्याने तुम्हाला केव्हाच मित्र केल असत. 

मी पुण्याला माझ्या भाओजींच्या घरी राहायचो निगडी ला, म्हणजे पुणे नाही (अजिबात नाही), ऑफिस पासून एक १५ किलोमीटर लांब घर होत. मी सहज विचारलं कि अरे कुणी राहत का तिथे, तर लोक म्हणाले अमित आहे आणि अविनाश राहतो ना ... आईला अविनाश तो माझ्या पेक्षा १.. २.. ३... ४... ५ लेवल मोठा तो मला का आणेल आणि सोडेल? मला पहिल्या दिवशी आणि बरेचदा अमित ने सोडल (पण आज अविनाश बद्दल पुन्हा कधी अमित बद्दल, कारण मला तो पण खूप आवडतो ), बाकी बहुतेक ये जा अविनाश सोबत 

seventh floor ला आम्ही सगळे चहा करता भेटायचो (३दा ), त्यात मी सांगितलं अविनाश ला माझ निगडी बद्दल , तर हा माणूस मला म्हणाला अरे ये कि माझ्या बरोबर मी तिथेच राहतो, मला खूप हायस आणि आधार वाटला, मी थोडा मानी आहे, मागायला कचरतो आणि कुणी दिल तर दुपट्टीने परत फेड करतो, पण हा इसम मला स्वतः अगदी जवळचा माणूस समजून काहीच हरकत नाही म्हणाला आणि  आनंदानी मी सोडेन म्हणत होता, मी त्याचे पायाच धरले असते (तसा वयाने तो फक्त सहाच महिने मोठा आहे माझ्या पेक्षा ), पण मी पुण्यात असल्याने स्वतःला सावरलं. 

बहुदा आमची खरी मैत्री तिथून सुरु झाली, साडे सातला (साडे सात म्हणजे साडे सात ) तो मला पीक अप करायचा आणि ५ ला आम्ही निघायचो, गप्पा होयच्या म्हणजे मी बोलायचो आणि तो कान देऊन ऐकायचा, मग मी आणि भावोजी एकदा त्याच्या घरी गेलो आणि त्यांचे जुने नगर चे संबंध निघाले, घरोबा झाला, मी त्याला माझं सगळं वयक्तिक सांगितलं त्याने खूप चांगले सल्ले दिले, कधीही मध्ये बोलणं, विचार लादणं केलं नाही त्याने कधीही "throwing his weight" केलं नाही (मी थोडा बारीक असेन, त्याच्या पेक्षा:)), मी खूप शिकत गेलो त्या तासा भरात (जायला अर्धा आणि यायला तेवढाच ). 

अविनाश हा एक उत्तम क्रिकेट पटू आहे टाइम्स शिल्ड्स खेळलाय ते सुद्धा दिग्गजान बरोबर , मी सुद्धा क्रिकेट खेळलो आहे असं म्हणणं त्याला भेटल्या नंतर सांगणं बंद केलं, तो A division वाला आम्ही z मध्ये वर्दी लागली म्हणून मिरवणारे (Z असं division नाहीये, हे फक्त प्रतीकात्मक आहे ). 


दोन चार गोष्टी मला त्याच्या खूप आवडतात, एक म्हणजे तो early morning person आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रह्मा मूहूर्तावर उठणारा माझ्या ओळखीत इहिलोकी हा पहिलाच इसम, एक तास फिरून, तास भर पूजा करून हा माणूस साडे सातला (साडे सात म्हणजे साडे सात) तय्यार , त्याला मी कधीही पेंगलेला, झोपेत, अवतारात पहिला नाहीये, दुसरं म्हणजे तो प्रत्येक माणसाला उत्तर (म्हणजे उलट नाही ) देतो, म्हणजे ई-मेल - फ़ोन - chat - message ह्या सगळ्या माध्यमातून.  वर पाचाला घरी, घरून परत काम करतो ते वेगळं. उत्तम बाबा मुलगा भाऊ नवरा जावई  काका मामा आहेसच , मी जास्त खाजगीत जात नाही कारण तो माणूस तसा personal आणि professional वेगळं ठेवणारा आहे... आणि त्याच्या परवानगी शिवाय मी काही लिहू इच्छित नाही, पण जेवढं मी जाणतो तो ह्या पेक्षा खूप अधिक असेल ..तो एक चांगला आणि सच्चा मित्र आहे. त्याने परक्यांसाठी सुद्धा खूप केलय (आता मला अविनाश फटके मारणार). 


काल त्याने सर्वांना पार्टी दिली, कारण त्याने नवीन नोकरी धरली, नवीन म्हणजे परत आधीच्या म्हणजे खूप आधीच्या कंपनीत परत त्याला आमंत्रण दिल ते त्याने स्वीकारलं , म्हणजे त्याला आधीच्या सगळ्या कंपन्या घ्यायला आतुर आहेत, ह्यात खूप काही आल. त्याच्या बद्दल कुणीच वाईट बोलत नाहीत, काहीना काही तरी चांगलच केलय त्याने  सगळ्यांसाठी . 

अविनाश चा मोठे पणा त्याचा माणूस असण्यात आहे, लोकांना देव व्ह्याच असत आणि अविनाश ला माणूस होण्यात आनंद वाटतो, देव होणं खूप सोपं असत कारण तो आपल्याला दिसत नाही का भेटत नाही, पण माणूस रोज दिसतो आणि भेटतो , तेव्हा माणूस होणं आणि तस राहणंच खूप कठीण आणि ते कठीण काम हा माझा मित्र सहज रित्या करतो ... लिहायला खूप आहे आणि चांगलच, पण आज थोडक्यात ..... 

शनिवार, २६ मे, २०१८

भक्त - अभक्त

हल्ली मोदी भक्त आणि मोदी द्वेष्टे अशी दोनच लोक आहेत ,  जगात . हा लेख मोदी विषयी नाही तर हल्लीच्या विचार पद्धती बद्दल आहे .  आपण भारतीय फक्त पांढरा आणि काळा हा भेदभाव करतो , म्हणजे दोनच रंग ग्रे हा नाहीच मुळी,  पु लं च्या म्हैस मध्ये तो orderly म्हणतो तस , "पुलिस न्हाय तर काय चोर हाय " अरे म्हणजे पोलीस किव्हा चोर, मध्ये साधं नाहीच कुणी. शेक्सपिअर चे सगळे हिरो "ग्रे" आहेत.  १००% हिरो नाहीच कुणी. आता शेक्सपिअरच उधाहरण दिल कारण तो आपल्याला माहित आहे. कालिदासा बद्दल आपण सगळेच अज्ञानी आहोत . कारण मला शाळेत कुणी कालिदास शिकवलाच नाही. इतिहास का महत्वाचा हे इथे आपल्याला कळत. 

पर्वा एका चर्चेत आला हा विषय म्हणून सांगतो,  मी सांगितलं कि आपण शेक्सपिअर शेक्सपिअर करतो पण भारतीय लेखक नाही , वाद (चरचा म्हणूया )  हा मोदी , हिंदुत्व वगैरे असा होता, तर इतिहासाचा काय संबंध? अस मला माझा भाचा म्हणाला, तो खरा तर BA आहे म्हणजे त्याला इतिहास हा विषय असणारच, मी १९८५ साली इतिहास सोडला, म्हणून  ही आस्था असेल इतिहास बद्दल कारण  आपल्याकडे  इतिहास म्हणजे तारखा , राजांची नाव , स्थळ , कुणी कुणाला मारला हेच.   मी शाळेचा इतिहास न वाचता बाहेरून अनेक पुस्तकातून वाचला . शिवाजी महाराज हे मला शाळेत ग्रेट वाटलेच नाहीत , नंतर स्वतंत्र पणे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला त्यांना सावरकरांनी हिंदू नृसिम्ह का म्हटलंय ते कळलं , असामान्य व्यक्तिमत्व , जिद्द , हिम्मत , खरा राजा कसा असावा त्याच उत्तम उधाहरण .

राज्य कर्त्यांनी त्यांचा स्वतःच्या स्वार्था करता त्यांचा इतिहास बदलून आपला वर्तमान समृद्ध करून घेतला .   ह्याच मुख्य  कारण म्हणजे आपल्याला शाळेत शिकवला तो इतिहास. अफझल खानाचं पोट फाडलं ते आहे  पण त्याच्या आधी काय घडलं त्याला तिथे का आणलं? कस आणला? काही नाही .... अश्या एक ना अनेक गोष्टी , नुसत्या वर पांगी .... अभिमान वाटायचा कुठून? नुसता फाजील गर्व .... गरवा वरून आठवल , पुण्यात एका टुरिस्ट गाडी पाठी महाराजांचा असा प्रोफाइल फोटो, म्हणजे चित्र आणि खाली "बघतोस काय? मुजरा कर "   हे वाक्य . मुळात त्या ड्रॉयव्हर ला मी का इतर कुणी का मुजरा करावा? रस्त्यात तंबाकू खाऊन थुंकतो म्हणून? का सिग्नल तोडतो म्हणून ? का कारण नसताना हॉर्न मारतो म्हणून ? मुस्काट फोडायला हवय खरं तर, पण मला इथे सांगितलंय कि ह्या लोकल  लोकांच्या नादी नको लागूस, (मुंबईत मी खूप लोकांना थोबडवलाय पान खाऊन थुंकतात म्हणून ) ही मुंबई नाही. दुसरी गोष्ट म्हणजे , शिवाजी महाराज , दरडावून मुजरा कर ... असा सांगणाऱ्यातले न्हवते , साध्या (महाराजांच्या) पुतळ्याला  पण मी लगेच नमस्कार करतो , त्यांना असल्या  राम रामाची गरज काय? तर  सांगायचा मुद्दा असा कि इतिहासच असा अर्धवट चुकीचा कळला, तर आपण चुकीची भांडण , चुकीचे नेते आणि चुकीची माणसं मारणार आणि चुकीच्याच  माणसांना फुकट हिरो करणार (दाढी ठेवली म्हणजे कुणी महाराज होत नसत महाराजा ). 

गाय खायला बंदी म्हणून मोदी वाईट ,  खूप विनोद , कारण भारतात गौ हत्या य वर्षा पूर्वी बंद केली आहे, इथे आपण (मी नाही हो ) म्हैस खातो , एक तर माझा स्वतःचा बंदी वर विश्वास नाहीये,  मी परदेशात काहीही खातो , गाय स्वतः मागून खाल्याचा मला स्मरत नाही, पण मी नाही खाल्ली अशी समजूत माझी नाही , कारण एखाद वेळेला त्या हॉट डॉग मध्ये असते गाय अस मला कुणी तरी म्हणलं होत आणि मी ब्रिटिश ब्रेकफास्ट खाल्ला आहे.  मी सावरकरांना खूप मानतो त्यांची गाई बद्दलची मत वाचा एकदा  ... असो ... पण  बीफ बंद म्ह्णून एक माणूस वाईट? तर व्यक्ती स्वातंत्र्य .... हा मुद्दा आहे गाय नाही असं मला पटवून द्यायचा (फाजील )प्रयत्न झाला.  मला एक सांगा ,  जेव्हा फार काळ एखाद्याला कोणता तरी विकार जडला असेल तर डॉक्टर किव्हा वैद्य त्याला कडक पथ्यावर ठेवतात ना? सगळंच बंद करा म्हणतात , तस सध्या चाललं आहे, म्हणजे जुनी जडलेली व्याधी , patient  थोडा बरा होतंय, तर ही लोक, अरे अजून १० किलोमीटर नाही धावत? मग काय उपयोग जुना बरा होता डॉक्टर सारखाच सलाईन लावायचा , हाच म्हणाला बरा करेन  अजून धावत नाही patient पप्पूच बरा

हल्ली मला खूप लोक खूप विरोधाभासात जगतायत असंवाटत , म्हणजे आरे मध्ये मेट्रो नको कारण झाड पाडायची, पण तिथे झाड पाडून झोपड्या बांधल्यात त्या अधिकृत करा असेही लोक आहेत.  म्हणजे सगळेच समाज सेवक . "socialist"  मंडळी आहेत ना ही ह्या लोकांचा सोपा हिशेब आहे,  लोकांच्या (आई वडील म्हणू आपण ) ताटातल्या चार भाकऱ्या घ्यायच्या , दोन वाटायच्या (दोन स्वतः गिळायच्या ) आणि फुकट उपदेश करत सुटायचं, एक भाकरी कमवायची ना अक्कल ना लायकी, बहुदा हीच लोक उपदेश करत असतील, नाही? कष्ट करी माणसाला वेळ कुठून असणार . ही काम नसलेली माणस whatsapp वर फिरत असतात तिथूनच  ज्ञान संपादन करतात आणि अकलेची तारे तोडतात , काही आगा ना पिछा नुसत उचललं बोट लावल मोबाईल ला.

स्वैराचार आणि स्वातंत्र्य ह्यात फरक असतो हे आपल्याला माहित नाही त्या मुळे आधी शिस्त लावायला हवी पण शिस्त लावायची म्हणजे त्रास, फुकट मिळालेल हवय सगळं , अमेरिके सारखं स्वातंत्र्य, श्रीमंती हवी पण त्यांची शिस्थ नको , कंपलसरी मिलिटरी ट्रेनिंग नको , -४२ डिग्रीस मध्ये सैन्य पिकनिक करते ही समजूत , मेले तर मेले , त्यात काय? त्यांना पगार मिळतो ना?असा सवाल करतात हल्ली. त्यात नवल नाही आयत  फुकट सगळं मिळालं असत , शालेय शिक्षणात फक्त ब्रिटिश लोकांनी सांगितलेला इतिहास , भारत कसा नगण्य आहे हे सांगितलं असत शिकवलं असत आणि त्यात इंग्रजी चाच अट्टाहास , त्या मुळे वाचन पण तेच त्यांचच .  माझा भाषेला विरोध नाहीचे , पण मातृभाषा डावलून नाही . माझा एक मित्र आहे, मस्त आहे एकदम ,गोव्याचा आहे, पण जन्म शिक्षण इथलच,  कोकणी आहे , हा आईशी कोंकणीत बोलतो, मस्त वाटतं ऐकायला  , मुलाशी इंग्रजीत किव्हा हिंदीत, मी विचारल कि मुलाला येत नाही का कोकणी? येत म्हणाला , आज्जीशी  कोंकणीत  बोलतो , पण बाहेर नाही , अशिक्षित समजतील लोक अस  वाटत म्हणाला .... हीगत  सगळ्यांचीच आहे, कारण दीडशे वर्ष साहेब म्हणजे इंग्रज , इंग्रजी न बोलणारा म्हणजे अशिक्षित असंस्कृत ....  ही भावना इतकी खोल आहे कि बाहेर कस पडणार? आधीच्या राजकारण्यांनी तेच पुढे ठेवल चालू आणि नंतरच्या पण . change नाही होत , अशी तक्रार जी लोक करतात तीच change नाही होत अस   वाटत , जे पन्नास वर्ष चालू आहेत तेच.. त्या आधीच वाईट . इतिहास म्हणून महत्वाचा आणि चुकीचा इतिहास म्हणून घातक.

मी मोदीला मत दिलय म्हणून मी त्याला बोलणार हा एक मुद्दा मांडणारे लोक आहेत , एकदम बरोबर आहे , नाही निवडून दिलत तरीही बोला , कारण पंत प्रधान सगळ्यांचा असतो म्ह्णून . दुसरं म्हणजे वाईटच का? चांगल का नाही? तुम्हाला फक्त वाईटच दिसतंय? नवल आहे कारण लाल  फीत (डोळ्यावर )   लावणारेच अस बोलतात आणि मोदी ला चांगल म्हंटल  म्हणजे लगेच आम्ही भक्त आणि विरुद्ध बोललं कि देश द्रोही हीच दोन टोक . कारण तुम्ही व्यक्तीला दोष देताय आणि कुणी तर सांगतय म्हणून त्याला हिटलर आणि काय काय म्हणता, तरी माहिती म्हणून सांगतो, माओ से सुंग च नाव दुष्ट लोकान मध्ये हिटलर च्या वरती आहे आणि त्यांने सगळ्यात जास्त माणस  मारली आहेत आणि गळचेपी बंद केली, हीच लोक आता democracy  म्हणून ओरडतायेत .

पर्वा कश्यात तरी मोदी among  most popular world  leader  अस वाचलं , एका भारतीयला  ऑस्कर मिळाला कि आपण खुश होतो , पण मोदीला कुणी चांगला म्हणतय? म्हणजे बेकार , तर हिटलर पण popular  होता असा कीव येणारा मुद्दा कुणी तरी मांडला, किंव मला, मांडला त्या व्यक्तीची  आली , कारण हिटलर  जगात popular  न्हवता फक्त त्याचाच देशात . तो वर्ल्ड लीडर न्हवता तर त्याला युद्ध करून व्ह्याच होत ,हा फरक कसा कळणार? पोपट पंची  करायची स्वतःची बुद्धी whatsapp वर घाण टाकायची . त्या मुळे ह्या लोकांशी वाद न घालायचा निर्णय मी घेतलाय , कारण तुम्ही झोपलेल्या माणसाला उठवू शकता , झोपेचं नाटक करणाऱ्याला नाही ,  आणि स्पीकर फोडून काय उपयोग प्लेअर भलताच असतो.  पण बीफ नाही मिळत म्हणून एवढा राग?


मला काळजी सरकार ला नाव ठेवतात ह्याची अजिबात नाहीये,  पण त्या नकारार्थी स्वभावाची आहे, तरुण मुलांनी सकारात्मक हवं , पण तो हार्दिक (पटेल) म्हणा जिग्नेश म्हणा सगळे नकारार्थी आणि त्यांना follow करणारे म्हणून तसेच, मुद्दा सोडायचा किंबहुना नसतोच फक्त व्यक्ती द्वेष. मग त्या प्रकाश राज सारखं जाहीर पोपट होतो. पण त्याच ठीके त्याला खूप पैसा अडका मिळतो, म्हणून ह्या अंध लोकांनी उगाच टीका? आणि आम्ही बाजू घेतली किव्हा हटकलं तर आम्हाला भक्त म्हणून दात विचकायचे. मला राग दात विचकायचा नाहीये (तेच स्वतःचे पडून घेतात ), पाम मला भक्त म्हणतात ह्याचा आहे , मी पर्वा पेट्रोल महागल कांद्याने डोळ्यात पाणी आणलं तेव्हा पण चिडलो तेव्हा हे अँटी भक्त खुश .... बिनडोक लेकाचे, मी मुद्दा खोडतोय माणूस नाही... तेवढी अक्कल असती तर काय हवं होतं? गाय बंदी म्हणून मोदी नको ही अक्कल....

तेव्हा मित्रांनो मी ना भक्त आहे ना अभक्त , पण जो देशासाठी नेटाने काम करेल त्याच्या मागे उभा राहें मग तो कोणत्याही पक्षाचा असो .पाम अशी एक जमात भारतात आहे ते प्लीज लक्षात घ्या ..... तरी अजून ,ए कन्हैया वर भाष्य केला नाहीये :)

गुरुवार, १० मे, २०१८

अभिषेक

अभिषेक

मी Atos मध्ये लागलो आणि लगेच आठ दहा दिवसात, महिना भरा करता बेल्जीयम ला गेलो,  माझ्या बरोबर आणिक  तिघे होते.  मी नवीनच होतो त्या मुळे फार कुणाला ओळखत न्हवतो, फक्त पिनाकीन ओळीचा होता , मग झाली म्हणा ओळख सगळ्यांशी. पण इथे भारतात मी कुणालाच ओळखत न्हवतो फक्त जॉईन झालो त्या दिवशी ,ऑफिस भर फिरवून खोटी खोटी ओळख करून दिली होती कुणी तरी.   पण धड कोण काय करत हे न्हवत कळलं. 

त्या काळी atos मध्ये क्रिकेट च्या म्याचेस होयच्या, त्यात आमच्या ऑफिस च्या टीम ने म्याच झिंकली होती असं आम्हाला युरोपात कळलं आणि झिंकून देणारा अभिषेक होता हे सगळे म्हणाले , मला काही केल्या अभिषेक आठवेना, मग मला सगळे सांगत होते अरे तुझ्याच पाठी बसतो, जाडा आहे , केस  विरळ , मी नुसतं पु ल म्हणतात तस अच्छा ...... तो काय? अरे वाह! मस्त असं केलं.  पण अभिषेक हा जाडा पण उत्तम क्रिकेट खेळतो ही मनात खूणगाठ बांधून ठेवली , आल्यावर आधी त्याला पहिला ,आवडला मला, एक तर खूप हसरा खूप उत्साही आणि जबरदस्त सेन्स ऑफ ह्यूमर  थोड्या महिन्याने तो खूप जास्त म्हणजे मला तोडीस तोड दारू पिऊ शकतो हे कळलं, बर वाटलं, कारण तशी ही मंडळी थोडी बिअर वालीच होती अभिषेक काय तो मॉंक होता . तसा माझा जीव त्या ऑफिसात संदीप, धनंजय आणि मयूर वर होता, म्हणजे  आहे अजून, अभिषेक नंतर भरला , मला वाटत तो फायनांस  module मध्ये आला तेव्हा आणि त्याचे अनेक गुण मला कळले , एक तर तो खूप शांत आहे, म्हणेज मस्ती खोर आहे, पण स्वभाव शांत अजिबात एकसाईट होत नाही , फायनान्स मध्ये खूप प्रॉब्लेम यायचे, मग मी आणि अभिषेक ते सोडवायचो, त्याला काय कळायचं कुणास ठाऊक तेव्हा, पण तो बसून राहायचा, मी काय करतो ते पाहायचा,  हो जायेगा सर बिन्धास. मला काय कोडींग येत नाही,  पण तो एक उत्तम कोडर आहे, फटाफट मला काहीतरी शोधून दयायचा आणि प्रॉब्लेम दोन तासाच्या ऐवजी दहा मिनटात सुटायचा , मग आमचा ट्युनिंग मस्त जमलं. 

अभिषेक हा एक उत्तम फ़ुटबाँल पटू आहे, तेव्हा पण तो रात्री ,अपरात्री जाऊन फ़ुटबाँल खेळायचा , उत्तम क्रिकेट खेळतो , कॅरम खेळतो बहुतेक सगळेच खेळ आणि तो खूप जोरात धावू शकतो, म्हणजे अक्षरशः वायुवेगाने आणि मॅरेथॉन पण पळू शकतो आणि हे सगळं त्याचा वजन ९० च्या वर असताना . परत तो उत्तम नाचतो , अभ्यासात हुशार. त्याचा एक मुख्य गुण म्हणजे तो कधीही कावलेला वैतागलेला आळसावलेला किव्हा चिडलेला नसतो , सारखे विनोद आणि कामात तरीही हुशार, कधी कुणाला उलट बोललेला अंगावर धावून गेलेला मला स्मरत नाही. 

त्याचा आणखी एक मोठा गुण म्हणजे तो एक सच्चा मित्र आहे, सगळेच त्याच्या वर विश्वास ठेवतात , मुलीन मध्ये पण तो तितकाच लोक प्रिय आहे, पण तरीही त्याने कोणत्या हि मुलीकडे वाईट नजरेनं बघितलेल नाही, म्हणजे आमच्या मुलानं मध्ये पण तो कधीही कोणत्याच   मुली विषयी काहीच कधीच बोलला नाही, त्याच्या इतका सभ्य माणूस मिळणं खूप दुर्मिळ, फक्त एकच प्रॉब्लेम म्हणजे त्याचे केस विरळ झाले , पण त्याने सरळ टक्कल करून तोही प्रॉब्लेम solve केला . मला आठवतंय एकदा तो जखमी अवस्तेत ऑफिसात आला, पण चेहरा हसरा, काल बुलेट वरून रात्री पडलो म्हणाला , थोडं खरचटलं . म्हणजे पायावर अक्खी बुलेट पडून पण तो नीट होता. पिकनिक ला गेलो कि सगळ्यात जास्त धमाल अभिषेक सगळ्यात जास्त धावपळ हाच, सगळ्यात पुढे हाच हवी तेवढी दारू आणि हवं तेवढं खायला द्या , खूप ठिकाणी फिरून हिंडून आला अनेक गोष्टी केल्या त्याने, पण तोल नाही जाऊ दिला .... 

मग तो atos सोडून IBM ला बंगलोर गेला तरी touch मध्ये आहेच , त्या दिवशी प्रशांतच्या लग्नात परत भेटला तेव्हा  म्हंटल अरे भेटला नाहीस खूप दिवसात , म्हणाला अभी दो पेशेंट है घर पे , हे सगळं हसत मुखाने ..... 

तीन एक वर्षान पूर्वी त्याच्या आई त्याच्या कडे बंगलोर ला गेली होती, त्यांनी तिथं मोठा फ्लॅट भाड्यानं घेतला होता, वडील बँकेतून रिटायर, भाऊ अमेरिकेत असतो, मग आई तिथे जाईची त्याच गाव पण बंगलोर हून जवळ आहे , एक दिवस तिला पॅरालिसिस अटॅक आला आणि ती almost भोज्जा करून आली, मला वाटत दोन एक महिने काहीच हालचाल न्हवती , मग हळू हळू ती रिकव्हर झाली, पण वाचा जवळ जवळ गेली, व्हील चेयर वर , ह्या मुलाने, मुली काय सेवा करतील? इतकी सेवा केली,  घरून काम करायची परवानगी घेऊन रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करून दिवस आईची सेवा. कामाला बायका पण टिकेनात, आईची चीड चीड होयची कारण आत्ता पर्यंत सगळं करणारी गृहिणी, एकदम आडवी? तरीही हा विना तक्रार सगळंच करत गेला, आम्हाला कुणालाच काही सांगितलं नाही, पण मलाच असा फार वाटत होत कि यार हा अभिषेक इतका शांत कसा? whatssapp च्या ग्रुप वर पण शांत फोन नाही काही नाही , मग मीच त्याला फोन केला तेव्हा त्याने मला ही हकीकत सांगितली, पण ह्या हि पेक्षा कठीण प्रसंगातून तो गेला असणार हे मला पक्क ठाऊक आहे  , त्याने आईच आजार पण ट्रीटमेंट इतकं सहज सांगितलं कि जस काही आईला सर्दी झाली होती. त्याने US ला जायचं नाकारलं , जे आहे तेच काम करत राहिला , गेल्या वर्षी लग्न केलं आणि आता पर्वा भेटला , तेव्हा दो पेशंट्स म्हणाला .... म्हटलं काय बायको का? नाही म्हणाला वडलांना ट्युमर , काना पाठी , आणि तो पण मॅलिग्नन्ट म्हणजे रेडिएशन आणि केमो.  रोज सकाळी हॉस्पिटलात जाऊन रेडिएशन अँड आठवड्यातून एकदा वेगळ्या ठिकाणी केमो आणि परत आईच आहेच , मग रात्रीभर  ऑफिस च काम. 

हे सगळं करत असताना परत आनंदी  , शनिवार रात्रौ सडे नऊ नंतर मी मोकळा असतो म्हणाला एरवी काम तेव्हा नाही जमत भेटायला.  आणतो तरी कुठून हां माणूस एवढा उत्साह ते पण तीन तीन वर्ष शुश्रूषा करून, परत नवीन पेशेंट ऑफिस च काम त्यात परत सध्या सॉफ्टवेअर क्षेत्रात असलेलं टेन्शन , तरीही हा लोकांच्या कार्याला हजर तसाच आनंदी तेवढाच उत्साह ..... विनातक्रार , कुणा पुढे सहानभूती दाखवणं नाही, मदत मागण नाही एकटा सगळा भार अगदी व्यवस्थित वाहतो .... 

श्रावण बाळ म्हणजे  आईवडलांना घेऊन चार धाम यात्रा करणंच का? हल्लीच्या काळातला आमचा अभषेक पण त्या श्रावण बाळा पेक्षा तूस भर हि कमी नाही , ह्या आधुनिक श्रावण बाळाला माझा शतशः प्रणाम, हा माझा मित्र आहे हे मी माझं मोठं भाग्य मानतो. 

त्याला आयुष्यात सगळी सुख मिळावी हीच प्रार्थना करतो..... जय हो अभिषेक you are great....  

मंगळवार, १० एप्रिल, २०१८

सॉक्रेटिस आणि आपण

सॉक्रेटिस म्हणतो 

"When a bunch of known corrupt people unite against one man and spare no effort to ridicule him blackmail him and attempt to assassinate his character, blindly follow that man". 

सॉक्रेटिस च नाव घेऊन सुरवात केली ह्याची दोन कारण आहेत, एक म्हणजे सॉक्रेटिस ने म्हटलंय अस लिहिलं कि लोक लगेच पुढे वाचतात, कारण आपल्या कडे काय बोललय ह्या पेक्षा कुणी बोललंय हे महत्वाचं आहे, दुसरं म्हणजे सध्या जे काही चाललंय त्या साठी हे वरच वाक्य अगदी चपखल बसत. 

मला हल्लीच्या पत्रकारानं बद्दल फार आदर राहिला नाहीये, त्यात केतकर आता राज्य सभेत काँग्रेस च्याच तिकीटा वर गेले (गेलाच म्हंटल पाहिजे, पण मी काही पत्रकार नाही ना पुढारी, मला संस्कार आहेत ) आता  तर अजूनच घाण बोलतील.  वागळे, कुबेर लवकरच तिथे जातीलच, अर्णब ला वेळ आहे अजून बराच . गडकरी गेले आणि लोकसत्ताची ची (वैचारिक)अधोगती व्हायला सुरवात झाली होती , केतकर तर काँग्रेसच्या पगारा वर होतेच, म्हणून त्यांनी आपल्यासारख्याच माणसाला गादि  सोपवली. 

माझा मुद्दा असा कि वैचारिक मतभेद असतील, न्हवे असावेत, पण व्यक्तीनिष्ठा ? तुम्हाला मुद्दे पटत नाही भांडा , जरूर भांडा (मला खर तर, चर्चा म्हणायचं होत, पण त्याने TRP मिळत नाही हल्ली ) पण हा माणूस कसा चांगला आणि कसा वाईट असच. लालू ला तर कोर्टाने शिक्षा दिली आहे आणि हे खूप आधी पासूनच चाललंय, म्हणून राबडी ला पद दिल आणि स्वतः रेल्वेची मारली, तरीही लोक, लोक म्हणजे पुढारी, पत्रकार , बुद्धी जीवी , त्याच्यावर अन्याय झाला आहे वगैरे म्हणतात. इतका प्रखर मोदी विरोध? तुम्ही आज कोणत्याही बिहारी माणसाला विचारा, तो हेच सांगेल कि लालू ने कशी वाट लावली. आता परत जेव्हा आला सत्तेवर (गेला म्हणावं आता) , तेव्हा ऑफिसातली   एक बिहारी मुलगी म्हणाली कि "अब खतम" आधी शाळा बंद, मग बसेस बंद आणि गुन्डा गर्दी चालू . माझे ओळखीचे विद्वान असे गृहसथ आहेत, ते म्हणतात लालू चालेल पण मोदी नको, त्यांचा ठीके ते पुण्यात राहतात खूप पैसे आहेत आणि विदेशी आहेत (म्हणजे जन्म इथला पण citizenship बाहेरची) त्या मुळे ते काय कधी बिहारात जाणार नाहीत, फार त्रास झालाच तर तिकीट काढून फारेन, म्हणजे त्यांच्या मायदेशी, लालू येवो नाहीतर पप्पू, त्यांचा काय अडतंय?  

तर सॉक्रेटिस म्हणतो त्या प्रमाणे जर कुणी एकाच माणसा विरुद्ध इतकी माणसं हात धुवून मागे लागले असतील  ज्यांना कोर्टाने गुन्हेगार म्हण्टलंय ती सगळीच जर मोदी विरोधात असतील तर मगमोदी नक्कीच काही तरी करत असतील ज्याने टी माणसं धोक्यात येण्याची शक्यता असेल, देश प्रेम वगैरे काही नाही त्यांना. ही गोष्ट अनपढ गवार लोकांना कळत नाही हे ठीके, पण सुज्ञ लोकांना कळू नये? आता दलित क्रांती परत सुरु झाली आहे ते ह्या मुळेच असेल. दलितां वर प्रेम असत तर एव्हाना ती लोक वर आली असती, पैसा देऊन मारामारी करणे, नुकसान करणे हे अगदी रोजच काम, ती सगळी रस्त्यात उतरलेली दलित होती? एवढा वेळ आहे? नवल आहे , ह्या सगळ्याने एकत्र येऊन काम केलं तर जास्त भलं होईल.... त्यांचं पुढाऱ्यांचे नाही.       

आपण जो एक माध्यम वर्गीयसमाज आहे तो नेहमीच गप्प सहन करत असतो , नाही म्हणायला आता social media आहे जिथे तो मत व्यक्त करता येत, पण ते तेवढंच . भारत बंद झालं कि सुट्टी टाकून घरी, ओला/उबर चा  संप,रिक्षा टॅक्सी करा, गाड्या बंद पाडल्या त्रास करून ऑफिसात जा. आपण बहुतेक सगळे न भांडता टोल देतो, टॅक्स भरतो , विना तक्रार बँकेत सुद्धा सगळे पुरावे देऊन घर गहाण ठेऊन housing loan घेतो , स्व खर्चाने सुट्टीत फिरतो , तरीही आपणच सगळा त्रास का सहन करायचा? बंद च्या दिवशी काहींच्या गाड्या फोडल्या त्या लोकांनी काय केल असणार? गपचूप रिपेअर केल्या असणार आणि मिळेल तेवढाच इन्शुरन्स घेतला असणार. दलित अन्याय मुस्लिम अन्याय ह्याव अन्याय एक ना दोन , असं म्ह्णून तोडफोड होते नुकसान होत हे सगळ भोगतो आपणच, पण आपण बंड का नाही करू शकत? एकत्र नाही येऊ शकत? आता २०१९ च इलेक्शन जवळ येत चाललंय म्हणून आपली ताकद दाखवायला हवीये, ज्या सरकारला मी निवडून दिल होत हळू हळू ते मतान साठी वेगळंच बोलायला लागले आहेत, दलित आता भारत बंद करायला लागल्या मुळे लगेच ह्यांचा सूर बदलला , म्हणजे शेवटी माध्यम वर्ग उपेक्षित राहणार का? चांगला माणूस म्हणता म्हणता आपण निष्क्रिय असल्या मुळे बदलणार का सगळं?

एवढी हुशार लोक आहेत तरी काही सोलुशन नाही? मारामारी सोडा त्याने काही प्रश्न सुटत नाहीत पण असा काही मार्ग आहे का? ज्याने ह्या लोकांना,  सरकार ला जाणीव होईल झळ बसेल? आपण एक दिवस संप नाही का करू शकत? एक दिवस टोल नाहीच भरायचा , कुणीच नाही भरायचा, किव्हा टोल रस्त्याने जायचंच नाही, जी लोक दंगलीत भाग घेतात त्यांना आपण वाळीत नाही का टाकू शकत? आपण एक मेकांना तरी साथ देऊ शकतो का? स्टेशन वर चार रिक्षावाले दादागिरी करतात , तिथून त्या वेळी जाणारी माणसं ४ हजार त्या पैकी एक टक्का लोक जरी एकत्र आली तरी सुद्धा ते गूंड घाबरतील . फेरीवाल्यानं कडून दोन दिवस नका घेऊ, आपलाच रस्ता आहे आपण त्याचा tax भरतो, तरीही आपल्याला चालायला जागा नाही गाड्या पार्क करायला जागा नाही तो सगळं फुकट घेतोय, हे आपल्या लक्षात येतय का?

आपण एकदा तरी असं करून पाहायला हवं बदल होईल आपण घडवून आणू .... आपलं मत महत्वाचं आहे हे कळायला हवं         

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

घर

घर 


अग ऐकलंस का? बळवंतराव खुश होते,  इथे नवीन बिल्डिंग बांधतायेत . इथे? म्हणजे? वाहिनी म्हणाल्या, अग  ते  जंगल आहे ना ? त्याच्या अगदी जवळ , म्हणजे तिथून पुढे फक्त जंगल , मध्ये एक भिंत अगदी स्वस्तात , आपल्याला थोड महाग आहे म्हणा, पण तरी परवडेल अस , स्टेशन थोड अंतरावर आहे, पण ठीके, मी करेन manage  . 


लग्नाला १७ वर्ष झाली होती , एका खोलीत संसार   चालला  होता , एका खाजगी कंपनीत  बळवंतराव होते, त्या मुळे मिळकत सरकारी पेक्षा  जरा   बरी, पण पेन्शन नाही . एक मुलगी एक मुलगा , त्यांचं शिक्षण, मग लग्न . तरी १ रूम किचन  मध्ये जरा जड होत आताशा संसार करण,  मुलं मोठी होऊ घातली होती आणि एके दिवस हापिसात कुणी तरी सांगितलं कि १ बेडरूम आणि किचन स्वस्तात मिळतंय आणि ते सुद्धा निसरगाच्या सानिध्यात . तडक घरी येऊन बायकोला सांगून त्या रविवारी जागा बघायचा बेत आखला. 

प्रथम दर्शनी परिसर आवडला बालकनीतून तर सार   जंगल , आवाज फक्त पक्ष्यांचा , सुंदर हवा . बिल्डरचा माणूस पण अगदी सज्जन  , हवे थेवढे चेकने द्या म्हणाला . घरी येऊन हिशेब थोडा बाहेर जाताना दिसला , पण  दागिने थोडे गहाण टाकून सहज होईल अस कळलं आणि लगेच घर घेऊन मोकळे झाले ..... 

नाही म्हणता म्हणता , बळवंतराव आणि मंडळी नवीन घरात अगदी लगेच  आली सुद्धा  राहिला. घर सामान लावण्यात दोन दिवस  गेले. चार एक दिवसाने घर लागल्यावर खूप दिवसाने , म्हणजे रात्रीने दोघंच स्वतंत्र एका खोलीत  झोपले होते नवरा बायको, कुशीत फक्त मुलंच  आली होती , त्या मुळे प्रथम दोघे अवघडले , मग लाजून झाल्यावर , किती वर्ष आपण हे  सार काही कस विसरून गेलो होतो हे लक्षात आल आणि केव्हा झोप लागली ते समजलं नाही . पहाटे  पक्ष्यांच्या  आवाजाने बळवंतराव उठले , बालकनीत खुर्ची टाकून किती वेळ ते त्या हिरवं गार झाडाने भरलेलं जंगल पाहत होते . किती सुंदर आहे निसर्ग , एरवी आपण दार  उघडलं कि नुसत्या इमारती वाहन बस्स बाकी काई नाही , पण आज ..आज सारं  कस छान  प्रसन्न होत , डोळे मिटून सार सार अनुभवताना अचानक वाहिनी आल्या आणि चहा चा कप घेऊन शेजारी बसल्या. वाह ! अजून काय हवय असच निसर्गात राहावं, हीच देवा कडे प्रार्थना करत  दोघेही त्या गर्द  झाडाने कडे पाहत राहिले. 

तीन दिवसाने फोन transfer करायला बळवंतराव गेले आणि अर्ज टाकून आले , आठ दहा दिवसाने सुद्धा काहीच हालचाल नाही म्हंटल्यावर पुन्हा गेले तेव्हा तो वायर मॅन म्हणाला , कि नाही येणार फोन इतक्यात , अजून वायर नाही टाकली आणि टाकूच शकणार नाही कारण तिथे बिल्डिंग बांधायला पर्वांगी   नाही , ती जमीन  वनखात्यात येते .  पायाखालची जमीन सरकली , धावत तसेच बिल्डर कडे गेले, तर तो माणूस हसायला लागला , काय बी काळजी करू नका सगळं लीगल हाय आणि आपण ते आता लवकरच करून घेऊ . आहो पण ती जमीन ? अरे तुमचा घाटी लोक चा हाच प्रॉब्लेम हाय तुम्ही लै घाबरता , अरे साहेब जावा आणि आरामात रहावा आठ दिवसाने फोन लागेल आपला फेस २ येतोय . आहो पण ती जमीन? अरे साहेब समदी लोक आपलीच हायेत , अहो पणती जमीन ? , बळवंतराव तरी आपल म्हणणं पुढे करत होते ... परत तेच साहेब अरे लोक इथे लाख रुपयात आपली आई पण विकतील , मंग धरती माता तर दूर ची गोष्ट  हाय  ती  तर हजारात विकतील..  घरी जावा आराम करा   मिळेल फोन . हे ऐकून  बळवंतराव खुश होऊन बाहेर आले, खर  तर लहान पणि   आई वरून शिवी दिली, म्हणून दात तोडले होते एकाचे  शाळेत, तेच आता आई विकतील म्हणून नकळत खुश होऊन आनंदी झाले होते .... दहाव्या दिवशी फोनची घंटा वाजली आणि जीव भांड्यात पडला 

हळू हळू लक्षात   आलं कि भाजी आणायला सुद्धा मैल भर  जाव  लागत  मग स्टेशन  वरून येताना भाजी आणण्याची जवाबदारी सुद्धा बळवंतराव घेऊ लागले, तक्रार न करता आणि एके दिवशी अचानक देवा सारखा एक भाजी वाला अगदीच कॉलनीच्या गेट वर येऊन बसायला लागला, सुटकेचा निश्वास सोडत बळवंतराव म्हणाले चला सुटलो.  थोडी महाग आहे हो भाजी असं वाहिनी म्हणाल्या , पण तरी कष्ट कमी आणि अगदी ऐन वेळेला सुद्धा , बंड्या किव्हा अगदी मनी सुद्धा भाजी आणू शकत होते .  


कष्टकरी आहे तो आपला मराठी माणूस करेल का? अस   सुद्धा   लोक म्हणायला लागले आणि मग भाजी वाला  रद्दी  वाला फळ वाला फूल वाला , सगळेच आले . लोक खुश झाली  ,म्हणता म्हणता रहदारी वाढली मग आणिक कुणी विकायला लागलं, मग स्टेशन ला  जाऊन आणायची  कटकट सुद्धा गेली 

लोन  फेडायला राब राब राबणारे बळवंतरावांना आताशा ती झाड पण दिसेनाशी झाली होती. वर्षा मागून वर्ष गेली आणि अचानक एक दिवशी  लक्षात  आलं कि गॅलरीतून जंगल दिसत सुद्धा नाही कारण समोर एक बिल्डिंग आली होती , एक काय? चक्क ३० बिल्डिंग चा प्रोजेक्ट  बांधून झाला होता , गर्दी वाढली होती आणि तो भाजीवला त्यांना दोनचार वेळा बिल्डिंग मध्ये सुद्धा दिसायला लागला होता आणि खालचा वॉचमन  त्याला सलाम पण करायला लागला होता. अरे उसको क्यूँ सलाम करताय  हम पण नही करताय तुम?असं जमेल तितकं हिंदीत  डाँ देऊन बळवंतराव बोलले, आता सारख हिंदीतच बोलून राष्ट्र भाषा सुद्धा सुधारली होती, अरे साहेब  आपको मालूम नही क्या?  नाही का काय झाल? ओह भाजीवाले का दो फ्लॅट हय इधर और फेस २ में भी  एक और दुकान लिया है दो वहा जो भाडे पे लगया है.... कानाखाली लागाया सारखं तोंड करून घरी आले ... जंगल लांब जाऊन लपलं होत ह्यांची बिल्डिंग आत्ता पहिलीच होती आणि आत अजून ५० ... 

म्हणता  म्हणता मुलं मोठी झाली लग्न झालं दोघे परदेशी गेली, इथे काय ठेवलं म्हणाली  , सगळी घाण, करप्शन साला , कष्टाला किंमत नाही प्रामाणिक पणाला कुणी विचारात नाही , काय ठेवलय? ह्या देशात ... खरंय  म्हणाले बळवंतराव ... मग एके दिवशी वहिनीना म्हणाले कंटाळा आला खूप गोंगाट आहे मुंबई सोडू लांब जाऊ मुलं   काय इथे नसतात  हे  विकू आणि निम्म्या पैशात छान घर घेऊ . 

अंकल एक सुपर फ्लॅट दिखाता हूं , मस्त   शहर के बाहर , कल  जाते  है .असं तो एजन्ट म्हणाला .  बळवंतरावांना घेऊन तो ५० मैल लामबच्या गावात गेला आणि गेल्या गेल्या त्या जागेच्या प्रेमात पडले .... सुंदर बाल्कनी तिथून दिसणार जंगल छान निसर्ग थंड  हवा  , घेतो म्हणाले बिल्डर ला भेटू . अगदी छान होता माणूस, वयाचा मान राखून वागला ...  निघताना परमिशन आहे का फॉरेस्ट लँड वाटते ? अस म्हणल्यावर , अरे सर इधर लाख रुपये में अपनी माँ भी बेच देते है धरती माँ तो हजार में बचेंगे ये लोग आप  टेंशन  ना  लो  हम  है ना.... तळपायाची आग मस्तकात गेली तडख निघून घरी आले आणि झालेला प्रकार   बायकोला बोलून दाखवला , वाटलं होत  जाऊन सरळ तक्रार करावी , पण म्हंटल मी एकट्याने करून काय उपयोग? काय फरक पडणार?म्ह्णून आलो परत तसाच. 

दुसऱ्या दिवशी चहा देताना वहिनींनी विचारल, काल रागात होता म्हणून जागा कशी आहे ते सांगितलं नाहीसच , आगा जागा तशी बारी आहे म्हणजे आपण आलो इथे तशीच आहे मस्त गार वारा पुढे जंगल   ..... मग?  काय करायच ठरवलंय?   तू येऊन बघतेस का एकदा? तू म्हणालीस तर घेऊ, ही विकू आणि तसही आपण आता काय फार नाही जगायचे फेस २ येई पर्यंत आपण वेगळ्याच फेस मध्ये गेलो  असणार ...... .....बळवंतराव पुढच प्लॅनिंग करत होते आता तर पैसा  हि खूप होता आणि एखाद वर्ष्यात सगळं नीट होईल गे माहिती होत ....... तसही एकट्याने तक्रार करून किव्हा न घेऊन थोडच काही होणार होत?