घर
अग ऐकलंस का? बळवंतराव खुश होते, इथे नवीन बिल्डिंग बांधतायेत . इथे? म्हणजे? वाहिनी म्हणाल्या, अग ते जंगल आहे ना ? त्याच्या अगदी जवळ , म्हणजे तिथून पुढे फक्त जंगल , मध्ये एक भिंत अगदी स्वस्तात , आपल्याला थोड महाग आहे म्हणा, पण तरी परवडेल अस , स्टेशन थोड अंतरावर आहे, पण ठीके, मी करेन manage .
लग्नाला १७ वर्ष झाली होती , एका खोलीत संसार चालला होता , एका खाजगी कंपनीत बळवंतराव होते, त्या मुळे मिळकत सरकारी पेक्षा जरा बरी, पण पेन्शन नाही . एक मुलगी एक मुलगा , त्यांचं शिक्षण, मग लग्न . तरी १ रूम किचन मध्ये जरा जड होत आताशा संसार करण, मुलं मोठी होऊ घातली होती आणि एके दिवस हापिसात कुणी तरी सांगितलं कि १ बेडरूम आणि किचन स्वस्तात मिळतंय आणि ते सुद्धा निसरगाच्या सानिध्यात . तडक घरी येऊन बायकोला सांगून त्या रविवारी जागा बघायचा बेत आखला.
प्रथम दर्शनी परिसर आवडला बालकनीतून तर सार जंगल , आवाज फक्त पक्ष्यांचा , सुंदर हवा . बिल्डरचा माणूस पण अगदी सज्जन , हवे थेवढे चेकने द्या म्हणाला . घरी येऊन हिशेब थोडा बाहेर जाताना दिसला , पण दागिने थोडे गहाण टाकून सहज होईल अस कळलं आणि लगेच घर घेऊन मोकळे झाले .....
नाही म्हणता म्हणता , बळवंतराव आणि मंडळी नवीन घरात अगदी लगेच आली सुद्धा राहिला. घर सामान लावण्यात दोन दिवस गेले. चार एक दिवसाने घर लागल्यावर खूप दिवसाने , म्हणजे रात्रीने दोघंच स्वतंत्र एका खोलीत झोपले होते नवरा बायको, कुशीत फक्त मुलंच आली होती , त्या मुळे प्रथम दोघे अवघडले , मग लाजून झाल्यावर , किती वर्ष आपण हे सार काही कस विसरून गेलो होतो हे लक्षात आल आणि केव्हा झोप लागली ते समजलं नाही . पहाटे पक्ष्यांच्या आवाजाने बळवंतराव उठले , बालकनीत खुर्ची टाकून किती वेळ ते त्या हिरवं गार झाडाने भरलेलं जंगल पाहत होते . किती सुंदर आहे निसर्ग , एरवी आपण दार उघडलं कि नुसत्या इमारती वाहन बस्स बाकी काई नाही , पण आज ..आज सारं कस छान प्रसन्न होत , डोळे मिटून सार सार अनुभवताना अचानक वाहिनी आल्या आणि चहा चा कप घेऊन शेजारी बसल्या. वाह ! अजून काय हवय असच निसर्गात राहावं, हीच देवा कडे प्रार्थना करत दोघेही त्या गर्द झाडाने कडे पाहत राहिले.
तीन दिवसाने फोन transfer करायला बळवंतराव गेले आणि अर्ज टाकून आले , आठ दहा दिवसाने सुद्धा काहीच हालचाल नाही म्हंटल्यावर पुन्हा गेले तेव्हा तो वायर मॅन म्हणाला , कि नाही येणार फोन इतक्यात , अजून वायर नाही टाकली आणि टाकूच शकणार नाही कारण तिथे बिल्डिंग बांधायला पर्वांगी नाही , ती जमीन वनखात्यात येते . पायाखालची जमीन सरकली , धावत तसेच बिल्डर कडे गेले, तर तो माणूस हसायला लागला , काय बी काळजी करू नका सगळं लीगल हाय आणि आपण ते आता लवकरच करून घेऊ . आहो पण ती जमीन ? अरे तुमचा घाटी लोक चा हाच प्रॉब्लेम हाय तुम्ही लै घाबरता , अरे साहेब जावा आणि आरामात रहावा आठ दिवसाने फोन लागेल आपला फेस २ येतोय . आहो पण ती जमीन? अरे साहेब समदी लोक आपलीच हायेत , अहो पणती जमीन ? , बळवंतराव तरी आपल म्हणणं पुढे करत होते ... परत तेच साहेब अरे लोक इथे लाख रुपयात आपली आई पण विकतील , मंग धरती माता तर दूर ची गोष्ट हाय ती तर हजारात विकतील.. घरी जावा आराम करा मिळेल फोन . हे ऐकून बळवंतराव खुश होऊन बाहेर आले, खर तर लहान पणि आई वरून शिवी दिली, म्हणून दात तोडले होते एकाचे शाळेत, तेच आता आई विकतील म्हणून नकळत खुश होऊन आनंदी झाले होते .... दहाव्या दिवशी फोनची घंटा वाजली आणि जीव भांड्यात पडला
हळू हळू लक्षात आलं कि भाजी आणायला सुद्धा मैल भर जाव लागत मग स्टेशन वरून येताना भाजी आणण्याची जवाबदारी सुद्धा बळवंतराव घेऊ लागले, तक्रार न करता आणि एके दिवशी अचानक देवा सारखा एक भाजी वाला अगदीच कॉलनीच्या गेट वर येऊन बसायला लागला, सुटकेचा निश्वास सोडत बळवंतराव म्हणाले चला सुटलो. थोडी महाग आहे हो भाजी असं वाहिनी म्हणाल्या , पण तरी कष्ट कमी आणि अगदी ऐन वेळेला सुद्धा , बंड्या किव्हा अगदी मनी सुद्धा भाजी आणू शकत होते .
कष्टकरी आहे तो आपला मराठी माणूस करेल का? अस सुद्धा लोक म्हणायला लागले आणि मग भाजी वाला रद्दी वाला फळ वाला फूल वाला , सगळेच आले . लोक खुश झाली ,म्हणता म्हणता रहदारी वाढली मग आणिक कुणी विकायला लागलं, मग स्टेशन ला जाऊन आणायची कटकट सुद्धा गेली
लोन फेडायला राब राब राबणारे बळवंतरावांना आताशा ती झाड पण दिसेनाशी झाली होती. वर्षा मागून वर्ष गेली आणि अचानक एक दिवशी लक्षात आलं कि गॅलरीतून जंगल दिसत सुद्धा नाही कारण समोर एक बिल्डिंग आली होती , एक काय? चक्क ३० बिल्डिंग चा प्रोजेक्ट बांधून झाला होता , गर्दी वाढली होती आणि तो भाजीवला त्यांना दोनचार वेळा बिल्डिंग मध्ये सुद्धा दिसायला लागला होता आणि खालचा वॉचमन त्याला सलाम पण करायला लागला होता. अरे उसको क्यूँ सलाम करताय हम पण नही करताय तुम?असं जमेल तितकं हिंदीत डाँ देऊन बळवंतराव बोलले, आता सारख हिंदीतच बोलून राष्ट्र भाषा सुद्धा सुधारली होती, अरे साहेब आपको मालूम नही क्या? नाही का काय झाल? ओह भाजीवाले का दो फ्लॅट हय इधर और फेस २ में भी एक और दुकान लिया है दो वहा जो भाडे पे लगया है.... कानाखाली लागाया सारखं तोंड करून घरी आले ... जंगल लांब जाऊन लपलं होत ह्यांची बिल्डिंग आत्ता पहिलीच होती आणि आत अजून ५० ...
म्हणता म्हणता मुलं मोठी झाली लग्न झालं दोघे परदेशी गेली, इथे काय ठेवलं म्हणाली , सगळी घाण, करप्शन साला , कष्टाला किंमत नाही प्रामाणिक पणाला कुणी विचारात नाही , काय ठेवलय? ह्या देशात ... खरंय म्हणाले बळवंतराव ... मग एके दिवशी वहिनीना म्हणाले कंटाळा आला खूप गोंगाट आहे मुंबई सोडू लांब जाऊ मुलं काय इथे नसतात हे विकू आणि निम्म्या पैशात छान घर घेऊ .
अंकल एक सुपर फ्लॅट दिखाता हूं , मस्त शहर के बाहर , कल जाते है .असं तो एजन्ट म्हणाला . बळवंतरावांना घेऊन तो ५० मैल लामबच्या गावात गेला आणि गेल्या गेल्या त्या जागेच्या प्रेमात पडले .... सुंदर बाल्कनी तिथून दिसणार जंगल छान निसर्ग थंड हवा , घेतो म्हणाले बिल्डर ला भेटू . अगदी छान होता माणूस, वयाचा मान राखून वागला ... निघताना परमिशन आहे का फॉरेस्ट लँड वाटते ? अस म्हणल्यावर , अरे सर इधर लाख रुपये में अपनी माँ भी बेच देते है धरती माँ तो हजार में बचेंगे ये लोग आप टेंशन ना लो हम है ना.... तळपायाची आग मस्तकात गेली तडख निघून घरी आले आणि झालेला प्रकार बायकोला बोलून दाखवला , वाटलं होत जाऊन सरळ तक्रार करावी , पण म्हंटल मी एकट्याने करून काय उपयोग? काय फरक पडणार?म्ह्णून आलो परत तसाच.
दुसऱ्या दिवशी चहा देताना वहिनींनी विचारल, काल रागात होता म्हणून जागा कशी आहे ते सांगितलं नाहीसच , आगा जागा तशी बारी आहे म्हणजे आपण आलो इथे तशीच आहे मस्त गार वारा पुढे जंगल ..... मग? काय करायच ठरवलंय? तू येऊन बघतेस का एकदा? तू म्हणालीस तर घेऊ, ही विकू आणि तसही आपण आता काय फार नाही जगायचे फेस २ येई पर्यंत आपण वेगळ्याच फेस मध्ये गेलो असणार ...... .....बळवंतराव पुढच प्लॅनिंग करत होते आता तर पैसा हि खूप होता आणि एखाद वर्ष्यात सगळं नीट होईल गे माहिती होत ....... तसही एकट्याने तक्रार करून किव्हा न घेऊन थोडच काही होणार होत?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा