गुरुवार, १० मे, २०१८

अभिषेक

अभिषेक

मी Atos मध्ये लागलो आणि लगेच आठ दहा दिवसात, महिना भरा करता बेल्जीयम ला गेलो,  माझ्या बरोबर आणिक  तिघे होते.  मी नवीनच होतो त्या मुळे फार कुणाला ओळखत न्हवतो, फक्त पिनाकीन ओळीचा होता , मग झाली म्हणा ओळख सगळ्यांशी. पण इथे भारतात मी कुणालाच ओळखत न्हवतो फक्त जॉईन झालो त्या दिवशी ,ऑफिस भर फिरवून खोटी खोटी ओळख करून दिली होती कुणी तरी.   पण धड कोण काय करत हे न्हवत कळलं. 

त्या काळी atos मध्ये क्रिकेट च्या म्याचेस होयच्या, त्यात आमच्या ऑफिस च्या टीम ने म्याच झिंकली होती असं आम्हाला युरोपात कळलं आणि झिंकून देणारा अभिषेक होता हे सगळे म्हणाले , मला काही केल्या अभिषेक आठवेना, मग मला सगळे सांगत होते अरे तुझ्याच पाठी बसतो, जाडा आहे , केस  विरळ , मी नुसतं पु ल म्हणतात तस अच्छा ...... तो काय? अरे वाह! मस्त असं केलं.  पण अभिषेक हा जाडा पण उत्तम क्रिकेट खेळतो ही मनात खूणगाठ बांधून ठेवली , आल्यावर आधी त्याला पहिला ,आवडला मला, एक तर खूप हसरा खूप उत्साही आणि जबरदस्त सेन्स ऑफ ह्यूमर  थोड्या महिन्याने तो खूप जास्त म्हणजे मला तोडीस तोड दारू पिऊ शकतो हे कळलं, बर वाटलं, कारण तशी ही मंडळी थोडी बिअर वालीच होती अभिषेक काय तो मॉंक होता . तसा माझा जीव त्या ऑफिसात संदीप, धनंजय आणि मयूर वर होता, म्हणजे  आहे अजून, अभिषेक नंतर भरला , मला वाटत तो फायनांस  module मध्ये आला तेव्हा आणि त्याचे अनेक गुण मला कळले , एक तर तो खूप शांत आहे, म्हणेज मस्ती खोर आहे, पण स्वभाव शांत अजिबात एकसाईट होत नाही , फायनान्स मध्ये खूप प्रॉब्लेम यायचे, मग मी आणि अभिषेक ते सोडवायचो, त्याला काय कळायचं कुणास ठाऊक तेव्हा, पण तो बसून राहायचा, मी काय करतो ते पाहायचा,  हो जायेगा सर बिन्धास. मला काय कोडींग येत नाही,  पण तो एक उत्तम कोडर आहे, फटाफट मला काहीतरी शोधून दयायचा आणि प्रॉब्लेम दोन तासाच्या ऐवजी दहा मिनटात सुटायचा , मग आमचा ट्युनिंग मस्त जमलं. 

अभिषेक हा एक उत्तम फ़ुटबाँल पटू आहे, तेव्हा पण तो रात्री ,अपरात्री जाऊन फ़ुटबाँल खेळायचा , उत्तम क्रिकेट खेळतो , कॅरम खेळतो बहुतेक सगळेच खेळ आणि तो खूप जोरात धावू शकतो, म्हणजे अक्षरशः वायुवेगाने आणि मॅरेथॉन पण पळू शकतो आणि हे सगळं त्याचा वजन ९० च्या वर असताना . परत तो उत्तम नाचतो , अभ्यासात हुशार. त्याचा एक मुख्य गुण म्हणजे तो कधीही कावलेला वैतागलेला आळसावलेला किव्हा चिडलेला नसतो , सारखे विनोद आणि कामात तरीही हुशार, कधी कुणाला उलट बोललेला अंगावर धावून गेलेला मला स्मरत नाही. 

त्याचा आणखी एक मोठा गुण म्हणजे तो एक सच्चा मित्र आहे, सगळेच त्याच्या वर विश्वास ठेवतात , मुलीन मध्ये पण तो तितकाच लोक प्रिय आहे, पण तरीही त्याने कोणत्या हि मुलीकडे वाईट नजरेनं बघितलेल नाही, म्हणजे आमच्या मुलानं मध्ये पण तो कधीही कोणत्याच   मुली विषयी काहीच कधीच बोलला नाही, त्याच्या इतका सभ्य माणूस मिळणं खूप दुर्मिळ, फक्त एकच प्रॉब्लेम म्हणजे त्याचे केस विरळ झाले , पण त्याने सरळ टक्कल करून तोही प्रॉब्लेम solve केला . मला आठवतंय एकदा तो जखमी अवस्तेत ऑफिसात आला, पण चेहरा हसरा, काल बुलेट वरून रात्री पडलो म्हणाला , थोडं खरचटलं . म्हणजे पायावर अक्खी बुलेट पडून पण तो नीट होता. पिकनिक ला गेलो कि सगळ्यात जास्त धमाल अभिषेक सगळ्यात जास्त धावपळ हाच, सगळ्यात पुढे हाच हवी तेवढी दारू आणि हवं तेवढं खायला द्या , खूप ठिकाणी फिरून हिंडून आला अनेक गोष्टी केल्या त्याने, पण तोल नाही जाऊ दिला .... 

मग तो atos सोडून IBM ला बंगलोर गेला तरी touch मध्ये आहेच , त्या दिवशी प्रशांतच्या लग्नात परत भेटला तेव्हा  म्हंटल अरे भेटला नाहीस खूप दिवसात , म्हणाला अभी दो पेशेंट है घर पे , हे सगळं हसत मुखाने ..... 

तीन एक वर्षान पूर्वी त्याच्या आई त्याच्या कडे बंगलोर ला गेली होती, त्यांनी तिथं मोठा फ्लॅट भाड्यानं घेतला होता, वडील बँकेतून रिटायर, भाऊ अमेरिकेत असतो, मग आई तिथे जाईची त्याच गाव पण बंगलोर हून जवळ आहे , एक दिवस तिला पॅरालिसिस अटॅक आला आणि ती almost भोज्जा करून आली, मला वाटत दोन एक महिने काहीच हालचाल न्हवती , मग हळू हळू ती रिकव्हर झाली, पण वाचा जवळ जवळ गेली, व्हील चेयर वर , ह्या मुलाने, मुली काय सेवा करतील? इतकी सेवा केली,  घरून काम करायची परवानगी घेऊन रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करून दिवस आईची सेवा. कामाला बायका पण टिकेनात, आईची चीड चीड होयची कारण आत्ता पर्यंत सगळं करणारी गृहिणी, एकदम आडवी? तरीही हा विना तक्रार सगळंच करत गेला, आम्हाला कुणालाच काही सांगितलं नाही, पण मलाच असा फार वाटत होत कि यार हा अभिषेक इतका शांत कसा? whatssapp च्या ग्रुप वर पण शांत फोन नाही काही नाही , मग मीच त्याला फोन केला तेव्हा त्याने मला ही हकीकत सांगितली, पण ह्या हि पेक्षा कठीण प्रसंगातून तो गेला असणार हे मला पक्क ठाऊक आहे  , त्याने आईच आजार पण ट्रीटमेंट इतकं सहज सांगितलं कि जस काही आईला सर्दी झाली होती. त्याने US ला जायचं नाकारलं , जे आहे तेच काम करत राहिला , गेल्या वर्षी लग्न केलं आणि आता पर्वा भेटला , तेव्हा दो पेशंट्स म्हणाला .... म्हटलं काय बायको का? नाही म्हणाला वडलांना ट्युमर , काना पाठी , आणि तो पण मॅलिग्नन्ट म्हणजे रेडिएशन आणि केमो.  रोज सकाळी हॉस्पिटलात जाऊन रेडिएशन अँड आठवड्यातून एकदा वेगळ्या ठिकाणी केमो आणि परत आईच आहेच , मग रात्रीभर  ऑफिस च काम. 

हे सगळं करत असताना परत आनंदी  , शनिवार रात्रौ सडे नऊ नंतर मी मोकळा असतो म्हणाला एरवी काम तेव्हा नाही जमत भेटायला.  आणतो तरी कुठून हां माणूस एवढा उत्साह ते पण तीन तीन वर्ष शुश्रूषा करून, परत नवीन पेशेंट ऑफिस च काम त्यात परत सध्या सॉफ्टवेअर क्षेत्रात असलेलं टेन्शन , तरीही हा लोकांच्या कार्याला हजर तसाच आनंदी तेवढाच उत्साह ..... विनातक्रार , कुणा पुढे सहानभूती दाखवणं नाही, मदत मागण नाही एकटा सगळा भार अगदी व्यवस्थित वाहतो .... 

श्रावण बाळ म्हणजे  आईवडलांना घेऊन चार धाम यात्रा करणंच का? हल्लीच्या काळातला आमचा अभषेक पण त्या श्रावण बाळा पेक्षा तूस भर हि कमी नाही , ह्या आधुनिक श्रावण बाळाला माझा शतशः प्रणाम, हा माझा मित्र आहे हे मी माझं मोठं भाग्य मानतो. 

त्याला आयुष्यात सगळी सुख मिळावी हीच प्रार्थना करतो..... जय हो अभिषेक you are great....  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: