शनिवार, २६ मे, २०१८

भक्त - अभक्त

हल्ली मोदी भक्त आणि मोदी द्वेष्टे अशी दोनच लोक आहेत ,  जगात . हा लेख मोदी विषयी नाही तर हल्लीच्या विचार पद्धती बद्दल आहे .  आपण भारतीय फक्त पांढरा आणि काळा हा भेदभाव करतो , म्हणजे दोनच रंग ग्रे हा नाहीच मुळी,  पु लं च्या म्हैस मध्ये तो orderly म्हणतो तस , "पुलिस न्हाय तर काय चोर हाय " अरे म्हणजे पोलीस किव्हा चोर, मध्ये साधं नाहीच कुणी. शेक्सपिअर चे सगळे हिरो "ग्रे" आहेत.  १००% हिरो नाहीच कुणी. आता शेक्सपिअरच उधाहरण दिल कारण तो आपल्याला माहित आहे. कालिदासा बद्दल आपण सगळेच अज्ञानी आहोत . कारण मला शाळेत कुणी कालिदास शिकवलाच नाही. इतिहास का महत्वाचा हे इथे आपल्याला कळत. 

पर्वा एका चर्चेत आला हा विषय म्हणून सांगतो,  मी सांगितलं कि आपण शेक्सपिअर शेक्सपिअर करतो पण भारतीय लेखक नाही , वाद (चरचा म्हणूया )  हा मोदी , हिंदुत्व वगैरे असा होता, तर इतिहासाचा काय संबंध? अस मला माझा भाचा म्हणाला, तो खरा तर BA आहे म्हणजे त्याला इतिहास हा विषय असणारच, मी १९८५ साली इतिहास सोडला, म्हणून  ही आस्था असेल इतिहास बद्दल कारण  आपल्याकडे  इतिहास म्हणजे तारखा , राजांची नाव , स्थळ , कुणी कुणाला मारला हेच.   मी शाळेचा इतिहास न वाचता बाहेरून अनेक पुस्तकातून वाचला . शिवाजी महाराज हे मला शाळेत ग्रेट वाटलेच नाहीत , नंतर स्वतंत्र पणे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला त्यांना सावरकरांनी हिंदू नृसिम्ह का म्हटलंय ते कळलं , असामान्य व्यक्तिमत्व , जिद्द , हिम्मत , खरा राजा कसा असावा त्याच उत्तम उधाहरण .

राज्य कर्त्यांनी त्यांचा स्वतःच्या स्वार्था करता त्यांचा इतिहास बदलून आपला वर्तमान समृद्ध करून घेतला .   ह्याच मुख्य  कारण म्हणजे आपल्याला शाळेत शिकवला तो इतिहास. अफझल खानाचं पोट फाडलं ते आहे  पण त्याच्या आधी काय घडलं त्याला तिथे का आणलं? कस आणला? काही नाही .... अश्या एक ना अनेक गोष्टी , नुसत्या वर पांगी .... अभिमान वाटायचा कुठून? नुसता फाजील गर्व .... गरवा वरून आठवल , पुण्यात एका टुरिस्ट गाडी पाठी महाराजांचा असा प्रोफाइल फोटो, म्हणजे चित्र आणि खाली "बघतोस काय? मुजरा कर "   हे वाक्य . मुळात त्या ड्रॉयव्हर ला मी का इतर कुणी का मुजरा करावा? रस्त्यात तंबाकू खाऊन थुंकतो म्हणून? का सिग्नल तोडतो म्हणून ? का कारण नसताना हॉर्न मारतो म्हणून ? मुस्काट फोडायला हवय खरं तर, पण मला इथे सांगितलंय कि ह्या लोकल  लोकांच्या नादी नको लागूस, (मुंबईत मी खूप लोकांना थोबडवलाय पान खाऊन थुंकतात म्हणून ) ही मुंबई नाही. दुसरी गोष्ट म्हणजे , शिवाजी महाराज , दरडावून मुजरा कर ... असा सांगणाऱ्यातले न्हवते , साध्या (महाराजांच्या) पुतळ्याला  पण मी लगेच नमस्कार करतो , त्यांना असल्या  राम रामाची गरज काय? तर  सांगायचा मुद्दा असा कि इतिहासच असा अर्धवट चुकीचा कळला, तर आपण चुकीची भांडण , चुकीचे नेते आणि चुकीची माणसं मारणार आणि चुकीच्याच  माणसांना फुकट हिरो करणार (दाढी ठेवली म्हणजे कुणी महाराज होत नसत महाराजा ). 

गाय खायला बंदी म्हणून मोदी वाईट ,  खूप विनोद , कारण भारतात गौ हत्या य वर्षा पूर्वी बंद केली आहे, इथे आपण (मी नाही हो ) म्हैस खातो , एक तर माझा स्वतःचा बंदी वर विश्वास नाहीये,  मी परदेशात काहीही खातो , गाय स्वतः मागून खाल्याचा मला स्मरत नाही, पण मी नाही खाल्ली अशी समजूत माझी नाही , कारण एखाद वेळेला त्या हॉट डॉग मध्ये असते गाय अस मला कुणी तरी म्हणलं होत आणि मी ब्रिटिश ब्रेकफास्ट खाल्ला आहे.  मी सावरकरांना खूप मानतो त्यांची गाई बद्दलची मत वाचा एकदा  ... असो ... पण  बीफ बंद म्ह्णून एक माणूस वाईट? तर व्यक्ती स्वातंत्र्य .... हा मुद्दा आहे गाय नाही असं मला पटवून द्यायचा (फाजील )प्रयत्न झाला.  मला एक सांगा ,  जेव्हा फार काळ एखाद्याला कोणता तरी विकार जडला असेल तर डॉक्टर किव्हा वैद्य त्याला कडक पथ्यावर ठेवतात ना? सगळंच बंद करा म्हणतात , तस सध्या चाललं आहे, म्हणजे जुनी जडलेली व्याधी , patient  थोडा बरा होतंय, तर ही लोक, अरे अजून १० किलोमीटर नाही धावत? मग काय उपयोग जुना बरा होता डॉक्टर सारखाच सलाईन लावायचा , हाच म्हणाला बरा करेन  अजून धावत नाही patient पप्पूच बरा

हल्ली मला खूप लोक खूप विरोधाभासात जगतायत असंवाटत , म्हणजे आरे मध्ये मेट्रो नको कारण झाड पाडायची, पण तिथे झाड पाडून झोपड्या बांधल्यात त्या अधिकृत करा असेही लोक आहेत.  म्हणजे सगळेच समाज सेवक . "socialist"  मंडळी आहेत ना ही ह्या लोकांचा सोपा हिशेब आहे,  लोकांच्या (आई वडील म्हणू आपण ) ताटातल्या चार भाकऱ्या घ्यायच्या , दोन वाटायच्या (दोन स्वतः गिळायच्या ) आणि फुकट उपदेश करत सुटायचं, एक भाकरी कमवायची ना अक्कल ना लायकी, बहुदा हीच लोक उपदेश करत असतील, नाही? कष्ट करी माणसाला वेळ कुठून असणार . ही काम नसलेली माणस whatsapp वर फिरत असतात तिथूनच  ज्ञान संपादन करतात आणि अकलेची तारे तोडतात , काही आगा ना पिछा नुसत उचललं बोट लावल मोबाईल ला.

स्वैराचार आणि स्वातंत्र्य ह्यात फरक असतो हे आपल्याला माहित नाही त्या मुळे आधी शिस्त लावायला हवी पण शिस्त लावायची म्हणजे त्रास, फुकट मिळालेल हवय सगळं , अमेरिके सारखं स्वातंत्र्य, श्रीमंती हवी पण त्यांची शिस्थ नको , कंपलसरी मिलिटरी ट्रेनिंग नको , -४२ डिग्रीस मध्ये सैन्य पिकनिक करते ही समजूत , मेले तर मेले , त्यात काय? त्यांना पगार मिळतो ना?असा सवाल करतात हल्ली. त्यात नवल नाही आयत  फुकट सगळं मिळालं असत , शालेय शिक्षणात फक्त ब्रिटिश लोकांनी सांगितलेला इतिहास , भारत कसा नगण्य आहे हे सांगितलं असत शिकवलं असत आणि त्यात इंग्रजी चाच अट्टाहास , त्या मुळे वाचन पण तेच त्यांचच .  माझा भाषेला विरोध नाहीचे , पण मातृभाषा डावलून नाही . माझा एक मित्र आहे, मस्त आहे एकदम ,गोव्याचा आहे, पण जन्म शिक्षण इथलच,  कोकणी आहे , हा आईशी कोंकणीत बोलतो, मस्त वाटतं ऐकायला  , मुलाशी इंग्रजीत किव्हा हिंदीत, मी विचारल कि मुलाला येत नाही का कोकणी? येत म्हणाला , आज्जीशी  कोंकणीत  बोलतो , पण बाहेर नाही , अशिक्षित समजतील लोक अस  वाटत म्हणाला .... हीगत  सगळ्यांचीच आहे, कारण दीडशे वर्ष साहेब म्हणजे इंग्रज , इंग्रजी न बोलणारा म्हणजे अशिक्षित असंस्कृत ....  ही भावना इतकी खोल आहे कि बाहेर कस पडणार? आधीच्या राजकारण्यांनी तेच पुढे ठेवल चालू आणि नंतरच्या पण . change नाही होत , अशी तक्रार जी लोक करतात तीच change नाही होत अस   वाटत , जे पन्नास वर्ष चालू आहेत तेच.. त्या आधीच वाईट . इतिहास म्हणून महत्वाचा आणि चुकीचा इतिहास म्हणून घातक.

मी मोदीला मत दिलय म्हणून मी त्याला बोलणार हा एक मुद्दा मांडणारे लोक आहेत , एकदम बरोबर आहे , नाही निवडून दिलत तरीही बोला , कारण पंत प्रधान सगळ्यांचा असतो म्ह्णून . दुसरं म्हणजे वाईटच का? चांगल का नाही? तुम्हाला फक्त वाईटच दिसतंय? नवल आहे कारण लाल  फीत (डोळ्यावर )   लावणारेच अस बोलतात आणि मोदी ला चांगल म्हंटल  म्हणजे लगेच आम्ही भक्त आणि विरुद्ध बोललं कि देश द्रोही हीच दोन टोक . कारण तुम्ही व्यक्तीला दोष देताय आणि कुणी तर सांगतय म्हणून त्याला हिटलर आणि काय काय म्हणता, तरी माहिती म्हणून सांगतो, माओ से सुंग च नाव दुष्ट लोकान मध्ये हिटलर च्या वरती आहे आणि त्यांने सगळ्यात जास्त माणस  मारली आहेत आणि गळचेपी बंद केली, हीच लोक आता democracy  म्हणून ओरडतायेत .

पर्वा कश्यात तरी मोदी among  most popular world  leader  अस वाचलं , एका भारतीयला  ऑस्कर मिळाला कि आपण खुश होतो , पण मोदीला कुणी चांगला म्हणतय? म्हणजे बेकार , तर हिटलर पण popular  होता असा कीव येणारा मुद्दा कुणी तरी मांडला, किंव मला, मांडला त्या व्यक्तीची  आली , कारण हिटलर  जगात popular  न्हवता फक्त त्याचाच देशात . तो वर्ल्ड लीडर न्हवता तर त्याला युद्ध करून व्ह्याच होत ,हा फरक कसा कळणार? पोपट पंची  करायची स्वतःची बुद्धी whatsapp वर घाण टाकायची . त्या मुळे ह्या लोकांशी वाद न घालायचा निर्णय मी घेतलाय , कारण तुम्ही झोपलेल्या माणसाला उठवू शकता , झोपेचं नाटक करणाऱ्याला नाही ,  आणि स्पीकर फोडून काय उपयोग प्लेअर भलताच असतो.  पण बीफ नाही मिळत म्हणून एवढा राग?


मला काळजी सरकार ला नाव ठेवतात ह्याची अजिबात नाहीये,  पण त्या नकारार्थी स्वभावाची आहे, तरुण मुलांनी सकारात्मक हवं , पण तो हार्दिक (पटेल) म्हणा जिग्नेश म्हणा सगळे नकारार्थी आणि त्यांना follow करणारे म्हणून तसेच, मुद्दा सोडायचा किंबहुना नसतोच फक्त व्यक्ती द्वेष. मग त्या प्रकाश राज सारखं जाहीर पोपट होतो. पण त्याच ठीके त्याला खूप पैसा अडका मिळतो, म्हणून ह्या अंध लोकांनी उगाच टीका? आणि आम्ही बाजू घेतली किव्हा हटकलं तर आम्हाला भक्त म्हणून दात विचकायचे. मला राग दात विचकायचा नाहीये (तेच स्वतःचे पडून घेतात ), पाम मला भक्त म्हणतात ह्याचा आहे , मी पर्वा पेट्रोल महागल कांद्याने डोळ्यात पाणी आणलं तेव्हा पण चिडलो तेव्हा हे अँटी भक्त खुश .... बिनडोक लेकाचे, मी मुद्दा खोडतोय माणूस नाही... तेवढी अक्कल असती तर काय हवं होतं? गाय बंदी म्हणून मोदी नको ही अक्कल....

तेव्हा मित्रांनो मी ना भक्त आहे ना अभक्त , पण जो देशासाठी नेटाने काम करेल त्याच्या मागे उभा राहें मग तो कोणत्याही पक्षाचा असो .पाम अशी एक जमात भारतात आहे ते प्लीज लक्षात घ्या ..... तरी अजून ,ए कन्हैया वर भाष्य केला नाहीये :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: