शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

बदलापूर

बदलापूर

चांगला सिनेमा तो असतो जो आपण आपल्या बरोबर सिनेमा घराच्या बाहेर घेऊन येतो आणि मी बदलापूर, दारातून बाहेर घेऊन आलो, स्कूटर वर येताना माझ्या समोर एक रिक्षा वाला थुंकला तरी मी दुर्लक्ष केल कारण  माझ्या मनात सिनेमाचा Climax घोळत होता . Paradigm Shift च मला एक उत्तम उधारण आशिष नी दिल   होतं .

"एकदा तो ट्रेन ने मुंबईला परत येत होता आणि त्याच्या शेजारी एक माणूस आणि त्याचा एक तीन चार वर्षांचा मुलगा होता तो सारखा टाहो फोडत होता, मधेच आई पाहिजे अस ओरडायचा , तो माणूस त्या मुलाला समजावत  न्हवता कि अरे आपण जाऊ थोड्या तासांने भेटेल आई, हे चोकलेट  घे , कि आणि काही , अगदी निर्विकार होता. लोक आपापसात बोलत होती काय लहान मुलाला एकट पाठवला आणि बाप असा . शेवटी न राहून एका काकूंनी विचारलं कि अरे समजाव त्याला जाऊ आईकडे आणि कशाला पाठवलं तुमच्या बरोबर तुम्हाला नाही सांभाळता येत ते? तो म्हणाला बाइको चार दिवसी पूर्वी वारली माझी, मुलाला परत घरी घेऊन चाललोय माहेरी होती ती … काय समजाऊ मुलाला?  सगळ Compartment सुन्न झाल, म्हणजे हा Paradigm Shift." आधी त्या माणसाला काय माणूस आहे? अस म्हणणारे अरेरे काय माणूस आहे अस झाल 

म्हणजे प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला Villain आणि त्या त्या वेळेला Hero असतो . दिग्दर्शकाला आख्खा  चित्रपट तोंडपाठ होता पुढे काय होणार माहित होत , त्या मुळे एक गती होती. थोडा लांबला, अजून छोटा असता तर आणखी परिणामकारक झाला असता. अभिनय उत्तम, म्हणजे अगदी हवालदारने पण उत्तम अभिनय, नावाझुद्दिन बद्दल काय बोलणार त्याला साजेशी भूमिका सहज अभिनय त्याचा राग येतो हसू येत कीव येते चीड येते. वरुण खूप  शिकला असेल , प्रगती आहे, जे सांगितलय ते केलंय, विनय पाठक  गुणी आहेच, हुम  खुरेशी ला rating  ४ पैकी ५ कारण ती येउन तिच  नुस्त काम करून जाऊ शकली  असती पण  तिने ते आणखी चांगल केलय, विनय पाठक  च्या बाईकोच काम अप्रतिम झाल आहे. 

पावसाचा उपयोग गूढ पणा वाढवायला उत्तम केलाय (आपण Romance करता कमी करतो उपयोग पावसाचा ), कारण खूप पाउस रात्री भयाण वाटतो. ज्या माणसाचा आयुष्य एका क्षणात उध्वस्त झाल  असत तो उरलेलं आयुष्य फक्त एकाच ध्यासान फिरत राहतो. पण मग बदला घेतल्यावर काय? सस्पेन्स वगेरे नाही अजिबात, पहिल्याच  पाच मिनटात कुणी खून केलाय का केला ते समजत आता वरुण काय करणार हे माहित असत, पण मग अचानक त्याने काय कराव ह्याचा विचार आपण करतो बरोबर का चूक हा वाद आपण आपल्याशीच घालतो, एक वाक्य  जे  नावाझुदिन म्हणतो ते खूप सांगून जातो तो म्हणतो मी खून केला कारण मी चिडलो होतो घाबरलो होतो दोन मिंट होती, पण तुझ्या कडे पंधरा वर्ष होती  मग असा का वागलास? आणि मग ते जो करतो त्याला आपण  कसा react करायचं ते कळतच नाही , अगदी अनपेक्षित. सूड , बदला म्हणजे काय? कश्यासाठी हे विचार करायला लावतो. Mind Games म्हणजे काय हे उत्तम दाखवल आहे नक्की माणूस काय विचार करत असतो हे आपल्याला कळू शकत नाही हे फार छान दाखवल आहे 

सिनेमा मध्ये गाण  नाही कारण गरज नाहीये, रोमान्स नाही, violent  आहे पिक्चर पण वेगळा, डार्क सिनेमा म्हणले लोक, असेल, पण मनाला इजा करतो म्हणून violent. दोन चार गोष्टी नाही पटत ते ठीक आहे. पण बघण्यासारखा आहे, अती क्रूरता दुष्टपणा सहन करू शकला तर, गम्मत म्हणून बघण्य सारखा नाही हा सिनेमा. 

एक सांगायचं म्हणजे अगदी climax ला पाठी एका गुजराती माणसा ला फोन आला आणि तो आणि त्याची बाइको हसून बोलले पाच मिंट, पण तरीही मी पाठी वळून त्यांना काही नाही बोललो … बिचारे वाया गेले पैशे त्यांचे उगीच आले होते.  




















शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

AIB

मी  आज AIB चा कार्यक्रम you tube वर पाहिला …. हसायला येतच जर तुमची शिव्या  
ऐकायची हरकत नसेल आणि तुम्हाला अश्लील विनोद आवडत असतील तर बघाच  मला आवडला … म्हणजे मी स्वतः  जाऊन काही तिथे भाग घेऊ शकणार नाही (मला कशाला कुणी बोलवेल?).  अक्षरशः आई बहिण …. म्हणजे आ   ई    ब     ही   ण काढली  आहे सगळ्यांनी सगळ्यांची …… म्हणजे तुम्हाला एक तर प्रसिद्ध असावा लागेल आणि तिथे भाग घेण्याची हिम्मत. खर म्हणजे  अगदी खर बोलले आहेत आणि बरचस आपल्या मनातलं (शिव्यान सकट), करण जोहर बद्दल त्याच्या समोर आणि   त्याने सुधा स्वतःवर विनोद केलाय आणि हस्लाय … खूप जास्त अश्लील आहे मान्य आहे पण तस  आधी सांगितल आहे … हव तर घ्या नाहीतर द्या सोडून … उगीच रस्त्या वर पडलेली काडी कानात (किव्हा तुम्हाला हवी तिथे ) घालायची आणि कान दुखतो म्हणून ओरडत बसायचं , त्यातला प्रकार आहे 

हा विनोद भारतीय स्वरूपाचा नाहीच , आपण मित्रान मध्ये आई बहिणी काढतो पण चार चौघात नाही , पण आता जग बदलत  आहे जस आपण बर्गर स्वीकारला तस  हे हरकत नाहीये (इलाजही नाहीये)…. मला कुणी बर्गर खा अशी जबरदस्ती करत नाही न? तशी मला कुणी AIB बघ अशी जबरदस्ती करत नसेल तर मला त्यात गैर वाटत नाही …. अस असेल तर आधी "होणार सून मी ह्या घरची बंद करा" (हे फक्त एक  उधारण होत , सगळ्याच बंद करायला हव्यात खर तर ) काय पण दाखवतात आम्हाला उल्लू समजतात आमच्या अकलेचे आई बहिण काढतात , इथे तर लोक स्वतः  स्वखुशीने जातायेत आणि तीन एक हझार  रुपये देऊन (एका तिकिटाचे). मग एस्सेल वर्ल्ड बंद करा तिथे लोकांना तुम्ही वरून खाली टाकता  गोल फिरवता घाबरवता आणी  रग्गड पैसे  घेता , त्याला तुमची ना नाही न? तर मग ह्याला का? लोकांनी कृपा करून इतरांनी कश्यावर हसायचं आणि हसू नये हे ठरवू नये … आणि भारतीय संस्कृती बद्दल तर अजिबातच बोलायचं काम नाही …  

आपण  हल्ली खूप impatient   झालोय, पण विनोद बुद्धी पण विसरलोय का ?  तिथे  सर्व अपमान स्व खुशीने होतोय रग्गड पैसा मिळतोय सगळ्यांना आणि ते सुधा त्यांना सांगून त्यांच्या मर्जीने (its scripted रे ),  मग हे का? कशाला? जर एवढ बबाल झाल नसत तर मी हे पाहिलं पण नसत. किव्हा  त्यांचाच हाच  हेतू  नसेल न?  बघितल माझ्या मनात पण शंका आली आता …  जाऊदे यार मजा करा जरा लोकांना हसू द्या स्वतःवर  आणि  इतरांवर आणि त्यांच्या संमतीने …… 





बेशिस्त

मी परवा बडोद्याला गाडी घेऊन गेलो होतो … NH8, छान आहे रस्ता , फक्त एके ठिकाणी  भारुच्ला वाईटट  (ट ला ट) अडकलो आणि म्हणून थोडक्यात ज्या करता गेलो ते नाही झाल . वडीलांची मावशी वारली वय वर्ष ९४ - ९५ . बातमी आल्यावर तातडीने निघालो, पण तिथे स्मशान आठाला  बंद म्हणे, त्या मुळे  शेवटच दर्शन हुक्ल. पण हा नियम समजला नाही मला, एरवी अतिशय बेशिश्त लोक, हे असले फाजील नियम का घालतात आणि पाळतात कुणास ठाऊक, आता वेळ सांगून येते का? 

तीथे  गेल्यावर मला कुणी विचारल गुजरातचे रस्ते कशे आहेत आमच्या? मी म्हणालो महाराष्ट्रात जास्त चांगलाय आणि  लवकर येता येत गुजरात आल कि सगळा गोंधळ, लोक उलट काय येतात , पहिल्या लेन मध्ये काय हळू हळू काय  चालवतात , म्हणजे सगळे नियम अगदी धाब्यावर , कुणाला पडलीच नसते कुणाची स्वार्थी सगळे …  आणि हे लक्षात सुधा येत नाही कुणाच्या की त्यांच्या मुळे सगळ्यांना हळू जावं  लागत. एक तर आपल्या राज्याला देशाला दुसऱ्या कुणी बोललं कि मला नाही चालत, ते आमच आम्ही पाहू आणि मुंबईत आपण थोडे जास्त शिस्तीने वाहन चालवतो (पूर्वीची मुंबई नाही हो राहिली आता ), चाईला मला काय विचारता रस्त्याबद्द्दल शिस्ती  बद्दल . माकडा कडे चांगला पेन दिल म्हणजे तो काय छान  चित्र काढेल का? मुळात अंगात असेल तर दिसेल , हो  कि नाही ? 

पण मला आता गुजरात च्या यशा बद्दलच शंका वाटू लागली आहे, कारण सारख नियम मोडून  आणि मोडीत काढणारी ही जमात इतकी कशी पुढे जाऊ शकते आणि प्रगती करू शकते? आम्ही येताना सुरत ला गेलो तेव्हा येताना एक छोटस रेल्वे च फाटक लागल, तर ही शूर वीर माणस अख्ख फाटक अडून उभे होते म्हणजे अर्धा भाग जाईला  आणि अर्धा यायला असा हवा न? तर दोन्ही बाजूला लोक फाटकाला चिकटून उभे ,  गाडी गेली फाटक उघडल तरी कुणीच पुढे जाऊ शकत न्हवत ,  सामोरा समोर लोक उभी ठाकलेली, एकाच जागी पाउण  तास …. कठीण आहे सगळ.  म्हणजे शिस्ती पेक्षा बेशिस्त फायद्याची आहे का?
















शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

प्रामाणीक

प्रामाणीक

मी कधी कधी (खूप पोट वाढलय सागर,  अस कुणी म्हंटल कि लगेच )सकाळी (पहाटे  नाही )national park ला cycling करायला जातो,  तिथे वाटेत लहान मुल , मुली पेरू, काकडी, संत्री विकायला बसतात.  मी नेहमी त्यांच्या कडून काहीतरी घेतोच,  कारण ती सकाळी थंडीत उठून आईवडील म्हणत असतील म्हणून बसतात त्यांना चार पैसे मिळाले तर त्यांना हुरूप येईल सकाळी उठायचं सार्थक होईल अस वाटत म्हणून. आज एका मुलाला विचारल कि बाबा कुठे राहतोस तर तिथेच पाठी कोणत्यातरी पाड्यात म्हणाला (वीज नाही घरी ….  मुंबईत असून), सहावीत शिकतो (school bus नाही ट्यम्पो ने जातो म्हणाला  ) पार्क च्या बाहेर बोरीवली पूर्वेला आहे शाळा .
त्याला विचारलं कि काय रे पेरू गोड आहे का (उगीच कायच्या काय विचारायचं म्हणून) ?  मला म्हणला  माहित नाही … विकत आणलाय …  ह्याला प्रामाणिक पणा म्हणायचा का निरागस पणा?

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

प्रिय अद्वैत

प्रिय अद्वैत,अम्रिता

तुमच्या लग्ना निमीत्त 

माला मामा बनवणारा हा पहिला माणूस आणि त्याने मामा बनवलेला मी पहिला , नंतर नंतर त्यानी खूप लोकांना मामा बनवला पण पहिला मान माझा.

तो खूप गोष्टीत पहिलाच होता … दोन्ही बाजूला पहिला नातू पहिला मुलगा स्वताचा धंदा चालू करणारा पहिला harris shield, kanga league खेळणारा पहिलाच आणि अशे अनेक … अगदी  लहान पणा पासून तो आमच्याकडे एकटा राहायचा धड बोलता सुधा येत न्हवत तेव्हा पासून आणि आमच्या इथे पण तो खूप famous होता खूप नकला करायचा वाघ, मांजर आणि किशोरे कुमार चा आवाज काढून दाखवायचा तो , खूप गोबरा आणि कधीही न रडणारा , त्याचा स्वभावात रड नाहीच , हे संसारात खूप उपयोगी ठरेल.

तुम्ही दोघ आता एक मेकांना दहा वर्ष ओळखता त्या नंतर प्रेमात पडलात तेव्हा तुम्हाला एका मेकान विषयी मी काय सांगणार आणि सुखी संसार कसा करायचा हे मी सांगण म्हणजे विनोदच होईल , तरी तुमच्या पेक्षा चार पावसाळे चार माणस जास्त पहिले म्हणून काही अनुभव सांगतो.

लग्न हि एक  भागीदारी असते आणि partnership  ही पन्नास पन्नास टक्के असते  असावी, पण खर सांगू लग्नात कधीच नसते रे पन्नास  पन्नास कधी 40  - 60 कधी 30 - 70 कधी 49 - 51 तर कधी 90 - 10 सुधा , 50-50 म्हणेज आपल्या आपल्या हद्दीत, असा  संसार  नाही चालत , एका ला  तरी एक पाउल पुढे किव्हा  पाठी यावच लागत,एक म्हणजे एकशे सुधा पण एकाच माणूस सारखा पाठी पुढे करत राहिला तरी कस चालेल , त्या साठी दोघांनी प्रयत्न करावे लागतात ..... 

विनोद हा माझ्या मते लग्नाचा आणि एकूण जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि असावाच स्वतावर हसण खूप कठीण आहे पण जर जमल तर त्या सारख सुख नाही, पण थोड्यात गोडी हे तुम्ही जाणताच. मस्करीच असुदेत कुस्करी करायचा मोह आवरा .

राग हे एक व्यसन आहे अस मला वाटत आणि गंम्मत म्हणजे ह्याचा त्रास स्वतः चिडक्या माणसा पेक्षा आजु बाजूच्या  लोकांनाच जास्त  होत असतो, म्हणजे व्यसन करणारा स्वताच जास्त त्रास करून घेतो, दारू पिउन लिवर खराब, तंबाकू ने कर्क  रोग, पण चिडक्या माणसाच तस नाही, चिडून तो मोकळा होता आणि इतर लोक त्रास करून घेतात.   तुम्ही दोघ चिडके नाहीत  तरी सुधा सांगतो राग आवरा, टाळा आणि विनाकारण  अजिबात चिडू  नका, खूप गोष्टी सोडून द्या  पटो अथवा न पटो, माणूस सोडण्या पेक्षा गोष्ट  सोडा. तुम्हाला जर एकमेकांना शिवी द्यायचा मोह झाला  तर  थांबा दोन मिण्ट थांबा  आणि तरी वाटल तर द्या  पण मनात तोंडातून नाही , म्हणजे दोन समाधान शिवी दिली म्हणून तुला आणि दिलीच नाही म्हणून तिला. एक मेकांचा आदर करा माझ्या मते सगळ्यांचाच आदर  करावा, जमण कठीण  आहे म्हणून किमान एक मेकांचा तरी आदर करा, भांडताना हे लक्षात ठेवा म्हणजे  आपोप शब्द जपून निघतील.

मी अश्या  बर्याच जोड्या पहिल्या आहेत ज्या एका मेकान बरोबर comfortable नसतात, तुम्ही खूप आहात आणि तसेच राहा, (चार लोकांत असताना कमी राहिलात तरी चालेल) कारण तुम्ही एक मेकांना  गृहीत धरता चांगलय, तुमचा एकमेकांवर विश्वास आहे, म्हणजे कस कि  घरी कधी चार मित्रांना आणलस हे गृहीत धरून कि त्यांना  आपली बाईको नक्की खाईला घालेल ह्यात काहीच गैर नाही, तीही अस कधी करेल (कर कि लेका चहा) तेव्हा तुला बाईकोची   भूमिका पार पडावी लागेल...पण विश्वास ठेवा गृहीत फार नका धरू … विश्वास असण आणि गृहीत धरण ह्यात एक बारीक रेष आहे ती ओळखा आणि पाळा ….

 स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट आहे, गोष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यातली एक घटना ...

"एकदा स्वामी आणि त्यांची शिष्या का शिष्य नदी काठी फिरत होते, तेव्हा स्वामींना शिष्याने  विचारल कि प्रेम कस कराव? स्वामी तिला नदी  जवळ घेऊन गेले आणि त्या शिष्येला म्हणाले कि ओंजळीत पाणी घे, ओंजळीतल्या पाण्याकडे पाहून म्हणाले कि अस प्रेम कराव ..... ओंजळ बंद करून मुठीत धरलस कि सगळ पाणी सांडून जाइल  आणि ओंजळ थोडी सैल केलीस तरी पाणी सांडेल खूप हलके पण तरी घट्ट अस प्रेम हे ओंजळीतल्या पाण्या प्रमाणे कराव  "

मला ईगो म्हणजे नक्की माहित नाही, पण "अभिमान" मध्ये दाखवलाय तो नक्कीच , तुमच्यात तस येण कठीण, अम्रिता काय उद्या कपडे विकायचं काम करणार नाही आणि तू जर मुलाना शिकवल तर तिला ते आवडेलच आणि अद्वैत तू थोडा आळशी असल्याने तू काय तिच्या कामात ढवळा ढवळ करणार नाहिस, तरी एक मेकांच्या  यशाच कौतुकच करत राहा …

दोघे मिळून माणस जोडा खूप सुखी व्हाल तशी तुम्हाला मित्र मंडळी आहेतच पण नातेवाईक पण जोड सारखी माणस असुदेत अवती भवती म्हणजे तुम्हाला एकांत मिळाला कि आवडेल ...प्रत्येकाची  Romance ची   संकल्पना फार वेगळी असते, मला स्वताला चहा खूप आवडतो,  सकाळचा एकत्र चहा पण मला समुद्र किनारी मारलेल्या फेरी पेक्षा जास्त Romantic वाटेल, सांगायचं काय कि europe टूर मस्तच पण romance छोटाच ठेवा... आणि खर तर अमुक म्हणजे सुख तमुक म्हणजेच romance अस नाहीये ...नसतं तुम्ही तुमचा शोधा.

....आणि आता ती बाइको आहे आता फरक पडणार .... एक मुख्य फरक म्हणजे ती आता पिक्चर बघून झाला कि  तुझ्याच (तुमच्याच)घरी येणार आधी कस  ती तिच्या घरी आणि तू तुझ्या, पण आता तस नाही आणि हा फरक खूप  पडणार ....तुला रोज वेळेत दात घासावे लागणार आणि  दोनदा, अंघोळ करावी लागणार  बघ बाबा केवढे कष्ट  ...मैत्रीण आणि बाइको ह्यात खूप फरक असतो स्वाभाविक आहे त्या मुळे  मैत्री जपून ठेवा (आणि बाइको पण ) तीच येईल कामाला ...

भांडण वगेरे  करा  पण एक मेकांशी न करता त्या वृत्तीशी किव्हा विषयाशी ...व्यक्तीशी नका रे  भांडू (अस तुझी आई म्हणते नेहमी)  आणि जमल्यास लगेच संपवा , माझा एक मित्र आहे तो शांत आहे पण त्याची बाइको सुधा शांत (किती छान) ते दोघ चिडले कि भांडत नाहीत , अबोला धरतात आणि तास झाला शांत झाले कि  मग बोलतात , संपल ना  भांडण राग गेला कि मग कशाला आरडा ओरड होतोय .....तस करा ....

आपले आपले स्वतंत्र मित्र मैत्रिणी पण ठेवा ...मधेच एखादी मुलांची ट्रीप करून ये तिला आवर्जून पाठव खूप फरक पडेल परत आल्यावर , बाईका नवरा कसाय हे एकमेकांना  विचारतात  आणि आपला कसा चांगलाय हे चार चौघात सांगतात (एखादीलाच तक्रार सांगतात)आणि तू तसा गुणीच आहेस त्या मुळे  तुझ्या गुणांची नकळत तिच्याच कडून उजळणी होईल.  आपल अस नसत , चार पुरुष एकत्र येउन बहुदा (आपल्याच) बाइको विषयी नाही बोलत सचिन ची एखादी इंनिंग किव्हा सिनेमा आणि त्यातल्या बाईकान विषयी जास्त बोलतात.

एक सांगतो  तुलाआतली  एखादी  वस्तू कुठे आहे हे माहित असेल तरी बाइको कडे माग त्यांना आवडत , तुला काय कष्ट नाही पडणार, तुला तसाही काही सापडत नाही  पण तिलाच बर वाटेल तिला मागितलं तर आणि तुला कस काही सापडत नाही मलाच द्यावं लागत ही लाडिक तक्रार सुद्धा करेल सगळ्यांकडे. आपल्या  नातेवाईकांना तिलाच फोन करू दय्याचे , बाईकांना तसही तारखा जास्त लक्षात राहतात. अश्याने ती तुझ्या कडच्या लोकांना जास्त आवडेल आणि त्यातच खरा आनंद आहे आणि तुमच सुख सुधा ….

घरातल्या छोट्या गोष्टींचे निर्णय तू घेऊ नकोस, म्हणजे पडदे, रंग, भाजी, फिरायला जाइच कुठे कधी कुणाला काय घ्याच ....तू मोठे निर्णय घे , म्हणजे अंबानीने आता कशात पैशे टाकले पाहिजेत , मेट्रो कुठून काढायची ,  भारताच्या Budget मध्ये काय काय करायचं , आपल्या टीम चा captain कोण हवा वगेरे वगेरे , आपण छोट्या गोष्टी नाही बघायच्या . जमल्यास स्वयपाक शीक बाइको दमून आली आणि आई  बाहेर गेली असेल, तर तिला घरात आल्या वर  गरम गरम जेवायला मिळण्या  सारख दुसर सुख नाही...

मुख्य म्हणजे लग्न enjoy करा , वर लिहिलेलं पटल तर कर ..else  तुझ्या मनाच कर पण सुखी राहा आणि लोकांना सुखी करा, तुम्ही आनंदी राहा लोकांना आनंदी करा , लग्न हे दोघांच नसत तर  दोन कुटुंबांच असत दोनशे माणस असतात त्यात ते लक्षात ठेवा



आणि निसर्गाचे नियम पाळा ......

सागर मामा



























शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

मा श्री उद्धव ठाकरे- एक पत्र

मा श्री उद्धव ठाकरे,

     स. न. वि. वि.

कोकणात दोन भावांच्या भांडणात एक शेट दुकान, जागा हडप्तो अस होऊन सुधा दोघ भाऊ खुश असतात कि कशी जिरवली म्हणून . कारण मुळात शत्रू कोण हेच ठाऊक नसतं तस  सध्या मला सेना आणि भाजप कडे बघून वाटतंय. 

मी गेली पंचवीस वर्ष मतदान करतो आहे, अगदी न चुकता आणि मत कायम युती ला होत त्या मुळे झाल काय कि, ह्या खेपेस कुणाला मत द्यायचं हे कळेच ना कारण मत कायम सेना भाजप अस  होत. 

पण एकमात्र नक्की कि तुम्हाला  सगळ्यांनी मिळून फसवलन आणि तुम्हाला अजून हे लक्षात येत नाही ह्याच आश्चर्य वाटतंय. 

जास्त प्रेम, मोह  तुम्हाला कसला आहे? सत्ता का राज्य? उत्तर मला नकोय ते मला दिसलंय. पण ह्यात तुमच नुकसान तर झालच पण महाराष्ट्रच  जास्त झाल न?  साफ गंडवल तुम्हाला, आणि तुमच्या कडे अशी माणसं   पण नाही जी लोक ही खेळी ओळखू शकतील. ह्या खेपेस  खूप सुवर्ण संधी आली होती तर तुम्हाला सोन्याच अंड नको होत अख्की कोंबडीच हवीशी झाली. प्रत्येक खेपेस पहिलच येणे गरजेच नसत साहेब. आत्ता काय झाला बघा हातातल  सोन्याच अंड जाउन नुसतच अंड आल. 

शरद पवार साहेबांकडून कडून हे शिकण्यासारख आहे, त्यानी एकाच खेळीत अनेक गोष्टी केल्या ….  युती फोडली, भाजप ला लोकांच्या मनातून उतरवल आणि स्वतावरच संकट दूर लोटलं , मानल त्यांना. 

आपण साहेब काय केलत? हातातली सत्ता घालवली लोकसभेत मंत्रिपद आणि लोकांचा आदर आणि प्रेम. पवारांची भूमिका तुम्ही घेतली अस्तीत तर? भाजपला हव तेव्हा तुम्ही दंडका  देऊ शकला असता , आता अगदी  समोर जाऊन बसलाय त्यांना कळतंय तुम्ही काय करणार ते, कधी तरी पाठून मारा, सारख समोर जाउन मारामारी करण्याचे दिवस गेले. आता निवडणूक झाल्या कि काय् होणार आहे अगदी उघड आहे, ते तुम्हाला दिसायला हवय. 

तुमचा शत्रू तुम्ही  ओळखलाच नाहीत , भाजप हा शत्रू न्हवता कधीच ….  तुम्ही समजलात आणि चुकीच्या दिशेने हल्ले केलेते लोकांच्या मनातून उतरलात , आता अस  लोकांना शिव्या देऊन नाही चालत, मध्यम वर्गीयांच्या मनातून उतरलात साहेब, कुणाचा बाप वगेरे काढायला हा काही सिनेमा नाही, तुमच वाक्य आणिक कुणी म्हंटल तर? जीवे मारल असत लोकांनी …. मग आपला बाप तो बाप आणि लोकांचा काय? 

कुणी टीका केली कि लगेच हाणून (मारून ) नका पाडू , जरा आत्म परीक्षण करा, नवीन लोकांना विचारा (घरच्या नाही ), अजून थोडी असतील आजूबाजूला चाचपडून पहा. शत्रू कडून पण शिकण्यासारख असत हे ध्यानात घ्या आधी शत्रू कोण हे ओळखा … 

शिवेसेनेला जशी महराष्ट्राची गरज आहे तेवढीच महाराष्टाला सुधा अजून सेने ची गरज आहे. 

आपल नम्र 

सागर कुलकर्णी 










मा श्री देवेंद्र फडणवीस - एक पत्र

मा श्री देवेंद्र फडणवीस ,

      स न वि वि,

पत्र लिहिण्यास कारण कि गेल्या आठ  दिवसात तुमच्या बद्दल , कौतुक, आदर  जिव्हाळा, राग , चीड ह्या सगळ्या भावना मनात आल्या आणि आता नैराश्या आणि वैफ़ल्य आल आहे.

कौतुक ह्याच्या करता वाटल कि चांगला सुशिक्षित, हुशार , तरुण  आमच्यातलाच  एक,   आता मुख्य मंत्री झाला अस वाटल , म्हणजे लग्नात मुंजीत कुणाचा  भाचा काका असतो न , जो थोडा हुशार असतो आणि लोक म्हणतात अरे हा फडणवीस , हुशार आहे पुढे जाईल , बाइको बँकेत आहेत … चांगल कुटुंब आहे  वगेरे त्यातलाच वाटलात म्हणून जिव्हाळा  वाटला  (न ला न आणि ण ला ण म्हणता हे ऐकून सुधा खूप आनंद झाला ) तुमच्या मुलखाती मध्ये तुम्ही म्हणालात कि सत्ता ठेवण्या  साठी सत्ता नाही ठेवणार … अवडल होत आदर वाटला  आणि  खर सुद्धा वाटल होत तेव्हा.

जेव्हा सेनेला तुम्ही  उत्तर नाही दिल झुलवत ठेवलं तेव्हाही चांगल वाटल, हट्टी  मुलाला असाच धडा द्यायला हवा असा वाटल तेव्हा, पण काल अगदीच सगळ फौल ठरवल फडणवीस तुम्ही साफ अपेक्षा भंग. हुशार म्हणता म्हणता तुम्हाला बनवल कि , शेवटी पश्चिम महाराष्ट्र सरस ठरला , तुम्हाला बंदूक दिली चालवायला पण गोळ्या मात्र पवार साहेबान कडेच आहेत,  किती दिवस नुसत्या बंदुकीचा धाक दाखवणार  बे … आज न उद्या कळणारच लोकांना कि उगा फुका मारून राहिले हे  फडणवीस,……  रागावतील लोक

आम्हाला दिल्ली ची सत्ता नको होती म्हणून तुम्हाला निवडल , पण तुमच्या वर दिल्ली आणि  गुजरात दोघांची सत्ता , कस होणार आमच?  महाराष्ट्रच नशीब वाईट , त्या नारायाण राव पेशव्यांना मारला न  त्याचे  भोग अजून भोगतोय , त्या काळात फडणवीस होते , ज्यांनी दिल्ली  आणि इंग्रज ह्यांना समर्थ पणे तोंड दिल आणि राज्य राखलं, इथे तर तुम्ही दिली च  ऐकून अगदी राघोभांचाच आधार घेतला ,  अहो फडणवीस त्यांना सत्ता हवी आहे हे नाही लक्षात येत तुमच्या.  मला सुधा एवढ कळत आणि चीड येते.

आता वर्ष भरात निवडणुका होतील (तेही आमच्याच पैशांनी),  तुम्हाला  आमची  काय तुमची मत पण  मिळायची नाहीत पण त्यांना मात्र त्यांची मत मिळणार , पुन्हा तेच किमान दहा  वर्ष आमचे बारा वाजवणार  धरणात मुतणार मुंबईत हल्ले झाले कि वेड्यागत बोलणार शेत्कारांच्या आत्महत्या होतच राहणार, आणिक  शंभर  ठिकाणी टोल लागणार . तुम्ही फार फार तर लोक सभेत जाऊन एखाद मंत्रिपद घ्याल आणि धन्य व्हाल …. कधी कधी वाटत हा कट महाराष्ट्राला गुजरातच्या पाठी मागेच  ठेवण्याचा तर न्हवता ना ? नसेलही  पण नुकसान मात्र मराठी माणसाचच झाल  आणि त्यात फडणवीस तुमचा सिंहचा वाट असणार , (इथेच नको होता हो माझा महाराष्ट्र) आणि ह्याचे प्रतिसाद लोक सभेत हि उमटणार ….  उशः काल होता होता काळ  रात्र झाली . 

 देव करो, फडणवीस करो का तावडे करोत का आणि कुणी करोत , तुम्हाल सुबुद्धी होऊन आमचा अपेक्ष भंग टळो …हीच मी महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो.

आपला विनम्र

सागर कुलकर्णी

ता. क.

आता मुंजीत तुमच्या कडे बघून बोट दाखून लोक म्हणतील (मी सुधा ) हाच तो फडणवीस, गळ्यात घड्याळ घातलेला .

कुलकर्णी