रविवार, ७ डिसेंबर, २०१४

प्रिय अद्वैत

प्रिय अद्वैत,अम्रिता

तुमच्या लग्ना निमीत्त 

माला मामा बनवणारा हा पहिला माणूस आणि त्याने मामा बनवलेला मी पहिला , नंतर नंतर त्यानी खूप लोकांना मामा बनवला पण पहिला मान माझा.

तो खूप गोष्टीत पहिलाच होता … दोन्ही बाजूला पहिला नातू पहिला मुलगा स्वताचा धंदा चालू करणारा पहिला harris shield, kanga league खेळणारा पहिलाच आणि अशे अनेक … अगदी  लहान पणा पासून तो आमच्याकडे एकटा राहायचा धड बोलता सुधा येत न्हवत तेव्हा पासून आणि आमच्या इथे पण तो खूप famous होता खूप नकला करायचा वाघ, मांजर आणि किशोरे कुमार चा आवाज काढून दाखवायचा तो , खूप गोबरा आणि कधीही न रडणारा , त्याचा स्वभावात रड नाहीच , हे संसारात खूप उपयोगी ठरेल.

तुम्ही दोघ आता एक मेकांना दहा वर्ष ओळखता त्या नंतर प्रेमात पडलात तेव्हा तुम्हाला एका मेकान विषयी मी काय सांगणार आणि सुखी संसार कसा करायचा हे मी सांगण म्हणजे विनोदच होईल , तरी तुमच्या पेक्षा चार पावसाळे चार माणस जास्त पहिले म्हणून काही अनुभव सांगतो.

लग्न हि एक  भागीदारी असते आणि partnership  ही पन्नास पन्नास टक्के असते  असावी, पण खर सांगू लग्नात कधीच नसते रे पन्नास  पन्नास कधी 40  - 60 कधी 30 - 70 कधी 49 - 51 तर कधी 90 - 10 सुधा , 50-50 म्हणेज आपल्या आपल्या हद्दीत, असा  संसार  नाही चालत , एका ला  तरी एक पाउल पुढे किव्हा  पाठी यावच लागत,एक म्हणजे एकशे सुधा पण एकाच माणूस सारखा पाठी पुढे करत राहिला तरी कस चालेल , त्या साठी दोघांनी प्रयत्न करावे लागतात ..... 

विनोद हा माझ्या मते लग्नाचा आणि एकूण जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि असावाच स्वतावर हसण खूप कठीण आहे पण जर जमल तर त्या सारख सुख नाही, पण थोड्यात गोडी हे तुम्ही जाणताच. मस्करीच असुदेत कुस्करी करायचा मोह आवरा .

राग हे एक व्यसन आहे अस मला वाटत आणि गंम्मत म्हणजे ह्याचा त्रास स्वतः चिडक्या माणसा पेक्षा आजु बाजूच्या  लोकांनाच जास्त  होत असतो, म्हणजे व्यसन करणारा स्वताच जास्त त्रास करून घेतो, दारू पिउन लिवर खराब, तंबाकू ने कर्क  रोग, पण चिडक्या माणसाच तस नाही, चिडून तो मोकळा होता आणि इतर लोक त्रास करून घेतात.   तुम्ही दोघ चिडके नाहीत  तरी सुधा सांगतो राग आवरा, टाळा आणि विनाकारण  अजिबात चिडू  नका, खूप गोष्टी सोडून द्या  पटो अथवा न पटो, माणूस सोडण्या पेक्षा गोष्ट  सोडा. तुम्हाला जर एकमेकांना शिवी द्यायचा मोह झाला  तर  थांबा दोन मिण्ट थांबा  आणि तरी वाटल तर द्या  पण मनात तोंडातून नाही , म्हणजे दोन समाधान शिवी दिली म्हणून तुला आणि दिलीच नाही म्हणून तिला. एक मेकांचा आदर करा माझ्या मते सगळ्यांचाच आदर  करावा, जमण कठीण  आहे म्हणून किमान एक मेकांचा तरी आदर करा, भांडताना हे लक्षात ठेवा म्हणजे  आपोप शब्द जपून निघतील.

मी अश्या  बर्याच जोड्या पहिल्या आहेत ज्या एका मेकान बरोबर comfortable नसतात, तुम्ही खूप आहात आणि तसेच राहा, (चार लोकांत असताना कमी राहिलात तरी चालेल) कारण तुम्ही एक मेकांना  गृहीत धरता चांगलय, तुमचा एकमेकांवर विश्वास आहे, म्हणजे कस कि  घरी कधी चार मित्रांना आणलस हे गृहीत धरून कि त्यांना  आपली बाईको नक्की खाईला घालेल ह्यात काहीच गैर नाही, तीही अस कधी करेल (कर कि लेका चहा) तेव्हा तुला बाईकोची   भूमिका पार पडावी लागेल...पण विश्वास ठेवा गृहीत फार नका धरू … विश्वास असण आणि गृहीत धरण ह्यात एक बारीक रेष आहे ती ओळखा आणि पाळा ….

 स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट आहे, गोष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यातली एक घटना ...

"एकदा स्वामी आणि त्यांची शिष्या का शिष्य नदी काठी फिरत होते, तेव्हा स्वामींना शिष्याने  विचारल कि प्रेम कस कराव? स्वामी तिला नदी  जवळ घेऊन गेले आणि त्या शिष्येला म्हणाले कि ओंजळीत पाणी घे, ओंजळीतल्या पाण्याकडे पाहून म्हणाले कि अस प्रेम कराव ..... ओंजळ बंद करून मुठीत धरलस कि सगळ पाणी सांडून जाइल  आणि ओंजळ थोडी सैल केलीस तरी पाणी सांडेल खूप हलके पण तरी घट्ट अस प्रेम हे ओंजळीतल्या पाण्या प्रमाणे कराव  "

मला ईगो म्हणजे नक्की माहित नाही, पण "अभिमान" मध्ये दाखवलाय तो नक्कीच , तुमच्यात तस येण कठीण, अम्रिता काय उद्या कपडे विकायचं काम करणार नाही आणि तू जर मुलाना शिकवल तर तिला ते आवडेलच आणि अद्वैत तू थोडा आळशी असल्याने तू काय तिच्या कामात ढवळा ढवळ करणार नाहिस, तरी एक मेकांच्या  यशाच कौतुकच करत राहा …

दोघे मिळून माणस जोडा खूप सुखी व्हाल तशी तुम्हाला मित्र मंडळी आहेतच पण नातेवाईक पण जोड सारखी माणस असुदेत अवती भवती म्हणजे तुम्हाला एकांत मिळाला कि आवडेल ...प्रत्येकाची  Romance ची   संकल्पना फार वेगळी असते, मला स्वताला चहा खूप आवडतो,  सकाळचा एकत्र चहा पण मला समुद्र किनारी मारलेल्या फेरी पेक्षा जास्त Romantic वाटेल, सांगायचं काय कि europe टूर मस्तच पण romance छोटाच ठेवा... आणि खर तर अमुक म्हणजे सुख तमुक म्हणजेच romance अस नाहीये ...नसतं तुम्ही तुमचा शोधा.

....आणि आता ती बाइको आहे आता फरक पडणार .... एक मुख्य फरक म्हणजे ती आता पिक्चर बघून झाला कि  तुझ्याच (तुमच्याच)घरी येणार आधी कस  ती तिच्या घरी आणि तू तुझ्या, पण आता तस नाही आणि हा फरक खूप  पडणार ....तुला रोज वेळेत दात घासावे लागणार आणि  दोनदा, अंघोळ करावी लागणार  बघ बाबा केवढे कष्ट  ...मैत्रीण आणि बाइको ह्यात खूप फरक असतो स्वाभाविक आहे त्या मुळे  मैत्री जपून ठेवा (आणि बाइको पण ) तीच येईल कामाला ...

भांडण वगेरे  करा  पण एक मेकांशी न करता त्या वृत्तीशी किव्हा विषयाशी ...व्यक्तीशी नका रे  भांडू (अस तुझी आई म्हणते नेहमी)  आणि जमल्यास लगेच संपवा , माझा एक मित्र आहे तो शांत आहे पण त्याची बाइको सुधा शांत (किती छान) ते दोघ चिडले कि भांडत नाहीत , अबोला धरतात आणि तास झाला शांत झाले कि  मग बोलतात , संपल ना  भांडण राग गेला कि मग कशाला आरडा ओरड होतोय .....तस करा ....

आपले आपले स्वतंत्र मित्र मैत्रिणी पण ठेवा ...मधेच एखादी मुलांची ट्रीप करून ये तिला आवर्जून पाठव खूप फरक पडेल परत आल्यावर , बाईका नवरा कसाय हे एकमेकांना  विचारतात  आणि आपला कसा चांगलाय हे चार चौघात सांगतात (एखादीलाच तक्रार सांगतात)आणि तू तसा गुणीच आहेस त्या मुळे  तुझ्या गुणांची नकळत तिच्याच कडून उजळणी होईल.  आपल अस नसत , चार पुरुष एकत्र येउन बहुदा (आपल्याच) बाइको विषयी नाही बोलत सचिन ची एखादी इंनिंग किव्हा सिनेमा आणि त्यातल्या बाईकान विषयी जास्त बोलतात.

एक सांगतो  तुलाआतली  एखादी  वस्तू कुठे आहे हे माहित असेल तरी बाइको कडे माग त्यांना आवडत , तुला काय कष्ट नाही पडणार, तुला तसाही काही सापडत नाही  पण तिलाच बर वाटेल तिला मागितलं तर आणि तुला कस काही सापडत नाही मलाच द्यावं लागत ही लाडिक तक्रार सुद्धा करेल सगळ्यांकडे. आपल्या  नातेवाईकांना तिलाच फोन करू दय्याचे , बाईकांना तसही तारखा जास्त लक्षात राहतात. अश्याने ती तुझ्या कडच्या लोकांना जास्त आवडेल आणि त्यातच खरा आनंद आहे आणि तुमच सुख सुधा ….

घरातल्या छोट्या गोष्टींचे निर्णय तू घेऊ नकोस, म्हणजे पडदे, रंग, भाजी, फिरायला जाइच कुठे कधी कुणाला काय घ्याच ....तू मोठे निर्णय घे , म्हणजे अंबानीने आता कशात पैशे टाकले पाहिजेत , मेट्रो कुठून काढायची ,  भारताच्या Budget मध्ये काय काय करायचं , आपल्या टीम चा captain कोण हवा वगेरे वगेरे , आपण छोट्या गोष्टी नाही बघायच्या . जमल्यास स्वयपाक शीक बाइको दमून आली आणि आई  बाहेर गेली असेल, तर तिला घरात आल्या वर  गरम गरम जेवायला मिळण्या  सारख दुसर सुख नाही...

मुख्य म्हणजे लग्न enjoy करा , वर लिहिलेलं पटल तर कर ..else  तुझ्या मनाच कर पण सुखी राहा आणि लोकांना सुखी करा, तुम्ही आनंदी राहा लोकांना आनंदी करा , लग्न हे दोघांच नसत तर  दोन कुटुंबांच असत दोनशे माणस असतात त्यात ते लक्षात ठेवा



आणि निसर्गाचे नियम पाळा ......

सागर मामा



























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: