सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

निगडीतली देवळ

वणी च सप्तशृंगीच देऊळ सोडल्यास मी फार आवडीने देवळात जात नाही , नेलं तर ना नसते , पण मुद्दामून जात नाही, मी शॉपिंग मॉल ला पण आवडीने जात नाही. मला सगळ्याच गोष्टींचा धंदा केलेला आवडत नाही. दत्तपाड्याला आम्ही जिथे राहायचो तिथे एक रामाचं देऊळ होत, खूप मस्त मला जाम आवडायचं, आम्ही पावसाळयात तिथे आत खेळायचो , राम  नवमी   सोडल्यास फार गर्दी नसायची आणि तिथे कीर्तन व्ह्याच, तेव्हा ते अकराला बंद होयच, नुसतं टाळ आणि ढोलक, माईक नाही कि काही नाही खूप प्रसन्न वाटायचं. तेव्हा सुद्धा कुणीतरी तक्रार केली होती आवाज होतो म्हणून. चालायचंच, इलाज नाही, नाव घेत नाही त्या माणसाचं, पण देव धर्म वगैरे करणारा माणूस होता . सांगायचा मुद्दा असा कि मला देवाचा प्रॉब्लेम नाही , मला त्याला विकणाऱ्यांचा आहे , म्हणून मी मोठी देवळ  टाळतो , जमलंच तर मुख दर्शन. 

मी सध्या निगडीला असतो , प्राधिकरण , मुंबईच्या गजबजाटा पासून दूर , शांत जागा  आहे . सगळ आटोपशीर तरी सगळं मिळत आणि फार लांब जाव लागत नाही , मॉल नाहीत अजून इथे, ज्यांना ते आवडत त्यांना इथे नाही आवडणार.   माझ्या पायाला भिंगरी आहे, त्या मुले मी सतत इथे चक्कर मारत असतो. खूप देवळ  आहेत इथे सुंदर आहेत, पण एरवी मी पायात shoes घालून असतो म्हणून  आत जाता न्हवत  आला, पाऊस होता त्यामुळे स्लीपर घालणं पण कठीण होत , पण काल संध्याकाळी मी आमच्या समोरच असलेल्या  स्वामी समर्थांच्या देवळात गेलो , बाजूला गणपतीच छोटं देऊळ आहे, मला गणपती आवडतो मस्त असतो नेहमी. देऊळ शांत आहे छान तसाच मोठा ओटा स्वामींची मूर्ती एक चार पायऱ्या वर गाभारा आहे तिथेय, गाभाऱ्यात AC वगैरे आहे, तो नक्की कुणा करताय ते ठाऊक नाही, पण देऊळ प्रसन्न आहे बाजूला बाग आहे , खर म्हणजे एक सोसायटी आहे तिची बाग आहे , मस्त आहे हिरवी गार. एक पाच मिंट बसून मी निघालो. बाहेर टाकी आहे पाण्याची एक कुत्र होता बसलेलं , देऊळ साफ करणारी बाई कडे बघून जोरात शेपूट हलवायला लागला, त्या बाईने टाकीचा नाळ उघडून दिला आणि त्या  कुत्र्याने मस्त तोंड खाली धरून पाणी प्यायला सुरुवात केली , बाई पण त्याला काही तरी बोलली कानडीत ....

मला आठवलं कि पाठी एक मारुती मंदिर आहे दक्षिण मुखी असं आहे, मला फार सोयर सुतक नाही देवा ने कुठे पण बघाव ,पण असले काही तरी. अतिशय सुंदर असा परिसर आहे, मोठी बाग आत गोल गोल असे पायवाटा, स्वच्छ कुठे घाण नाही  कुणी जबरदस्ती करून हातात हार देत नाही, फुलं कोंबत नाही , पेढे नाही , नारळ नाही काही नाही . गेटच्या आत गेलं कि उजवीकडे  बाप्पा च देऊळ आहे, मस्त आहे आवार छोटा आहे , बाहेर दोन आज्या आणि एक आजोबा होते , त्याच गप्पा, त्यातली एक आजी बहिरी होती त्या मुळे मला आणि खूप लोकांना सगळं  ऐकू येत होत. गणपती पूर्व पश्चिम होता. त्या देवळाच्या थोड्या पुढे मारुती मंदिर , छान छोटे खानी  रस्ता बाग, सहाच उन्ह , पाठी लहान मुलांचा प्ले एरिया , मोठी मूल (मुलीचं होत्या जास्त )  मस्त त्या बागेतून बागडत होती (अनवाणी ).  मेन गेट पासून देऊळ पन्नास फुटांवर आहे मध्ये बाग हिरवीगार , आजूबाजूला छोटीशी घर आणि झाड , त्यातून हलके सूर्य किरण येत होती आणि संध्याकाळचा एक छान सुवास. हे देऊळ थोडं मोठय , म्हणजे बरंच , एक वीस बावीस पावलांचा तो ओटा मग गाभारा, देवळा  सारख देऊळ , पण हल्ली देवळा सारख देऊळ दिसत कुठे? छान आहे कोरीव मूर्ती, पण आमच्या इथे बोरिवलीला एका हातात मोठा डोंगर   आणि दुसऱ्या हातात गदा असलेली शेंदूर फसलेली साईड पोझ वाली मूर्ती आहे त्या मुळे असा रेखीव हनुमान मी पहिल्यांदाच पहिला , मी फार देवळात जात नाही त्या मुळे  हनुमान असाच असतो अस मला वाटायच एकदम उडणाऱ्या पोझ मध्ये, सगळी देवळ एक तर दत्तपाड्याची लहान पणा पासून पाहिलेली किव्हा वणी तेच ठाऊक आहे मला . 

मी देवळात गेलो त्या चार पायऱ्या चढून, रीतसर नमस्कार केला आणि बाजूला माझ्या माहितीतला हनुमान दिसला त्याला मी थोडा जास्त वेळ नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली, खूप सुबक देऊळ केलय हे प्रदक्षिणा मारताना दिसलं . तसाच पाठी येत मी  अगदी पायरी जवळ भिंतीला टेकून बसलो, डोळे बंद केले खूप शांतता , मधेच मुलांचा आवाज खेळताना , देवळात मुलांचा आवाज खूप छान वाटतो तसाच डोले बंद करून बसलो तेव्हड्यात हलके घंटा वाजली मोठा आवाज नाही छोटा ....टन  टन असा ....एक दोन मिनिटाने बाजूला डोळे  उघडून पहिल तर एक माणूस होता बाजूला, मला हात जोडून नमस्कार केला मी हि केला , मग गुरुदेव दत्त म्हणाला, मला पण म्हणा असा आदेश सोडला , मी हि म्हणालो. मग बोलायला लागला , जरा वेडसर टाईप्स होता , मग देवाला माणूस करून तो कसा मोठाय ते सांगत्याला लागला ,परत गुरुदेव दत्त म्हणाला , मी पण लागलीच म्हणालो .   आपण अश्या लोकांशी वाद घालत नाही , नशिबाने तो पुढे गाभार्या जवळ गेला, तसा मी उठलो , उगाच काही गोष्टी मला पाटल्या नसत्या पण मग माझं शांत झालेलं मन अशांत झालं असत......

सोमवार, १५ मे, २०१७

gyaan

I had to write this, since I was termed as an intellect or it was presumed that  this is the  way which I present myself and Socrates was thrown in the face.

Couple of things, I don't understand Socrates, not sure whether Plato was his teacher or Aristotle or vice versa and mentioned sri sri, since he is the newest philosopher and get lot  of his gyan, which I accept (in my cell) and say thank just not to be rude, since  it is also too heavy. 

I  am just lost nowadays with so many quotes which are shared  which are all Greek and Roman (so this again is just a proverb, neither been to Greece nor Rome), for me bliss is having a drink with Atul and suddenly madan mohan - lata combination song comes up or a simple Jagjit - Gulzar gazhal which I understand, for me  Shankar Mahadevan singing an allap is a beauty which I still don't understand  but is soothing rather than a Kishori Amonkar concert (again nothing against her).  For me  pearl is my kid and wisdom is what you all  my friends share and which i understand , a rickshaw  waala perhaps gives me more gyaan than a spiritual guru, so when some one says pearls of wisdom, I am lost again.  My point was can we just share or talk normal  stuff  rather than a  15 mb video, my memory  is too less (4 gb) on phone and mera dimag usase bhi kam hai. I got the point that mein crib bahut maarta hoon, noted  and understood and agreed, but I am still evolving, still Work in process and improvement suggestions are always welcome.

For me fulfillment or achievement  is when my daughter is not able to sleep some times in the night  and she calls out "baba?" and I say baba aahe ithe, zop tu bala and she is fasst asleep in the next minute.

I am a simple man and this is the problem  with the world, when I say muze kuch nahi samajha  you term me  is an intellect and when most of the guys are trying to prove that they are intellect, we term them as idiots. My knowledge  of cricket is far more superior than philosophy, I can probably list down centuries of Sachin than quotes of the first philosopher to the latest  (I can't remember a single  quote).

So again taken your point, ppl do fwd just to keep in touch, their choice and in a big forum like ours it is difficult, so I would rather chat with individual next time rather than get all of us talking. But please don't give gaali by terming me  as  an intellect, because the only thing i know is i know nothing (ye bhi Manoj ne fwd kiya tha which i understood )

मंगळवार, ७ मार्च, २०१७

देवाच दुकान

आज मला एक अति प्रामाणिक दुकानदार आणि खरा देव भक्त दिसला.  वाटेत येताना  मला एक देवाचं दुकान दिसल. म्हणजे शटर असलेल दुकान, त्यात अनेक मुर्त्या  लाईन मध्ये लावून ठेवल्या होत्या आणि समोर खुर्च्या.  किती प्रामाणिक माणूस, लोक हेच करतात आणि त्याला देऊळ अस गोंडस नाव देतात. हा माणूस बघा, सच्चा आणि प्रामाणिक. एक दिवस मी नक्की जाईन आज गाडीत होतो, पार्किंग चा लोचा असतो, कधी स्कूटर वर आलो कि नक्की थांबेन, दुकानात जाऊन  दहा बारा रुपये देऊन हक्काने आशीर्वाद घेऊन येईन.  

 

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

पुन्हा झी चे कार्यक्रम

पुन्हा झी ....... 

गेल्या खेपेस जेव्हा मी रागाने, झी च्या (बौद्धिक ) घसरण बद्दल लिहिलं होत, तेव्हा वाटलं होत कि अजून किती खाली जाऊ शकतात ही लोक? चुकलो साफ चुकलो, आता रागा  ची जागा "कीव" ह्या भावनेनी घेतली आहे. आता कीव नक्की कुणाची करायची? झी ची? त्यांना भरपूर पैसे मिळतात, कलाकारांची? त्यांना ही पैसे मिळतातच कि, पण त्यांच्या creativity च काय? नुसते पैसे काय हो? अगदी..... कुणीही कमावत . का जनतेची? अगदी  तन,  मन, धन (झी फुकट नाहीये) लावून हे इतके फालतू , निर्बुध्द  आणि खूपदा घाणेरडे कार्यक्रम बघतात म्हणून. 

जय मल्हार : अजून शंभर वर्ष सहज जाईल ती मालिका, अहो देवचं आहे त्यात, त्यामुळे मालिकेला मरण नाही.   तरीही अजून त्या  मल्हर कम शंकर कम पहेलवाना ला अभिनय काही जमत नाहीये.  हळू हळू देवाला माणूस करून सोडणार आहेत कोठारे, मत्सर द्वेष ईर्षा अश्या माणसालाच दिलेल्या भावना देवात दाखवणार. माणसाला देव करणं सोप्प आहे पण  देवाला माणूस? ह्यात खरी creativity ..... 

तुझ्यात जीव  रंगला : खरं तर फार नाही पहिली ती मालिका, पण मला त्या पेहेलवाना  पेक्षा हा जास्त  आवडला. आणि  ती  भाषा पण शोभते त्याला , त्यात पण थोड vyamp पणा घेतलाय पण सध्या टी गरज आहे मराठी महिलांची (पुरुष नाही पाहत एवढ्या चवीने ह्या मालिका)  म्हणजे बघा मालवणी कट्टा नावाच्या हॉटेल मध्ये सुद्धा पनीर मसाला आणि फ्राईड राईस मिळतो ना तश्यातलं आहे, फार कुणी लावून घेत नसेल ही मालीका 

माझ्या नवऱ्याची बायको : बरा वाटायचा मला तो खांडकेकर , बरा म्हणजे बराच चांगला नाही. पण त्या दिवशी हवा येऊ द्या मध्ये तो आणि त्यांच्या सौ आल्या होत्या (ती आवडते मला, गोडे)  तेव्हा इतकी निर्बुद्ध उत्तर दिलीन तेव्हा माझी खात्री पटली  कि हा अगदी योग्य आहे त्या रोल ला. एक तर फार हावभाव करून अभिनय करण्यात त्याला रस नाहीये (RJ होता ना तो?). आणि फार काय नाही  त्यात त्याला करण्यासारखं.  अनिता दाते खरं तर गुणी कलाकार आहे, एकदा एका छोट्या भूमिकेत पहिला होत सुबोध भावे बरोबर,  मग एका लग्नाची दहावी बारावी गोष्टीत. ह्या रोल ला तशी फिट आहे, म्हणजे खूप देखणी बायको दाखवली तर तो एका कुरूप नटवीच्या प्रेमात पडताना दाखवलं तर कस वाटल असत ?  खर  काही हरकत नाही म्हणा,  इतका मूर्ख  पणा लोक खपवून घेतात हे पण खपल असत . लहान पाणी आम्ही challenge नावाचा खेळ खेळायचो त्यात चार एक्के असा दहावेळा तरी लोक करायचे, तस आहे समोरचा काहीच challenge  करत  नाही म्हंटल ना कि द्या थापा (ज्या दिवशी एका ने जरी challenge केला  ना कि बघा, झी च्या समोर तारे चमकतील ).  रोहिणी निनावे ह्या काकू अजून शे दोनशे वर्ष पूर्वीच्या काळात जगतात, म्हणजे अति टुकार मालिका असेल तर  लेखक कोण? हे कळायला फार वेळ लागत नाही. अजून चूल आणि मूल मध्ये गुन्तलेल्या आजी आहेत ह्या. शोभा कपूर एकता  कपूर हे त्यांचे idol असावेत, अजून माहेरच्या साडी मध्ये अडकलेल्या ह्या आज्जी ला झी का म्हणून इतक्या मालीका बिघडवायला देत असेल हे न सुटलेलं कोड आहे. नवऱ्याला डब्बा दिला म्हणजे सॉलिड आहे बाई, बस ह्या  पलीकडे ती  बाई विचार करू शकत नाही. मग ती दुसरी   मुलगी कशी वाईट? तर तिला स्वयंपाक येत नाही आणि काम पण नाही, मग का आवडेल त्याला? बर एक त्या माणसाला मुलं विषयी पण काहीच वाटत नाही? फारच जास्त  आहे हे, मग पोरखेळ  तोंडाला काळ फासा, खाज खुजली टाका असे अतिशय पांचट बिनडोक आणि बाळबोध गोष्टी दाखवून लोकांना हसवण्याचा (का फसवण्याचा?) नीच प्रयोग करणारी ही मालिका. कायद्याने बंदी आणता येईल का  ? हा विचार मी  अगदी मनापासून करतोय, पण वकील म्हणजे झी सारखीच जमात निघाली तर? माझेच पैसे जातील आणि ही जमात श्रीमंत होईल....... अरे हो एक राहीलच , हल्लीच्या हलली फडणवीसांचं भाषण बरेचदा ऐकल, बर बोलतात कि सारखं जाऊन राहील येऊन राहील वगैरे नाही करत ते, पण मग ती राधिका चांगली शिकली सवरलेली ही अशी भाषा का बर बोलते?  (इंग्रजी शिकवत नाहीत काय नागपूरला? )आणि तिला कणा नाही का? तोच उष्टा खरकटा नवराच तिला का हवाय? नागपूरचे लोक चिडत का नाहीत? विदर्भ ला अगदीच असं तस नका समजू एकदा का ते चिडून राहिले ना कि मग बघून राहा बे मुश्किल होऊन जाईल ..... 

ता क : अरुण नलावडे (खूप गुणी कलाकार)ह्यांनी लाजे खातर सोडली म्हणे सिरीयल 

खुलता  कळी खुलेना :   कोण म्हणतं जगात देव नाही? विक्रांतच एक देऊळ पण आहे म्हणे झी च्या स्टुडिओ मध्ये , रोज आरती वगैरे असते, बावन्न बुधवार केले आणि दररोज झी ला पन्नास रुपये दिले कि विक्रांत सारखाच नवरा मिळतो म्हणे (झी मराठी बंद पडणार हे गृहीत धरून नवीन धंदा काढलाय सुभाष जी ह्यांनी) गर्दी रोज वाढते आहे म्हणे. पण मला एकच खटकतंय, त्या मुलीला नाव द्यायचं ना स्वतःच, ती बायको गुणी आहे, क्रेडिट कार्ड दिल कि झालं फार फार तर अजून एक दोन चार लफडी करेल, पण ह्या वेळेस तो आधीच काळजी घेऊ शकेल (गायनेक असल्याचा काय उपयोग?). पण नक्की काय दाखवायचं आहे हे नाही कळलं मला, नाही कळत तेच बरं आहे तस,  मला  त्यांच्या इतका निर्बुद्ध पणा जमणं  कठीण आहे. ह्या सिरीयल मध्ये एक जमेची बाजू म्हणजे दिग्दर्शन आणि अभिनय, पण साला स्टोरी मधेच लोचा, खूप जास्त लोचा अजून किती खेचणार आहेत कुणास ठाऊक.  मी ही फक्त पहिले मिनिट भर सहन करू शकतो किंभहुना  आवर्जून पाहतो कारण त्याचा शीर्षक गीत,  शंभर पैकी दोनशे गुण ...... 

काही दिया परदेस : ही सीरिअल अजून पंन्नास वर्ष नक्की चालेल, फक्त तेव्हा सगळेच हिंदीत बोलतील, म्हणजे मुंबईत अशुद्ध हिंदी आणि बनारस ला शुद्ध, आधी मुंबई मग बनारस मग  परत मुंबई. इथे असलं तरी  आपल्या सारखच वागायचं तिथे पण असच  पण शिव ने इथे पण आपल्या सारखं आणि तिथे पण आणि मधेच एक वाईट सून (चायला हे काय काढलंय कळत  नाही, सून वाईट सासू वाईट). चांगला संसार चालला असेल तरी मोडतील ही लोक वाईट साईट मनात भरवून ..... जाऊदे . 

चूक भूल द्यावी घायवी : मी दिलीप प्रभावलकरचा fan आहे, मला प्रियदर्शन जाधव पण आवडतो त्या मुळे मी ती बघतो.   तरुण पणीची  पण मुलगी चांगली आहे, फक्त सगळीच लोक वयापेक्षा तरुण दिसतात ती म्हातारी  शंभर नाही वाटत आणि आवाज बघा कसला सात मजली लाऊड आहे पण फार्स म्हणून ठीके, अजून तरी हवा तसा विनोद नाहीये .  खरी कसरत जाधव ची आहे (जोशी नाही वाटत तो), त्याला अगदी प्रभावळकरान सारखच करायला लागत,आवाज वगैर चांगला धरलाय, लकबी पण, अभिनय उत्तम हलकी फुलकी मालिका अगदी आवर्जून पाहावी अशी हि नाही आणि पहिली तरी काहीच हरकत नाही.    

नकटीच्या लग्नाला यायचं हा :  काय सीरिअल आहे काहीच कळत नाहीये, नक्की काय म्हणायचं आहे त्यांना काय ठाऊक? उगीच पात्र वाढवून ठेवली आहेत मोठं मोठे कलाकार येतात आणि जातात ..... किती आचरट पणा? जाऊदे मरूदे . 

दिल दोस्ती दोबारा : जस्ट सुरुवात आहे,  पण मला ही आधी पण आवडायची म्हणजे तेव्हा पण टाकाउ न्हवती एवढी तरुण माणसं  असली कि एनर्जी येणारच आणि आता अद्वैत दादरकर आहे दिग्दर्शक, मी बघेन .  फक्त प्राईम टाइम द्यायला हवाय ह्यांना त्या रटाळ सिरीयल पेक्षा केव्हाही बरी ....

चला हवा येऊ द्या : दोन चार मालिकेचा लेखक विनोद आहे कुणीतरी, नावात आहे फक्त विनोद लेखणीत नाही, ते तरी बिचारे किती वेळ करणार हो कॉमेडी, थोडा ब्रेक घेऊन पुन्हा आलेत तरी चालेल.... जुन्या मालिका दाखव तोवर रिपीट     

मी आता न्यूस चॅनेल पाहण्याचा धाडस करणार आहे .... कारण मला त्याच्या वर लिहायचं आहे ...   

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

माणुसकी

दिनेश  गोहिल साहेब हे एक श्वान प्रेमी आहेत, आधी ते (पण) गावठी कुत्र्यांना घाबरायचे, त्यांच्या गल्लीत खूप होती, रात्री अंगावर वगैरे यायचे एकदम. मग वेग वेगळे विचार आले त्यांना संपवण्याचे. अचानक त्यांना वाटलं कि आपण root cause काय आहे हे पाहतच नाही, मग कोणत्या तरी  NGO ला पकडून सगळ्या कुत्र्यांचं operation करून, त्यांची संख्या कमी केली. आता त्यांच्याच घरात एका खोलीत सगळी कुत्री रात्री  झोपतात आणि हेच त्यांचा खाण पिणं आजारपण सगळ  बघतात. मी म्हंटल ग्रेट आहात सर. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट  सांगितली 

तर हे राहतात मीरा रोड ला , आता खूप पसरलय आणि गाड्यांची वर्दळही वाढलीये .  पण कैक वर्षान पूर्वी विरार ला दर पंधरा ते वीस मिनिटाला एक गाडी होती , तेव्हा रात्री स्टेशन वर वर्दळ पण कमी असायची. एकदा ते दहिसर ला गाडी साठी थांबले होते, साधारण दहा साडे दहा झाले असतील, पावसाळा होता, सगळे प्राणी माणस  गुडूप आडोश्याला बसली होती. तिथे एक म्हातारी आणि म्हातारा होते तिथेच राहत असतील, म्हातारीने एक पिशवी काढली त्यात काही जेवण वगैरे होत, तिने एक थाळी काढली आणि एक हाक दिली, तस एक कुत्र  आल पिशवीतलं थोडं त्याला  दिल  , त्याने खाल्यावर तेच ताट पावसाच्या खाली धून म्हाताऱ्याला दिल , मग तेच स्वछ करून आपण त्यात खाल्लं . तिथेच एक चादर ओढली आणि निजली ते कुत्र पण तिथेच वळकोटी करून झोपलं .

म्हणजे खायची  भ्रांत डोक्यावर छप्पर नाही, तरी माया केवढी आणि ती पण एका भटक्या कुत्र्यावर?   ते म्हणाले  मी अवाक होऊन बघत राहिलो.  त्यातूनच प्रेरणा घेतली असेल म्हणाले. 

पण गोहिल साहेब ग्रेट आहेत .... त्यांची स्टोरी पुन्हा कधीतरी          

रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

आवडता शिक्षक


आमच्या (जिमच्या)परुळेकर सरांना मी गुरुजी म्हणतो :) मस्त माणूस आहे, व्यायामाचं ज्ञान देतोच पण त्या बरोबर आयुष्य, जीवन आणी इतर बरच काही, म्हणजे शिकायला जातोय का आणि हा माणूस मला शिकवतोय काय? मी शिकलो अश्या बऱ्याच लोकांन  कडून आणि अजूनशिकतोय.  त्या दिवशी जिम मधून बाहेर पडताना माझा मनात आलं कि ह्या सगळ्यांनी ज्यांनी मला शिकवल त्यात माझा सगळ्यात आवडता शिक्षक कोण ?

 .....हाच प्रश्न तुम्हाला कुणी विचारला तर? तर साधारण पणे शाळेतले किव्हा कॉलेजातले सर किव्हा बाई असं म्हणाल , फार तर शिकवणीचे एखादे मास्तर,  एखाद अगदीच गुणी मुल, "माझे पहिले वाहिले शिक्षक माझे बाबा व माझी आई!" असं हि म्हणेल (म्हणूं दे हो माझा काही विरोध नाही),  माझी बायको अस म्हणणारा प्रामाणिक वर्ग ही असेल.  

पण माझं काय? मला  शाळेतल्या किव्हा कॉलेजातल्या शिक्षकांनी काय शिकवलं? अभ्यास?  पण मला अभ्यास कधीच आवडला नाही.   मी शाळेतल्या,  कॉलेजातल्या वर्गात काहीच शिकलो नाही (नाही म्हणायला लिहायला वाचायला शिकलो हे काय कमी नाही). साक्षर झालो शिक्षित नाही, पण असा आवडता शिक्षक? सांगण फार कठीण. माझ्या  अनाहूत पणे मी शिकत गेलो, बसवून कुणी शिक, असं म्हंटल तर मी तसा शिकणाऱ्यान पैकी नाहीये, त्या मुळे नकळत खूप शिकता आल.

.

आमच्या चीनाय कॉलेजच्या  बाहेर पानाच्या  गादीवर तिवारी बसायचा, एकदा इकॉनॉमिक्स वर चरचा चालू असताना हा सटासट मार्क्स वगैरे बोलून गेला,  पाना ऐवजी पाय दे म्हणालो. त्याला विचारल रे बाबा तुला एवढं कस माहित, मला आत बसून येत नाही तुला पानाच्या गादीवर बसून कस येत? तो म्हणाला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी चा MA आहे मी Economics मध्ये केल. माझा तो पण एक शिक्षक होता आणी खूप चांगला. MA करून क्या मिळाल त्याला काय ठाऊक? शेवटी विड्याच विकायचा.  पण ते एकॉनमिकस त्याला धंद्यात किती कामाला येतंय ते ठाऊक नाही, त्याच्या ह्या ज्ञाना  मुळे कायम मुलांच्या (आणी त्याच्या गिराहीकाच्या ) घोळक्यात असायचा. 

लहान पणी आम्ही साठ्यांच्या कयऱ्या तोडायचो म्हणजे कयऱ्या होत्या अंब्याच्याच पण त्या साठ्यांच्या  वाडीत होत्या, आम्ही त्या वाडीच्या बाजूच्या बिल्डिंग मधून तोडायचो दगड मारून, मग ते साठे आमच्या मागे धावायचे, आम्ही धूम ठोकायचो, वास्तविक कयऱ्यान मध्ये न आम्हाला रस होता ना त्यांना, सगळी मजा दगड मारून पळण्यात होती, त्यांना आमचं घर ठाऊक होत म्हणजे ते कधीही घरी येऊ शकले असते, पण त्यांनी तस केल नाही कधीच, (दत्तपाड्यात साठ्यांच्या कैऱ्या न तोडलेला माणूस तुम्हाला मिळण अशक्य. म्हणजे त्या काळी आता तिथे इमारत आहे मोठी).   पण त्यातून खूप शिकायला मिळाल मला तेव्हा  मझ्या एका मित्रा कडून, तो आत उडी मारून आणायचा  कैरी, पण साठे कधी पाठी पळतील आणि कधी नुसती हूल देतील ते त्याला कळायचं तो गुण मला अजून उपयोगी पडतो कोण नुसती हूल देतोय आणी कोण कधी अंगावर येतोय हे कळायला सोप जात. चुकतो अंदाज कधी कधी, पण बहुतेक बरोबर असतो. तो मुलगा चाळीत राहणारा त्याला सवय असेल अस करायची आणी पळायची, त्याने बरच उद्योग केले असतील पण माझा तेव्हा तो आवडता शिक्षक होता, काय पण विनोद आहे बघा :).

तसा मी एकदा वर्गात पण शिकलोय . Baan मध्ये असताना "Presentation skills" अश्या एका कोर्स साठी मला पाठवल होत, ३ दिवस residential होता कोर्स , तिथे मला अरविंद नाडकर्णी नावाच एक संथान भेटलं , त्यांनी ३ दिवस आम्हाला कस presentation द्यायचं ?हेच नुसतं शिकवल नाही तर एकूण आयुष्या कडे कस पहावं ?माणूस कसा ओळखावा ? तुम्ही जीवन कस जगावं? हे शिकवलं . म्हणजे त्यांनी फक्त PPT कशी चांगली बनवायची हेच खर तर सांगितलं , पण त्यात कस उभं राहायचं ?तुमचा प्रेक्षक कसा ओळखायचा? content काय हव? शब्दानं पेक्षा हाव भाव , आवाज , उच्चार हेच कसे जासत महत्वाचे ते सांगितलं . जगात चांगल किव्हा वाईट काहीच नसत फक्त परिणाम असतात . There is nothing good or bad, only consequences. हे मी शिकलो, लोक तुम्ही बोलताना मुद्दाम तुम्हाला त्रास देतील, पण आपण आपला focus कायम ठेवायचा, नन्हाचा पाढा गिरवायचा नाही.........  अजून सगळ वळत नाहीये, पण खूपदा त्यांची शिकवण कामाला येते . त्या ३ दिवसात मीच सगळ्यात जास्त शिकलो , PPT फक्त एक १०% होत ९०% बाकी सगळ , नाही म्हणायला मी पहिला आलो सगळ्यान  मध्ये  कारण बहुदा ते  नकळत शिकवत गेले तेच शिकत गेलो आणि PPT आपोआप येत गेली . शेवटी त्यांनी जे शिकवलं ते आयुषयात जास्त उपयोगी आहे,  लोक ओळखणं , कुणाला काय आवडत ते देण , हाव भाव, हालचाली, positive  राहणं आणि अस बरच काही , साधा, सरळ आणि सोप 

गुरगावला असताना मला Financeच बाळकडू एका सायकल वर विड्या काड्या विकणाऱ्या माणसाने दिल होत. मी जीथे Finance च  ट्रेनिंग दयायला गेलो होतो तिथे, सायकल घेऊन उभा असायचा. त्याला विचारल मी कि किती  धंदा करतोस? 100 - 200 चा माल विकतोस का? किती वेळ काम करतोस ? मला म्हणाला "साहब  रोज का 500 का मुनाफा हो इतना भेचता हूं सायकल है आप का लंच टाइम हो जायेगा उसके बाद ओह कॉल सेंटर वाले है फिर ओह शाम को ओह फॅक्टरी चुटती है  फिर रात मे  कॉल सेंटर. अगर जल्दी हो गया तो शाम मे घर नही तो रात को मॉल के बाहर". हे उलट calculation मला शिकायला कित्येक वर्ष गेली आणी हा माणूस ज्याला साधा sms पण वाचता येत न्हवता त्याला..  हे उपजात होत? का तो धंदा करता करता शिकला? हे तुम्हाला कुणीच कधीच शिकवत नाही, हे तुम्हीच स्वतः शिकता.

ही अशी अनेक माणस मला भेटली ज्यांच्या कडून मी शिकत गेलो,  काय शिकवायचं होत त्यांना आणि मी काय शिकलो. तुम्ही  पण आठवून बघा असे बरेच शिक्षक तुम्हाला आठवतील . 

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

Demonetisation

Finally, I had to do what was being procrastinated from the 8th of November. There was no need for me to do this, but my kamwali bai has no bank account (is the P.M. listening?) and the watchman needed payment for the car washing services. All my other payments get done by 7th (smart move actually to demonetise on the 8th), this two have a different due dates and hence the problem. So finally after a period of 10 days, I found myself  in a line outside my bank at 8:30, the bank opens at 9:30 I am told. One hour to check my whatsapp and catch on my phone, its too boring to see  all  messages convincing me that Modi is great  and it's OK to suffer a little. 

Hell I am sold on the move, hence the delay in withdrawing, but give me a break.Let us do some constructive help (I just said a big "good morning" and thanked the cashier and the  deputy bank manager for their efforts),   but there is a lot of stuff that we can do, like educate the maids  and drivers and  watchmen and the small time vegetable vendors and rickshawalas. Install apps  like paytm to make life easier for all. Stop forwarding messages for and against the step taken Secondly avoid withdrawing lot of money from banks to keep   at home, I have seen people withdrawing 50000 (48000 to be precise from two accounts)for keeps sake. Why would you need so much money when you have debit/credit card? The weekly expenses in cash cannot be much. Do keep some cash for others, don't be greedy. 100% people in the line were convinced that this will teach a lesson who have black money and how it is not possible to get away with hoarding money from now on. 

It may take months to get to normalcy, so don't lose patience now. After a  cancer surgery when a patient is undergoing  the chemo therapy, he loses appetite and his hair also, so do we stop it midway? No. It has to be complete, corruption is a cancer, you cannot expect it to go away by a paracetamol.  The patient needs utmost support of the family and his morale needs to be high. Medicine is given and is approved by all the experts and expectedly, we have some realtives who are more of a foe and wants the family to do a  abracadabra thing to wish away the black money, so they are safe and it helps them that the patient remains sick. I still wonder what is dereck o'Brien doing in TMC and shouting alongside Mamta ? He seemed a good host in Bournvita quiz contest.

And let us not put some body on a pedestal and make a god out of him nor kill some one by branding him a  devil (well "आप" को कुछ exception allowed है), we all are humans and all are equal (though we treat some people more equal than others)so get on with life and help fellow citizens instead of just opposing, swearing or praising and praising and praising.....India is rising let us rise together.