शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

मा श्री उद्धव ठाकरे- एक पत्र

मा श्री उद्धव ठाकरे,

     स. न. वि. वि.

कोकणात दोन भावांच्या भांडणात एक शेट दुकान, जागा हडप्तो अस होऊन सुधा दोघ भाऊ खुश असतात कि कशी जिरवली म्हणून . कारण मुळात शत्रू कोण हेच ठाऊक नसतं तस  सध्या मला सेना आणि भाजप कडे बघून वाटतंय. 

मी गेली पंचवीस वर्ष मतदान करतो आहे, अगदी न चुकता आणि मत कायम युती ला होत त्या मुळे झाल काय कि, ह्या खेपेस कुणाला मत द्यायचं हे कळेच ना कारण मत कायम सेना भाजप अस  होत. 

पण एकमात्र नक्की कि तुम्हाला  सगळ्यांनी मिळून फसवलन आणि तुम्हाला अजून हे लक्षात येत नाही ह्याच आश्चर्य वाटतंय. 

जास्त प्रेम, मोह  तुम्हाला कसला आहे? सत्ता का राज्य? उत्तर मला नकोय ते मला दिसलंय. पण ह्यात तुमच नुकसान तर झालच पण महाराष्ट्रच  जास्त झाल न?  साफ गंडवल तुम्हाला, आणि तुमच्या कडे अशी माणसं   पण नाही जी लोक ही खेळी ओळखू शकतील. ह्या खेपेस  खूप सुवर्ण संधी आली होती तर तुम्हाला सोन्याच अंड नको होत अख्की कोंबडीच हवीशी झाली. प्रत्येक खेपेस पहिलच येणे गरजेच नसत साहेब. आत्ता काय झाला बघा हातातल  सोन्याच अंड जाउन नुसतच अंड आल. 

शरद पवार साहेबांकडून कडून हे शिकण्यासारख आहे, त्यानी एकाच खेळीत अनेक गोष्टी केल्या ….  युती फोडली, भाजप ला लोकांच्या मनातून उतरवल आणि स्वतावरच संकट दूर लोटलं , मानल त्यांना. 

आपण साहेब काय केलत? हातातली सत्ता घालवली लोकसभेत मंत्रिपद आणि लोकांचा आदर आणि प्रेम. पवारांची भूमिका तुम्ही घेतली अस्तीत तर? भाजपला हव तेव्हा तुम्ही दंडका  देऊ शकला असता , आता अगदी  समोर जाऊन बसलाय त्यांना कळतंय तुम्ही काय करणार ते, कधी तरी पाठून मारा, सारख समोर जाउन मारामारी करण्याचे दिवस गेले. आता निवडणूक झाल्या कि काय् होणार आहे अगदी उघड आहे, ते तुम्हाला दिसायला हवय. 

तुमचा शत्रू तुम्ही  ओळखलाच नाहीत , भाजप हा शत्रू न्हवता कधीच ….  तुम्ही समजलात आणि चुकीच्या दिशेने हल्ले केलेते लोकांच्या मनातून उतरलात , आता अस  लोकांना शिव्या देऊन नाही चालत, मध्यम वर्गीयांच्या मनातून उतरलात साहेब, कुणाचा बाप वगेरे काढायला हा काही सिनेमा नाही, तुमच वाक्य आणिक कुणी म्हंटल तर? जीवे मारल असत लोकांनी …. मग आपला बाप तो बाप आणि लोकांचा काय? 

कुणी टीका केली कि लगेच हाणून (मारून ) नका पाडू , जरा आत्म परीक्षण करा, नवीन लोकांना विचारा (घरच्या नाही ), अजून थोडी असतील आजूबाजूला चाचपडून पहा. शत्रू कडून पण शिकण्यासारख असत हे ध्यानात घ्या आधी शत्रू कोण हे ओळखा … 

शिवेसेनेला जशी महराष्ट्राची गरज आहे तेवढीच महाराष्टाला सुधा अजून सेने ची गरज आहे. 

आपल नम्र 

सागर कुलकर्णी 










मा श्री देवेंद्र फडणवीस - एक पत्र

मा श्री देवेंद्र फडणवीस ,

      स न वि वि,

पत्र लिहिण्यास कारण कि गेल्या आठ  दिवसात तुमच्या बद्दल , कौतुक, आदर  जिव्हाळा, राग , चीड ह्या सगळ्या भावना मनात आल्या आणि आता नैराश्या आणि वैफ़ल्य आल आहे.

कौतुक ह्याच्या करता वाटल कि चांगला सुशिक्षित, हुशार , तरुण  आमच्यातलाच  एक,   आता मुख्य मंत्री झाला अस वाटल , म्हणजे लग्नात मुंजीत कुणाचा  भाचा काका असतो न , जो थोडा हुशार असतो आणि लोक म्हणतात अरे हा फडणवीस , हुशार आहे पुढे जाईल , बाइको बँकेत आहेत … चांगल कुटुंब आहे  वगेरे त्यातलाच वाटलात म्हणून जिव्हाळा  वाटला  (न ला न आणि ण ला ण म्हणता हे ऐकून सुधा खूप आनंद झाला ) तुमच्या मुलखाती मध्ये तुम्ही म्हणालात कि सत्ता ठेवण्या  साठी सत्ता नाही ठेवणार … अवडल होत आदर वाटला  आणि  खर सुद्धा वाटल होत तेव्हा.

जेव्हा सेनेला तुम्ही  उत्तर नाही दिल झुलवत ठेवलं तेव्हाही चांगल वाटल, हट्टी  मुलाला असाच धडा द्यायला हवा असा वाटल तेव्हा, पण काल अगदीच सगळ फौल ठरवल फडणवीस तुम्ही साफ अपेक्षा भंग. हुशार म्हणता म्हणता तुम्हाला बनवल कि , शेवटी पश्चिम महाराष्ट्र सरस ठरला , तुम्हाला बंदूक दिली चालवायला पण गोळ्या मात्र पवार साहेबान कडेच आहेत,  किती दिवस नुसत्या बंदुकीचा धाक दाखवणार  बे … आज न उद्या कळणारच लोकांना कि उगा फुका मारून राहिले हे  फडणवीस,……  रागावतील लोक

आम्हाला दिल्ली ची सत्ता नको होती म्हणून तुम्हाला निवडल , पण तुमच्या वर दिल्ली आणि  गुजरात दोघांची सत्ता , कस होणार आमच?  महाराष्ट्रच नशीब वाईट , त्या नारायाण राव पेशव्यांना मारला न  त्याचे  भोग अजून भोगतोय , त्या काळात फडणवीस होते , ज्यांनी दिल्ली  आणि इंग्रज ह्यांना समर्थ पणे तोंड दिल आणि राज्य राखलं, इथे तर तुम्ही दिली च  ऐकून अगदी राघोभांचाच आधार घेतला ,  अहो फडणवीस त्यांना सत्ता हवी आहे हे नाही लक्षात येत तुमच्या.  मला सुधा एवढ कळत आणि चीड येते.

आता वर्ष भरात निवडणुका होतील (तेही आमच्याच पैशांनी),  तुम्हाला  आमची  काय तुमची मत पण  मिळायची नाहीत पण त्यांना मात्र त्यांची मत मिळणार , पुन्हा तेच किमान दहा  वर्ष आमचे बारा वाजवणार  धरणात मुतणार मुंबईत हल्ले झाले कि वेड्यागत बोलणार शेत्कारांच्या आत्महत्या होतच राहणार, आणिक  शंभर  ठिकाणी टोल लागणार . तुम्ही फार फार तर लोक सभेत जाऊन एखाद मंत्रिपद घ्याल आणि धन्य व्हाल …. कधी कधी वाटत हा कट महाराष्ट्राला गुजरातच्या पाठी मागेच  ठेवण्याचा तर न्हवता ना ? नसेलही  पण नुकसान मात्र मराठी माणसाचच झाल  आणि त्यात फडणवीस तुमचा सिंहचा वाट असणार , (इथेच नको होता हो माझा महाराष्ट्र) आणि ह्याचे प्रतिसाद लोक सभेत हि उमटणार ….  उशः काल होता होता काळ  रात्र झाली . 

 देव करो, फडणवीस करो का तावडे करोत का आणि कुणी करोत , तुम्हाल सुबुद्धी होऊन आमचा अपेक्ष भंग टळो …हीच मी महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो.

आपला विनम्र

सागर कुलकर्णी

ता. क.

आता मुंजीत तुमच्या कडे बघून बोट दाखून लोक म्हणतील (मी सुधा ) हाच तो फडणवीस, गळ्यात घड्याळ घातलेला .

कुलकर्णी










सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

मनोज दादा

माला बहिणी जास्त  आणि भाऊ कमी, नाहीच म्हणा न आणि मोठा भाऊ तर एकच . लहान पणी सगळ्यां मुलांना आपल्याला एक मोठा भाऊ असावा अस वाटत  असत , म्हणजे काय कि वट मारता येते , कुणी आपल्याला दम देऊ शकत नाही, तोच आपला हिरो असतो तसा माझा लहान पणी पासून हा माझा मनोज दादा हिरो होता ......आहे

एक तर लहान पणा पासून त्याची बॉडी सोलिड होती आणी तो खूप हाण्ड्सम होता आता जरा केस पिकले म्हणून पण अजून तो देखणाच आहे.

मी इथे ठाण्याला येउन त्याची साइकल चालवायचो, निळ्या रंगाची होती , माझा पाय नीट पुरत नसे, मग मी  त्या चेन कवर वर पाय् ठेऊन चढायचो , साधारण पणे लोक डावीकडून चढतात मी उजवीकडून चढायचो , खोपडी उलटीच  आधीपासून ...माझी , तर त्या मुळे काय होइच कि ते कवर थोड दाबल जाईच , मनोज दादा ने मला एकदा सांगून पाहिलं पण मला काय ते डावीकडून जमल नाही आणि मी बरेच दिवस त्या चेन कवर वर पाय् ठेऊन चढायचो, पण तरी तो बिचारा मला कधी ओरडला नाही, ही तुमच्या करता खूप लहान गोष्ट असेल , पण  जेव्हा मी स्वतः साइकल घेतली तेव्हा मला जाणवल कि तो मला ओरडला नाही म्हणजे किती ग्रेट आहे ते आपली साइकल लहान पणी  एका मुलाला खूप प्रिय असते  आता कसा तो टयाब आहे तसा .....स्कूटर पण मी  ह्याचीच  शिकलो M 80 होती , मी इथे राहायला आलो कि फिरवत बसायचो, तेव्हा इथे एवढी वाहन न्हवती कि वस्ती  न्हवती , तो कामावर गेला तरी मी फिरवायचो ती  स्कूटर...

कामावरून आठवल कि माला आठवतंय तेव्हा पासून तो काम करायचा म्हणजे घरातल आणि फाक्टारीत जाउन  आज तो पन्नास  चा आहे म्हणजे गेली  पस्तीस एक वर्ष तरी तो कामच  करतोय , का ते मला नाही माहित पण माझ्या  आठवणीत ह्याची नाईट सेकंड किव्हा फस्त होतीच ....घरात त्याला कधी लोळताना मी पहिला नाही फक्त नाईट करून आला कि मात्र  आम्हाला आत्याचा धाक होता झोपलाय त्याला  उठू  नकोस अस सांगायची पण मला तो लहान पणा  पासून इथका आवडतो कि त्याला मी कधीच त्रास दिला नसता 

आमचा मनोज दादा क्रिकेट  खेळायचा , मला आठवत एकदा तो आमच्या कडे राहायला आला होता कारण त्याची दुसर्या दिवशी सकाळी ओवल ला म्याच होती , तो सीझन ने खेळणार ह्या कल्पनेनेच मी खूप खुश झालो मग त्यानी मला असा तोंडावर बोल टाकायला सांगीतला , बौन्सर  कसा खेळायचा ह्याची तय्यारी म्हणून ....


मी त्या  नंतर कित्तेक वर्ष आमच्या इथे सगळ्यांना  सांगायचो कि माझा भाऊ सीझन ने म्याच खेळतो म्हणून .... तसा मी लोकांना हे पण सांगायचो कि माझा भाऊ काय सोलिड स्कूटर चालवतो म्हणून ... तो सोलीडच आहे  त्याने माझ्या समोर कधी सिगारेट नाही ओढली कि कधी तमाबाकू नाही खाल्ला कि कधी काही नाही केल ....हे मला खूप महात्वाच वाटत , कारण तो करेल तस मी केल असत ...कारण तो माझा हिरो होता ...पण तो हिरो सारखच वागला  


तो   कायम हसत असतो कधी कावलेला चिडलेला मी नाही पहिला कुणावर  डाफरला नाही कि शिव्या दिलेला मी तरी पहिला नाही ....एकदा आम्ही म्हणजे मी बीना ताई आणि हा गाडीने बडोद्याला जात होतो  लग्न असेल बहुदा  .....गाडीत चढलो तेव्हा काही लोक  आधीच आमच्या सीट वर बसले होते  ....आणि थोडे  सरकून बसा म्हणाले , आता काय कराच हा प्रश्न पडला त्याना सांगून बघितल तरी ते निर्लज्ज पणे तसेच हसत होते ...मग मला  मनोज दादा म्हणाला कि तू थांब  बघतो आणि त्याना जबर दम दिला आणी उठा नाहीतर बघा  काय करेन ते ....उठले ते आणि आम्ही  बसलो निट  .....आणिक एक हिरो च काम


त्याच्याकडे त्या काळी म्हणजे बघा साधारण पणे तीस एक वर्षा पूर्वी फिलिप्स चा एक मुझिक प्लेयर होता त्या काळी दहा हझाराचा असेल …. मला जाम आवडायचा मोठे स्पीकर आणि amplifier वगेरे होता , एकदम ढासू , म्हणजे तो तुम्हाला आत्ता काटकसर करताना दिसत असेल पण तो खूप हौशी आणि दिलदार आहे …कारण तो एक अर्टिस्त आहे , तो एक उत्तम तबला वादक आहे   … माला आठवत तेव्हा  पासून तो तबला वाजवायचा अगदी कोटन ग्रीन ला असल्या पासून , मग कुणी त्याला म्हणायचं कि अरे मनोज जरा दादरा वाजून दाखव रे ,  मग मी ही एकदा म्हणालो होतो कि आता  बोरीवली वाजून दाखव …. आणि मग सगळे खूप हसले होते …. आता पण त्याला बसवा एकदम सही  वाजवेल …

एके  दिवशी  सगळ्यांना सारख त्याचा लग्न झाल , मानसीने पण त्याला  चांगलीच साथ साथ दिली , पण आत्ता विषय माझ्या मनोज दादा चा आहे… तो नोकरीशी इतका एक निष्ठ आहे म्हणजे बाइको शी तर असणारच

लग्नात तो सफारी सूट घालणार आहे अस मला म्हणाला …. बापरे मी जरा टरकलोच , कारण त्याने सुट  घालावा अस आम्हाला वाटत होत पण तो काही केल ऐकेना , मग दीदी आली आणि तिला मी सांगितल , त्याला काय बोलली ती कुणास ठाऊक पण तो सुट घालायला तय्यार झाला (तस आमच्या कडे  सगळेच दीदीच ऐकतात ) आणि नेहमी पेक्षा लग्नात जास्त देखणा दिसला   …. लग्नात त्याला सफारी का घालायचा होता कुणास ठाऊक?

लग्ना नंतर त्याने अफाट  संकटांना  तोंड दिलय, त्याने ज्या प्रेमाने आणि आस्थेने आपल्या  आई वडिलांची काळजी घेतली … घेतोय तशीच त्याने मानसीच्या आईची आणि वडलांची घेतली …घेतोय , मानसी च्या बहिणीच त्या दोघांनी इतक केल आणि ही गोड निकिता तर त्यांची सक्खी  मुलगी वाटते , मानसी तर तिची मावशीच आहे …. तीच खूप कौतुक आहेच पण नवराच्या पाठीम्ब्या शिवाय ती हे करू शकली असती का? किती प्रेमाने करतो तीच अगदी मांडीत पण घेऊन बसतो तिला , हल्ली जग पाहिलं न कि मग ही लोक (म्हणजे  माझा हिरो आणि त्याची बाइको ) किती मोठी  आहेत ते कळत , पण  हा वारसा त्याला आत्या आणि भाऊन कडून आलाय श्रीराम ला पण आत्या ने खूप  वर्ष सांभाळला त्याच्या भावा करता काय काय पाठवायचे … तेच ह्याने पाहिलं आणि मुख्य म्हणजे आचरणात आणल हे महत्वाच.

गणपती ला अजून दहा दिवस सुट्टी घेतो हा … त्या काळी आम्ही घरीच आरास करायचो … रात्र भर जागून तो थर्माकोल कापून दिवे लाऊन काहीतरी करायचोच … आम्ही म्हणजे मी सोडून …. कलेचा आणि माझा दूर पर्यंत संबंध नाही …. दीदी काही तरी करायची आणि बाकी सगळे तिचे हेल्पर … पण मजा यायची , दीदी, बीनाताई  आणि मनोज दादाने आणलेले दिवे अजून नीट  ठेवेल आहेत त्याने …. ते दिवे आणून आता तीसेक वर्ष झाली असतील :) , तो जशी नाती जपतो तश्या वस्तू सुधा जपतो.   दिवाळीत बहिणीं कडून अगदी रगडून घ्याचा तेल मग सगळ्या बहिणी जोर लगाके हय्या  करायच्या …मजा यायची , तोच काय त्याने आज पर्यंत त्रास दिला असेल बहिणींना

त्याने गेल्या वर्षी गाडी घेतली तेव्हा मी खूप खुश झालो (त्याने मला कळवल न्हव्त गाडी घेतली ते पण असो ) कारण तोच एक राहिला होता …   बाकी सगळ्यान कडे गाडी होती .  त्याला बिचाऱ्याला कष्टातून फुरसत मिळाली तेव्हा त्याने गाडी घेतली .

मानसी ने त्याला साथ दिलीच पण त्याची मुल पण अगदी गुणी आणि हुशार   निघाली, हे फारच छान झाल , शेवटी कर भला तो हो भला …सचीन तेंडूलकर कसा वकार च्या बाउन्सर ला धडाधड फ़ट्कावायचा तसा हा त्याच्या आयुष्यात ला संकटाना फटकावतो …. ते पण अगदी धीराने , आता मी काय त्याने तोंड  दिलेल्या संकटांची उजळणी करत नाइये नाहीतर दोन पान त्यातच जातील … पण त्याच्या एवढ समर्थ्य मला लाभाव अस नेहमी वाटत

पण मला अस वाटत कि त्याने थोड पिचर ला वगेरे वेळ काढून जाव मॉल मध्ये फिरावं  एखादा संगीताचा कार्यक्रम पहावा , खूप कष्ट केले आता थोड दमान घ्याव ….

त्याने जेवढ सोसलं आणि निभावल तोच त्याचा जाणे , मला तर ते अशक्यच होत , त्याच्या पुढल्या आयुष्यात खूप खूप आनंद यावा आणि त्याचे कष्ट संपून जावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना …













रविवार, ३१ मार्च, २०१३

संजू बाबा

संजू बाबा :

काल पर्वा मला कुणीतरी म्हणल की  संजय दत  ला सोडला पाहिजे किती छान काम करतो तो, मुन्नाभाई मध्ये    काय मस्त बोलला आहे , म्हंटल खरय,  सोडायला हवाय, पण आपण दाउद ला पण सोडू कारण बहुतेक चित्रपट underworld  sponsor करतात म्हणे . 

आम्ही जेव्हा कॉलेजात होतो किव्हा, नुकतेच बाहेर पडलो होतो, आता आपल्याला सवय झाली आहे म्हणा पण तेव्हा हे नव होत सगळ , म्हणजे अशी लोक मरतात आणि अस लोकांना मारता येत हे मुळी माहीतच न्हवत , फार फार तर वार किया किव्हा वस्तारा घुम्या इथ पर्यंत मजल, सोडा वाटर का बॉटल फोड हे माहिती होत (थोडास पाहिलं होत ) तितकच हो… पण अशी प्रेत पडली आहेत उध्वस्त चेहरे हे पचवायला खूप जड होत , मग मन मेल् आणि काश्याचाच काही वाटेनास झाल , सौव्हीस अकरा झाला, चीड आली , पण खूप हतबल झालो कारण १ ९ ९ ३ साली जे झालो होतो ते परत आठवल आणि दाउद ला आपण काहीच नाही केल हे जाणवल संजू बाबा आता एक स्टार होता हे जाणवलं , आपण एक शंड आहोत आणि आपला राष्ट्र पशु गांडूळ हवा अस पटू लागल होत, मन मेल होत,  फक्त वाट  पाहत आहोत अस वाटत होत आणि तेच झाल . 

मालां अजून आठवत …… एक क्रिकेट च कीट वूखुरलेला एक फोटो पेपर मध्ये आल होता , मेलेल्याला मुलाच वय १४ अस होत , तो कुणीही असू शकला असता …अग्दि सचिन सुधा ……पण आज त्याच काय?

मी तर वाचलो न? मी नशिबाने त्या एकाहि ठिकाणी न्हव्तो , किमान दोन ठिकाणी मी असतो , किव्हा माझे वडील तरी तिथे असते आणि होते फक्त दहा मिनटा नंतर तिथे पोचले , हे सगळ आम्हाला नवीन होत, आज आपण निर्लज्ज झालो आहोत आणि ह्याचा श्रेय जात त्या एका दिवसाला आणि ह्यात तुमच्या संजू बाबा चा मोठा हात होता, त्याला माहिति होत कि त्या गाडीत काय होत? आणि तो @#@##@#@ हे सगळ टाळू शकला असता हा त्याचा मोठा गुन्हा. 

आज आपण पैशाल्याला खूप महत्व देतो , पण एकदा तरी निस्वार्थ पणे  विचार करावा  आणि संजय ला माफ करा असा म्हण्या आधी google करा आणि १९९३ ला    शोधां आणि जमल्यास फोटो पहा . आपण जर तेव्हाच हे सगळ ठेच्ल असत न तर बहुदा पुढे काही घडल नसतच … 

सगळ्यात आधी देश हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपण अमेरिके पेक्षा पुढे जाऊ …स्वर्थि पण थोडा बाजूला ठेवा (खूप कठीण आहे मला मान्य आहे कारण आपल्याला तेच शिकवलं आहे )आणि नीट विचार करा… 

जय हिंद 





मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

एक सत्यकथा

एक  सत्यकथा   

हल्ली जे काही गाजतंय म्हणून मला एक घटना आठवली , मला कुणी तरी सांगितलेली....जशी सांगितली तशीच लिहित आहे...

"मी आधी एका क्लासेस  मध्ये शिक्वायची ,  कॉलेज मधली मुल मुली होती सगळी  , तिथे एक गोड चुणचुणीत मुलगी यायची छान  होती तरतरीत, सरळ नाक, छान  केस..मला आवडायची ...मला एकदा आमच्या एका पिउन ने तिच्याशी गप्पा मारताना पाहिलं आणि मला म्हणाला "बाई जास्त बोलू नका तिच्याशी चांगली नाही ती " असा मला आणखी कुणी सल्ला दिला , माझ्या लक्षात आल कि ती नेहमी मुलान मध्ये जास्त असते, मुली तिला टाळतात , पण मी मात्र कुणाच ऐकल नाही , मी बोलायची , तिला बर वाटत असेल कदाचित , ती खूप बोलायची.

एकदा बस मध्ये मला "मी बसू इथे " अस विचारल कुणी तरी  , बघते तर हीच , अरे बस न , मी म्हंटल , डोळे लाल वाटले  मला , मी काही बोलले नाही तीच बोलायला लागली , "बाई मी का येते माहिती आहे शिकायला? मला न ह्यातून बाहेर पडायचं नोकरी करायची आहे म्हणून शिकते त्रास होतो कधी कधी, मन मेलय म्हणा पण तरी सुधा कधी काहि झाल, घडल कि निराश होइला होत, पण जिद्द नाही सोडत पुन्हा अंग झटकून सुरु होते  ".

पुढे तिने मला जे सांगितल ते ऐकून मी सुन्न झाले . त्या मुलीच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता , वडील भावाला घेऊन गेले आणि मुलगी म्हणून आई कडे हिला ठेवल , आई ने दुसर लग्न केल आणि तेव्हा ही लहान होती खूप , पण तिला काय ते फार अवडल न्हवत जशी मोठी होऊ लागली त्या सावत्र बापाची नजर तिला बोचायला लागली आणि एक दिवस त्याने जे नाही करायचा ते केल , रडली खूप आई आली तेव्हा आई कडे रडत गाऱ्हाणं सांगितल तिला वाटल आता आई त्याला हाकलून लावेल आपण दोघीच राहू आनंदाने , पण झाला भलतच आई हिलाच ओरडली आणि बदडून काढल , बापाची तक्रार करते म्हणून आणि मग तर आई सांगायला लागली जा बोलावतो आहे. हे अस अनेक वर्ष सुरु आहे, म्हणजे ती वयात आल्या पासून.

लहानग्या वयात एवढा आघात सहन करायचा म्हणजे?   पण ती म्हणाली मला हे नॉर्मल वाटू लागल बापाच प्रेम मिळालंच न्हवत त्या मुळे  हे असच असेल अस वाटू लागल , आता तर हे एक काम आहे अस वाटतंय म्हणाली , मन साफ मेल कसल काही वाटत नाही अस म्हणाली . पण बाई मला ह्यातून बाहेर पडायचं असेल तर रडून कस चालेल? मी शिकणार नोकरी करणार चार पैशे आले कि आधी घर सोडणार कुठे हि राहेन कहि खाइन , जगात आणखी त्रास काही होऊ शकेल का मला? जन्म दाती आई जर वैरी असेल तर काय त्रास होणार बाकीच्यांचा ? 

मी त्या दिवशी खूप बेचैन झाले त्याच बस ने उलटी घरी आले आणि विचार करत बसले , ती प्रेम शोधत फिरते आहे म्हणून कुणाशीही बोलते , मुलांना काय  तेच हव असत , तिला घरात जाईला  आवडत नसे , म्हणून मुलान बरोबर हिंड, इथे जा तिथे जा अस करत फिरे. लोकांनी मात्र किती वेगळा अर्थ लावला होता.

काहि कारणाने मी शिकवायचं बंद केल , म्हणून तिचा संपर्क नाही राहिला त्या काळी सेल फोन न्हव्ते आणि मला एक दिवस कळल कि तिने आत्महत्या केली दिवाळीच्या पणतीने  पेटून घेतल  स्वताला ...

माझा विश्वास बसेना कारण हे अशक्य होत, इतकी वर्ष जिद्दीने लढलेली मुलगी अशी आत्महत्या नाही करणार , खूप विषण्ण वाटल मी तिला मदत नाही करू शकली हेही खुपत राहील . पुढे तिचा खून केला होता तिच्याच आईने आणि त्या माणसाने म्हणून त्यांना अटकही केली ....पण त्याचा काय उपयोग?  कुंपणच शेत खात म्हणजे काय ते मला तेव्हा कळल ".







बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

जय हिंद .

15 ऑगस्ट 2012

आज सुट्टी आहे , हल्ली स्वातंत्र्य  दिन म्हणजे एक सुट्टी म्हणूनच बघतो मी पण. 

 facebook  वर सगळ्यांनी भारतीय असल्याचा अभिमान वगेरे लिहिलंय , गम्मत वाटली,  सारख सांगाव लागत , हल्लि mothers day ला सख्या आईला मला "तू खूप आवडते " "I  Love You " अस लोकांना सांगत फिरायचं , मी आज पर्यंत चाळीस वर्षात एकदा पण आई ला अस नाही सांगीतल , म्हणजे मी वाईट मुलगा आहे का?

तसच मला हल्ली जाणवत , सगळा खोटे पणा . परवा त्या दंगे खोरांनी अख्या मुंबईस दोन तास वेठीस धरल , काहीही होऊ शकल असत त्या मध्ये चार  कसाब असते तर? असतील ही वेळ आली कि कळेल . किती नुकसान केल आणि ह्याची भरपाई मी आणि तुम्हीच करणार न? पण काही होत नाही, कसाब  जिवंत आहे विलासराव गेले ....सोश्लीस्त लोक गप्प , शबाना , महेश भट , तिस्ता आणि अशे बरेच बुद्धी किवी , कीव कारवाई अशी बुद्धी आहे ह्यांची ...

परदेशी राहणाऱ्या आणि स्थाईक झालेल्यांनी मला भारत किती आवडतो अस आवर्जून लिहिलंय आज...आणि मी काय बोलणार , हा खोटेपणा आहे न? हल्ली जगच खोट्याचं आहे ...निस्वार्थ काही नाही.. प्रेम हि नाही, म्हणून सख्या आईला सारख सांगाव लागत ....मला तू आवडते म्हणून ....आणि देशाला पण कि मला अभिमान आहे तुझा ...

आपण त्या पेक्षा एक संकल्प सोडूया की ह्या दिवशी देश करता काही तरी एक गोष्ट करूया, मग ती दिवस भर traffic signal पाळण असो की रस्त्यात कचरा न टाकण असो, हे फुटकळ वाक्य नकोतच. नुसता झेंडा लाऊन कुणी देश भक्त नाही होत शरीरा भोवती गुंडाळून चितेवर जाईला  हव ....तो झेंड्याचा मान ...

65 वर्ष झाली तरी आपण अजून गुलामीत जगतो , इंग्रजीची तर प्रचंड गुलामी , खाण्याची गुलामी, विचारांची गुलामी सगळीच  गुलामी आणि तरी आपण त्याच काहीच करत नाही. आपण पुढाऱ्यांच कौतुक करतो सैनिकांचं नाही करत, कारण आपल्या पुस्तकात सैनिकांचं कमी आणि पुढाऱ्यांच जास्त लिहिलेलं आहे.. 

आपण खरच स्वतंत्र आहोत का ? सहा पदक मिळाली म्हणून खूप खुश झालो, अरे पण लोक संख्या किती? पदक किती? जी मिळाली ती पण त्या सार्यांच्या स्व कष्टाने सरकारच काही अनुदान नाही कि मदत नाही, तरी आपल्या कडे दिव्या खाली बसून अभ्यास करण्याची प्रथा आहेसच तीच लोक खूप पुढे गेलीत.

चीन म्हणे लहान मुलांना प्रशिक्षण देत त्रास देत म्हणून त्यांना इतकी पदक अरे मी म्हणतो आपल्याकडे काय कमी गरीब लोक आहेत त्यांना  उचला आणि शिकवा दोन वेळ खाईला द्या मिळवा पदक, भिकारी होऊन मारण्या पेक्षा, किमान खाईला तरी मिळेल त्यांना ...

शेवटी काय तर एक दिवस सुट्टी मिळाल्याचा आनंद घायचा T V पहायचा आणि मस्त झोप काढायची देश काय माझ्या वर अवलंबून नाही.. 

जय हिंद .





शनिवार, ११ ऑगस्ट, २०१२

आशा....

हल्ली सगळच बदलेल आहे, चांगली माणसं असतात न? ती बावळट आणि बदमाश माणस successful   असा नियम. माझी boss (खवीस आहे, का हडळ?) म्हणते लोकांना झाप, ओरड दम भर, म्हणजे लोक काम करतील. मला जमत नाही, मी माणूस शोधतो हो, साफ चुकतो, तीच (माझी boss)बरोबर आहे लोक चांगली माणस ह्यांना उल्लू समजतात, म्हणजे मी लोकांना समजून घेतो, सगळे मला फसवायला बघतात. मी नाही बदलणार एक दिवस (आत्ता नाही तर १०० वर्ष नंतर तरी?) मी बरोबर आहे हे कुणाला तरी पटेल.
काल दही हंडी होती, आधी दुपारी सगळं समपुन जाईच हल्ली  दुपारी सगळ सुरु होत. आमच्या दत्तापाड्याला तीन हंड्या लागायच्या दुपारी साधारण दोन अडीच पर्यंत सगळ संपायच आणि काल मी साडेसात ला परत आलो (रात्री)तरी लोक जमा होती  आणि कुणी तरी गाण म्हणत होत दही हंडी तशीच (आंबट झाल असेल दही) लटकत होती, सगळं नंगा नाच चाईला. मोठे बंनेर्स मोठी नाव आणि काय हवंय? मला परवा थोडा रस्ता नीट दिसला, काल समजल दही हंडी बांधली तिथे रस्त्यावर डांबर टाकल होत, मला किळस आली. ह्या लोकांना रात्री झोप लागत असेल?
मला तर हल्ली सण आले कि धडकी भरते, गणपती म्हणजे काय विचारूच नका, नवरात्र तर सगळी गम्मत. अरे ह्यात देव कुठे संस्कार कुठे? लोक काय पण करतात, सिधीविनायाकाला चालत शिर्डीला चालत, त्याने काय होणार? सगळे साले स्वार्थी... आज तर कहर झाला एका माणसाने रस्त्यात मधेच गाडी थांबून गप्पा मारल्या कुणाशी तरी मागे traffic आहे हे न जुमानता एक दहा सेकंदात त्याच्या समोर एक माणूस थांबला तर ह्या माणसाने होर्न मारून त्याला हैराण केल, भांडला, किती स्वार्थी पणा, म्हणजे कळतंय , कळतंय बर का पण वळून नाही घ्यायचं.
फाशीच द्या प्रत्येक गुन्ह्य करता द्या एक तरी फाशी लोक घाबरतील, मी मूर्ख आहे चांगुल पणा वगेरे काही नसत, सगळे स्वार्थी. हल्ली तर खोट बोलण्याची fashion  आहे, म्हणजे उगाच खोट बोलायचं, अरे का कशाला ? मी बोलतो खोट चूक आहे पण नेहमी नाही, हे म्हणजे कुणाला तरी आपण हॉटेल मध्ये  भेटलो आणि तो म्हणाला कि अरे पुस्तक बदलायला आलो होतो... गम्मत आहे, सगळी नाती विस्कटली आहेत, प्रेमाचा, धर्माचा गैर वापर ...
कधी कधी येत नैराश्य, मग मुलगीच माझी काही तरी निष्पाप पणे बोलून जाते...तिला टोकाव वाटत, मग वाटत राहूदेत तीच घडवणार न पुढला भारत ?  अजून आशा आहे खोटी का होईना? आहे आशा....