सध्या, मी सगळीकडे बस किव्हा रिक्षा किव्हा उबर नि जातो, शहाणा माणूस मुंबईत हल्ली गाडी चालवत नाही. (म्हणजे मी शहाणा आहे). तर , पर्वा असाच रिक्षा नी जात असताना तो रिक्षावाला माझ्याशी गप्पा मारायला लागला, हल्ली काय हो दोन किलोमीटर ला जायला पण तास जातो, वेळ कसा घालवणार तो तरी ... सब धंदा डाऊन है, गाडी नही बिक्ती आज कल, सेल डाउन है म्हणाला, मी म्हंटल हो रे, पण माझी गाडी असून मी काढत नाहीये, नवीन गाडी कशाला घेईल कुणी? जवळ जायला रिक्षा, लांब जाईल उबर आहेच कि? उगाच कशाला कुणी इतके पैसे गुंतवेल आणि परत आता दंड पण वाढलाय .खड्डे किती आहे रस्त्यात, स्लो डाऊन नाही तर काय होणार? आधी रस्ते नीट करा पार्किंग द्या , उद्या गाड्या घेतील लोक, वैतागलेत लोक..... "किधर नोकरी करते है म्हणाला", म्हंटल का रे? नाही म्हणजे तुला काय फरक पडेल, रिक्षा पुरते पैसे असतात माझ्या कडे अजून तरी, माझी इकॉनॉमी इतकी डाऊन नाही झाली अजून तरी (हे पुढलं मनात)? "नही मतबल कहा पे जाते हो, साफ्टवेर मे क्या?" म्हटलं हो, तभी इतना GDP डाउन है नही समझ मे आया आपको, थोडा फायनान्स का पढो, पढते नही क्या"? म्हटलं काय? "व्हाट्सअप ... कितना सही सही आता है, नालेज के लिये पढो ... हम रोज पढते है, छे महिने मे नया नया फोन लेते है हम " .... मी माझं शिक्षण त्याच्या पेक्षा थोडं जास्त आहे आणि चार लोकं पेक्षा सुद्धा मी फायनान्स मध्ये दोन बुक अधिक वाचलीत अस सांगायचा मोह टाळला, हलली असं सुद्धा पुस्तकानं पेक्षा मोबाईल ला महत्व जास्त आहे आणि सगळेच सगळ्यात हुशार असतात ... आम्ही समजून सुद्धा अडाणीच ... का समजत म्हणून अडाणी कोण जाणे ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा