कधी नाही पुन्हा कधीचनाही ssssss दे न ग एक पापा, नाही कधीच नाही असं म्हणून चिमुरडी रुसते तेव्हा किती गोड वाटत .... पण कधीच नाही पुन्हा कधीच नाही , म्हणजे काय? ह्याचा खरा अर्थ आई गेली तेव्हा कळला. एक दिवस हॉस्पिटलात होती तेव्हा ती बारी होणारच नाही हे कळून चुकलं होत, तशीच ती गेली .... कधीच कधीच भेटणार नाही अशी .... तरी तेव्हा नाहीच कळलं , पण नंतर जाणवायला लागलं , पुनर जन्मात वगैरे मी फार नाही मानत, तरीही तेव्हा भेटेल वगैरे असं जरी मानलं तरी अशीच आई पुन्हा कधीच दिसणार नाही ... कधीच नाही
आपण फार सहज पणे काही गोष्टी बोलून जातो , त्यातलीच ही एक पुन्हा कधीच नाही वाली. गेल्या पंधरवड्यात जे घडलय आणि त्यावर जो हलकल्लोळ माजलाय त्या वरून हे जाणवलं एवढच. ह्यात प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाणारी माणसं दिसली, बेहेती गंगा में हात धोने वाले कळले, काही घेणं ना देणं, तरीही आपला विरोध नोंदवणारे, उगाच निषेध व्यक्त करणारे, एकदम भारत मातेचा पुळका आलेले, लगेच बंदूक घेऊन दहा माणसं मारायला निघालेले सगळेच दिसले. लोक काय वाट्टेल ते बोलले आगा ना पिच्छा, पण ते जे बोलले वागले हे त्यांना पुन्हा कधीच परत घेता येणार नाही कधीच नाही हे त्यांच्या लक्षात नसेल येत का?
मी फार काही भाष्य केले नाही आणि तेवढी माझी कुवत पण नाहीये , मी माझं तोंड बंद ठेऊन आहे, त्यामुळे सगळं बघता आलं ऐकता आलं. कुणाला मी काही समजवायला गेलो नाही कि समजून घ्यायला गेलो नाही. मला का कोण जाणे पण, हकनाक बापाचं छत्र हरवलेल्या त्या चिमुरड्यांचंच चित्र सारखं दिसत होत, जे ४५ सैनिक शाहिद झालीत, त्यांची मुलं. म्हणजे अभिमान वगैरे वगैरे कळायचं वय सुद्धा नसेल काही लेकरांचे , त्यांना त्यांचा बाबा कधी ... कधी म्हणजे कधीच दिसणार नाहीये .... कधी नाही चा अर्थ पण त्यांना कळत नसेल. लोकांनी मदत सुद्धा केली, मी नाही केली अजून, काय मदत करावी हेच कळत नाहीये ... ज्यांनी केली त्यांचं कौतुकच वाटत , काही जणांनी त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी घेतली, ते तर फारच स्तुत्य आहे... हेच असं प्रोतसाहन नेहमीच दयायला लागेल ... त्यांच्या वर अशी वेळ पुन्हा कधीच येऊ नये कधीच नाही....
युद्ध चालू आहे आणि सैनिक शाहिद झाले हे समजू शकतो (म्हणजे समजू नाहीच शकत ,पण कळू शक्त), हे वाटेत, बसल्या जागीच, एका क्षणात ह्या जगातून निघून जाईच .... असं .... कायमच ..कधीच कधीच परत न यायला ...? त्या मुळे आपण थोडं शांत राहावं असं वाटतं एव्हडेच , त्यांना घुसून मारलं हे वाचून बरं वाटलं न्हवे आनंदच झाला, हे आधीच केलं असत तर असं कधीच कधिच घडलं नसत ..हे पहिल्यांदा घडलंय त्या मुळे लोकही खुश झाली, अभिमान वाटला असच घुसून मारायला हवय म्हणजे आपले सैनिक असे फुकट मारले जाणार नाहीत ....
पण जपून बोलूया वागूया कारण बोललेला शब्द आणि गेला माणूस पुन्हा कधी येत नाही कधिच नाही ...
जय हिंद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा