ऑफिसच्या एका ट्रेनिंग मध्ये ओळख (self introduction ) करून देताना मी सांगितलं कि मी बान मध्ये होतो, बान वाल्यांचं एक वेगळं विश्व आहे त्या मुळे तशी माणसं विरळ, विखूरलेली तरीही जोडलेली असतात, म्हणून मी फार काही बोललो नाही, फक्त बान consultant एवढच सांगितलं . ब्रेक मध्ये एक माणूस आला आणि मला म्हणाला तू बान मध्ये कधी होतास? आईला, बान म्हणजे काय हे लोकांना ठाऊक नसत आणि हा माणूस मला एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न विचारात होता, पण नवल म्हणजे मी ह्याला ओळखत न्हवतो, मी सांगितल्यावर म्हणाला मी पण बान वर होतो पटणी मध्ये, मग अजून एक कंपनी, मग खूप ओळखी निघाल्या, खूप बर वाटलं, माणूस एकदम प्रसन्न होता, चेहऱ्या वर एक स्मित, genuine interest घेऊन मी काय बोलत होतो ते ऐकत होता, मग अच्छा भेटू असं झालं. कुणीतरी मला म्हणलं नवीन आहे एखाद वर्ष झालं असेल, येडा आहे, अरे, मला जाम राग आला कारण एक तर तो आमचा बान वाला होता, तसा मोठा माणूस होता आणि वर बोलायला एकदम friendly असा आमच्या ऑफिसात सापडणं कठीणच . एक तर मला इतकं judgemental होयला आवडत नाही आणि मला तो माणूस खरंच आवडला होता एकदम कनेक्ट झाला होता. पण आमच्या इथे बहुतेक सगळेच असेच judgemental होते.
चार एक महिन्याने मी पुण्याला ऑफिसात गेलो असताना , तोच माणूस मला एका केबिन मध्ये बसलेला दिसला, म्हणजे मोठ्या पदावर होता, कारण खूप मोठा असल्या शिवाय केबिन मिळत नाही तुमहाला , मी काही त्याला आत जाऊन हॅलो वगैरे केल नाही , ह्याची दोन कारण होती, एक म्हणजे मला शाईन मारायची न्हवती कि मी ह्या मोठ्या माणसाला ओळखतो आणि मला शाश्वती न्हवती कि हा केबिन मधला माणूस कसा रिऍक्ट होईल , तर तोच बाहेर आला "अरे कधी आलास , मी मगाशी पहिलं पण तु लांबून जात होतास ?" मग परत जुन्या गप्पा, सासरी गेल्यावर एकदम आपल्या गावची एखादी सखी भेटली कि कस होत तस झालं मला, एकदम करेक्ट बान वाला निघाला.
चल भेट पुन्हा आलास् कि म्हणाला आणि केबिन मध्ये गेला, दारावर अविनाश एवढीच पाटी होती. तर हा आपला अविनाश बसतो इथे असं मी मनात म्हंटल कारण मला वाटलं होत कि दुसराच एक अविनाश बसतो .
मी पुण्याला गेलो कि फक्त लांबून हात दाखउन मान डोलावून वंदन होत, आमची खरी मैत्री जमली ती मी कामा करता वर्ष भर पुण्याला शिफ्ट झालो तेव्हा झाली, खर तर अविनाश हा जग मित्र आहे त्या मुळे मैत्री तुम्ही करता त्याने तुम्हाला केव्हाच मित्र केल असत.
मी पुण्याला माझ्या भाओजींच्या घरी राहायचो निगडी ला, म्हणजे पुणे नाही (अजिबात नाही), ऑफिस पासून एक १५ किलोमीटर लांब घर होत. मी सहज विचारलं कि अरे कुणी राहत का तिथे, तर लोक म्हणाले अमित आहे आणि अविनाश राहतो ना ... आईला अविनाश तो माझ्या पेक्षा १.. २.. ३... ४... ५ लेवल मोठा तो मला का आणेल आणि सोडेल? मला पहिल्या दिवशी आणि बरेचदा अमित ने सोडल (पण आज अविनाश बद्दल पुन्हा कधी अमित बद्दल, कारण मला तो पण खूप आवडतो ), बाकी बहुतेक ये जा अविनाश सोबत
seventh floor ला आम्ही सगळे चहा करता भेटायचो (३दा ), त्यात मी सांगितलं अविनाश ला माझ निगडी बद्दल , तर हा माणूस मला म्हणाला अरे ये कि माझ्या बरोबर मी तिथेच राहतो, मला खूप हायस आणि आधार वाटला, मी थोडा मानी आहे, मागायला कचरतो आणि कुणी दिल तर दुपट्टीने परत फेड करतो, पण हा इसम मला स्वतः अगदी जवळचा माणूस समजून काहीच हरकत नाही म्हणाला आणि आनंदानी मी सोडेन म्हणत होता, मी त्याचे पायाच धरले असते (तसा वयाने तो फक्त सहाच महिने मोठा आहे माझ्या पेक्षा ), पण मी पुण्यात असल्याने स्वतःला सावरलं.
बहुदा आमची खरी मैत्री तिथून सुरु झाली, साडे सातला (साडे सात म्हणजे साडे सात ) तो मला पीक अप करायचा आणि ५ ला आम्ही निघायचो, गप्पा होयच्या म्हणजे मी बोलायचो आणि तो कान देऊन ऐकायचा, मग मी आणि भावोजी एकदा त्याच्या घरी गेलो आणि त्यांचे जुने नगर चे संबंध निघाले, घरोबा झाला, मी त्याला माझं सगळं वयक्तिक सांगितलं त्याने खूप चांगले सल्ले दिले, कधीही मध्ये बोलणं, विचार लादणं केलं नाही त्याने कधीही "throwing his weight" केलं नाही (मी थोडा बारीक असेन, त्याच्या पेक्षा:)), मी खूप शिकत गेलो त्या तासा भरात (जायला अर्धा आणि यायला तेवढाच ).
अविनाश हा एक उत्तम क्रिकेट पटू आहे टाइम्स शिल्ड्स खेळलाय ते सुद्धा दिग्गजान बरोबर , मी सुद्धा क्रिकेट खेळलो आहे असं म्हणणं त्याला भेटल्या नंतर सांगणं बंद केलं, तो A division वाला आम्ही z मध्ये वर्दी लागली म्हणून मिरवणारे (Z असं division नाहीये, हे फक्त प्रतीकात्मक आहे ).
दोन चार गोष्टी मला त्याच्या खूप आवडतात, एक म्हणजे तो early morning person आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रह्मा मूहूर्तावर उठणारा माझ्या ओळखीत इहिलोकी हा पहिलाच इसम, एक तास फिरून, तास भर पूजा करून हा माणूस साडे सातला (साडे सात म्हणजे साडे सात) तय्यार , त्याला मी कधीही पेंगलेला, झोपेत, अवतारात पहिला नाहीये, दुसरं म्हणजे तो प्रत्येक माणसाला उत्तर (म्हणजे उलट नाही ) देतो, म्हणजे ई-मेल - फ़ोन - chat - message ह्या सगळ्या माध्यमातून. वर पाचाला घरी, घरून परत काम करतो ते वेगळं. उत्तम बाबा मुलगा भाऊ नवरा जावई काका मामा आहेसच , मी जास्त खाजगीत जात नाही कारण तो माणूस तसा personal आणि professional वेगळं ठेवणारा आहे... आणि त्याच्या परवानगी शिवाय मी काही लिहू इच्छित नाही, पण जेवढं मी जाणतो तो ह्या पेक्षा खूप अधिक असेल ..तो एक चांगला आणि सच्चा मित्र आहे. त्याने परक्यांसाठी सुद्धा खूप केलय (आता मला अविनाश फटके मारणार).
काल त्याने सर्वांना पार्टी दिली, कारण त्याने नवीन नोकरी धरली, नवीन म्हणजे परत आधीच्या म्हणजे खूप आधीच्या कंपनीत परत त्याला आमंत्रण दिल ते त्याने स्वीकारलं , म्हणजे त्याला आधीच्या सगळ्या कंपन्या घ्यायला आतुर आहेत, ह्यात खूप काही आल. त्याच्या बद्दल कुणीच वाईट बोलत नाहीत, काहीना काही तरी चांगलच केलय त्याने सगळ्यांसाठी .
अविनाश चा मोठे पणा त्याचा माणूस असण्यात आहे, लोकांना देव व्ह्याच असत आणि अविनाश ला माणूस होण्यात आनंद वाटतो, देव होणं खूप सोपं असत कारण तो आपल्याला दिसत नाही का भेटत नाही, पण माणूस रोज दिसतो आणि भेटतो , तेव्हा माणूस होणं आणि तस राहणंच खूप कठीण आणि ते कठीण काम हा माझा मित्र सहज रित्या करतो ... लिहायला खूप आहे आणि चांगलच, पण आज थोडक्यात .....
३ टिप्पण्या:
अप्रतिम.. आमच्या सर्वांच्या मनातील लिहिले आहे तुम्ही.
Cannot disagree with you Sagar !!! Cent percent in agreement...well written (of course die credit to Avinash as well :))
Well said..
टिप्पणी पोस्ट करा