गैर समज ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे , आपण केली तर समोरचा येडा , आपल्या बद्दल झाली कि आपण शहाणेच होतो पण मूर्ख लोक असतात जगात ....
आमचा धनंजय अजिबात पुणेरी वाटत नाही, जन्म सदाशिव पेठ सगळं शिक्षण, बायको, नोकरी सगळं पुण्यात (नाही म्हणायला थोडा काळ मुंबईत नोकरी साठी राहायचा म्हणा), पण गडी अजिबात पुणेरी नाही, एकदम गोड आहे , हसतो सात माजली स्वतः वर केलेल्या विनोदावर सुद्धा, आता बोला? बिल भरायला भांडतो आणि मित्रान वर आनंदाने खर्च करतो, खाण्यात (फक्त ) शाकाहारी आहे , पण माणूस म्हणून मस्त , कधी कुस्क बोलत नाही कुणाला हिणवत नाही टोचून तर अजिबात नाही आगाऊ नाही आणि रंग सुद्धा देशस्थी , सगळ्यांना आवडतो ऑफिसात पण (घरी माहित नाही :)) , आता ह्याला पाहिलं तर पुणेकरांना बद्दल लोकांचा गैर समज नाही का होणार? का पुणेकरांना बद्द्दल लोकांचा गैर समज आहे .......
निगडी ला एक पेपर वाला आहे पन्नास एक वर्षांचा असेल. सकाळी एके ठिकाणी पेपर घेऊन बसतो आणि वाटतो पण, हसराय (पूर्वीच पूण नाही राहील आता ), तो पेपर वाटायला गेला कि त्याचे वडील बसतात तिथे , ते ठार भहिरे आहेत , आधी मला कळलंच नाही ते बहिरे आहेत ते, मी एक इंग्रजी आणि एक मराठी पेपर मागितला तर त्यांनी मला नवाकाळ आणि एक मद्रासी पेपर दिला (काय कॉम्बिनेशन तर बघा), मला वाटलं बाजूला कुणाचं असेल , तर ती लोक माझ्या कडे पुणेरी माणसालाच शोभेल अश्या नजरेने पाहू लागली, मग मला कळलं कि त्या माणसाने, माझ्यासाठीच हा पेपर काढलाय .... एक दोनदा असच झाला , मग त्यांचा तो मुलगा (टक्कल पडलंय खर तर ), पुढे आला आणि मला पटकन दिले पेपर, मग माझ्या लक्षात आलं कि ते काका बहिरे आहेत . पुण्यात असलो कि त्याचाच कडून पेपर घेतो तरी त्यांना मी काय घेतो हे माहित नाही अगदी अचूक पणे चुकीचे पेपर मला देतात , आता मी त्याला बोटाने दाखवतो कोणता पेपर (तरी चुकीचाच पेपर काढतात म्हणा निम्म्या वेळा) मग ते पण खाणा खुणा करतात आणि सांगतात किती पैसे द्यायचे ते, कारणत्यांचा असा गैसमज झालाय कि मी बहिरा आहे .... आता बोला ...
आमच्या आधी ऑफिस मधून काही ट्रेनिंग्स होत होते , अजून बाकीच्या ऑफिसात होत असतील आमच्या इथे बंद झाले . तर त्या ट्रेनिंग्स नंतर दोन दिवस फार छान वाटतं , म्हणजे आपण किती छान, आयुष्य जगू शकतो लोक कशी छान असतात जग काय सुंदर आहे आपण काम कस करायला हवय , पैश्यात कस सुख नसतं वगैरे वगैरे , बरं वाटत दोन दिवस मग .... ये रे माझ्या मागल्या ... अश्याच एका ट्रेनिंग मध्ये माझा एक मित्र जाऊन आला , तो पण असा भारावून गेला होता , पहिलं वहील असावा ट्रेनिंग त्याच , दोन चार दिवसाने म्हणतो चायला काय पण सांगतो तो ट्रेनिंग वाला. का माझी गर्ल फ्रेंड पागल आहे ते कळत नाहीये? मी म्हंटल का रे? काय झालं? ह्याने त्या ट्रेनिंग वाल्या काकांना ह्याच्या गर्ल फ्रेंड शी का भेट घालून दिली असेल? तो म्हणाला कि अरे त्या दिवशी मी त्या कसल्या तरी ट्रेनिंग ला गेलो होतो. ट्रेनिंग मध्ये सांगितलं कि आपण कस आवडीच्या लोकांना आपल प्रेम व्यक्त करत नाही, थँक्स म्हणत नाही , अस केलं कि लोक कशी खुश होतात एकदम पोस्टिव्ह वाटत .... मग लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गर्ल फ्रेंड ला फोन लावला आणि म्हणालो कि तू मला खूप आवडतेस किती चांगली आहेस, हुशार आहेस , नोकरी करतेस , समजा सेवा , माझी काळजी घेतेस... तशी ती लगेच थांब , थांब , म्हणाली, मी तुला सांगितलंय कि लग्ना आधी काही नाही आता साखर पुडा पण नाही झालाय. नक्की लग्न करणार ना? आधीच सांग आणि सकाळी प्यायला का रात्रीची पार्टी आत्ता संपली? काही दूसरा विचार करत नाहीस का रे तू?मला सकाळी खूप काम असतात , सकाळी काय आहे चावट पणा?..... तास भर बोलली (तेव्हा बारा वेळ मिळाला), काय काय म्हणून बोलली भलतच झाला ,तरी नशीब , मी आईलाच सांगणार होतो आधी ती स्वयंपाक करताना कि किती छान करतेस स्वयंपाक , बाबांची काळजी मला नीट वाढवलास , मेलोच असतो, हातात लाटणं होत तिच्या , अजून धपाटा घालते पाठीत, तिला जर वाटलं असत कि मी सकाळी चोरून दारुण प्यायलोय तर हाणलंच असत .... बायका उगाच गैर समज करतात आणि सेम टू सेम . मी पडून पडून हसलो ..... काय करायचा बोला?
आता तुम्ही बघा आपण जेव्हा कुणाला निवडून देतो ते पण गैर समजा मुळेच, कधी तो टिकतो कधी नाही, लग्न पण तसेच करतो, अंधश्रद्धा म्हणजे पण गैर समजच कि हो आपण हजारो वर्ष त्या गैर समजा वर आहोत तर विश्वास निर्माण करण्या पेक्षा माझ म्हणणंय कि गैर समज करून द्या खरा असला तरी, लोकांना पटत .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा