परवा मी अजित रानडे ह्यांची ट्विटर वर खिल्ली उडवली (प्रयत्न केला). वास्तविक मला त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे, मुंबई मिरर मध्ये अतिशय सुंदर स्तंभ ते लिहितात .
त्या आधी त्यांची थोडी माहिती. रानडे हे IIT मुंबई आणि IIM अहमदाबाद मधून शिकले आहेत आणि मग त्यांनी PHD सुद्धा केली आहे ते पण ब्राउन विद्यापीठातून , खूप हुशार economists आहेत. म्हणून अगदी सोप्या भाषेत ते लिहितात , म्हणजे आपल्याला कळेल असं ते समजावून सांगतात आणि ते आपल्याला कळत. मी जेव्हा ट्विटर वर आलो तेव्हा मी त्यांना शोधून follow केलं . खूप गुणी माणूस अफाट वाचन असणारच आणि ते चांगलं चुंगलं शेर करतात (नाही म्हणायला सरदेसाई नावाच्या इसमाला पण करतात, पण ते ठीके) .
तर त्या दिवशी त्यांनी कन्हैया कुमार ला लेखक म्हंटल आणि त्याची गळचेपी कशी केली ते लिहिलं आणि काही तरी retweet केलं . आता बरखा राणी ने केलं असत शेर तर मी दुर्लक्ष केलं असतं (मी तिला नाही करत follow), पण रानडे? मला खूप राग आला, आवडतात रानडे मला ते अस कस करू शकतात? मग मी खिल्ली उडवल्या सारखं केलं तर त्यांनी मग (फक्त )त्या कन्हैया च एक पुस्तक छापून आलय ते शेर केलं, अरे! हॅरिस शिल्ड मध्ये कुणी एक century ठोकली म्हणून त्याला तुम्ही उत्तम batsman म्हणून लगेच कोच म्हणून नेमत नाहीत आणि नाही नेमले म्हणून लोकांना दोषी धरत नाहीत.
तर हा जून होऊ घातलेला लोकांच्या पैश्यान वर फुकट JNU मध्ये राहून काश्मीर आझाद करो आणि भारत तेरे तुकडे होंगे म्हणून नंगा नाच करणारा माणूस, लेखक कसा होईल एका पुस्तकाच्या जोरावर? माझं पण एक पुस्तक छापून आल आहे म्हणून काय मी लगेच परिषदेला भाषण ठोकू? एक तर तो नोकरदार माणूस आहे पगारावर काम करणारा कारण एरवी गरीब म्हणून घेणारा माणूस मुंबई पुणे विमानाने फिरतो ? (रानडे पण गाडीने जात असतील पुण्याला ). ते काय स्वतःच्या पैश्यां वर? नाही , ते communists पक्षाच्या जोरावर आणि ते पुस्तक कश्या वरून ह्याने लिहिलंय? लेखक आहेस ना? मग सोड ना फुकटे पणा , तिथून (JNU मधून) काय पेन्शन घेऊन निघणार?
तर मला रानडेंचा विरोध नाही राग तर त्याहून नाही , पण ते जो विचार promote करतात त्याचा आहे. लोक त्यांचा आदर करतात (मी पण ), भेटले कधी तर नामकर सुद्धा करेन (वाकून ). कन्हैया म्हणेज काय कुणी मोठा होतकरू मुलगा नाही, भाड्याचा टटू आहे त्याची दया वगैरे करण्याच्या लायकीचा तर अजिबात नाही म्हणून खवळलो मी त्याला गरीब बिचारा केला म्हणून .
आता मी काय उजवा नाही, म्हणजे विचारांनी, (थोडा झुकलो असेन ) डावा तर अशक्य , एक वेळ राहुल गांधी हुशारीने बोलेल पण मी डावा होणे अशक्य, आताच्या जगात मूर्ख पणा आहे, त्या चे गुव्हेराच्या वेळेस असेल ग्लॅमर पण आता नाही . जग बदललं आहे बदला आता आणि मुंबई ते पुणे विमानाने जाऊन कसले communist?
तर डॉक्टर रानडे चूक भूल माफी, राग तुमच्यावर नाहीये , तुमचे विचार पण छान असतात, तुम्ही लिहिलेले अर्थ शास्त्राचे तर मला कळतात पण , ह्या लुच्च्या लोकांचा तुम्हाला पुळका आला कि मला राग येतो, मी काय तुमच्या एवढा सुशिक्षित नाही कि विचारवंत नाही, बुद्धी जीवी तर अजिबात नाही पण कधी तरी राग येऊ शकतो ना? माझ्या देशप्रेमाच्या कल्पना पण इतर लोकान सारख्या नाहीत, कुणी राष्ट्र गीताला उभा नाही राहिला तरी मी त्याला मारणार नाही पण , कुणी रस्त्यात थुकला तर मात्र मी नक्की हटकेन ..... पण तरी कन्हैया? माफ करा पण तुम्ही केला तो ट्विट म्हणून बोललो, श्रद्धा स्थान आहात माझं ते हल्ल कि त्रास होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा