शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

हिंदी मिडीयम

हल्ली त्या RTE  मुळे सगळ्याच शाळान मध्ये सगळीच मुलं admission  घेऊ शकतात म्हणे , म्हणजे फक्त उचभ्रू नाही तर साधी जनता पण.  काही तरी सूट सेल म्हणा. सांगण्याच तात्पर्य तुमच्या मुलाच्या वर्गात तुमच्या काम वालीची मुलगी असू शकते , तो "हिंदी मिडीयम"  नावाचा पिक्चर येऊन गेला ना ? तस .
  
तर त्यात काही लोक घाबरली , आमच्या मुलाच्या किव्हा मुलीच्या शेजारी ही अशी  लोक? आईला म्हणजे? अशी लोक? त्यात लहान मुलांचा काय दोष? खर तर खूप बर होईल , त्या मुलांना पण खूप चांगल  बघायला शिकायला मिळेल, त्यांच्या कडून आपल्या मुलांना कष्ट, पैश्याच महत्व वगैरे कळेल, काही मुलांना माहित असेलच आणि चूक पालकांची पण आहे , मागितलं कि आणून देणं हे मी पण करतो म्हणा, त्या मुलानं कडे बघून हे तरी कळेल.

पण एक होऊ शकत त्या मुलांना complex नको यायला, हल्ली काय लहान मुलं   डब्यात सफरचंदा  ऐवजी खिश्यात Apple घेऊन फिरतात. 

आमच्या लहान पाणी हे एक बर होत, आमच्या   शाळेत सगळी मुलं यायची  आणि खाली  खेळायला गेलो कि बाजूच्या चाळीतली पण असायची, तेव्हा झोपडपट्या न्हाव्त्या (आता काय म्हणा चांगल्या घरात पण ते कल्चर आलंय), नुसत्या चाळी होत्या, काही अगदी वाईट होत्या  म्हणा , पण आम्ही सगळ्यांशी खेळायचो. आमच्या घरा  जवळ बन्सी चाळ होती, अजून आहे , त्यातली पोर  जरा डेडली  होती,  म्हणजे मारामारी, वाह्यात पणा वगैरे , त्यात हुशार माणस पण होती , पण जास्त करून डेडली.  तेही आमचे मित्र होते.  झालच तर  काजू पाडा भाटिया चाळ, कार्टर रोड नंबर  ३ ची मुलं , ही सगळीच. आता कधी तरी ओळखीचं भेटतात, काही बदलली असतात काही तशीच.  

तसा एकदा  मला अँड्रीव भेटला होता, तो मला शाळे पासून ओळखायचा, म्हणजे मी शाळेत जायचो तेव्हा, तो कधी गेला असेल अस वाटत नाही.   मी आणि माझा आत्ते  भाऊ मनोज दादा पान आणायला गेलो होतो, नवमी का दसरा असेल, आत्या आली होती ,  जेवण झाल्यावर आम्ही गेलो पान  आणायला. हे ही खूप वर्षान  पूर्वी, माझ कॉलेज नुकतच  झालं होत, दत्त पाडा फाटक तसच होत , फ्लाय ओव्हर न्हवता झाला तेव्हाची गोष्ट.     पानाच्या गादीवर अँड्रीव, मला अगदी प्रेमाने भेटला, त्याला थोडं होत माझ्या बद्दल .  एकदा दोनदा खाऊन गेला होता घरी,  तो का आला होता तेही आठवत नाही, तस माझ्या आईने कुणाकुणाला जेवायला घातलाय म्हणून सांगू? मी बरेचदा मित्रांना घेऊन यायचो, ती काहीही ना  बोलता खायला घालायची, अन्नपूर्णाच होती म्हणा,  आता नवल वाटत  कारण तरुण  मूल  नीट खातात , तेव्हा कळायचं नाही किती  असेल घरी वगैरे ,  आता अचानक पणे  लोक येणे आणि खायला घालणे ही पद्धत सम्पलीच आहे . 

तर अस अनेक जणांन पैकी हा एक होता , त्या मुळे   आई बद्दल आदर म्हणा कि माझ्या बद्दल आस्था म्हणा, तो नीट प्रेमाने बोलायचा,  कारण  त्याला  घरी नेऊन खायला कुणी घातल असेल  अस  वाटत नाही मला.  एरवी शेर असणारा हा अगदी भीगी बिल्ली झाला होता घरात,  अगदी हळु खाल्लं आणि परत काहीही मागितलं नाही , ताट कुठे धू म्हणाला :), एकदम भारावला होता , भरल घर कधी न  पाहिलेला, असं आई खायला देतेय छान टेबल खुर्च्या नळाला पाणी, त्याला खूप भरून आल्या सारखं वाटलं मला तेव्हा, मला कळलं नाही असं काय करतोय हा? कारण मला हे अगदी नॉर्मल होत हे त्याला स्वप्न वाटत होत.  तर  हा अँड्रीव आम्हाला पानाच्या गादीवर भेटला पांढरे कपडे हातात, गळ्यात सोन, मनोज दादा कडे बघून अपना भाई क्या? अस म्हणाला, (अपना)?  मी जमेल तेवढं  त्याच्या धंद्याच सोडून इतर गोष्टीन बद्दल चर्चा करत होतो, तेवढ्यात त्यानेच आगाऊ सारखं भाई किधर रेहताय असा विचारलं , ठाणा म्हणाला मनोज दादा , आता मी पुढच्या गोष्टी साठी मनाची तयारी करत होतो कारण मला पुढे काय संभाषण होणार ते माहित होत, अँड्रीव लगेच अरे ठाणा  में किधर? आत्या कुठे राहते ते  सांगून झाल, मे भी था म्हणाला ठाणा  में , तरी मी त्याला म्हंटलं चल निकलते है हं लोग, पण मनोज दादा ला कस कळणार बिचाऱ्याला , विचारल त्याने  , किधर था ठाणा  में? ठाणा जेल में  हाप  मर्डर किया ना , साला बच गया ,  ज्यादा नई  दो साल था , अभि जमानत पे  भार है, छूट जायेगा,   अब ओह सब नई करताय , कभी आयेगा तो मिलेगा   आपको .  कूच लगेगा तो  बोलना   सागर   को,  एकदम खास है अपना, तू बोला नई क्या भाई को अपने बारे  मे? त्याच्या पांढऱ्या शर्ट खाली त्या रामपुरी चा दांडा मला स्पष्ट दिसत होता तो काय माझ्या थोरल्या भावाच्या नजरेतून सुटणारे? ...... घरी येई पर्यंत मनोज दादा एक शब्द  न्हवता बोलला  ...  

तर सांगायचा अस कि आपण स्वतः स्वतःला एका कोशात किव्हा पिंजऱ्यात बंद करतो आणि तो आणखी खुजा करत जातोय, पालकांचं म्हणणं कि आम्हाला आमच्या सारखीच मुलं हवीत वर्गात तर मुलांची वाढ खुंटणार ते कोशातच राहणार  त्यांचा, हे जग बघा  किव्हा आपला भारत देश हा किती विविध लोकांनी भरलाय, इतकी वर्ष  सगळे आप आपल्या  कोशात होते अजून  काही राज्य अशी आहेत जी आपली भाषा सोडत नाहीत, किव्हा IPL बघा, एका टीम मध्ये किती विविध प्रकारची खेळाडू असतात, त्याने किती फरक पडतो बघा, भारताच्या खेळाडूंचा आता रेकॉर्ड बघा IPL नंतर किती सुधारलाय . कारण विविधता , ती हवीच ना. किती नुकसान करणार आपण आपल्याच मुलांचे?    

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

गैर समज

गैर समज ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे , आपण केली तर समोरचा येडा , आपल्या बद्दल झाली कि आपण शहाणेच होतो पण मूर्ख लोक असतात जगात .... 

आमचा धनंजय अजिबात पुणेरी वाटत नाही, जन्म सदाशिव पेठ सगळं शिक्षण, बायको, नोकरी  सगळं पुण्यात   (नाही म्हणायला थोडा काळ  मुंबईत नोकरी साठी राहायचा म्हणा), पण गडी  अजिबात पुणेरी नाही, एकदम गोड आहे , हसतो सात माजली  स्वतः वर केलेल्या विनोदावर सुद्धा, आता बोला? बिल भरायला भांडतो आणि मित्रान वर आनंदाने  खर्च करतो, खाण्यात (फक्त ) शाकाहारी आहे  , पण माणूस म्हणून मस्त , कधी कुस्क बोलत नाही कुणाला हिणवत नाही टोचून तर अजिबात नाही आगाऊ नाही आणि रंग सुद्धा देशस्थी , सगळ्यांना आवडतो ऑफिसात पण (घरी माहित नाही :)) , आता ह्याला पाहिलं तर पुणेकरांना बद्दल लोकांचा गैर समज  नाही का होणार?  का पुणेकरांना बद्द्दल लोकांचा गैर समज आहे ....... 

निगडी ला एक पेपर वाला  आहे पन्नास एक वर्षांचा असेल.  सकाळी एके ठिकाणी  पेपर घेऊन बसतो आणि वाटतो पण, हसराय (पूर्वीच पूण नाही राहील आता ), तो पेपर वाटायला गेला कि त्याचे वडील बसतात तिथे , ते ठार भहिरे  आहेत ,  आधी मला कळलंच नाही ते बहिरे आहेत ते, मी एक इंग्रजी आणि एक मराठी पेपर मागितला तर त्यांनी मला नवाकाळ आणि एक मद्रासी पेपर दिला (काय कॉम्बिनेशन तर बघा), मला वाटलं बाजूला कुणाचं असेल , तर ती लोक माझ्या कडे पुणेरी माणसालाच शोभेल अश्या नजरेने पाहू लागली, मग मला कळलं  कि त्या माणसाने, माझ्यासाठीच  हा पेपर काढलाय .... एक दोनदा  असच  झाला , मग त्यांचा तो मुलगा (टक्कल पडलंय खर  तर ), पुढे आला आणि  मला पटकन दिले पेपर, मग माझ्या लक्षात आलं कि ते काका बहिरे आहेत .  पुण्यात असलो कि त्याचाच कडून पेपर घेतो तरी त्यांना मी काय घेतो हे माहित नाही अगदी अचूक पणे चुकीचे पेपर मला देतात ,  आता मी त्याला बोटाने दाखवतो कोणता पेपर (तरी चुकीचाच पेपर काढतात म्हणा निम्म्या वेळा) मग ते पण खाणा  खुणा करतात  आणि सांगतात किती पैसे द्यायचे ते, कारणत्यांचा असा गैसमज झालाय कि मी बहिरा आहे ....  आता बोला ...  

आमच्या आधी ऑफिस मधून काही ट्रेनिंग्स होत होते , अजून बाकीच्या ऑफिसात होत असतील आमच्या इथे बंद झाले . तर त्या ट्रेनिंग्स नंतर दोन दिवस फार छान वाटतं ,  म्हणजे आपण किती छान, आयुष्य जगू शकतो लोक कशी छान असतात जग काय सुंदर आहे आपण काम कस करायला हवय , पैश्यात कस   सुख नसतं वगैरे वगैरे , बरं वाटत दोन दिवस मग .... ये रे माझ्या मागल्या ... अश्याच एका ट्रेनिंग मध्ये माझा एक मित्र जाऊन आला , तो पण असा  भारावून गेला होता , पहिलं वहील असावा ट्रेनिंग त्याच , दोन चार दिवसाने म्हणतो चायला काय पण सांगतो तो ट्रेनिंग  वाला.  का माझी गर्ल फ्रेंड पागल आहे ते कळत  नाहीये? मी म्हंटल का रे? काय झालं? ह्याने त्या ट्रेनिंग वाल्या काकांना ह्याच्या गर्ल फ्रेंड शी का भेट घालून दिली असेल? तो म्हणाला कि अरे त्या दिवशी मी त्या कसल्या तरी ट्रेनिंग ला गेलो होतो.  ट्रेनिंग मध्ये सांगितलं कि आपण कस आवडीच्या लोकांना आपल प्रेम व्यक्त करत नाही, थँक्स म्हणत नाही , अस केलं कि लोक कशी खुश होतात एकदम पोस्टिव्ह वाटत .... मग लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गर्ल फ्रेंड ला फोन लावला आणि म्हणालो कि तू मला खूप आवडतेस किती चांगली आहेस,  हुशार आहेस , नोकरी करतेस , समजा सेवा , माझी काळजी घेतेस... तशी ती लगेच थांब , थांब , म्हणाली,  मी तुला सांगितलंय कि लग्ना आधी काही नाही आता साखर पुडा पण नाही झालाय. नक्की लग्न करणार ना? आधीच सांग  आणि सकाळी प्यायला का रात्रीची पार्टी आत्ता संपली? काही दूसरा विचार करत नाहीस का रे तू?मला सकाळी खूप काम असतात , सकाळी काय आहे चावट पणा?..... तास भर बोलली  (तेव्हा बारा वेळ मिळाला), काय काय म्हणून बोलली  भलतच झाला ,तरी  नशीब , मी आईलाच सांगणार होतो आधी ती स्वयंपाक करताना कि किती छान करतेस स्वयंपाक , बाबांची काळजी मला नीट वाढवलास , मेलोच असतो, हातात लाटणं होत  तिच्या , अजून धपाटा घालते पाठीत, तिला जर वाटलं असत कि मी सकाळी चोरून दारुण प्यायलोय तर हाणलंच असत .... बायका उगाच गैर  समज  करतात आणि सेम टू सेम . मी पडून पडून हसलो .....  काय करायचा बोला?

आता तुम्ही बघा आपण जेव्हा कुणाला निवडून देतो  ते पण गैर समजा मुळेच, कधी तो टिकतो कधी नाही, लग्न पण तसेच करतो,  अंधश्रद्धा म्हणजे पण गैर समजच कि हो आपण हजारो वर्ष त्या गैर समजा वर  आहोत तर  विश्वास निर्माण करण्या पेक्षा माझ म्हणणंय कि गैर  समज  करून द्या खरा असला तरी, लोकांना पटत ..... 

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

अजित रानडे

परवा  मी अजित रानडे ह्यांची ट्विटर वर खिल्ली उडवली (प्रयत्न केला). वास्तविक मला त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे, मुंबई मिरर मध्ये अतिशय सुंदर स्तंभ ते लिहितात . 

त्या आधी त्यांची थोडी माहिती.  रानडे हे IIT मुंबई आणि IIM  अहमदाबाद मधून शिकले आहेत आणि मग त्यांनी PHD सुद्धा केली आहे ते पण ब्राउन विद्यापीठातून , खूप हुशार economists आहेत. म्हणून अगदी सोप्या भाषेत ते लिहितात , म्हणजे आपल्याला कळेल असं ते समजावून सांगतात आणि ते आपल्याला कळत. मी जेव्हा ट्विटर वर आलो तेव्हा मी त्यांना शोधून follow केलं . खूप गुणी माणूस अफाट वाचन असणारच आणि ते चांगलं चुंगलं शेर करतात (नाही  म्हणायला सरदेसाई नावाच्या इसमाला पण करतात, पण ते ठीके)  . 

तर त्या दिवशी त्यांनी कन्हैया कुमार ला लेखक म्हंटल आणि त्याची गळचेपी कशी केली ते लिहिलं आणि काही तरी retweet केलं . आता बरखा राणी ने केलं असत शेर तर मी दुर्लक्ष केलं असतं (मी तिला नाही करत follow), पण रानडे? मला खूप राग  आला, आवडतात रानडे मला ते अस कस करू शकतात? मग  मी  खिल्ली उडवल्या सारखं   केलं तर त्यांनी मग (फक्त )त्या कन्हैया च एक पुस्तक छापून  आलय  ते शेर केलं, अरे!  हॅरिस शिल्ड मध्ये कुणी एक century ठोकली म्हणून त्याला तुम्ही उत्तम  batsman म्हणून लगेच कोच म्हणून नेमत नाहीत आणि नाही नेमले म्हणून लोकांना दोषी धरत नाहीत. 

तर हा  जून होऊ घातलेला लोकांच्या पैश्यान वर फुकट JNU मध्ये राहून काश्मीर आझाद करो आणि भारत तेरे तुकडे होंगे म्हणून नंगा नाच  करणारा माणूस,  लेखक कसा होईल  एका पुस्तकाच्या जोरावर? माझं पण एक पुस्तक छापून आल आहे म्हणून काय मी लगेच परिषदेला भाषण  ठोकू?   एक तर  तो नोकरदार माणूस आहे पगारावर काम करणारा कारण एरवी गरीब म्हणून घेणारा  माणूस मुंबई पुणे विमानाने फिरतो ? (रानडे पण  गाडीने जात असतील पुण्याला ). ते काय स्वतःच्या पैश्यां  वर? नाही ,  ते communists पक्षाच्या जोरावर आणि ते पुस्तक कश्या वरून ह्याने लिहिलंय? लेखक आहेस ना? मग सोड ना  फुकटे पणा , तिथून (JNU मधून) काय पेन्शन घेऊन निघणार?

तर  मला रानडेंचा  विरोध नाही राग तर त्याहून नाही , पण ते जो विचार promote  करतात त्याचा आहे. लोक त्यांचा आदर करतात (मी पण ), भेटले कधी तर नामकर सुद्धा करेन (वाकून ).  कन्हैया म्हणेज काय कुणी मोठा होतकरू मुलगा नाही, भाड्याचा टटू  आहे त्याची दया वगैरे करण्याच्या लायकीचा तर अजिबात नाही म्हणून  खवळलो मी त्याला गरीब बिचारा केला म्हणून . 

आता मी काय उजवा नाही, म्हणजे विचारांनी, (थोडा झुकलो असेन ) डावा तर अशक्य , एक वेळ राहुल गांधी हुशारीने बोलेल पण मी डावा होणे अशक्य, आताच्या जगात मूर्ख पणा आहे, त्या चे गुव्हेराच्या वेळेस असेल ग्लॅमर पण आता नाही . जग बदललं आहे बदला आता आणि मुंबई ते पुणे विमानाने जाऊन कसले communist?

तर डॉक्टर रानडे चूक भूल माफी, राग तुमच्यावर नाहीये , तुमचे विचार पण छान असतात, तुम्ही लिहिलेले अर्थ शास्त्राचे तर मला  कळतात पण , ह्या लुच्च्या लोकांचा तुम्हाला पुळका आला कि मला राग येतो, मी काय तुमच्या एवढा सुशिक्षित नाही कि विचारवंत नाही, बुद्धी जीवी तर अजिबात नाही पण कधी तरी राग येऊ शकतो ना? माझ्या देशप्रेमाच्या कल्पना पण इतर लोकान सारख्या नाहीत, कुणी राष्ट्र गीताला उभा नाही राहिला  तरी मी त्याला मारणार नाही पण , कुणी रस्त्यात थुकला तर मात्र मी नक्की हटकेन ..... पण तरी कन्हैया? माफ करा  पण तुम्ही केला तो ट्विट म्हणून बोललो, श्रद्धा स्थान आहात माझं ते हल्ल कि त्रास होतो.