मी करण जोहर चित्रपटाला बंदी घाला किव्हा त्या पाकिस्तानी माणसाला घेतलय म्हणून मी अजिबात बघणार नाही हे काही करणार नाही, करण जोहरचे पिच्चर मला अजिबात आवडत नाहीत म्हणून मी काय तो जाऊन बघणार नाही . उद्या तुम्ही गेल्यावर्षी चा वर्ल्ड कप ला झालेली भारत पाकिस्तानची मॅच बघू नका म्हणाल, आता त्या फवाद ला घेऊन नवीन पिच्चर काढू नका ह्याला माझा पाठिंबा आहे अजिबात पाकिस्तानशी खेळू नका हे पण मी सांगेन (मी कशाला गावस्कर, गांगुली , गंभीर सगळेच म्हणतात). मला काय त्या फवाद चा पुळका नाहीये आणि त्या कारण चा तर अजिबात नाही, पण एकदम बंदी घाला बघू नका म्हणून त्याला फुकट पब्लिसिटी तर मी नाहीच देणार आणी हल्ली लोक मूर्ख नाहीयेत उगाच ५०० रुपये देऊन फालतू गोष्ट पाहायला जाणार नाहीत. फार बाऊ नका करू जो तो त्याच्या कर्माने मारतो आणी त्या पिक्चर मुळे करण जोहर च अजिबात नुकसान होणार नाही, त्याला मिळाले रिटर्न्स. झालंच तर त्या कामगारांचं होईल जी लोक पोस्टर्स लावतात वरची काम करतात स्पॉट बॉईझ ना पगार थोपवेल तो जोहर. सिनेमा हॉल्स वाल्यांचे हाल, तो फवाद पैशे घेऊन गेला सुद्धा आपण का उगाच भांडायचं? गप्प बसा आणी फराळ करा दिवाळी चा
शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६
बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६
काळी पॅन्ट
काळी पॅन्ट
माझ्या कडे फार कपडे न्हवते कॉलेज मध्ये, अजून बाकींच्याच्या मानाने कमीच आहेत . एक जीन ची होती बस्स. मग आर्टिकल शिप करताना एक दोन घेतल्या होत्या, व्ह्याच काय कि मी जो हाताला लागेल तो शर्ट आणी त्याच दोन पॅन्ट घालायचो खूप दा रंग संगती जरा विसंगत व्ह्याची . त्या काळी नवीन कपडे फक्त दिवाळीतच घायचो आणि मला तसा पगार पण न्हवता नव नवे कपडे घ्यायला सारखे सारखे, तर त्या वर्षी मी एक काळी पॅन्ट पहिल्यांदा विकत घेतली, म्हणजे तीच दिसली मला आणि मी फार चिकित्सक नाहीये पण मला जामआवडली, मला तरी म्हणले लोक अरे काळी पॅन्ट काय घेतोस? वेगळा रंग वगैरे घे उठून दिसेल... मी थोडा हट्टी आहेच आणि मला फार लोकांच्या बोलण्याने फरक नाही पडत मी तीच घेतली .
छान होती कॉटन ची आणि मग मला लक्षात आलं कि ती पॅन्ट कशावर ही चालते, म्हणजे त्या पॅन्ट वर काहीही उठून दिसत (माझंच मी काय कौतुक करायचं म्हणा ) अगदी निळ्या शर्ट पासून ते पांढऱ्या ते ग्रे झालंच तर tshirt वर (का खाली ?) पण चालायची. मी एकदम खुश, खूप जास्तच खूष, छोट्या गोष्टी किती आनंद देतात हे सांगणं कठीण आहे, पण मग मी तीच पॅन्ट सारखीच घालायचो एक तर ती फार मळ्याची नाही म्हणजे कुणाला कळायचं नाही , ही casual म्हणून चालायची formal म्हणून तर अगदीच सरस.
मला मग जाणवलं कि ह्या आधी माझं कपाट कस अपूर्ण होत आणी मी तयार व्ह्यचो तरी कसा? आयत्या वेळेची पॅन्ट ही होती आणी छान तयार होऊन जायला पण हीच, म्हणजे मी अर्धवट होतो का मला माझी गरज माहित न्हवती. जाम जीव होता आणि आहे माझा काळया पॅण्ट वर माझ्या, अचानक मला मिळालेल्या पॅन्ट वर संपूर्ण पणे अवलंबून झालो होतो, एक तरी काळी पॅन्ट सगळ्यांकडे कडे हवीच.
तू माझी काळी पॅन्ट आहेस :)
सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६
जय भवानी जय शिवाजी!!!
पर्वा नवी मुंबई काल कोल्हापूर आज ठाणे अरे अरे अरे ...स्वतःच्या हातावरच्या तागदि वरचा विश्वास संपला ..... आता पसरा ... शोक कश्याचा करायचा? तलवार म्यान केली ह्याचा ? का लढल्या वाचून फुकट मिळतं हा साकशातकार झाला ह्याचा ?
जय भवानी जय शिवाजी!!! माफ करा महाराज तुम्ही आमच्या करता व्यर्थ लढलात , त्या पेक्षा दिलेले किल्ले साम्भाळायचेत .....
का दिलीत आम्हाला आस,
कि आमच्या मनगटात आहे ताकद ह्याचा विश्वास,
पसरले असतेत हात, बसल्या बसल्या मिळाला असता ना थाट?
अजून तरी आणि ह्या पुढे मला कुणीहि आरक्षित म्हणणार नाही :) हर हर महादेव !!!!
फडणवीस देऊन टाका.
मागणाऱ्या पेक्षा देणारा मोठा असतो... मी कधीच मागणार नाही, शिवाजी माझा आदर्श आहे, आडनाव भोसले नसले तरीही ....

रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६
सात्विक
सात्विक
जोशी काकू खूप सात्विक आहेत आणि त्यांच्या खूप ठाम कलपना आहेत. अमुक म्हणजेच सात्विक तमुक म्हणजे वाह्यात वगैरे. कुणी जरा तोकडे कपडे घातलेत की त्या एखाद्याला साफ नालायक आहे असं ठरवून टाकतात, कुणी मुलगी जरा मुलांशी बोलताना दिसली की लगेच कशे संस्कार नाहीत वगैरे, चार लोकात मुलांनी कस वागावं ? ह्या बद्द्दल एकदम clear आहेत. मुलांनी मुलींशी बोलूच नये असं मताच्या , देव धर्म करावा वगैरे वगैरे , पण पर्वा त्यांनी त्यांच्या मुलीचे डोहाळे जेवण अगदी थाटात केले , हा मोठा विनोद, अगदी त्या मुलीला सजवून झोपाळ्यावर बसवून छान फोटो वगैरे, त्यांना विचारू का जाऊन? काय हो काकू कशी झाली ही गरोदर?

उगाच डोक्याला त्रास
माझा मित्र संदीप मला जाम आवडतो (मला माझे सगळेच मित्र फार आवडतात ) एकदम प्रामाणिक आणि बेसिक ला धरून असतो , खूप लोकांना तो जंगली वाटतो raw वाटतो पण म्हणून तो मला आवडतो. मला त्या दिवशी म्हणाला "पुनर जन्म असतो रे,मला आलाय अनुभाव " चायला माझे आणि ह्याचे विचार कधी कधी जुळतात, पण हे म्हणजे फारच होत , का रे का वाटत तुला अस? "अरे ते जन्मो जन्मो का नातं असं म्हणतात न? मला आला रे अनुभव? गेल्या तीन जन्मातल्या माझ्या बायका, म्हणजे wife मला भेटल्या?" भेटल्या ? मेल्या तुझं लग्न झालच नाहीये म्हणजे तू केलस नाहीस ह्या बायका कोण? "अरे गेल्या तीन जन्मी च्या, दोन वर्षात तीन भेटल्या, एकदम काय तरी झालं" कुणाला? "दोघांना" आणि असं तीन दा झालं? "हो, सात जन्म असतात ना" अरे हो पण मग? "मग काय नाही, आम्ही भेटलो" नवरा बाईको सारखे? "हो रे, मागल्या जन्मात गेल्या सारखं वाटलं रे " " सात जन्म तरी असतात न रे, अजून चार तरी भेटतील ?"
कधी कधी मला ह्याचा राग येतो आणू मत्सर सुद्धा वाटतो, तो त्याच्या भावना कधीच लपवत नाही, एक झेपेनाशी होते आणि हा पठ्ठा अजून चार बायका शोधतोय आणि हे सार त्याच्या मैत्रिणी सांभाळून .
सुनामीच्या वेळी त्याचा फोन, "मी महिना भर नाहीये, जरा घराकडे बघ" कुठे निघालास? "नक्की नाही, मद्रास ला जाईन तिथून ठरवेन, खूप वाताहत झाली आहे रे, मी सडाफटिंग, माझी मदत होईल का ते विचारतो, मला चिखलाची घाण वाटत नाही कि प्रेतांची भीती, मी काहीही खातो, त्या मुळे बघू काही जमेल ते करू " हे टोक.
काय करायचं ह्याच? गेल्या जन्मीची बायको सापडली म्हणून संबंध ठेवतो सुनामीत वाताहत झाली म्ह्णून सगळं सोडून तिथे जातो लोकांन साठी . ह्याला खूप लोक असभ्य, चालू म्हणतात , पण हा स्वतःहून कुणाच्या अंगचाटी जात नाही लंपट पण नाही, एकच लक्ष्य , साधा सरळ आयुष्य, भूक लागली कि भागवतो, मग ती कोणतीही असेल .
जोशी काकूंना हा संदीप फार रुचत नाही, मला जोशी काकू , मी त्यांना आवडतो आणि मला संदीप , सगळाच लोचा .

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)