हिंदू धर्म म्हणजे नक्की काय? हा धर्म कधी स्थापन्न झाला?म्हणजे त्या जू लोकांचा तो मोसेस का कुणी होता क्रीस्चन लोकांचा येशु आणि मुसलमानांचा मोहोम्मद. झालंच तर सिद्धार्थ चा जेव्हा गौतम बुद्ध होतो ते ही आपल्याला ठाऊक आहे , जैन लोकांचा महावीर , शीख लोकांचे धर्म गुरु हे आपल्याला माहित आहेत.
पण हिंदू धर्म हा established कधी झाला? तो Pvt. Ltd. कधी झाला हे मला कुणी सांगेल का? का हा धर्म होताच आणि आपल्याला हे माहीतच न्हवत? जेव्हा मुहम्मद घानी / चेंगीझ खान व इतर तत्सम परकीय लोकांनी हल्ला केला तेव्हा आपल्याला समजलं कि ही लोक मुसलमान आणि आपण असे नाही , कालानतराने पोर्तुगीज आले (त्यानी खर तर conversion सुरु केले इंग्रज ह्या भानगडीत नाही पडले म्हणून राज्य करू शकले) आणि हे ख्रिस्त म्हणजे आपण हे सुधा नाही , म्हणून आपण हिंदू अस आहे का? "Its a way of life" हे बरोबर आहे का? मी हिंदू आहे का? कश्यावरून?
आता काही लोक तोकडे कपडे धर्मा विरुद्ध आहे अस म्हणतात, पण शिलाई दोन हझार वर्षान पूर्वी होती का? त्या सेरिअल मध्ये दाखवतात तस फॉल वगेरे लाऊन साडी होती का?ब्लाउज होते का? का साध फडक चोळी म्हणून बांधायचे? का फक्त साडी किव्हा नुस्त अंगाला गुंडाळलेल वस्त्र असायचं ? त्याने बाईची पाठ , पोट, कंबर, पाय दिसायचे का? ते अश्लील होत का? का बाइका कैक हजारो वर्ष डोक्यावर पदर घेऊन फिरायच्या? मुलींनी कमी कपडे घातले म्हणून माणूस भरकटला अस म्हणणारे लोक हजार वर्षान पूर्वी होते का?माझ्या वाचनात किव्हा गोष्टीन मधून हे समजलंय कि इंद्र अप्सरांना पाठवून (देवांचा राजा सुधा काम करत नाही) ऋषी मुनींची तपशचर्या मोडायला लावायचा, मग ते मोहित होयचे(पण कुणी अप्सरेवर बळजबरी केल्याचं वाचण्यात आलेलं नाही), म्हणजे जी लोक बलात्कार करतात ते थोर ऋषी मुनी असतात/आहेत का?आणी ह्या मुलींना इंद्र पाठवतोय का?आणी आपल्याला ते माहित नाही का?
हिंदूंच्या कोणत्या पुस्तकात मी काय खाइच आणि नाही हे लिहून ठेवलय ? ते पुस्तक कुणी लिहील आहे? देवळात खूप वेळा आरती करतात किती वेळा हे अस कुठे सांगितलंय का? देवाला कांदा लसूण चालत नाही अस देवाने कुणाला खाजगीत सांगितलंय का? कधी? ते इतरांना कस समजल?दहा हजार वर्षान पूर्वी शेती होती का?लोक अन्न शिजवायचे का? तेव्हा प्राणी मारून खाईचे का? गाय मारायचे का? ती खाईला कधी व कुणी बंदी घातली? रामायणा मध्ये लोकांच जेवण काय होत? तेव्हा लोक लग्न करायची का?किती करू शकायचे? हा एक पत्नी चा नियम रामा मुळे पडला का? कारण महाभारतात तर एका पुरुषाला (पांडवांना सुधा)एका पेक्षा जास्त बाइका होत्या आणि एका बाईलाच एका पेक्षा जास्त नवरे होते. आपण आता मागास आहोत का तेव्हा होतो ?