शाळा नावाचं पुस्तक वाचल होत मी २००६ साली, दीदीने दिलं होत मी इंग्लंड ला गेलो तेव्हा. मला काहीच माहित न्हवत पुस्तका बद्दल, म्हणजे एखाद्या पुस्तका बद्दल आपण ऐकतो आणि मग वाचतो, पण शाळा मी तसच वाचल परदेशात, शाळा सोडून वीस वर्षा नंतर......(इंग्लंड हा विषय वेगळा आहे आणि त्यावर एक अखका ब्लोग लिहिला आहे)
आपण बघा जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा एक इमेज तयार करतो तशी मनात एक शाळा तयार केली मी, त्यातली माणसं , मुलं तयार केली होती. बहुदा सिनेमा आणि पुस्तकात तफावत असते कारण आपण मनात एक चित्र तयार करतो म्हणून. आजच मी शाळा बघितला (सिनेमा पाहिला).
सिनेमा म्हणून चांगलाय, पुस्तक वाचल असेल तर जरा कुठे तरी कमी पडतो अस वाटतं, पण माहित नसेल काहीच तर छान आहे. पुस्तकात सगळ्या गोष्टी रंगवल्या आहेत, सिनेमात तेवढासा वेळ नाही मिळालाय म्हणजे त्या शाळेच्या आधी त्या इमारती मध्ये बसतात मुलं ती जागा पुस्तकात छान रंगवली आहे, सगळ्यांचा लहान पणी एक अड्डा असतो, तो एकदम पटतो पुस्तकात, सिनेमात अजून रंगवायला हवा होता, हिरो चा आणि शिरोडकर च प्रेम, लाईन पुस्तकात जेवढा आहे तेवढा सगळं घेतलंय पण म्हणून ते जास्त वाटत, आणीबाणी पुस्तकात चान दाखवली आहे ते इथे कमी पडत चित्रे ह्याचा क्यारेक्टर अजिबात रंगवल नाहीये, जरा वाईट वाटत कारण न दोन घनिष्ट मित्र कधीच खूप बोलत नाहीत एक मेकांशी, पण सगळ दोघांना माहित अस्त. नाही म्हणायला स्काउट ची पिकनिक दाखवली आहे, पण चित्रे आणि जोशी ह्यांची मैत्री नीट नाही रंगवली. चित्रे च खूप छान व्यक्तिमत्व दाखवल आहे पुस्तकात, मला जाम आवडला होता, म्हणून असेल, पण एक चांगला मित्र हा असाच असतो तो थोडा कमी रंगवला आहे.
पण कस आहे न कि नुसता सिनेमा म्हणून पाहिला तर छान आहे. एक तर सगळ्यांचे अभिनय अतिशय सुरेख, जी पात्र निवडली आहेत ती अगदी चपखल बसली आहेत. शिरोडकर तर फार गोड आहे (मोठे पणी सुंदर होईल) म्हात्रे , फावडा, मामा, आई , बाबा , शाळेतला शिपाई अगदी "perfect". जागा जी निवडली आहे ती फार छान, कॅमेरा , संगीत सगळं हव तस, म्हणजे मी जस माझ्या मनात चित्रित केल होत त्याच्या जवळ पास आहे.
आता गोष्ट सांगायला हरकत नाही :).
सिनेमा सुरु होतो शाळेत, गावातली शाळा , मराठी मध्यम, छान सुंदर बाई असते शिकवायला जास्त वेळ न घालवता त्यांनी सरळ विषयाला हात घातलाय, म्हणजे शाळेत अभ्यास असतो एक हुशार मुलगा एक सगळ करणारा एक गुंड पण चांगला दोन चार छान मुली शाळेतली गम्मत. वेळ असते १९७५ emergency ची , ते रंगवलं नाही पुस्तक वाचलत तर लक्षात येत. एक कडक बाई असते ती खूप मारते पोरांना, एक चान लाडके सर असतात त्यान्च्या विषयी थोड दाखवल आहे, मग एक
mod मुलगी येते. पुढे आपण शाळेत करतो तसच, मुलींना बघण , इम्प्रेस करण तसच. मला हल्लीच माहित नाई, पण मी शाळा ८५ साली संपवली ही शाळा ७५ सालची आहे, फरक आहे पण तेवढा नाही (हल्ली सहा महिन्यात मोबाइल च नाव मोडेल येत). पण सगळ्याचं बालपण तसच अस्त ना हो? आपल्याला उगीच वाटत कि नवीन पिढी आगाऊ, पण आपल्या बद्दल पण लोक तसच म्हणत असतील न?
सिनेमात सगळ्यांची नाती फार सुरेख दाखवली आहेत, मामा भाचा पण छानच, वडील मुलगा छान, मित्र छान, बहिण भाऊ समर्पक आईची काळजी योग्य, तो मुलगा आणि मुलगी भेटतात ते पण छान वाटत, अजून रंगवल अस्त तर अवडल अस्त.
एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा हा सिनेमा लहान मुलांचा नाही, शाळा सोडून अनेक वर्ष झालेल्यान साठी आहे :).
कलाकार सगळे चांगले आहेत, दिलीप प्रभावळकर, नंदू माधव, संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी आणि सगळी बचे मंडळी
आणखी काही सांगत नाही पाहूनच या, एक नम्र विनंती download करून पाहू नका ही चोरी आहे, तुम्ही चोर आहात का? असाल तर करा आणि पहा.......मला कळल तर मी १०० टक्के तक्रार करेन.