माझे आणी आरे colony चे जुने ऋणानुबंध आहेत, मग नंतर आरेच्या प्रेमात पडलो, traffic मध्ये अडकलो , झाडाखाली बसलो ....
आमच्या शाळेची पिकनिक नेहमी आरे मधेच जायची , म्हणजे माझी शाळा होती बोरीवलीला आणि आरे गोरेगावला , पण चार पाच वर्ष आम्ही तिथेच जायचो, एका वर्षी मुंबई दर्शन ला गेलो (त्या वेळी होती मुंबई दर्शनीय). आम्ही लहान पणी कधी कुठे बाहेर फिरायला गेल्याच मला फार नाही, म्हणजे आम्ही गरीब वगेरे न्हव्तो , खाउन पिउन सुखी. दिवाळीत नवीन कपडे, फटाके , मोठा होताना सायकल, तस सुखवस्तू, पण फिरायला मात्र कुठेच जायचो नाही, आम्हाला गावच न्हवत, गेलोच तर अक्का पंतांकडे पुण्याला .. तस आमचे वडील आम्हाला शनिवारी चर्चगेट ला बोलवायचे ऑफिस ला हाफ डे असला कि, मला फार आवडायचं चर्चगेट एक तर स्वछ आहे बंद, म्हणजे झाकलेल, उघड नाहीये, बाहेर छान इमारती , समुद्र . सगळच. आम्ही akbarallys मध्ये जाईचो सिनेमा पाहायचो, पण गावात मात्र कधी नाही गेलो राहायला.
शाळे मध्ये असताना दर वर्षी पिकनिक ला मात्र न चुकता आरे मिल्क कोलोनी, पण इतकी वर्ष आरे मध्ये जाऊन सुधा कधी आम्हाला ती factory दाखवली नाही कि कधी फुकट (फुकट चीमजा काही औरच असते) दुध पाजलं नाही, पण त्या वेळी लक्षात नाही आल, आम्ही त्या आरे गार्डेन मध्ये खेळायचो आणि परत घरी यायचो दमून भागून, त्यातच फारा मज्जा होती, आता ते आरे गार्डेन जरा बकाल झालंय त्या वेळी हिरवळ होती हुंदडायला जाम बर वाटायचं छोटा काश्मीर ला तर मी लग्ना नंतर गेलो पहिल्यांदा (काय उपयोग?), त्या आधी फक्त सिनेमात बघायचो . माझी खरी मैत्री जमली आरेशी ते मी Baan मध्ये असताना, सकाळी लवकर जायचो साधारण साडेसात पावणे आठला 2001साली, तेव्हा वेड्यागत न्हवता ट्रफिक गाड्या ही कमी होत्या, मी बाइक वर जायचो, तिथे जो रस्ता MIDC कडे वळतो न? तिथे सूर्य दिसायचा वर येताना झाडातून, थंडीत बरेचदा मी दहा पंधरा मिंट बाइक बाजूला उभी करून तिथेच बसायचो तो उगवता सुर्य पाहत, मस्त हिरव गवत थंड वार्याची झुळूक ताज्या हवेचा सुवास, ते सुंदर दृश्य, morning walk ला आलेली लोक ...मुंबईत असून नसल्या सारख, आता बरीच वर्ष नाही थांबलोय तिथे आणी हल्ली सकाळी सुद्धा इतका ट्रफिक असतो कि धुराचा वास जास्त येतो . पण आहे अजून आरे कॉलनी थंड आहे .
मला गाव नाही (नाही म्हणायला गिरगावात जायचो), म्हणून निसर्गाचा तसा संबंध आरेमुळेच आला माझा. तरी माझा मित्र म्हणायचा कि आरेच्या आत जंगल आहे, मस्त मजा येते (त्याची मजा वेगळी असायची म्हणा), मला आधी खर वाटायचं नाही (म्हणजे जंगल आहे ते , त्याची मजा नाही) पण मग आतले रस्ते शोधत गेलो मग पटायला लागल , आवडायला लागल.
आरे मध्ये एक आतला रस्ता आहे, (new zealand हॉस्टेल चा ) बाहेर ट्रफिक असलं कि आतून काढतात हल्ली , पण मला हा रस्ता फार पूर्वी पासूनच माहित होता, पण तो जाणवला फार नंतर अनेक वर्षांनी, सकाळी तर झाडातून सूर्य कीर्ण वाट काढून येतात, तिथेच छोटी छोटी घर आहेत, एक वाण्याच दुकान सुद्धा आहे, गोठा तर आहेच, तिथे लोक सकाळी चूल पेटवून पाणी गरम करतात, त्या मुळे त्या धुरा मध्ये सूर्यकिरण अडकला कि मस्त वातावरण निर्मिती होते, तिथेच थांबून निसर्गाचा आनंद घेत बसाव वाट्त (पण कुणी तरी मूर्ख मागून जोरात होर्न मारतो आणि आपण मुंबईतच असल्याची जाणीव करून देतो )ते सगळ डोळ्यात भरून घेऊन मी तिथून निघून जातो. आरे मधली ती वेडी वाकडी वळण पण त्या सगळ्याला साजेशी आहेत , कवलारू घर , आजूबाजूला हिरव रान, पलीकडे थोड जंगल , एक हि बिल्डींग दिसत नाही , ताज तवानं वाटत . तिकडे न बाक ठेवली आहेत बसायला वेग वेगळ्या ठिकाणी आहेत, लोक असतात कधी कधी, मला पण खूप दिवसान पासून बसायचं आहे त्या बाकावर, बघू कधी योग येतोय. नेहमी घाईतच जातो हल्ली मी तिथून
एकदा रात्री आरेतून येताना मी आधीच आतला रस्ता घेतला (modern bakery कडून, ह्याला पण वर्ष लोटली ) पुढून आत जावच लागत म्हणून आधीच, थोडा खराब आहे रस्ता खड्डा होता मोठा तिथे, थोडा पुढे गेलो तसा अंधार होता बुदुक आणी नशीबाने गाड्या पण नव्हत्या , मी हेड लाईट सुद्धा बंद करून पहिला (उगीच आगाऊ पणा ) रस्ता माहितीतला होता , मस्त काळोख झाला, बाक पण दिसली झाड पण दिसली पण जाणवली वेगळी. म्हणजे बघा आपण आपल्याला आवडलेली एखादी जागा, वस्तू , मुलगी कुणाला मुद्दाम दाखवली कि आपण त्यांच्या नजरेतून पहायचा प्रयत्न करतो मग आणखी येते मजा, तस मला अंधारात दिसल आरे . पुढे आल्यावर (लाईट लाऊन) त्या घरातून चुलीचा धूरदिसला , अंधार होता, जंगल दिसत न्हवत पण जाणवत होत , दिसण्या पेक्षा जाणवण्यात जास्त मज असते न? म्हणजे कॉलेज मध्ये, शाळेत ऑफिसात एखादी व्यक्ती दिसली नाही तरी चालते, पण आहे हे जाणीवेने बर वाटत , म्हणून सेंड ऑफ ला वाईट वाटतच न? आपण काय लोकांना रोज भेटत नाही पण ते आता नसणार ही जाणीव आपल्याला त्रास देते. तर ते हे जंगल तस जाणवल. आत थंड असते नेहमीच (कोण जाणे मला अस वाटत कि बाहेरची गर्दी बघून थंडी इथे आत आरे मध्ये लपून बसली असणार, कारण सिग्नल आला कि एकदम उकडायला लागत तिला आणू बाहेर बोलून परत ), तसलीच ती घर बाहेर बसलेली वस्तीतली माणस दुकानात असलेली लोक, गुर ढोर गोठयात तसाच तो मिणमिणता दिवा …. त्या वेळी हे पाहून ऑफिस चा सगळा क्षीण निघून जायचा … असच ठेवा रे आमच आरे