रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

सात्विक

सात्विक
जोशी काकू खूप सात्विक आहेत आणि त्यांच्या खूप ठाम कलपना आहेत. अमुक म्हणजेच सात्विक तमुक म्हणजे वाह्यात वगैरे. कुणी जरा तोकडे कपडे घातलेत की त्या एखाद्याला साफ नालायक आहे असं ठरवून टाकतात, कुणी मुलगी जरा मुलांशी बोलताना दिसली की लगेच कशे संस्कार नाहीत वगैरे, चार लोकात मुलांनी कस वागावं ? ह्या बद्द्दल एकदम clear आहेत. मुलांनी मुलींशी  बोलूच नये असं मताच्या , देव धर्म करावा वगैरे वगैरे , पण पर्वा त्यांनी त्यांच्या मुलीचे डोहाळे जेवण अगदी थाटात केले  , हा मोठा विनोद, अगदी त्या मुलीला सजवून झोपाळ्यावर बसवून छान  फोटो वगैरे, त्यांना विचारू का जाऊन? काय हो काकू कशी झाली ही गरोदर?  

उगाच डोक्याला त्रास

माझा मित्र संदीप मला जाम आवडतो (मला माझे सगळेच मित्र फार आवडतात ) एकदम प्रामाणिक आणि बेसिक ला धरून असतो , खूप लोकांना तो जंगली वाटतो raw वाटतो पण म्हणून तो मला आवडतो. मला त्या दिवशी म्हणाला "पुनर जन्म असतो रे,मला  आलाय अनुभाव " चायला माझे  आणि ह्याचे विचार कधी कधी   जुळतात, पण हे म्हणजे फारच होत ,   का रे का वाटत तुला अस? "अरे ते जन्मो जन्मो का नातं असं  म्हणतात   न?  मला आला रे अनुभव? गेल्या तीन जन्मातल्या माझ्या बायका, म्हणजे wife  मला भेटल्या?" भेटल्या ?  मेल्या तुझं लग्न झालच नाहीये म्हणजे तू केलस नाहीस ह्या बायका कोण? "अरे गेल्या तीन जन्मी च्या, दोन  वर्षात तीन भेटल्या, एकदम काय तरी झालं"  कुणाला? "दोघांना" आणि असं तीन दा झालं? "हो, सात जन्म असतात ना" अरे हो पण मग? "मग काय नाही, आम्ही भेटलो"  नवरा बाईको सारखे? "हो रे, मागल्या जन्मात गेल्या सारखं वाटलं रे " "  सात जन्म तरी असतात न रे, अजून चार तरी भेटतील ?"

कधी कधी मला ह्याचा राग येतो आणू मत्सर सुद्धा वाटतो, तो त्याच्या भावना कधीच लपवत नाही, एक झेपेनाशी होते आणि हा पठ्ठा अजून चार बायका  शोधतोय आणि हे सार  त्याच्या मैत्रिणी सांभाळून .

सुनामीच्या वेळी त्याचा फोन, "मी महिना भर नाहीये, जरा घराकडे बघ" कुठे निघालास? "नक्की नाही, मद्रास ला जाईन तिथून ठरवेन, खूप वाताहत झाली आहे रे, मी सडाफटिंग, माझी मदत होईल का ते विचारतो, मला चिखलाची  घाण वाटत नाही कि प्रेतांची भीती, मी काहीही खातो, त्या मुळे  बघू काही जमेल ते करू "     हे टोक.

काय करायचं ह्याच? गेल्या जन्मीची बायको सापडली म्हणून  संबंध ठेवतो सुनामीत वाताहत झाली  म्ह्णून सगळं सोडून तिथे जातो लोकांन साठी . ह्याला खूप लोक असभ्य, चालू म्हणतात , पण हा स्वतःहून कुणाच्या अंगचाटी जात नाही लंपट पण नाही, एकच लक्ष्य , साधा सरळ आयुष्य, भूक लागली कि भागवतो, मग ती कोणतीही   असेल .

जोशी  काकूंना हा संदीप फार रुचत नाही, मला जोशी काकू , मी त्यांना आवडतो आणि मला संदीप , सगळाच लोचा .












  

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

शरद पोंक्षे ह्यांनी लिहिलेला लेखाला उत्तर

बरेच दिवस झाले एक ब्लॉग सारखा मला येत होता , शरद पोंक्षे ह्यांनी लिहिलेला लेख . मला अभिनेता म्हणून नितांत आदर  आहे, टिव्ही असो नाटक असो गुणी कलाकार, पण तो लेख मला झेपला नाही. नशिबाने  माझ्या बहिणीशी बोलताना लक्षात आलं कि तिला हि माझ्या सारखच वाटलं, म्हणजे काही लोकांना खटकलं असेलच ना? म्हणून माझं हे मत मांडतो आहे. 

म्हणजे मला थूनकू नको सांगतोस? अंघोळ कर म्हणतोस? अंगण साफ ठेव सांगतोस ? नाही करत जा आधी माझ्या बाजूवाल्याला सांग तो पण अंघोळ नाही करत दाढी पण नाही करत कचरा पण नाही काढत. आहे हिम्मत त्याला सांगायची ? मग ? चूप बस मी घाण करणार आवाज करणार ..... हे एकदम असं . म्हणजे नक्की म्हणणं काय आहे पोंक्षे ह्यांचं? आपण आवाज करत राहायचं? झाड कपात राहायची? पाणी दूषित करत राहायचं? पर्यावरणाची वाट लावत राहायची? कुणी बकरा कापतो म्ह्णून आपण झाड कापायचं? तलावात plaster of paris चा गाळ करायचा? तो वेडा म्हणून आपण सात वेडे होऊन दाखवायचं? त्यानं काय होईल? तुम्ही शहाणे आहात ना? मग वेड होईच हट्ट का? आणि कश्यासाठी?

बकरा मारणं आणि हरण (का काळवीट?) मारणं ह्यात  फरक नाही? बकरे खाण्यासाठी पाळतात तो अजून तरी extinct घोषित केला नाहीये आणि बोकड आपण पण मारतोच कि (अगदि सर्रास) आणी खातो सुद्धा आणी  हे म्हणजे जैन लोकान सारखय ह्या दिवसात कुणी अमुक खाऊ नका तमुक खाऊ नका, उद्या कांदा वर्ज करतील, चक्कर येऊन पडला माणूस तर त्याला काय भेंडी लावायची नाकाला?  हा सगळाच अतिरेक. त्यांने केला न?मग  मी पण करणार  हा हट्ट मला विचित्र वाटतो. 

तेव्हा पण बकरा कापायचे आता पण तोच कापतात आणि तुमच्या घरी आणून तरी कापत नाहीत ना  अजून तरी? आता पोंक्षे वाचन वगैरे करत असतील, म्हणजे करतात असं वाटत .  टिळकांनी जेव्हा गणपती उत्सव साजरा करायचा ठरवल त्या काळी आणि हल्ली  जो घाट घालतात त्यात फरक त्यांना जाणवत नाही का? शाडू ची मूर्ती वापरा  गोंगाट करू नका हे सांगणं गैर ते कस? मिरवणुकीत दारू पिऊन झीनघाट घालणं हे सांस्कृतिक कस?  सैराट होऊन धिंगाणा घालणं धार्मिक कस? त्याचा धर्म वाईट म्हणून माझा चांगला, हे logic मला पचायला जड आहे (एक वेळ बकरा पचेल).

हल्ली माझा धर्म कसा पहिला येईल ह्या स्पर्धेत का असतो आपण? त्या पेक्षा olympic मध्ये पाहिलं यायला झटा न. आपल्याला ठाऊक आहे न कि आपला धर्म स्तुतनीय वंदनीय आदरणीय आणि पालनीय आहे , अरे पण ठीक आहे.  लोकांना का टाहो फोडून सांगायचं कि तुम्ही अस करता? बघा मी कस  करतो ते, म्हणून माझा  धर्म  जास्त मोठा आणि चांगला मला नका शहाणं पण शिकवू .

आमच्या कॉलेजात एकदा एका मुलाला काही तरी चोरी करताना पकडलं, त्याला मग दम  देऊन सोडल, त्याच्या मित्रान पैकी कुणीतरी सांगायला गेलं त्याच्या आईला कि काकू अस  झालं म्हणुन, तर त्या बाई ह्या मुलांनाच ओरडायला लागल्या, तुम्ही कस बंक करता पिक्चर बघता आणी तो तुमचा मित्र सिगारेट ओढतो!  वाह सांगू का तुमच्या घरी, चालते व्हा .आत्ता 20 वर्ष नंतर  तो मुलगा काय करतोय हे सांगायला नकोय. पोंक्ष्याचा असं काही तरी होतंय असं वाटतंय मला.  म्हणजे मला नका सांगू मी काय करायचं ते तुम्ही बकरा कापायचं थांबवा (अरे तुम्ही नको खाऊ  आम्ही खातोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ?) . फार तर पहाटे बांग  नका मारू हे ठीक आहे .  आपल्याला त्रास होत असेल तर बोला 

थोड  हास्यास्पद वाटतंय ते म्हणजे वाघ आणी  बकरा ह्यांची  तुलना केली आहे, त्यांनी चक्क  असं लिहिलंय कि वाघ मारू नका अस म्हणताय ना? मग बकरा मारू नका अस म्हणा. हे थोडं अति आहे. 

मी पोंक्षे  ह्यांच्याशी अजिबात सहमत नाहीये, हिंदू धर्मा बद्दल लिहिण्याची ही वेळ नाही आणि दाभोळकर ह्यांच्या संस्थे विषयी सुद्धा नाही, मी नक्की लिहीन, पण तो खूप विशयनंतर होईल सध्या मला फक्त एवढच म्हणायचं आहे कि धर्म  ह्या नावाखाली जो बाजार आपण हिंदूंनी  मांडलाय तो आपणच थांबवू शकतो 40 फूट मूर्ती आणली म्हणजे काय तो माझ्या पेक्षा  उंच कोटींचा हिंदू होत नाही, खूप गोंगाट करून आणि 100 स्पीकर्स लावून मिरवणूक काढली म्हणजे माझा धर्म  जास्त मोठा होत नाही, दही हंडीच्या उंचीवरून  माझी श्रद्धा खुजी होत नाही. धर्माचं  पाश्चती करण जे चालवलं आहे ते थांबवा, कोणत्या ग्रंथा मध्ये असं गणपतीच्या मूर्ती ची उंची म्हणा कि  आवाज म्हणा  असे तपशील असतील तर मला कृपा करून  दाखवा मी सुद्धा पुढच्या वर्षी एक मोठा स्पीकर चा खर्च स्पॉन्सर करेन ....

तो वर कृपा करून शांतता राखा               

सागर कुलकर्णी 






मंगळवार, ७ जून, २०१६

माननीय मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, विषय : वाढते अपघात



प्रती,                                                                                                                      07-जून-2016

माननीय मुख्य मंत्री,
महाराष्ट्र राज्य,

            विषय : वाढते अपघात  

माननीय श्री देवेंद्र फडणवीस स न वी वी ,

पत्र लिहिण्यास कारण  हल्ली होत असलेले अपघात (सध्या वाहनान विषयी). ह्याच आठवड्यात मुंबई - पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामुळे परत एकदा खूप मोठ्या संखेत जीवित हानी झाली आणी त्यात ताहने जीव गेले ह्याच अतिशय दुखः झाल. पण ह्याचा कारण माझ्या मते अती वेग किव्हा दारू किव्हा निष्काळजी पणा नसून बेशिस्ती हे आहे.

मी गेली 25 वर्ष गाडी आणी स्कूटर  चालवतो आहे आणी अलीकडे मुंबईत होणारी बेशिस्त बघून प्रचंड राग येतो. आधी मुंबईच नाव शिस्तीशी जोडलं जाइच, लोक  सिग्नल ला थांबायची वेडी वाकडी गाडी चालवायचे नाहीत. पण हल्ली लोक सर्रास  सिग्नल मोडतात, उलटे रस्त्या वर येतात, बिनदिक्कत मधेच गाडी उभी करतात. पार्किंग तर विचारू नका. मी ठाकूर संकुलात राहतो आणी 90 फीट  रस्त्यावर वेड्या वाकड्या  गाड्या उभ्या असतात त्यांना हात न लावता कोपर्यात उभी असलेली दुचाकी उचलली जाते.

माझ्या  मते लोकांना मुंबईत शिस्त लावली  तर लोक आपोआप  महामार्गावर गाडी नीट  चालवतील आणि अपघात  टाळता  येतील. तुम्ही महामार्गावर काय ते नियम लावाच पण त्या हि पेक्षा लोकांना मुंबईतच शिस्त लावा म्हणजे, आपण घरीच नीट  वळण लावल कि मुल बाहेर गेल तरी नीटच वागणार नुस्त पाहुणे आले कि  डोळे वटारून काय उपयोग? लोकांना सीट बेल्ट आणी   हेल्मेट ची सक्ती करू शकल न शासन? मग हे  पण  जमेल आणि ह्यात तर इतर लोकांचे जीव वाचतील. 

ह्या करता एक जालीम  उपाय म्हणजे मोठा  दंड, सिग्नल  मोडला कि किमान 5000/-  त्यातले 1800/-  रुपये  एक पोलीसान साठीच्या फंडात  टाका, त्यांच्या "welfare" साठी  वापरा  200/ रुपये त्या पोलिसाला द्या म्हणजे लाच द्यायचा प्रश्न येणार नाही (त्यांना ही फायदा/प्रोत्साहन) सरकार ला 3000/- .   हळू हळू लोकांनाआपो आप सवय होईल आणि  मग शिस्त लागेल.

कृपा करून लवकरात लवकर काहीतरी करा ही नम्र विनंती. एक नागरिक  म्हणून मी काही  मदत करू शकलो तर मला जरूर कळवा .

आपला कृपाभिलाषी ,

सागर कुलकर्णी
मुंबई  

गुरुवार, १९ मे, २०१६

झी चे कार्यक्रम....

एरवी कस होयचं न कि एखादीच मालिका बरी असायची, आता इतकी पातळी घसरली आहे न  कि पुसता सोय  नाही. तरीही सगळ्या मालिका  जोरात चालल्या आहेत.  म्हणजे उद्या सूर्य पश्चिमे कडूनउगवताना दाखवतील आणी  लोक चवीने ते पाहतील.

मी फक्त झी पाहतो (तेच लावतात घरी, काय करू?), म्हणून फक्त त्याच वहिनीच्या कार्यक्रमान बद्दल , एक म्हणजे ह्या सगळ्या शो च्या आधी एक disclaimer हवा, की हा कार्यक्रम निर्बुद्ध लोकांनी निर्बुद्ध लोकां  करता खूप पैशे मिळतात म्हणून केला आहे, तर त्या नुसार काय तो बोध घ्यावा.

जय मल्हार 
जय मल्हार नावाचा पहिला कार्यक्रम असतो  सातला,  आता आपण पण त्या  ISIS सारख असल्या  मुळे देवा बद्द्दल मी काय बोलणार? पण फूल ना फुलाची पाकळी म्हणून ....एक म्हणजे ही काल्पनिक गोष्ट आहे त्यामुळे उगीच संदर्भ शोधत बसू नका आणि मी फक्त आणि फक्त मालिके बद्दल बोलत आहे, मला शंकरा बद्दल काही एक बोलायचं नाहीये मला सगळे देव आवडतात, ह्याची कृपा करून नोंद घायवी.

आता रामानंद सागर नी रामायणात फॉल  बिडिंग वाली साडी, मशीन ने शिवलेला ब्लाउज , तसेच दागीने  , टिकली वगेरे गोष्टी दाखव्ल्या होत्या त्या मुळे , ह्या गोष्टीन कडे  मी पाहत नाही  आणी  मुळात हा इतिहास  नाहीये त्या मुळे ते काहीही दाखू शकतात. आता लीला च्या मुलाने लीलया लोकांच्या गळ्यात मजनू म्हणून बाजीराव उतरवलाय (दुखः त्याला अवार्ड दिल  ह्याचय ) तर ह्या लोकांनी उद्या काहीही दाखवल तरी मला गैर वाटणार नाही.  सेट वगेरे बरे आहेत, बजेट च्या मानाने उत्तम. फक्त  कधी कधी जे हिमालय किव्हा जेजुरी  गड  दाखवण्याचा फाजील प्रयत्न केलाय तो त्रास दायक आहे हल्ली technically इतक advanced आहे कि हिमालय किव्हा मान सरोवर नीट दाखवण काही जड नाही. अभिनय म्हणाल तर नारद चांगला उभा केलाय , आवाज चांगलाय आणि सुरात गातो  माणूस, लक्ष्मी विष्णू छान  दिसतात , शांत चेहरा हवा तसा आणि तेव्हढाच  अभिनय, बानू न जरा बाळसं धरलय, (वाड्यात आल्या पासून कामाला बाइका  असतील बहुतेक ), म्हाळसा चा पर्सनल काही वाद असेल, ती तो  अभिनयात आणते, सारखच  कावते त्या  मोठ्या  देहावर आणि तो देह केवढा आहे , मल्हार म्हणजे शंकराच रूप (अस दाखवले आहे)  म्हणून तो प्रचंड माणूस घेतलाय, अरे पण मग जर इनर वेर  घालावेत  एवढ शरीर दाखवत हिंडू  नये सारख सारख, बर  दिसता  का ते? मी एक सहा महिन्यात एकदा बघतो, तेच हाव भाव करत तो मल्हारी मार्तानाडाचा आवेश आणून काही बाही करत असतो  (कधी कधी K.N.Singh सारखे चेहरे करतो ), म्हणजे फार कष्ट घेत नसावा अभिनय सुधारण्या  साठी, जेवढे कष्ट शरीर बनवण्यात घालवतोय  त्याच्या   अर्धा वेळ तरी त्याने अभिनय शिकायला द्यायला हरकत नाहीये, पण सांगायचं तात्पर्य म्हणजे गोष्ट इंचदेखील पुढे सरकली नाहीये  गेल्या सहा वर्षात (चार तरी असतीलच). तर सगळ्यांना माहित असलेली स्टोरी आहे, मस्त देव राक्षस मारा मारी  वगेरे  एक दोन चार महिन्याने डोकावून  बघायला ठीके.



नांदा सौख्य भरे:

कायद्याने जर बंदी आणता  आली असती तर मी कोर्टात गेलो असतो , म्हणजे संपदा जोगळेकर मला बरी सुद्न्य वाटली होती, साफच गेलीय, इतका टुकार लेखन, म्हणजे तमाम प्रेक्षक हे  मंद आहेत किव्हा ठार मूर्ख आहेत (असतील म्हणा)    अस गृहीत धरून लिहायला घेतलेली मालिका, बांदेकर च ठीके त्यांना पैशे कमवायचे आहेत (तरी भौजींना सामाजिक जवाबदारी हवी ) चार दिवस सासूचे  नावाची होती अशी  अघोरी मालिका संपता संपे ना शेवटी ई च्यानेल बंद पडलं  पण मालिका  नाही पडली बंद आता झी पडेल बंद पण ही मालिका काही बंद होणे नाही. आहो म्हणजे काहीतरी पटेल अस दाखवा उद्या अम्पायारला स्टंप च्या मागे दाखवाल आणि विकेट कीपर ला पुढे  आणि मग अपील करणार अम्पायर आणी निर्णय घेणार विकेट कीपर, पटल? हरकत काय आहे? अरे उगीच कारण नसताना दुष्ट पणा  करायचा आणि तोंडावर पाटी  लाऊन ठेवायची आणी ही पाटी मुलगा आणि सून सोडून सगळ्यांना दिसते आणि ते पण हवी तेव्हा. काम सासू करत नाही पैशे कमवत नाही आणि शेखचिली पणा मुलाला देशोधडीला लावायचं आणि काम करणाऱ्या, पैसे अणाऱ्या  सुनेला त्रास देऊन हाकलून लावायचं  का? तर तिला सत्ता आणि पैशे हवेत. अगदी नशिबाने ह्यांनाच वाईट लोक भेटतात ती हुशार असतात चांगली लोक मंद असतात.  लोक पण रोज चवीने तेच कस  पाहू शकतात? टिपरे होती प्रभावलकारांचीछान होती डोक्याला त्रास नाही, कधी तरी कंटाळा यायचा पण उगाच क्रूर पणा नाही, एखाद दिवस मी जाउन सैराट पाहीन रोज मुडदे पाडताना कशाला पाहीन? पण लोक बघतात, चवीने बघतात. अगदी भारी नको पण फील गुड नको का?    माणूस TV का पाहतो विरंगुळा म्हणून न? अरे पण मग हे अस? आता काही बायका भाजी निवडताना बघतात काही बाईका डोक्याच भज करून घ्यायला मालिका बघतात, म्हणजे सगळ फक्त पैशे कमवायलाच करतात न चानेल वाले ? मग डान्स बार का बंद ती लोक आम्ही पैशे कमवायला हे करतो, creativity दाखवायला वगेरे करतो अशी सोंग तरी आणत नाही.    म्हणजे एकीकडे मराठी सिनेमा इतका  पुढे गेलाय आणि मालिकांची अधोगती का? आणि झी वर? त्यांचेच आहेत न हल्लीचे सगळे चित्रपट ? निखिल साने ना   आणा इथे, हुशार आहे माणूस . 

म्हणजे न लोक काहीही बघतात  TV वर,  कारण फुकट असत ते आणी स्टार कडे बघता फार काही competetion नाही सध्या तरी, पण काही सांगू शकत नाही जर स्टार  चे दिवस उजळले तर त्रास होईल झी ला. थोडी जवाबदारी दाखवायला हरकत नाही.
पण स्टोरी नाही काही खास एक कजाक  सासू जी तोंडावरून हडळ दिसते आणि विचित्र चेहरे करते पण तरी काही मूर्ख लोकांना (मुलगा, सून ) ती देव वाटत्ते, मग ती कारस्थान करते आणि झिन्क्ते आणि सगळे दुखी होतात आणि त्या  चांगल्या मुलीला त्रास देतात सगळ वाईट होत मग खूप वाईट होत आणि ती खूप वाईट वागते आणि खूप वाईट हस्ते (आपण डोक्याला हात मारतो).  जेव्हा नवीन मालिका यायची असेल तेव्हा दोन एपिसोड सगळ नीटहोताना दाखवतील , तो पर्यंत दुष्काळात तेरावा  महिना ......



पसंत आहे मुलगी 

मला ती मुलगी खूप आवडते , गोड आहे आणि एकदम confident, मुंबईची नाहीये, भाषा छान  आहे आणि smart आहे, खूप देखणी वगेरे काही नाही पण पटकन आवडण्या सारखी आहे. हिरो पण चांगलाय, मला सुनील बर्वे टाईप वाटतो, शुद्ध बोलतो म्हणजे मठ वाले शोभतो . तर हा मुलगा एका कर्मठ घरचा,  प्रेमात पडतो आणि घरच्या परवानगी शिवाय  लग्न करतो आणि त्याच  लग्न ठरल असताना.
 सगळ्यांच्या reactions perfect दाखवल्या आहेत, त्यात नंदिनी सध्या वाईट दाखवली आहे पण एकदम freud ला आवडेल अस, तिची आई लहान पाणी गेलीये वडील वारले आहेत लग्न मोडलेल म्हणून ती तिच स्थान किव्हा security करता सगळा डाव टाकतेय उद्यानीट झाल तर चांगली पण वागेल (अस काही दाखवणार नाहीत ते ), situational आहे, ती खविस आत्या एकदमसही उभी केली आहे उज्वला  जोग ने , तिला फक्त त्या  मुली पासून सुटका , म्हणजे जवाबदारी पासून, मोठी सून, तिला काहीच स्थान नाही , थोडी लोभी,  अशी वाईट नाही, पण एकदम narrow  minded,  लांबचा विचारच नाही, दागिन्यांची हौस ऐपत नाही नवरा विरक्त,  त्यामुळे अमिषाला बळी पडणारी, दादा एकदम कर्मठ, परंपरा,  देव हे नुस्त आंधळ्या पणे  पाळत जायचं, विचार नाही. माई प्रेमळ, नवरा हेच सर्वस्व पण नवीन विचार पण पटणारी, रूढी आहेत त्या बदलता येत नाही हे जाणवणारी.  त्या उर्मी चा बाप एकदम तत्व वादि, छान  मोकळ वातावरण असणार घर आणि जिथे मोकळ्या पणाने  विचार मांडता येतात अस वातावरण म्हणेज बाबा ला ए  बाबा म्हणणारी, सुस्वभावी ,   तिथून एकदम कर्मठ घरातलं वातावरण, concept चांगलाय आता त्याला रंगवणार का चिखल करणार हे बघायचं .

ह्यात ती देव देव करणारी मुलगी सरास खोटी शपथ घेते आणि देव न मानणारी मुलगी खर बोलते, तिला लपायला लपवायला देवाचा आधार नाही लागत.... ह्या लोकांनी balance अजून तरी ठेवलाय पण जर लोकांना मठः समजून जर पुढे नेणार असले तर संपलच ....          

थोडं थोड पाहायला हरकत नाहीये, पण रोज अर्धा तास नको वाटेल  
       



सौभ्ग्यावती 


एक म्हणजे वैभव मांग्लेचा उत्तम अभिनय , बस संपल बाकी सगळ भंपक . ठीके अजून थोड, अभिनय सगळ्यानीच उत्तम केलाय,  पक्याची कॉमेडी किव्हा वैभव ची बाइको सासरे आई वडील सासू मित्र सगळेच सही आहेत. पण मुळात स्टोरीत दमच  नाही म्हणजे फार तर दोन अंकी नाटक  किव्हा सिनेमा पण मालिका?दोन वर्ष (कमीत कमी ) चालणारी?  जरा  जड जाइल, म्हणजे आपल्याला त्यांना काही नाही जड. म्हणजे एक माणूस स्त्री वेशात जातो हे  ठीके, पण हिरोईन म्हणून काम करतो? अरे दिसतो रे तो पुरुष  अस  नका करू, वाटल्यास पटकन नाही समजणार पण रोज दिवस रात्र एकत्र काम करताना स्पर्श करताना एका पुरुषाला ...पुरुष  आणि बाई ह्यातला फरक नको कळायला? हे म्हणेज अगदीच लोकांना येड समजल्या सारख, म्हणजे artist lok तंद्रीअसतील पण एवढे मंद? रमेश भाटकर ला लंपट दाखवलाय (फार अभिनय कौशल्य नसेल लागल तसाच आहे चेहरा ) त्याला नको कळायला? एका झटक्यात समजेल आणि एक दोन दिवस ठीके पण महिनोन महिने? आणि प्रेक्षक? ते पण येडे काय?  अगदी नका रे अस करू? ते बालगंधर्व बिचारे बेचैन असतील स्वर्गात.

पण कधी पण पहा आणि कुठून पण पहा स्टोरी पुढे  सरकत नाही प्रेक्षक वर्ग  हा मूर्ख आहे हे गृहीत धरूनच सगळ्या मालिका केलेल्या आहेत

काहे दिया परदेस 


म्हणजे आता पर प्रांतीय मराठी मालिकेत  घुसायला लागले आहेत  आणी ते सुद्धा direct हिरो म्हणून, काही खर नाहीये . तो नट चांगलाय, नटीला अजून जमायचं आहे, पण मोहन जोशी ने बापच बाप केलंय म्हणजे अगदी चपखल बसलाय त्या भूमिकेत, बाकीचे कलाकार सुद्धा उत्तम आहेत. एक परदेसी परदेसी मुलगा शेजारी  येतो आणि मग ते सगळ normal love story सारख, ती सून उगीच चेटकीण आणि भांडखोर लोभी दाखवली आहे, म्हणजे असतील  अश्या बाईका, पण नीट सालस दाखवायला काही हरकत नाही . एक अतिशय भामटा मुलगा दाखवायला आहे तो पण मराठी आणि तो पण कपाळावर चोर  आहे अशी पाटी  फिरलाय  फसतात. आता नेहमी सारख ती मुलगी आणि तो मुलगा भांडतील आणि प्रेमात वगेरे पडतील  मग ती  पण जाइल बनारस ला बघू घडतंय ......

रोज बघायची गरज नाही आठवड्यातून एकदा दहा मिंट चालेल त्यात मोहन जोशी असण गरजेच आहे.    


चला हवा येऊ द्या 

सध्या चालू असलेल्या मालिकेन मधली सगळ्यात बेष्ट, कधी कधी पकवतात, पण इतके गुणी आहेत सगळे कलाकार कि सगळच तारून नेतात. म्हणजे साबळे उत्तमच लिहितो पण कधी कधी लूस असेल स्क्रिप्ट तरी  सुधा कलाकार तरतात एके काळी पेपर वर अझर  सगळ्यात उत्तम कर्णधार होता (एकटाच असेल जो थर्ड म्यान ला फिल्डिंग  करायचा), त्याचा कारण म्हणजे सचिन, सौरभ, द्रविड, लक्ष्मण , श्रीनाथ कुंबळे सगळेच त्याच्या कडे , प्रयत्न  करावे लागले हरायला, इथे साबळे ला हरायचा काहीच कारण नाही त्या मुळे तो छानच लिहितो आणि हे छानच करतात, कधीतरी लोकांना  थोडा बोलू द्यायला हरकत नाहीये, कारण हीच लोक धिंगाणा घालतात, जरा ही बाब पहिली तर सोने पे सुहागा.

सगळेच अशेच असतील कार्यक्रम तर प्रेक्षक पण खुश होईल हो . कधी पण पहा रोज पण पहा नुसता फार्स  आहे नो टेनशन  

अस्मिता        

तीन वर्ष झाली म्हणे,  मी तीनदा पण नसेल पहिला, त्या मुळे  लिहिण गैर ठरेल.

 रात्रीस खेळ चाले    

मुलगी लहान असल्या मुळे अशे कार्यक्रमान बंदी आहेआमच्याकडे कडे (सुटलो, नाहीतर माझी जाम फाटते)


बुधवार, १८ मे, २०१६

www.rapidels.com

नात्यातला गोडवा वाढवेल rapidel  ….

सकाळी वडलांच्या वाढदिवसाला त्यांना फोन केला, त्यांना म्हंटल Greeting Card पाठवल आहे मिळाल का? नाही म्हणाले आणी आता कार्ड पेक्षा मला आज हव होत काही तरी गोड. पुरण पोळी केली पटकन पण  पाठवणार कशी?  मी राहते ठाण्याला आणी  वडील बोरीवली ते कार्ड सुद्धा एका दिवसानंतर सुद्धा  नाही पोचत, Rapidel ला विचारल, कराल का पुरण पोळी पोस्त? काय कमाल जेवायला वडलांच्या ताटात मी केलेली पोळी पोहोचली ……… नुसत्या पोळ्या नाहीत त्यांनी माझ्या भावना सुद्धा पोहोचवल्या. 

नुस्त कार्ड नाही तर बरच काही …. Rapidel  फक्त चार तासात pick up  and delivery   

शतशः धन्यवाद
http://www.rapidels.com/

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

मला पडलेले दोन चार प्रश्न

JNU

मला पडलेले  दोन चार प्रश्न:

  • त्या कन्हैया लालच वय 28 आहे, मग तो कॉलेजात अजून का शिकतोय? त्याची आई एकटी कमवणारी आणी वडील आजारी असतात म्हणे, आई वडलान पेक्षा अफझल गुरु ह्याला जवळचा का वाटतो?
  • आता मेलेल्या माणसान बद्दल  बोलू नये पण तो रोहित पण PHD करायला कॉलेजात का राहत होता ? तो सुधा गरीब घरचा होता आणि पंचविशी च्या पुढला होता,
  • आपण ह्यांच शिक्षण का पोसायच? (JNU ला grant आहे) 
  • भारत कि बरबादी काश्मीर कि आझादी अस  म्हंटल तरी त्यांना हटकायच  नाही का? पण मग त्या Herald प्रकरणी legal notice दिली ते राष्ट्रा विरुद्ध कस ? (निरुपम भैय्या ने  मोर्चा काढला होता, गांधीन ना  notice पाठवली म्हणून )
  • हल्लीची पिढी इतकी देशद्रोही आहे का? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार का? मग उद्या कुणी रस्त्यात  मुलीला थांबून तुझे कपडे काढायची इच्छा आहे अस म्हंटल तरी  लहान म्हणून सोडून द्यायचं का?  त्याला जर पोलिसांनी डांबल तर पोलिस चुकीचे का?

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

If you flaunt a yacht while in debt, it shows you don't care


I just came across this lines from an interview of our RBI governor, it was very obviously pointing to a certain flamboyant CEO of a beleaguered group. I cannot agree  more, the same  attitude brought down the golden egg laying Beer business and the air line too, this was in some way predicted  by Mr. Gopinath who sold (?) Deccan airways to the KF group in an  interview he gave when the first crack appeared pointing to the obvious which an astute business man could see but unfortunately the bank did not or had no option by then.

But this is usually the case  with most of the rich business men that are in public life or other wise, probably with some exceptions like  Mr. Tata or Mr.Premji, Mr.Murty and his ilks, but then this are exceptions, usually people  with lot of money tend to throw their weight (pun not intended)around and this is also true for common people like us who are a  little better off who can afford a vehicle and a home than the majority Janta. Drive on  the road and you will understand, Rickshawallas can be  expected to break the signals, but when  you come across  a well dressed person driving a high end car and  still breaking the law nonchalantly it hurts more, since  they are aware that the law  is  being broken and know they can get away with it  and this is very worrying. Once in a while Rs.500/- is peanuts for them and they are bound to haggle and argue. 

I have a neighbor who is in the US of A for most part of the year, visits the homeland once in 3  months (and no he is not a  Software   engineer) has a  car and  a rented house there. During a conversation when he was asked about the traffic rules in foreign land, he explained that the fine ranges from 500  to 5000 dollars so no question of breaking the law and  the  police  is always round the corner with cameras  everywhere, so it is very expensive to break a signal and you are  bound to get caught plus the license will be terminated after certain offences so you will not be able to drive, does he follow the signal here?  He said no, am I mad? why should I if there is no police? When probed further, he confessed that he only follows the law for the fear of law and does not think it's a responsibility as a citizen.

And that my friends is the majority opinion,   it will be difficult to change the thinking, even though he is seeing and enjoying the benefits of following the law in the USA. The basic's are all wrong here and Rajan has  hit the nail on the head. The onus is on us to follow  the laws that benefit the society as a  whole.

There are 16 deaths in India every hour on Indian roads,