गेले कित्तेक दिवस ह्या विषया वर लिहीन म्हणतोय, पण टाळत होतो. काल AAP ने जो तमाशा मांडला त्यावरून वाटल लिहूनच टाकाव. एक तर AAP चा विशेष राग आहे कारण त्यानी सरळ सरळ फसवलंय, म्हणजे दारू बंदी चा मोर्चा काढणारयाने, दारू पियुनच तो काढला तर? अस आहे ह्याचं, एक तर त्या केजरीवाल ला कुणी तरी सांगा हो की अरे बाबा तूच आहेस देल्हीचा शिल्पकार, आता तू काही मोर्चा काढणारा आणि रस्त्यावर आडवा पडणारा नाही राहिलास, तुझीच सत्ता आहे आणि सारख हमरी तुमरीवर नाही चालत. पण त्याला तो तरी काय करणार? दिल्लीत सगळेच हमरी तुमरी वर येतात.
एक तर मुख्य मंत्र्याला साधारण पणे एक पोच ठेवायला हवा आणी भाषा जरा जपून वापरावी, प्रधान मंत्रीला काहीही बोलायच्या आधी लक्षात ठेवायला हवय कि तो तुझ्या बापाचा माल नाही (अरेरे काय हि भाषा ?) अख्या भारताने निवडून दिलेला तो एक आपलाच प्रतिनिधी आहे, त्याला शिव्या म्हणजे आपल्या सगळ्यांना शिव्या आहेत त्या. भाषेवरून लायकी कळते , म्हणजे तुम्ही जसा चार लोकात आणि चार लोकांशी बोलता त्या वरून , भाषा म्हणजे हिंदी मराठी नाही. लहान पोर खेळताना भांडण झाल कि कशी बरळतात तसा बरळतोय, रोज काहीतरी आठवून शिवराळ पणा. इथे अण्णा हजार्यांशी संबंध चांगले दाखऊन लालू ला मिठ्या मारायच्या आणी हे सगळ AAP च्या कार्यकर्त्यांना चालत?
हल्ली RSS बद्दल वाईट बोलण्याची फ्याशन आहे, कुणीही उठत आणि RSS वाईट अस म्हणत काही लोक तर ISIS सारखेच आहे हो, हे अस म्हणतात . एका माझ्या ओळखीच्या अतिशय सुज्ञ आणी आदरणीय माणसाने मला बोलण्याच्या ओघात अस सांगीतल कि मोदी पेक्षा लालू बरा, माझ्या करता हे खूप धक्कादायक आहे. मी स्वतः शाकेत जायचो कितेक वर्ष, अगदी शाखा घेऊन अनेक ठिकाणी जायचो, बर्याच संघातल्या (RSS च्या शाखा होत्या आमच्या लहान पणी ) लोकांना मी चांगल्या पणे ओळखतो , चांगले सुशीक्षित, संसारी आणि संस्कारी लोक आहेत, माझ्या देखत कुणीही बंदूक काढून खून केलेला मी पहिला नाही, किंबहुना ती लोक त्यातली नाहीच, मी करेन का अस काही? मग ही लोक ISIS सारखी कशी? लालू ने 12 हजार करोड खालले आणी बिहार ला पार मागे नेल, त्या मनान गुजरातच बर चालला आहे अस दिसतंय, तरी लालू बरा? दीड वर्षात देशातले विरोधक सोडले तर फार काही वाईट लोक बोलत नाहीत आणी काहीतरी होताना दिसतंय. भारता बाहेरच्या नेत्यांच मत सुधा चांगलच आहे (तरी लालू बरा?) आणि परदेश दौरा म्हणजे काही ITमध्ये onsite जाण्या सारखा नाही, गुंतवणूक दिसते आहेच न? सगळ्यांना instant noodles हवेत, लग्न केल असत मोदीने तरी अरे अजून गरोदरच बायको? दहा मुल होतील अस वचन दिल होत, वर्ष झाल तरी अजून काही नाही? अस म्हणणारी लोक कमी नाहीत (तरी लालू कसा बरा, त्याने पण एका वर्षात नाही काढली 9 मुल ?).
भीती ह्याची वाटते कि आज लालू आला (खूप भीती दायक आहे, बिहारी माणसाला विचारा ), उद्या पप्पू येईल,बुद्धी जीवी खुश होतील (पैसा खाऊ द्या हो, गाय खायला विरोध नाही न?) मध्यम वर्गीय परत वैतागणार, मतच नाही देणार (लालू वाले नक्की देतील), बाहेर (परदेशात)जायचा प्रयत्न करणार, हे आताच नाहीये आधी सुद्धा लोकांना बाहेरचा (बिहारचा नाही ) मोह होताच तो राहणार. हिंदून बद्दल बोललात कि तुम्ही जातीयवादी. मला त्या दिवशी दोघ हा ब्राह्मण आहे अस म्हणाले(म्हणजे सहजच) , कॉलेजात हा भट आहे अस ही मुल बोलायची (मला काही त्याच सोयर सुटक नाही म्हणा), पण उद्या मी जर कुणाला जाती वरून हाक मारली तर मला तो कोर्टात नेऊ शकतो. म्हणजे ती तुमची असहीश्रुन्ता subjective आहे काही लोकांनी केली तरच एरवी OK अस्त.
मी आज का लहिल? कारण एक तर फार लोक फार काही बोलतायेत आणि generally वाईटच बोलतायेत, पण एक चांगल म्हणजे लोकांना आता बोलावसं वाटतंय कारण कुणी तरी ऐकेल अस होतंय ही चांगलीच बाब आहे .....पण तरी लालू कसा बरा? हे उत्तर नाही मिळाल आणी ह्या काळात परत हिटलर होईल हे अशक्य आहे ...
जाता जाता एकच ....त्या अमृता ला प्लीज कुणीतरी सांगा हो, कि तू फक्त घरी गात जा, मुखमंत्री बरा असला आणी आम्ही कितीही साहिश्र्णु असलो म्हणून काय झाल? फार अंत नाही पाहू ग लोकांचा