शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

मा श्री देवेंद्र फडणवीस - एक पत्र

मा श्री देवेंद्र फडणवीस ,

      स न वि वि,

पत्र लिहिण्यास कारण कि गेल्या आठ  दिवसात तुमच्या बद्दल , कौतुक, आदर  जिव्हाळा, राग , चीड ह्या सगळ्या भावना मनात आल्या आणि आता नैराश्या आणि वैफ़ल्य आल आहे.

कौतुक ह्याच्या करता वाटल कि चांगला सुशिक्षित, हुशार , तरुण  आमच्यातलाच  एक,   आता मुख्य मंत्री झाला अस वाटल , म्हणजे लग्नात मुंजीत कुणाचा  भाचा काका असतो न , जो थोडा हुशार असतो आणि लोक म्हणतात अरे हा फडणवीस , हुशार आहे पुढे जाईल , बाइको बँकेत आहेत … चांगल कुटुंब आहे  वगेरे त्यातलाच वाटलात म्हणून जिव्हाळा  वाटला  (न ला न आणि ण ला ण म्हणता हे ऐकून सुधा खूप आनंद झाला ) तुमच्या मुलखाती मध्ये तुम्ही म्हणालात कि सत्ता ठेवण्या  साठी सत्ता नाही ठेवणार … अवडल होत आदर वाटला  आणि  खर सुद्धा वाटल होत तेव्हा.

जेव्हा सेनेला तुम्ही  उत्तर नाही दिल झुलवत ठेवलं तेव्हाही चांगल वाटल, हट्टी  मुलाला असाच धडा द्यायला हवा असा वाटल तेव्हा, पण काल अगदीच सगळ फौल ठरवल फडणवीस तुम्ही साफ अपेक्षा भंग. हुशार म्हणता म्हणता तुम्हाला बनवल कि , शेवटी पश्चिम महाराष्ट्र सरस ठरला , तुम्हाला बंदूक दिली चालवायला पण गोळ्या मात्र पवार साहेबान कडेच आहेत,  किती दिवस नुसत्या बंदुकीचा धाक दाखवणार  बे … आज न उद्या कळणारच लोकांना कि उगा फुका मारून राहिले हे  फडणवीस,……  रागावतील लोक

आम्हाला दिल्ली ची सत्ता नको होती म्हणून तुम्हाला निवडल , पण तुमच्या वर दिल्ली आणि  गुजरात दोघांची सत्ता , कस होणार आमच?  महाराष्ट्रच नशीब वाईट , त्या नारायाण राव पेशव्यांना मारला न  त्याचे  भोग अजून भोगतोय , त्या काळात फडणवीस होते , ज्यांनी दिल्ली  आणि इंग्रज ह्यांना समर्थ पणे तोंड दिल आणि राज्य राखलं, इथे तर तुम्ही दिली च  ऐकून अगदी राघोभांचाच आधार घेतला ,  अहो फडणवीस त्यांना सत्ता हवी आहे हे नाही लक्षात येत तुमच्या.  मला सुधा एवढ कळत आणि चीड येते.

आता वर्ष भरात निवडणुका होतील (तेही आमच्याच पैशांनी),  तुम्हाला  आमची  काय तुमची मत पण  मिळायची नाहीत पण त्यांना मात्र त्यांची मत मिळणार , पुन्हा तेच किमान दहा  वर्ष आमचे बारा वाजवणार  धरणात मुतणार मुंबईत हल्ले झाले कि वेड्यागत बोलणार शेत्कारांच्या आत्महत्या होतच राहणार, आणिक  शंभर  ठिकाणी टोल लागणार . तुम्ही फार फार तर लोक सभेत जाऊन एखाद मंत्रिपद घ्याल आणि धन्य व्हाल …. कधी कधी वाटत हा कट महाराष्ट्राला गुजरातच्या पाठी मागेच  ठेवण्याचा तर न्हवता ना ? नसेलही  पण नुकसान मात्र मराठी माणसाचच झाल  आणि त्यात फडणवीस तुमचा सिंहचा वाट असणार , (इथेच नको होता हो माझा महाराष्ट्र) आणि ह्याचे प्रतिसाद लोक सभेत हि उमटणार ….  उशः काल होता होता काळ  रात्र झाली . 

 देव करो, फडणवीस करो का तावडे करोत का आणि कुणी करोत , तुम्हाल सुबुद्धी होऊन आमचा अपेक्ष भंग टळो …हीच मी महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो.

आपला विनम्र

सागर कुलकर्णी

ता. क.

आता मुंजीत तुमच्या कडे बघून बोट दाखून लोक म्हणतील (मी सुधा ) हाच तो फडणवीस, गळ्यात घड्याळ घातलेला .

कुलकर्णी










1 टिप्पणी:

prometheus म्हणाले...

Chhan lihilayas re;ekdam to the point.....Mata madhye dena.
Raajkarna baddal me jasti samjavun ghet nahi....kaaran ek goshta pakki aahe ki Anna ani kejariwaalcha hey kaam nahi...tevha apan apala fayda baaghne hech uchit....