रविवार, ७ डिसेंबर, २०१४

प्रिय अद्वैत

प्रिय अद्वैत,अम्रिता

तुमच्या लग्ना निमीत्त 

माला मामा बनवणारा हा पहिला माणूस आणि त्याने मामा बनवलेला मी पहिला , नंतर नंतर त्यानी खूप लोकांना मामा बनवला पण पहिला मान माझा.

तो खूप गोष्टीत पहिलाच होता … दोन्ही बाजूला पहिला नातू पहिला मुलगा स्वताचा धंदा चालू करणारा पहिला harris shield, kanga league खेळणारा पहिलाच आणि अशे अनेक … अगदी  लहान पणा पासून तो आमच्याकडे एकटा राहायचा धड बोलता सुधा येत न्हवत तेव्हा पासून आणि आमच्या इथे पण तो खूप famous होता खूप नकला करायचा वाघ, मांजर आणि किशोरे कुमार चा आवाज काढून दाखवायचा तो , खूप गोबरा आणि कधीही न रडणारा , त्याचा स्वभावात रड नाहीच , हे संसारात खूप उपयोगी ठरेल.

तुम्ही दोघ आता एक मेकांना दहा वर्ष ओळखता त्या नंतर प्रेमात पडलात तेव्हा तुम्हाला एका मेकान विषयी मी काय सांगणार आणि सुखी संसार कसा करायचा हे मी सांगण म्हणजे विनोदच होईल , तरी तुमच्या पेक्षा चार पावसाळे चार माणस जास्त पहिले म्हणून काही अनुभव सांगतो.

लग्न हि एक  भागीदारी असते आणि partnership  ही पन्नास पन्नास टक्के असते  असावी, पण खर सांगू लग्नात कधीच नसते रे पन्नास  पन्नास कधी 40  - 60 कधी 30 - 70 कधी 49 - 51 तर कधी 90 - 10 सुधा , 50-50 म्हणेज आपल्या आपल्या हद्दीत, असा  संसार  नाही चालत , एका ला  तरी एक पाउल पुढे किव्हा  पाठी यावच लागत,एक म्हणजे एकशे सुधा पण एकाच माणूस सारखा पाठी पुढे करत राहिला तरी कस चालेल , त्या साठी दोघांनी प्रयत्न करावे लागतात ..... 

विनोद हा माझ्या मते लग्नाचा आणि एकूण जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि असावाच स्वतावर हसण खूप कठीण आहे पण जर जमल तर त्या सारख सुख नाही, पण थोड्यात गोडी हे तुम्ही जाणताच. मस्करीच असुदेत कुस्करी करायचा मोह आवरा .

राग हे एक व्यसन आहे अस मला वाटत आणि गंम्मत म्हणजे ह्याचा त्रास स्वतः चिडक्या माणसा पेक्षा आजु बाजूच्या  लोकांनाच जास्त  होत असतो, म्हणजे व्यसन करणारा स्वताच जास्त त्रास करून घेतो, दारू पिउन लिवर खराब, तंबाकू ने कर्क  रोग, पण चिडक्या माणसाच तस नाही, चिडून तो मोकळा होता आणि इतर लोक त्रास करून घेतात.   तुम्ही दोघ चिडके नाहीत  तरी सुधा सांगतो राग आवरा, टाळा आणि विनाकारण  अजिबात चिडू  नका, खूप गोष्टी सोडून द्या  पटो अथवा न पटो, माणूस सोडण्या पेक्षा गोष्ट  सोडा. तुम्हाला जर एकमेकांना शिवी द्यायचा मोह झाला  तर  थांबा दोन मिण्ट थांबा  आणि तरी वाटल तर द्या  पण मनात तोंडातून नाही , म्हणजे दोन समाधान शिवी दिली म्हणून तुला आणि दिलीच नाही म्हणून तिला. एक मेकांचा आदर करा माझ्या मते सगळ्यांचाच आदर  करावा, जमण कठीण  आहे म्हणून किमान एक मेकांचा तरी आदर करा, भांडताना हे लक्षात ठेवा म्हणजे  आपोप शब्द जपून निघतील.

मी अश्या  बर्याच जोड्या पहिल्या आहेत ज्या एका मेकान बरोबर comfortable नसतात, तुम्ही खूप आहात आणि तसेच राहा, (चार लोकांत असताना कमी राहिलात तरी चालेल) कारण तुम्ही एक मेकांना  गृहीत धरता चांगलय, तुमचा एकमेकांवर विश्वास आहे, म्हणजे कस कि  घरी कधी चार मित्रांना आणलस हे गृहीत धरून कि त्यांना  आपली बाईको नक्की खाईला घालेल ह्यात काहीच गैर नाही, तीही अस कधी करेल (कर कि लेका चहा) तेव्हा तुला बाईकोची   भूमिका पार पडावी लागेल...पण विश्वास ठेवा गृहीत फार नका धरू … विश्वास असण आणि गृहीत धरण ह्यात एक बारीक रेष आहे ती ओळखा आणि पाळा ….

 स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट आहे, गोष्ट म्हणजे त्यांच्या आयुष्यातली एक घटना ...

"एकदा स्वामी आणि त्यांची शिष्या का शिष्य नदी काठी फिरत होते, तेव्हा स्वामींना शिष्याने  विचारल कि प्रेम कस कराव? स्वामी तिला नदी  जवळ घेऊन गेले आणि त्या शिष्येला म्हणाले कि ओंजळीत पाणी घे, ओंजळीतल्या पाण्याकडे पाहून म्हणाले कि अस प्रेम कराव ..... ओंजळ बंद करून मुठीत धरलस कि सगळ पाणी सांडून जाइल  आणि ओंजळ थोडी सैल केलीस तरी पाणी सांडेल खूप हलके पण तरी घट्ट अस प्रेम हे ओंजळीतल्या पाण्या प्रमाणे कराव  "

मला ईगो म्हणजे नक्की माहित नाही, पण "अभिमान" मध्ये दाखवलाय तो नक्कीच , तुमच्यात तस येण कठीण, अम्रिता काय उद्या कपडे विकायचं काम करणार नाही आणि तू जर मुलाना शिकवल तर तिला ते आवडेलच आणि अद्वैत तू थोडा आळशी असल्याने तू काय तिच्या कामात ढवळा ढवळ करणार नाहिस, तरी एक मेकांच्या  यशाच कौतुकच करत राहा …

दोघे मिळून माणस जोडा खूप सुखी व्हाल तशी तुम्हाला मित्र मंडळी आहेतच पण नातेवाईक पण जोड सारखी माणस असुदेत अवती भवती म्हणजे तुम्हाला एकांत मिळाला कि आवडेल ...प्रत्येकाची  Romance ची   संकल्पना फार वेगळी असते, मला स्वताला चहा खूप आवडतो,  सकाळचा एकत्र चहा पण मला समुद्र किनारी मारलेल्या फेरी पेक्षा जास्त Romantic वाटेल, सांगायचं काय कि europe टूर मस्तच पण romance छोटाच ठेवा... आणि खर तर अमुक म्हणजे सुख तमुक म्हणजेच romance अस नाहीये ...नसतं तुम्ही तुमचा शोधा.

....आणि आता ती बाइको आहे आता फरक पडणार .... एक मुख्य फरक म्हणजे ती आता पिक्चर बघून झाला कि  तुझ्याच (तुमच्याच)घरी येणार आधी कस  ती तिच्या घरी आणि तू तुझ्या, पण आता तस नाही आणि हा फरक खूप  पडणार ....तुला रोज वेळेत दात घासावे लागणार आणि  दोनदा, अंघोळ करावी लागणार  बघ बाबा केवढे कष्ट  ...मैत्रीण आणि बाइको ह्यात खूप फरक असतो स्वाभाविक आहे त्या मुळे  मैत्री जपून ठेवा (आणि बाइको पण ) तीच येईल कामाला ...

भांडण वगेरे  करा  पण एक मेकांशी न करता त्या वृत्तीशी किव्हा विषयाशी ...व्यक्तीशी नका रे  भांडू (अस तुझी आई म्हणते नेहमी)  आणि जमल्यास लगेच संपवा , माझा एक मित्र आहे तो शांत आहे पण त्याची बाइको सुधा शांत (किती छान) ते दोघ चिडले कि भांडत नाहीत , अबोला धरतात आणि तास झाला शांत झाले कि  मग बोलतात , संपल ना  भांडण राग गेला कि मग कशाला आरडा ओरड होतोय .....तस करा ....

आपले आपले स्वतंत्र मित्र मैत्रिणी पण ठेवा ...मधेच एखादी मुलांची ट्रीप करून ये तिला आवर्जून पाठव खूप फरक पडेल परत आल्यावर , बाईका नवरा कसाय हे एकमेकांना  विचारतात  आणि आपला कसा चांगलाय हे चार चौघात सांगतात (एखादीलाच तक्रार सांगतात)आणि तू तसा गुणीच आहेस त्या मुळे  तुझ्या गुणांची नकळत तिच्याच कडून उजळणी होईल.  आपल अस नसत , चार पुरुष एकत्र येउन बहुदा (आपल्याच) बाइको विषयी नाही बोलत सचिन ची एखादी इंनिंग किव्हा सिनेमा आणि त्यातल्या बाईकान विषयी जास्त बोलतात.

एक सांगतो  तुलाआतली  एखादी  वस्तू कुठे आहे हे माहित असेल तरी बाइको कडे माग त्यांना आवडत , तुला काय कष्ट नाही पडणार, तुला तसाही काही सापडत नाही  पण तिलाच बर वाटेल तिला मागितलं तर आणि तुला कस काही सापडत नाही मलाच द्यावं लागत ही लाडिक तक्रार सुद्धा करेल सगळ्यांकडे. आपल्या  नातेवाईकांना तिलाच फोन करू दय्याचे , बाईकांना तसही तारखा जास्त लक्षात राहतात. अश्याने ती तुझ्या कडच्या लोकांना जास्त आवडेल आणि त्यातच खरा आनंद आहे आणि तुमच सुख सुधा ….

घरातल्या छोट्या गोष्टींचे निर्णय तू घेऊ नकोस, म्हणजे पडदे, रंग, भाजी, फिरायला जाइच कुठे कधी कुणाला काय घ्याच ....तू मोठे निर्णय घे , म्हणजे अंबानीने आता कशात पैशे टाकले पाहिजेत , मेट्रो कुठून काढायची ,  भारताच्या Budget मध्ये काय काय करायचं , आपल्या टीम चा captain कोण हवा वगेरे वगेरे , आपण छोट्या गोष्टी नाही बघायच्या . जमल्यास स्वयपाक शीक बाइको दमून आली आणि आई  बाहेर गेली असेल, तर तिला घरात आल्या वर  गरम गरम जेवायला मिळण्या  सारख दुसर सुख नाही...

मुख्य म्हणजे लग्न enjoy करा , वर लिहिलेलं पटल तर कर ..else  तुझ्या मनाच कर पण सुखी राहा आणि लोकांना सुखी करा, तुम्ही आनंदी राहा लोकांना आनंदी करा , लग्न हे दोघांच नसत तर  दोन कुटुंबांच असत दोनशे माणस असतात त्यात ते लक्षात ठेवा



आणि निसर्गाचे नियम पाळा ......

सागर मामा



























शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

मा श्री उद्धव ठाकरे- एक पत्र

मा श्री उद्धव ठाकरे,

     स. न. वि. वि.

कोकणात दोन भावांच्या भांडणात एक शेट दुकान, जागा हडप्तो अस होऊन सुधा दोघ भाऊ खुश असतात कि कशी जिरवली म्हणून . कारण मुळात शत्रू कोण हेच ठाऊक नसतं तस  सध्या मला सेना आणि भाजप कडे बघून वाटतंय. 

मी गेली पंचवीस वर्ष मतदान करतो आहे, अगदी न चुकता आणि मत कायम युती ला होत त्या मुळे झाल काय कि, ह्या खेपेस कुणाला मत द्यायचं हे कळेच ना कारण मत कायम सेना भाजप अस  होत. 

पण एकमात्र नक्की कि तुम्हाला  सगळ्यांनी मिळून फसवलन आणि तुम्हाला अजून हे लक्षात येत नाही ह्याच आश्चर्य वाटतंय. 

जास्त प्रेम, मोह  तुम्हाला कसला आहे? सत्ता का राज्य? उत्तर मला नकोय ते मला दिसलंय. पण ह्यात तुमच नुकसान तर झालच पण महाराष्ट्रच  जास्त झाल न?  साफ गंडवल तुम्हाला, आणि तुमच्या कडे अशी माणसं   पण नाही जी लोक ही खेळी ओळखू शकतील. ह्या खेपेस  खूप सुवर्ण संधी आली होती तर तुम्हाला सोन्याच अंड नको होत अख्की कोंबडीच हवीशी झाली. प्रत्येक खेपेस पहिलच येणे गरजेच नसत साहेब. आत्ता काय झाला बघा हातातल  सोन्याच अंड जाउन नुसतच अंड आल. 

शरद पवार साहेबांकडून कडून हे शिकण्यासारख आहे, त्यानी एकाच खेळीत अनेक गोष्टी केल्या ….  युती फोडली, भाजप ला लोकांच्या मनातून उतरवल आणि स्वतावरच संकट दूर लोटलं , मानल त्यांना. 

आपण साहेब काय केलत? हातातली सत्ता घालवली लोकसभेत मंत्रिपद आणि लोकांचा आदर आणि प्रेम. पवारांची भूमिका तुम्ही घेतली अस्तीत तर? भाजपला हव तेव्हा तुम्ही दंडका  देऊ शकला असता , आता अगदी  समोर जाऊन बसलाय त्यांना कळतंय तुम्ही काय करणार ते, कधी तरी पाठून मारा, सारख समोर जाउन मारामारी करण्याचे दिवस गेले. आता निवडणूक झाल्या कि काय् होणार आहे अगदी उघड आहे, ते तुम्हाला दिसायला हवय. 

तुमचा शत्रू तुम्ही  ओळखलाच नाहीत , भाजप हा शत्रू न्हवता कधीच ….  तुम्ही समजलात आणि चुकीच्या दिशेने हल्ले केलेते लोकांच्या मनातून उतरलात , आता अस  लोकांना शिव्या देऊन नाही चालत, मध्यम वर्गीयांच्या मनातून उतरलात साहेब, कुणाचा बाप वगेरे काढायला हा काही सिनेमा नाही, तुमच वाक्य आणिक कुणी म्हंटल तर? जीवे मारल असत लोकांनी …. मग आपला बाप तो बाप आणि लोकांचा काय? 

कुणी टीका केली कि लगेच हाणून (मारून ) नका पाडू , जरा आत्म परीक्षण करा, नवीन लोकांना विचारा (घरच्या नाही ), अजून थोडी असतील आजूबाजूला चाचपडून पहा. शत्रू कडून पण शिकण्यासारख असत हे ध्यानात घ्या आधी शत्रू कोण हे ओळखा … 

शिवेसेनेला जशी महराष्ट्राची गरज आहे तेवढीच महाराष्टाला सुधा अजून सेने ची गरज आहे. 

आपल नम्र 

सागर कुलकर्णी 










मा श्री देवेंद्र फडणवीस - एक पत्र

मा श्री देवेंद्र फडणवीस ,

      स न वि वि,

पत्र लिहिण्यास कारण कि गेल्या आठ  दिवसात तुमच्या बद्दल , कौतुक, आदर  जिव्हाळा, राग , चीड ह्या सगळ्या भावना मनात आल्या आणि आता नैराश्या आणि वैफ़ल्य आल आहे.

कौतुक ह्याच्या करता वाटल कि चांगला सुशिक्षित, हुशार , तरुण  आमच्यातलाच  एक,   आता मुख्य मंत्री झाला अस वाटल , म्हणजे लग्नात मुंजीत कुणाचा  भाचा काका असतो न , जो थोडा हुशार असतो आणि लोक म्हणतात अरे हा फडणवीस , हुशार आहे पुढे जाईल , बाइको बँकेत आहेत … चांगल कुटुंब आहे  वगेरे त्यातलाच वाटलात म्हणून जिव्हाळा  वाटला  (न ला न आणि ण ला ण म्हणता हे ऐकून सुधा खूप आनंद झाला ) तुमच्या मुलखाती मध्ये तुम्ही म्हणालात कि सत्ता ठेवण्या  साठी सत्ता नाही ठेवणार … अवडल होत आदर वाटला  आणि  खर सुद्धा वाटल होत तेव्हा.

जेव्हा सेनेला तुम्ही  उत्तर नाही दिल झुलवत ठेवलं तेव्हाही चांगल वाटल, हट्टी  मुलाला असाच धडा द्यायला हवा असा वाटल तेव्हा, पण काल अगदीच सगळ फौल ठरवल फडणवीस तुम्ही साफ अपेक्षा भंग. हुशार म्हणता म्हणता तुम्हाला बनवल कि , शेवटी पश्चिम महाराष्ट्र सरस ठरला , तुम्हाला बंदूक दिली चालवायला पण गोळ्या मात्र पवार साहेबान कडेच आहेत,  किती दिवस नुसत्या बंदुकीचा धाक दाखवणार  बे … आज न उद्या कळणारच लोकांना कि उगा फुका मारून राहिले हे  फडणवीस,……  रागावतील लोक

आम्हाला दिल्ली ची सत्ता नको होती म्हणून तुम्हाला निवडल , पण तुमच्या वर दिल्ली आणि  गुजरात दोघांची सत्ता , कस होणार आमच?  महाराष्ट्रच नशीब वाईट , त्या नारायाण राव पेशव्यांना मारला न  त्याचे  भोग अजून भोगतोय , त्या काळात फडणवीस होते , ज्यांनी दिल्ली  आणि इंग्रज ह्यांना समर्थ पणे तोंड दिल आणि राज्य राखलं, इथे तर तुम्ही दिली च  ऐकून अगदी राघोभांचाच आधार घेतला ,  अहो फडणवीस त्यांना सत्ता हवी आहे हे नाही लक्षात येत तुमच्या.  मला सुधा एवढ कळत आणि चीड येते.

आता वर्ष भरात निवडणुका होतील (तेही आमच्याच पैशांनी),  तुम्हाला  आमची  काय तुमची मत पण  मिळायची नाहीत पण त्यांना मात्र त्यांची मत मिळणार , पुन्हा तेच किमान दहा  वर्ष आमचे बारा वाजवणार  धरणात मुतणार मुंबईत हल्ले झाले कि वेड्यागत बोलणार शेत्कारांच्या आत्महत्या होतच राहणार, आणिक  शंभर  ठिकाणी टोल लागणार . तुम्ही फार फार तर लोक सभेत जाऊन एखाद मंत्रिपद घ्याल आणि धन्य व्हाल …. कधी कधी वाटत हा कट महाराष्ट्राला गुजरातच्या पाठी मागेच  ठेवण्याचा तर न्हवता ना ? नसेलही  पण नुकसान मात्र मराठी माणसाचच झाल  आणि त्यात फडणवीस तुमचा सिंहचा वाट असणार , (इथेच नको होता हो माझा महाराष्ट्र) आणि ह्याचे प्रतिसाद लोक सभेत हि उमटणार ….  उशः काल होता होता काळ  रात्र झाली . 

 देव करो, फडणवीस करो का तावडे करोत का आणि कुणी करोत , तुम्हाल सुबुद्धी होऊन आमचा अपेक्ष भंग टळो …हीच मी महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो.

आपला विनम्र

सागर कुलकर्णी

ता. क.

आता मुंजीत तुमच्या कडे बघून बोट दाखून लोक म्हणतील (मी सुधा ) हाच तो फडणवीस, गळ्यात घड्याळ घातलेला .

कुलकर्णी










सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

मनोज दादा

माला बहिणी जास्त  आणि भाऊ कमी, नाहीच म्हणा न आणि मोठा भाऊ तर एकच . लहान पणी सगळ्यां मुलांना आपल्याला एक मोठा भाऊ असावा अस वाटत  असत , म्हणजे काय कि वट मारता येते , कुणी आपल्याला दम देऊ शकत नाही, तोच आपला हिरो असतो तसा माझा लहान पणी पासून हा माझा मनोज दादा हिरो होता ......आहे

एक तर लहान पणा पासून त्याची बॉडी सोलिड होती आणी तो खूप हाण्ड्सम होता आता जरा केस पिकले म्हणून पण अजून तो देखणाच आहे.

मी इथे ठाण्याला येउन त्याची साइकल चालवायचो, निळ्या रंगाची होती , माझा पाय नीट पुरत नसे, मग मी  त्या चेन कवर वर पाय् ठेऊन चढायचो , साधारण पणे लोक डावीकडून चढतात मी उजवीकडून चढायचो , खोपडी उलटीच  आधीपासून ...माझी , तर त्या मुळे काय होइच कि ते कवर थोड दाबल जाईच , मनोज दादा ने मला एकदा सांगून पाहिलं पण मला काय ते डावीकडून जमल नाही आणि मी बरेच दिवस त्या चेन कवर वर पाय् ठेऊन चढायचो, पण तरी तो बिचारा मला कधी ओरडला नाही, ही तुमच्या करता खूप लहान गोष्ट असेल , पण  जेव्हा मी स्वतः साइकल घेतली तेव्हा मला जाणवल कि तो मला ओरडला नाही म्हणजे किती ग्रेट आहे ते आपली साइकल लहान पणी  एका मुलाला खूप प्रिय असते  आता कसा तो टयाब आहे तसा .....स्कूटर पण मी  ह्याचीच  शिकलो M 80 होती , मी इथे राहायला आलो कि फिरवत बसायचो, तेव्हा इथे एवढी वाहन न्हवती कि वस्ती  न्हवती , तो कामावर गेला तरी मी फिरवायचो ती  स्कूटर...

कामावरून आठवल कि माला आठवतंय तेव्हा पासून तो काम करायचा म्हणजे घरातल आणि फाक्टारीत जाउन  आज तो पन्नास  चा आहे म्हणजे गेली  पस्तीस एक वर्ष तरी तो कामच  करतोय , का ते मला नाही माहित पण माझ्या  आठवणीत ह्याची नाईट सेकंड किव्हा फस्त होतीच ....घरात त्याला कधी लोळताना मी पहिला नाही फक्त नाईट करून आला कि मात्र  आम्हाला आत्याचा धाक होता झोपलाय त्याला  उठू  नकोस अस सांगायची पण मला तो लहान पणा  पासून इथका आवडतो कि त्याला मी कधीच त्रास दिला नसता 

आमचा मनोज दादा क्रिकेट  खेळायचा , मला आठवत एकदा तो आमच्या कडे राहायला आला होता कारण त्याची दुसर्या दिवशी सकाळी ओवल ला म्याच होती , तो सीझन ने खेळणार ह्या कल्पनेनेच मी खूप खुश झालो मग त्यानी मला असा तोंडावर बोल टाकायला सांगीतला , बौन्सर  कसा खेळायचा ह्याची तय्यारी म्हणून ....


मी त्या  नंतर कित्तेक वर्ष आमच्या इथे सगळ्यांना  सांगायचो कि माझा भाऊ सीझन ने म्याच खेळतो म्हणून .... तसा मी लोकांना हे पण सांगायचो कि माझा भाऊ काय सोलिड स्कूटर चालवतो म्हणून ... तो सोलीडच आहे  त्याने माझ्या समोर कधी सिगारेट नाही ओढली कि कधी तमाबाकू नाही खाल्ला कि कधी काही नाही केल ....हे मला खूप महात्वाच वाटत , कारण तो करेल तस मी केल असत ...कारण तो माझा हिरो होता ...पण तो हिरो सारखच वागला  


तो   कायम हसत असतो कधी कावलेला चिडलेला मी नाही पहिला कुणावर  डाफरला नाही कि शिव्या दिलेला मी तरी पहिला नाही ....एकदा आम्ही म्हणजे मी बीना ताई आणि हा गाडीने बडोद्याला जात होतो  लग्न असेल बहुदा  .....गाडीत चढलो तेव्हा काही लोक  आधीच आमच्या सीट वर बसले होते  ....आणि थोडे  सरकून बसा म्हणाले , आता काय कराच हा प्रश्न पडला त्याना सांगून बघितल तरी ते निर्लज्ज पणे तसेच हसत होते ...मग मला  मनोज दादा म्हणाला कि तू थांब  बघतो आणि त्याना जबर दम दिला आणी उठा नाहीतर बघा  काय करेन ते ....उठले ते आणि आम्ही  बसलो निट  .....आणिक एक हिरो च काम


त्याच्याकडे त्या काळी म्हणजे बघा साधारण पणे तीस एक वर्षा पूर्वी फिलिप्स चा एक मुझिक प्लेयर होता त्या काळी दहा हझाराचा असेल …. मला जाम आवडायचा मोठे स्पीकर आणि amplifier वगेरे होता , एकदम ढासू , म्हणजे तो तुम्हाला आत्ता काटकसर करताना दिसत असेल पण तो खूप हौशी आणि दिलदार आहे …कारण तो एक अर्टिस्त आहे , तो एक उत्तम तबला वादक आहे   … माला आठवत तेव्हा  पासून तो तबला वाजवायचा अगदी कोटन ग्रीन ला असल्या पासून , मग कुणी त्याला म्हणायचं कि अरे मनोज जरा दादरा वाजून दाखव रे ,  मग मी ही एकदा म्हणालो होतो कि आता  बोरीवली वाजून दाखव …. आणि मग सगळे खूप हसले होते …. आता पण त्याला बसवा एकदम सही  वाजवेल …

एके  दिवशी  सगळ्यांना सारख त्याचा लग्न झाल , मानसीने पण त्याला  चांगलीच साथ साथ दिली , पण आत्ता विषय माझ्या मनोज दादा चा आहे… तो नोकरीशी इतका एक निष्ठ आहे म्हणजे बाइको शी तर असणारच

लग्नात तो सफारी सूट घालणार आहे अस मला म्हणाला …. बापरे मी जरा टरकलोच , कारण त्याने सुट  घालावा अस आम्हाला वाटत होत पण तो काही केल ऐकेना , मग दीदी आली आणि तिला मी सांगितल , त्याला काय बोलली ती कुणास ठाऊक पण तो सुट घालायला तय्यार झाला (तस आमच्या कडे  सगळेच दीदीच ऐकतात ) आणि नेहमी पेक्षा लग्नात जास्त देखणा दिसला   …. लग्नात त्याला सफारी का घालायचा होता कुणास ठाऊक?

लग्ना नंतर त्याने अफाट  संकटांना  तोंड दिलय, त्याने ज्या प्रेमाने आणि आस्थेने आपल्या  आई वडिलांची काळजी घेतली … घेतोय तशीच त्याने मानसीच्या आईची आणि वडलांची घेतली …घेतोय , मानसी च्या बहिणीच त्या दोघांनी इतक केल आणि ही गोड निकिता तर त्यांची सक्खी  मुलगी वाटते , मानसी तर तिची मावशीच आहे …. तीच खूप कौतुक आहेच पण नवराच्या पाठीम्ब्या शिवाय ती हे करू शकली असती का? किती प्रेमाने करतो तीच अगदी मांडीत पण घेऊन बसतो तिला , हल्ली जग पाहिलं न कि मग ही लोक (म्हणजे  माझा हिरो आणि त्याची बाइको ) किती मोठी  आहेत ते कळत , पण  हा वारसा त्याला आत्या आणि भाऊन कडून आलाय श्रीराम ला पण आत्या ने खूप  वर्ष सांभाळला त्याच्या भावा करता काय काय पाठवायचे … तेच ह्याने पाहिलं आणि मुख्य म्हणजे आचरणात आणल हे महत्वाच.

गणपती ला अजून दहा दिवस सुट्टी घेतो हा … त्या काळी आम्ही घरीच आरास करायचो … रात्र भर जागून तो थर्माकोल कापून दिवे लाऊन काहीतरी करायचोच … आम्ही म्हणजे मी सोडून …. कलेचा आणि माझा दूर पर्यंत संबंध नाही …. दीदी काही तरी करायची आणि बाकी सगळे तिचे हेल्पर … पण मजा यायची , दीदी, बीनाताई  आणि मनोज दादाने आणलेले दिवे अजून नीट  ठेवेल आहेत त्याने …. ते दिवे आणून आता तीसेक वर्ष झाली असतील :) , तो जशी नाती जपतो तश्या वस्तू सुधा जपतो.   दिवाळीत बहिणीं कडून अगदी रगडून घ्याचा तेल मग सगळ्या बहिणी जोर लगाके हय्या  करायच्या …मजा यायची , तोच काय त्याने आज पर्यंत त्रास दिला असेल बहिणींना

त्याने गेल्या वर्षी गाडी घेतली तेव्हा मी खूप खुश झालो (त्याने मला कळवल न्हव्त गाडी घेतली ते पण असो ) कारण तोच एक राहिला होता …   बाकी सगळ्यान कडे गाडी होती .  त्याला बिचाऱ्याला कष्टातून फुरसत मिळाली तेव्हा त्याने गाडी घेतली .

मानसी ने त्याला साथ दिलीच पण त्याची मुल पण अगदी गुणी आणि हुशार   निघाली, हे फारच छान झाल , शेवटी कर भला तो हो भला …सचीन तेंडूलकर कसा वकार च्या बाउन्सर ला धडाधड फ़ट्कावायचा तसा हा त्याच्या आयुष्यात ला संकटाना फटकावतो …. ते पण अगदी धीराने , आता मी काय त्याने तोंड  दिलेल्या संकटांची उजळणी करत नाइये नाहीतर दोन पान त्यातच जातील … पण त्याच्या एवढ समर्थ्य मला लाभाव अस नेहमी वाटत

पण मला अस वाटत कि त्याने थोड पिचर ला वगेरे वेळ काढून जाव मॉल मध्ये फिरावं  एखादा संगीताचा कार्यक्रम पहावा , खूप कष्ट केले आता थोड दमान घ्याव ….

त्याने जेवढ सोसलं आणि निभावल तोच त्याचा जाणे , मला तर ते अशक्यच होत , त्याच्या पुढल्या आयुष्यात खूप खूप आनंद यावा आणि त्याचे कष्ट संपून जावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना …